कधी कधी…

कधी कधी शांतच राहणं खुप गरजेचं असतं..
आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नाची उत्तरे मागायची नसतात..
कारण ओंजळीत पाणी तर पकडू शकतो….

पण टिकवून नाही ठेवू शकत…

🌹🌹शुभ सकाळ 🌹🌹

(19637)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.manachyakavita.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

गर्व..💐

लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी
आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी
किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं शिखर चढण्यासाठी
क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी
💐💐शुभ सकाळ💐💐

(19636)

(व्हाट्सएपच्या माध्यमातून प्राप्त एक अप्रतिम संदेश.)

चुक……

🌻🍁🌻🍁🌻🍁🌻🍁
या जगात सगळ्या
गोष्टी सापडतात,
पण स्वतःची चुक
कधीच सापडत नाही.
आणि ज्या दिवशी
ती सापडेल त्या दिवसापासून
आयुष्य बदलून जाईल.

(19635)

🌹☕ शुभ सकाळ ☕🌹
🌻🍁🌻🍁🌻🍁🌻🍁

(व्हाट्सएपवर प्राप्त संदेश)

🌸🌹 शब्दगंध🌹🌸

✍🏻…..जीवनात उत्तम मित्र, योग्य रस्ता, चांगले विचार, उच्च धेय आणि अंगी नम्रता,
या पाच गोष्टी पाच बोटाप्रमाने असतात आणि सर्वच जुळून आल्या तर वज्रमुठ तयार होते.
आणि याच वज्रमुठीची ताकत माणसाला यशाकडे घेऊन जाते.

(19634)

💐 ☕🙏 शुभ सकाळ🙏☕ 💐

(व्हाट्सएपवर प्राप्त संदेश)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.koshtirn.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

प्रगती

स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल

पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको,

ही भावना ज्या माणसाजवळ असते तोच माणूस योग्य अशा प्रगतीच्या वाटेवर असतो.

(19633)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

🙏शुभ प्रभात🙏

(व्हाट्सएपवर प्राप्त संदेश)

http://www.manachyakavita.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

टाईम इज मनी.

“टाईम इज मनी” हे शिर्षक मुद्दामहून इंग्रजी भाषेतच ठेवले आहे. कारण याला मराठीत काय लिहिणार हे सूचलेच नाही.वेळ म्हणजे पैसा किंवा वेळ म्हणजे धन असे अर्थ लावून बघितले पण मूळ इंग्रजीतच योग्य वाटला.

“टाईम इज मनी” हे लहानपणापासून सतत ऐकत आलोय. पण समोरच्या व्यक्ती ला आपल्याला नेमके काय सांगायचे आहे हे कधी कळले नाही. अर्थात ते लहानपण होते म्हणून. नंतर यावर कधी विचारच केला नाही.

पण हल्ली वेळच वेळ आहे. तब्येतीमुळे घरीच असतो.म्हणून काही तरी वावगं दिसलं कि लिहायला घ्यावे.

सोनी एप्प मी मोबाईल वर डाऊनलोड करून घेतली आहे. कोणतीही सिरियल बघायची असेल तर त्यावर बघता येते.

आता तुम्ही म्हणणार त्याचा काय संबंध?

अहो, त्या एप्प वर जेव्हा सिरियल चे इपिसोड बघतो. तेव्हा जाहिराती दाखविल्या जातात. त्या किती वेळेच्या असतात कधी विचार केला आहे का? त्या एप्प वर जाहिरातींची वेळ असते १० ते २० सेकंद. पण त्यावेळी तो काळ डोंगरा एव्हढा वाटतो. का कुणास ठावूक पण जेव्हा पासून टिव्ही आला आहे तेव्हापासून प्रेक्षकांना नेहमी जाहिरातींचा तिटकारा येत आलाय. लहान मुल असो कि म्हातारा माणूस (मी मला म्हातारा म्हणत आहे बर का! नाही तर उगाच कोणी मनात राग धरून बसेल ) जाहिराती कडे नेहमी दुर्लक्षच करतो. मलाही १०-१५ सेकंदाच्या जाहिराती खूप कष्टाने झेलाव्या लागतात.

आपण उशिरा येण्यामधे किंवा वेळेला महत्त्व न देण्यासाठी जगप्रसिद्ध आहोतच. आपले नट यासाठी प्रसिद्ध असल्याच्या बातम्या येत असतात. असो.

पण सेकंदाला किती महत्त्व आहे हे टिव्ही, रेडिओ, मोबाईल यावरील जाहिरातींद्वारे सिद्ध होते. हे सर्व उद्योग या जाहिरातीच्या उत्पन्नामुळेच चालतात.

म्हणून म्हणतो, मित्रांनो वेळेचे महत्त्व ओळखा.

(19632)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

कौतुक हा शब्द खूप छोटा आहे पण ते करायला मन मात्र मोठं लागतं.💐💐

💐💐शुभ सकाळ💐💐

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

पाऊस आला मोठा आणि…

पाऊस येत नाही येत नाही करतात न नेहमी म्हणून तुम्हाला चांगला धडा शिकवतो आता असे तर वरूण राजाने ठरवले नसेल न यावर्षी.

त्यामुळे आता बाजारातील परिस्थिती फार वाईट आहे. मला वांगी आवडतात. पण बाजारात वांगीच नाहीत. मागच्या आठवडाभरापासून शोधतोय. जे आहेत ते शिळे व भाव रु. ३०/-पाव किलोला. विचारले तर म्हणतात यावर्षी वांग्याचे पिकच नाही. शेवटी आठवडे बाजारात मिळाले. बरे होते म्हणून घेतले. भाव तोच. पालेभाजीचे ही तसेच अगदी खराब झालेल्या भाज्या येत आहेत. तरीही भाव जास्त असतो.

दोन तीन दिवसापूर्वी वर्तमानपत्रात वाचले होते “कांद्याला शतकातील उच्चांकी भाव.आवक निचांकी” याला जवाबदार कोण तर वरूणराजाच न!

पण देवाने विश्व निर्मिती पासून वन वेच ठेवला आहे. सर्व सुख-दुःख तो आपल्याला देऊ शकतो. सुखामधे धन्यवाद ही देऊ शकत नाही कि दुःखा मधे भाडू ही शकत नाही. तुम्ही कधी भांडताना पाहिले आहे का कोणाला देवाशी. ते सिनेमात दाखवतात ते काल्पनिक असते. खरी कोणाची तरी हिंमत होईल का देवासमोर जाऊन भांडायची.

म्हणून मी म्हटले आहे, “पाऊस आला मोठा आणि करून गेला तोटा.”

असो आलिया भोगाशी……

(19631)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

थांब सखे…..

थांब सखे शोधून दे मला

हरवलेले हृदय माझे,

तू पाहिले आहेस का

ते घायाळ हृदय माझे?।।

मला वाटते हृदयात
तुझ्या कुठेतरी कोपर्‍यात

लपवून ठेवले असावेस तू।।

थांब सखे दिसले मजला

पारदर्शी हृदय तुझ्या

लपवून ठेवलेले ते

जख्मी हृदय माझे।।

तुझ्याच नाजूक हातांनी

काढून देशिल का सखे

मला तू तूझ्या

हृदयातून तूच लपवून

ठेवलेले हृदय माझे।।

(19630)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

माझी कविता

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

नाती….

जग किती वर गेले आहे. म्हणजे पुढे हो. जग वर कसे जाणार? माझा सांगायचा अर्थ असा कि चंद्र, मंगळ पर्यंत जाऊन झाले आहे. आणि आता गुरू आणि शुक्रावर जायची तयारी सुरू आहे. इतकेच काय परवा टिव्हीवर बातमी ऐकली कि आपल्या इस्रोच्या वैज्ञानिकांनी सूर्यावर जायची तयारी सुरू केली आहे. अर्थात सूर्यावर जाणे शक्य नाही पण त्याच्या जवळपास जाणार व तेथूनच त्याचा अभ्यास करणार.

या आधुनिक युगात असे झाले आहे कि लांबचे जवळ येत आहेत व जवळचे लांब जात आहेत. सांगायचा तात्पर्य असा कि नाती हरवत चालली आहेत कि काय? असा सतत भ्रम होत असतो.

जेव्हा अतिव्रुद्ध जागोजागी एकट्याने बसलेली दिसतात, तेव्हा तर हे प्रकर्षाने जाणवते.

पुणे हे सेवानिवृत्तांचे शहर म्हणून प्रख्यात आहे. तशी पुण्याची ख्याती इतर अनेक बाबतीत ही आहेच. पुण्यात वयोव्रुद्ध व शिक्षण घेणारे विद्यार्थी/विद्यार्थीनी हेच सर्व परिसरात नजरेस पडतात.

असे म्हणतात कि “अक्षरांच्या ओळी सारखी माणसांची नाती असतात, ती
गिरवली तर अधिक लक्षात रहातात.” पण हल्ली कोणी गिरवायला तयार नसते. क्षणिक कामापुरते बोलायचे बस! सतत संपर्कात राहिले तर गिरवल्यासारखे होते व नाती जुळत जातात. पण तितका वेळ नसतो कोणाकडे ही. कामाच्या व्यापात व्यग्र असल्याने कुठे जाणे येणे शक्य होत नाही. ही गोष्ट मान्य करायला च हवी सर्वांनी. त्यात स्मॉर्टफोन ची व कालांतराने सोशल मीडिया ची भर पडत गेली आणि मग माणसाची अवस्था शोले मधील जेलर सारखी झाली. ऑफिस ची कामें आणि सोशल मीडिया या दोन्हीमधेच त्याने अर्धा अर्धा वेळ वाटून दिला असल्याने परिवारातील सदस्यांना द्यायला वेळच शिल्लक नाही.

काल्पनिक जगात विवरतांना आपलं सर्वस्व विसरून गेला आहे बिचारा☺️☺️

(19628)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

इतरांचे दोष आपल्याला लगेच दिसतात, त्यापेक्षा स्वतःचे दोष व इतरांचे गुण शोधत राहणेच अधिक बरे.

💐💐🙏 *शुभ प्रभात* 🙏💐💐

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

ए-2 दुध…

ईश्वराने ब्रम्हांडाची निर्मिती करतांना प्रत्येक बाबींचा बारकाईने सखोल अभ्यास केलेला आहे. नवनिर्मितीची म्हणजे नवउत्पत्तिची सुद्धा काळजी केली आहे. नवजात मग मानव असो अगर प्राणी त्याला भरत पोषणासाठी खाद्य म्हणून आईपासून दुधाची व्यवस्था त्याने करून ठेवली आहे.

लहानपणी दूध हे गावात गाई म्हशींच्या गोठ्यात मिळत असे. मी लहान होतो. ३री मधे होतो तेव्हा आमच्या घराहमोर गोठा होता. तेथील दूध घरोघरी वाटायचे काम मला मिळाले होते. गरिबी मुळे त्याकाळी घरातील प्रत्येकाला काही तरी काम करून घराला हातभार लावावा लागत असे. मी केलेल्या कामाच्या बदल्यात आम्हाला दररोज पाव लिटर चहा साठी मिळत असे. त्यामुळे पिण्याचा प्रश्न उदभवत नाही.तो काळ होता १९६८-६९ चा.

पण क्वचित कधी चव चाखायला मिळाली तर ते दूध खरोखरच “क्षीर” असायचे. जसजसा काळ बदलला, जनावरांना चारा मिळेनासा झाला. नंतर त्या मोठमोठ्या गाई आल्या. आणि रयाच गेली.

हल्ली एक वेगळे दूधाचे नाव ऐकायला येत आहे. ए -२ दूध. किंवा गीर गाईचे दूध. हे कोणते दूध

असते याचा विचार कधी केला नाही. मध्यंतरी सौ. म्हणाल्या ते दूध खूप छान असते असे ऐकले आहे.

अचानक एके ठिकाणी बोर्ड दिसला. मग एकदा आणायचे ठरवून गेलो. भाव दुप्पट होता. तरीही घेवून बघु म्हणून घेतले. घरी आणल्यावर स्वाद घेऊन पाहिला. तर गोड व स्वादिष्ट वाटले. लहानपणी ची आठवण आली.

दुसर्यांदा ४-५ दिवसांनी परत गेलो. तेव्हा तुपाचा तपास केला तर भाव ऐकून चाट पडलो. काय भाव असेल कल्पना कराच तुम्ही. किती म्हणाला ६००/- ८००/- १०००/- १५००/- २०००/- २५००/- कल्पना नाही न करू शकत. अहो रू. ३०००/- एका किलोला. मी बेशुध्द पडत होतो पण सावरले स्वतःला.☺️.कदाचित मी चुकीचे ऐकले असावे. पुन्हा एकदा खात्री करून घेईल.

आज इंटरनेटवर ए-२ दूध काय असते तेव्हा हजारों लिंक्स उघडल्या गेल्या. खोलवर तपास केला तर हे भूत बाहेरून आले आहे. पाश्चात्य देशांमध्ये ए-२ दूधच वापरतात. आपले साधे दूध हे ए-१ ग्रेड चे असते. म्हणजे जर्शी गाई आपल्याकडे त्यांच्या कडून आल्या. आणि आपल्या कडील देशी गाई ते घेऊन गेले. आता आपण पुन्हा देशी गाईंकडे वळायला लागलो.

मित्रांनो, हे निसर्ग आहे. जगात बदल हा हवा असतोच. एकाजागी स्थिर राहिलो तर जगरहाटी चालणार नाही. म्हणून हे चक्र फिरत राहायला हवे.

फेशन सुद्धा अशीच परत फिरून येते.

(19627)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

काम केल्याने माणूस मरत नाही तो आळसानेच मरतो.

💐💐💐💐सुप्रभात💐💐💐💐💐

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐