वर्ष समापन….एक पर्व

काका नेहमी प्रमाणे खांद्याला कापडी पिशवी टांगून जवळच्या किराणा दुकानात शिरले. (प्लास्टिक पिशव्या बंद झाल्या पासून पेंटीच्या खिशातील पिशवीने काकांच्या खांद्याचा ताबा घेतला आहे.)

“काका, काय हवय तुम्हाला?.” दुकानदाराने आदराने विचारले.

“अरे बाळा, घरच्यांनी काही तरी सांगितले आहे रे. पण नेमके नाव लक्षात येत नाही. ते काय झालं मी घराबाहेर पडलो आणि मित्राचा फोन आला. बोलण्याच्या नादात विसरलो.”

“होत काका, वय झाल्यावर असं होत.”

“अरे काय बोलतोय तू. कसल वय कोणाचे वय. उगाच माझं वय काढून म्हातारा झाल्याची आठवण करून देऊ नको.”

“बर काका. सॉरी.”

“तस नाही रे. म्हातारा झालोय अशी जाणीव झाली न कि उठता बसता येत नाही मला. थकल्यासारखे वाटते. मी थकलो तर घरची कामं कोण करणार. मुलं काय दोन दिवसांची पाहुणी असतात. लगेच परतणार आहेत़.”

बेचारे काका. त्यांचा तो रडवेला चेहरा बघून दुकानदाराने विषय बदलला.

“काका आठवा. नक्की आठवेल बघा. दोन मिनिटे बसा तुम्ही.”

“अरे हो, तो हिमालयामधील डोंगर आहे न…”

“अहो काका, डोंगराचा आमच्या दुकानाशी काय संबंध?” दुकानदार.

“अरे थांब न जरा. मला आठवतंय.” काका.

“$$$” म्हणजे दुकानदार तुमच्या कडे टक लावून बघत आहे.

“अरे बाळा, आज वर्ष अखेर म्हणजे ३१ डिसेंबर असल्याने घरी वडा सांभारचा बेत आहे. त्यासाठी ते काय लागतं …..” काका बोलले.

“अहो काका, आता ओळखलं बघा.” तुम्हाला मी सांगतो काय हव आहे ते….”

दुकानदाराचे वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच काका म्हणाले “अरे हो, आठवलं मला.” काका, मधेच बोलले. त्यांच्या चेहर्यावरील अत्यानंद बघून दुकानदार थांबला.

“काका…..” काका, थबकल्याने शेवटी त्याने विचारण्यासाठी तोंड उघडलं.

“आता आलं होतं रे तोंडात. अचानक गेलं परत.” काका पुटपुटले.

“एव्हरेस्ट….” काका लहान मुलासारखे एकदम ओरडले.

“काका, एव्हरेस्टचा मसाला सांगितला असेल तुम्हाला.” दुकानदाराने सुद्धा ओळखले. व त्याने ही तितक्याच जोमाने ओरडून काकांना सांगितले.

“हो हो, तेच ते. देतोस न बाळा!!” काकांना आठवल्या मुळे ते अतिशय आनंदात होते.

“हे घ्या काका!” दुकानदार सुद्धा खुश झाला. त्याने सुटलो एकदाचा म्हणून सुस्कारा सोडला.

“पण काका, काय हे. तुम्ही मोठी माणसं. आणि आज नववर्षाच्या स्वागतासाठी काय तर वडा सांभारची पार्टी!! नाही, आपल सहज बोललो.” काकांचा लालेलाल होत जाणारा चेहरा बघून दुकानदार भांबावला.

“तुला काय करायचं आहे. तु आपलं काम कर. ते बघ ग्राहक आलय.” असे बोलून काकांनी काढता पाय घेतला. त्याला ही तेच हवं होतं.

“अहो$$$ काका$$$ नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.👍👍💐💐”

दुकानदार ओरडून म्हणाला. काकांना ऐकायला आले असावे. कारण त्यांनी त्याला हात हलवून प्रतिसाद दिला.

असो. मित्रांनो, तुम्ही अशी कंजूसी न करता आज छान मजा करा. आणि नववर्षाचे दिलखुलासपणे स्वागत करा.

सर्व मित्रमंडळी व तुमचे कुटुंबीय, आप्टेष्ट सर्व नातेवाईक सर्वांना नववर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.

(19668)

💐👍💐👍💐👍💐👍💐👍💐👍💐👍💐

आयुष्याने शिकवलेलं एक वाक्य…
“जिंकलो तर आवरायचं आणि हरलो तर सावरायचं…”

💐💐सुप्रभात🌼🌼

👍💐👍💐👍💐👍💐👍💐👍💐👍💐👍

http://www.rnk1.wordpress.com

💐👍💐👍💐👍💐👍💐👍💐👍💐👍💐👍

विशिष्ट बातमी

सौजन्य:सकाळ वर्तमानपत्र

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

माणसे….

“परिस्थिती”प्रमाणे “बदलणारी माणसे” सांभाळण्यापेक्षा;
परिस्थिती “बदलविणारी” माणसे सांभाळा ………
आयुष्यात कधीही अपयश “अनुभवायला” मिळणार नाही

🙏🙏शुभ सकाळ🙏🙏

मित्रांनो, किती छान शब्दबद्ध संदेश आहे न हा! खरच जगात अशी माणसे असतात जी तुमच्या परिस्थिती नुसार बदलतात. अगदी जवळची सुद्धा. जवळची कशाला सगी सुद्धा बदलतात. तुम्हाला चांगले दिवस असले कि ते जवळ येतात. जशी तुमची परिस्थिती बिगडली किंवा कामाधंद्यात काही अडचण आली किंवा आजारपण आलं कि ती अंतर ठेवायला लागतात. उगाच अंगलट येईल आपल्या. त्यापेक्षा थोडे अंतर ठेवून राहिलेले बरे. असे त्यांचे विचार असतात.

काही माणसे तर अशी ही असतात कि त्यांची स्वतः ची परिस्थिती बदलली कि ते अंतर ठेवायला सुरुवात करतात. जशे त्यांना काही अडचण आली कि तुम्हाला त्रास कशाला द्यावा म्हणून ते तुमच्या पासून लांब जातात. किंवा तुम्हाला कशाला त्रास म्हणून आजारपणा विषयी सांगत नाही. मदतीला बोलवत नाही. अशा ठिकाणी आपण स्वतः हून मदतीला गेलेले कधी ही चांगले.

पण माझ्या मते पहिल्या प्रकारच्या माणसांपेक्षा कधीही दुसर्या प्रकारची माणसे चांगली असतात.

आणि तिसर्या प्रकारची माणसे तर वेगळीच असतात.

ती माणसे परिस्थिती बदलवतात. ती तर भारीच असतात. अशी माणसे कधी ही तुम्हाला सोडून जाणार नाहीत. आणि तुम्ही ही त्यांना सोडू नका.

(19667.)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

भारतीय ग्रँडमास्टर कोनेरू हंपी ही मास्कोतील स्पर्धेत जगज्जेती ठरल्याबद्दल तीचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन

फोटो सौजन्य:सकाळ पेपर

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.rnk1.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

स्वप्नात पाहिले मी….

स्वप्नात पाहिले मी….😔

तुझ्या केसांची ती सुंदर लट

त्यामधे मळलेले ते सुंदर फुल🌻🌼

मळलेले असले तरी ते

सुंदर व सुवासिक फुल🌻🌼

आकर्षित करून घेत होते

दुरुनच माझ्या मनाला

मोहित करून घेत होते

अचानक रवि उदयाची🌞

चाहूल लागून जाग आली🌞

आणि स्वप्न भंग पावले.

कवि: रविंद्र “रवी ” कोष्टी

(19666)

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

🌻🌻 शुभ सकाळ 🌻🌻

*आयुष्यातल्या असंख्य समस्यांची,फक्त दोनच कारणं असतात एकतर आपण विचार न करता कृती करतो,किंवा कृती करण्याऐवजी,फक्त विचारच करत बसतो…………..!!!*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

http://www.manachyakavita.wordpress.com

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

तुहिन….☁💨🌬

“तुहिन” वाचून काही कळत नसेल न मित्रांनो. हा बर्फाला पर्यायी शब्द आहे. हिम सारखा.

काल टिव्हीवर बातमी बघितली कि या वर्षी ठंडीने दिल्लीत ११८ वर्षाचे आपलेच रिकॉर्ड तोडले. खर म्हणजे ठंडी जास्त असली तर काहीच तोडता येत नाही माणसाला, थिजलेले असते न! पण हा माणूस नाही ठंडी आहे. काय तोडेल याचा नेम नाही. बादल्या तोडते, बाटल्या ही तोडते, नळ पण तोडते हो. मायनस तापमान असते न तेथे पाणी बाटलीत भरलेले असेल तर त्याचा बर्फ होतो व आकारमान वाढल्याने बाटली फुटते. कांचाची बाटली असेल तर हमखास फुटते. प्लास्टिक ची असेल शक्यता कमी असते. कारण त्या बाटलीचा आकार वाढू शकतो. असो.

पण ११८ वर्षाने दिल्लीत या महिन्यातील तापमानात चे रिकॉर्ड तोडले गेले आहे. अद्याप जानेवारी व फेब्रुवारी शेष आहेत. त्या महिन्यात काय होईल?

बातम्यांमधे हिमालयातील वातावरणाची माहिती ही सांगितली बर का! काही ठिकाणी तापमान उत्तर ध्रुवापेक्षा किती तरी जास्त आहे. मायनस ४०डिग्री. बाप रे. लोकांना जगणे कसे शक्य आहे. आपल्याकडे तर ७-८ डिग्री मधेच आपण गारठून जातो. बातम्या ही येतात अति ठंडीने मरण पावल्याच्या. मग तिकडची माणसे कशी जगत असावी!

चोहीकडे बर्फच बर्फ. वरील चित्रं हिमालयातील नाही पण बर्फाळ प्रदेशातील आहेत. गुगलवरून घेतली. गुगल बाबा ग्रेट आहेत. काही ही विचारा अचूक मिळतेच.

(19665)

☁☁☁🌬🌬💨💨💨🌬💨💨

☁🌬🌬💨💨

“नाती” आणि बर्फाचे गोळेे एक सारखेच असतात. ज्यांना बनवणं सोप पण टिकवणं खूप अवघड असतं. दोघांना वाचवण्यासाठी फक्त एकच उपाय.

“कायम शीतलता ठेवा ” !

🍃🍁🌷शुभ सकाळ🌷🍁🍃

🌬☁☁☁🌬🌬💨💨💨🌬💨☁🌬🌬💨💨
http://www.rnk1.wordpress.com

🌬☁☁☁🌬🌬💨💨💨🌬💨☁🌬🌬💨💨

सूर्यग्रहण

मित्रांनो, जेव्हा पासून हे ब्रम्हांड हे विहंगम विश्व निर्माण झालं असेल तेव्हा पासूनच पृथ्वी, सूर्य, चंद्र व इतर ग्रह हे अविरत फिरत आहेत. सूर्य व पृथ्वी यांच्या मधे जेव्हा चंद्र येतो तेव्हा चंद्राची पडछाया किंवा सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास सावली पृथ्वीवर पडते. त्यामुळे पृथ्वीच्या ज्या भागात चंद्राची सावली पडते, तेथील रहिवाशांना सूर्य पूर्णतः किंवा अंशतः दिसत नाही. तेव्हा सूर्यग्रहण झाले असे समजले जाते.

(सौजन्य: गुगल)

ही एक नैसर्गिक क्रिया आहे. पण सूर्याच्या प्रखरतेला अडवून पृथ्वीवर सावली पाडणे तितकेसे सोपे नाही. सूर्याचे प्रचंड तापमान असल्याने जेव्हा तो प्रकाश अडवला जातो तेव्हा आपण गडद सावलीत असतो आणि म्हणून मोकळ्या भागातून येणार्या प्रकाशाची प्रखरता आपल्याला कित्येक पट वाढल्यासारखी वाटते. ही साधी गोष्ट आहे. रात्री अचानक लाईट गेली कि सर्व दूर अंधकार पसरतो. अर्धा एक तास लाईट आली नाही कि आपले डोळे अंधाराला अडजस्ट झालेले असतात. आणि अचानक लाईट आली कि डोळे दिपतात. पटकन आपण डोळे बंद करून घेतो. हे ही तेच आहे. चारही बाजूंनी अंधकार असताना प्रकाश डोळ्यांवर पडला डोळ्यांना त्रास होतो. तसाच हा त्रास होतो.माझ्या मते पूर्वी विज्ञान इतके प्रगत नव्हते. आणि वैज्ञानिक विचार मांडणार्यांना वेडं समजल जात असे. गेलीलिओचे उदाहरण आहेच डोळ्यासमोर. म्हणून लोकांना अपाय हे डायरेक्ट सांगण्यापेक्षा इनडायरेक्ट सांगितले तर घाबरतील तरी असा विचार झाला असावा. म्हणून ग्रहण काळात खाऊ पिऊ नये असे सांगितले गेले असावे. असे मला वाटते.पण आपल्या कडील खगोलशास्त्र किती प्रगत होते व आहे कि कोणत्या दिवशी किती वाजेला किती मोठे व कोणत्या ठिकाणी दिसेल हे अचूक कसे सांगता येत असेल?

(व्हाट्सएप ग्रुप मधून प्राप्त )

मी लहान असताना पासून बघतोय. पंचांगात सर्व दिलेले असते. म्हणजे हे पंचांग शास्त्र त्याची गणना खरच काही उपकरण नसताना इतके प्रगत कसे झाले असावे? असो. हा संशोधनाचा विषय आहे.पण आता या २१व्या शतकात आपण किती प्रगत आहोत कि घरी बसल्या बसल्या आपल्याला टिव्हीवर जगभरात कोणत्या ठिकाणी सूर्य ग्रहण कसे व किती वेळ दिसले हे अक्षरशः लाईव्ह दिसते.

(व्हाट्सएप ग्रुप मधून प्राप्त फोटो )

खरच आपल्या साठी हे टिव्ही वाले महाभारतातील संजयच आहेत असे वाटते. संजयने महाभारत युद्धाचे लाईव्ह प्रसारण घरात बसून राजा धृतराष्ट्र यांना सांगितले होते. त्यांना कसे दिसत असावे? धृतराष्ट्रला युद्धाचे सजीव वर्णन ऐकवण्यासाठीच व्यास मुनिंनी संजयला दिव्य दृष्टि प्रदान केली होती. धृतराष्ट्रला सम्पूर्ण महाभारत युद्धाचे साँगोपांग वर्णन संजयने ऐकवले होते.

लहानपणी आम्ही मुल मुल गप्पा करत असायचो. एक गोष्ट मला आठवते. अशी काही लोकं असतात कि ज्यांना विशिष्ट विद्दा विदित असते. ती म्हणे अंगठ्याला काजळ लावतात व त्यात तुम्ही सांगाल त्या व्यक्तीचे चित्र चित्रपटासारखे सजीव दाखवतात. ऐकायला गंमत वाटायची. म्हणून आम्ही ऐकत असू. खरं खोटं काही माहिती नव्हते. असो, कदाचित ही अंधश्रद्धा असावी.(19664)

🌻🌻 🌻🌻🌻🌻 🌻🌻🌻🌻 🌻🌻🌻🌻🌻

🌻🌻शुभ सकाळ 🌻🌻

एक कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला त्याला शोधण्यासाठी पाच रुपयाची मेणबत्ती उपयोगी आली. एखाद्या गोष्टीचे महत्व त्याच्या किंमतीवर नसते तर तीच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असते.

🌻🌻 🌻🌻🌻🌻 🌻🌻🌻🌻 🌻🌻🌻🌻🌻www.manachyakavita.wordpress.com

🌻🌻 🌻🌻🌻🌻 🌻🌻🌻🌻 🌻🌻🌻🌻🌻

ठेविले अनंते ….

योगायोग, संयोग कि प्रारब्ध काय नाव द्यावे त्याला? काही सुचत नाही मित्रांनो. जगात खूप प्रकारची माणसं भेटतात आणि असतात ही. काही विदेशातून डिग्री घेऊन तिकडेच वास्तव्य करतात. काही तिकडे शिकून आपल्या देशात परत येऊन नौकरी करतात. काही तर चक्क विदेशातून डिग्री घेतात व इकडे येऊन शेतीमध्ये विविध प्रयोग करून यशस्वी शेतकरी होतात.

विदेशातील डिग्री घेतलेली मुलं इकडे रु. ७० ते ८० हजार वेतनावर नौकरी करतात. काही येथील स्थानिक डिग्री घेऊन त्यांच्या पेक्षा किती तरी जास्त वेतनावर नौकरी करतात.

एक व्यक्ती मध्यंतरी भेटली. विषयावर विषय निघत गेले. मुलांबद्दल विषय निघाला तेव्हा समजले त्यांचा मुलगा अमेरिकेत शिकत होता. आताच एम.एस. ची शेवटची परीक्षा संपली म्हणे. केंपस मधे त्याला तेथेच एका मोठ्या कंपनीत नौकरी मिळाली सुद्धा. किती वेतन सांगितले त्यांनी. मी तर ऐकून बेशुद्ध व्हायचा शिल्लक राहिलो. आपल्या कडील रुपयामधे ५५ लक्ष रूपये वर्षाला वेतन. बापरे. मी त्यावर काहीच प्रतिक्रिया देऊ शकलो नाही. कारण माझी योग्यता तेव्हढी नाही. तो २३-२४ वर्षाचा मुलगा इतके वेतन घेणार! त्याचे विश्व येथेच संपल्यात जमा आहे. महत्वाकांक्षाच शिल्लक राहणार नाही! अर्थात हा माझा गैरसमज होता. जो काही दिवसांनी त्यांनीच दूर केला.

एखाद्या वर्षानंतर त्यांची पुन्हा भेट झाली तेव्हा चर्चा झाली तर समजले तो मुलगा जॉब बदलतोय. यापेक्षा जास्त पगार पाहिजे म्हणून. म्हणजे, अहो पगार कमी पडतोय का त्याला?? तर तसे नाही. एका ठिकाणी नौकरी करून कंटाळा येतो म्हणून. आणि जास्त वेतन तर प्रत्येकाला अपेक्षित असतेच. असो.

अमेरिकेतून एम.एस. करून भारतात आल्यावर काही मुलं नौकरी करतात. त्यांना रू. ७०,०००/- वगैरे वेतन असते.

तर माझा प्रश्न आहे, असे का होते? सारखी डिग्री असूनही इतकी तफावत का? यात बरेच फेक्टर असतात असे माझे मत आहे.

१) मिळविलेले गुण

२) सामान्य ज्ञान

३) बुद्धिमत्ता म्हणण्यापेक्षा कुशाग्रबुद्धी

४) स्किल

५) एकाग्रता

६)सचोटी

७) हातोटी

८) नशीब

इतर ही बरेच असतील. पण एक मात्र नक्की कि प्रत्येक मनुष्य हा वेगळा असतो. सारखा असूच शकत नाही. असे असते तर प्रत्येक मनुष्य धनवान झाला असता. किंवा प्रत्येक मनुष्य मुकेश अंबानी झाला असता. प्रत्येक जण जर अंबानी झाला तर अंबानीकडे काम कोण करेल. किंवा जगात कामगार कोण असेल?

तुकाराम महाराजांनी म्हटले आहेच:-

ठेविले अनंते तैसेचि रहावे,

चित्ती असो द्यावे समाधान”

जसी वेळ येते जसे अनुभव येतात तसे सामोरे जावे असे मला वाटते. यातून खूप काही शिकायला मिळते. बरे वाईट सर्व अनुभव गोळा होतात. व हिरा कसा पैलू पाडून तयार केला जातो तसा मनुष्य तयार होतो. जो सर्व अडीअडचणी मधून सहीसलामत बाहेर पडण्याची क्षमतेचा सही वापर करतो.

(19663)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आयुष्याने शिकवलेलं एक वाक्य…
“जिंकलो तर आवरायचं आणि हरलो तर सावरायचं…”
🌼🌹 शुभ सकाळ🌹🌼

👌👌शुभ सकाळ👌👌

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

खुंटी…

पूर्वी प्रत्येक घरामध्ये कपडे टांगण्यासाठी घरातील भिंतीला खुंट्या ठोकलेल्या असत. वडील बाहेरून आले कि सदरा काढून खुंटला टांगत असत. आम्हाला गंमत वाटे. पण आमचा हात पुरत नसे खुंटी पर्यंत. मग वडिलांना सदरा काढून द्यायचा. ते खुंटीवर आमचा छोटासा सदरा टांगत. तो लहान असल्याने दोन तीन वेळा खाली पडत असे. टांगला गेला कि आनंदाने नाचत असू.

मी नेहमी प्रमाणे खुंटी चे चित्र नेटवर उपलब्ध होते का म्हणून शोधाशोध सुरू केली. पण सापडले नाही. बराच प्रयत्न केला. हिंदी भाषेत ही खुंटीच म्हणतात म्हणून हिंदी मधे टाकून पाहिले. बराच वेळ गेल्यावर अलीबाबा. कॉम वर अशा परंपरागत खुंट्या विकत मिळत असल्याचे लक्षात आले. त्याचा स्क्रीन शॉट काढला व येथे टाकला.

त्यांना डॉली खुंटे म्हणतात असे दिसून आले.

आता या जमान्यात धातूचे खुंटे ज्यांना हुक म्हणतात ते मिळतात. स्क्रू ने भिंतीवर फिट केले जाते. डेकोरेटिव पद्धतीची विविध आकाराची अत्यंत आकर्षक अशी हुक्स बाजारात उपलब्ध असतात. ह्याच त्या आधुनिक खुंट्या.☺️😊☺️😊

(19662)

🌼🌹🌹🌼🌼🌹🌹🌼🌼🌹🌹

तुटलेली फुले, “सुगंध” देऊन जातात🌹गेलेले क्षण, “आठवण” देऊन जातात प्रत्येकांचे “अंदाज” वेग-वेगळे असतात
म्हणुन काही माणसं “क्षणंभर”, तर काही “आयुष्यभर” लक्ष्यात राहतात…!!

💐💐 शुभ सकाळ 💐💐
🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

http://www.manachyakavita.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐