पाऊस….(19600)


मित्रांनो, निसर्गाच्या नियमानुसार ७ जून ला सुरू झालेला पाऊस चार महिने म्हणजे आतापर्यंत तो थांबायला हवा होता. पण ऑक्टोबर ही संपायला आला.दिवाळी ही आता आली पण तो काही केल्या थांबत नाही. मागील आठवड्यापासून दररोज पाऊस सुरू आहे.

आज दिवाळी लक्ष्मी पूजन पावसातच होईल असे दिसतेय. काल पण असच होत वातावरण. बर तो काही येथेच आहे असे नाही. सर्व दूर आहे. आता तर अतिच झाले आहे. शेतातील पिके खराब व्हायची पाळी आली आहे. नको नकोसा झाला आहे तो आता.

सूर्याच्या म्रुग नक्षत्र प्रवेशापासून पाऊस सुरु होतो. यावेळी वाहन होते उंदीर. नंतर आर्द्रा-हत्ती, पुनर्वसु- मेंढा, पुष्य- गाढव,आश्लेषा-बेडूक, मघा-उंदीर, पूर्वा- घोडा, उत्तरा- मोर.

मी मागच्या काही वर्षांपासून निरिक्षण करतोय कि पाऊस जवळजवळ डिसेंबर पर्यंत मजल मारतो. मी याचा उल्लेख बर्याच पोस्ट मधे केला आहे कि निसर्ग आपले रंगरूप बदलतो आहे. आपल्याला ही आता त्याच्या सोबत रहावे लागेल. शेतीत बदल करावा लागेल.

अक्षरशः ऑगस्टच्या मध्यावर पावसाळा आला आहे असा भास होतोय आकाशाकडे पाहिल्यावर. ऋतूच कळत नाही सद्दस्थितीत.

असो. पण आता बस कर रे बाबा. तू आता जा. असे म्हणायची वेळ आली आहे.

💐💐💐💐💐💐💐💐

💐💐 “शुभ सकाळ”💐💐

तुम्ही कोणासाठी कितीही केले, तरी ते कोठेतरी कमी पडतच
जगातल कटु सत्य हे आहे की “नाती” जपणाराच नेहमी सर्वांपासुन दुरावला जातो..

😍शुभ सकाळ 😍