खूप विचार करून एक दिवस नशिबाला विचारलं की तू सगळ्यांना एवढं दुःख का देतोस!
नशिबाने हि हसून उत्तर दिलं कि मी देतांना तर सगळ्यांना सुखच देतो!
पण तुम्ही सगळेच जण एकमेकाच सुख पाहून दुःख ओढवून घेता त्यात माझा काय दोष!
💐💐शुभ सकाळ 💐💐
हा संदेश मी वाचून पुढे फॉरवर्ड करणार होतो. शेजारी धर्मपत्नी बसली आहे, हे भान मला नव्हतं. मित्रांनो, जेव्हा पासून हे व्हाट्सएप आल आहे न तेव्हा पासून माणूस कसं भान हरवल्यागत झालाय. त्याला काही भानच रहात नाही. माझं ही असच होतं. आपण या विश्वातच आहोत हे लक्षात रहात नाही. असो.
“नेमकं तेच मी आताच देवाला विचारलं. कि देवा तू मलाच का इतक दुःख दिल आहे.” सौ. म्हणाल्या.
“अग, काय दुःख दिले देवाने तुला?” मी विचारले.
“हे काय एव्हढे.” तिने माझ्या कडे इशारा केला.
मी अवाक होऊन तिला बघितले.
“अग काही तरी काय बडबडत आहे.”
“तस नाही हो. तुम्ही मला बोलू ही देत नाही. मी देवाला असे विचारले. तेव्हा देवांनी हसून उत्तर दिलं कि “मी देतांना तर सगळ्यांना सुखच देतो! पण तुम्ही सगळेच जण एकमेकाच सुख पाहून दुःख ओढवून घेता त्यात माझा काय दोष!” अगदी तुमचंच वाक्य बोलले हो देव. मला आश्चर्य होतोय. अस कस झालं.”
“मग, बघ देवाने माझ वाक्य म्हटलं.”
“हो, देवा हाच माझा देव आहे. अस मी देवाला तुमच्याकडे इशारा करून सांगितले. आणि देव हसले हो.”
“अग, माझ तेच म्हणणं आहे. देव का कोणाच वाईट चिंतणार. आपणच दुसऱ्या च वाईट बघतो. बर, आता लक्षात आले न. आता तुम्ही पण आनंदी रहा आणि मला पण आनंदी ठेवा.
मी कसा आनंदी होतो. माहित आहे न. चला चहा टाका. ”
🤣😆🤣😜😜😜🤣😆🤣🤣😆🤣
(3120698)
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
http://www.manachyakavita.wordpress.com
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐