भाषेची गंमत…


पूर्वी दादा कोंडके नावाचा एक मराठी नट होता. त्यांनी लोकांचे मन ओळखून लोकप्रिय सिनेमे काढले. त्यांनी लोकांना नेमकं काय आवडतं ते पाहिलं. त्यानुसार द्विअर्थी शब्दांचा डायलॉग व गाण्यात पुरेपूर वापर करून घेतला.

असत इंग्रजी भाषेत सुद्धा आहे. एकाच शब्दाचे दोन अर्थ असतात. इतकेच काय स्पेलिंग ही सारखेच असते. अर्थ तितका वेगळा असतो. असेच काही शब्द मी येथे मांडत आहे.

1) इंग्रजी भाषेत “फाईन” (fine) असा शब्द आहे. याचा अर्थ “दंड” होती. आणि चांगला सुद्धा. एखादा नियमभंग केला तर आर्थिक दंड भरावा लागतो. म्हणजे हा निगेटिव्ह शब्द होतो.

पण याच स्पेलिंगचा फाइन शब्दाचा अर्थ “चांगला” ही होतो. तू कसा आहेस? ह्या प्रश्नाचे उत्तर होते “फाइन”म्हणजे “चांगला”. हा पॉजिटिव्ह वाटतो.

दोन्ही शब्दांत स्पेलिंग तीच आहे.

तुम्हाला त्याचा अर्थ कोणत्या ठिकाणी तो घेतला आहे त्यानुसार ठरवावा लागतो.

2) दुसरा शब्द Nail. याचे ही दोन अर्थ होतात. एक “खिळा”. भिंतीत ठोकतो तो खिळा. आणि दुसरा म्हणजे “नख”.

बोटाचे नख. येथे तसं बघितलं तर खिळा हा पॉजिटिव्ह होईल कारण तो जोडण्यासाठी उपयोगी पडतो.

आणि नख हे जरी हाताच्या सुरक्षिततेसाठी देवाने दिले असले तरी ते वाढले आपण काढून टाकतो. म्हणजे निगेटिव्ह सारखेच होते.

3) पुढचा शब्द जॉम घेता येईल. Jam म्हणजे “फळांचा पेस्ट”. ब्रेड वर किंवा पोळीवर लावून खातात. म्हणजे याला पॉजिटिव्ह म्हणता येईल.

आणि दुसरा अर्थ होतो “वाहनांची गर्दी” हा निगेटिव्ह शब्द होतो.

4) पुढील शब्द Mine घेता येईल. याचा एक अर्थ आहे “माझे” म्हणजे मम. हा पॉजिटिव्ह शब्द होय. दुसरा अर्थ कोळश्याची खाणं. संपूर्ण काळा पदार्थ असल्याने निगेटीव्ह म्हणायला हरकत नाही. पण ते म्हणतात न कोळश्यातूनच हिरा तयार होतो. आणि बहुमुल्य हिरा हा कोळशाच्या खाणीतून सापडतो. या अर्थबोधाने पॉजिटिव्ह होतो.

5) पुढील शब्द Novel घेऊ. कोणते नॉवेल वाचतो आहे तू? येथे त्याचा अर्थ “पुस्तक” होतो. तू एखादी नॉवेल आयडिया सांग न मित्रा. या वाक्यात नॉवेल चा अर्थ होतो “नाविन्यपूर्ण”.

6) Current चा अर्थ विजेचा प्रवाह होतो. या घातक असतो. त्यामुळे निगेटीव्ह म्हणू या. दुसरा अर्थ आहे पाण्याचा किंवा हवेचा प्रवाह. हा मात्र आनंददायी असल्याने पॉजिटिव्ह म्हणता येईल.

7) crane हा शब्द सुद्धा असाच आहे. एक अर्थ बगळा एक पक्षी. दुसरा अर्थ होतो वजनदार साहित्य उचलण्यासाठी वापरले जाते ती मशीन.

8) Date चा अर्थ होतो दिनांक. दुसरा अर्थ खजूर.

आणखी बरेच शब्द असतील.

मित्रांनो, हे वरील शब्द जेथे स्पेलिंग सारखेच असते पण अर्थ वेगळा असतो यांना इंग्रजी मधे Homonyms असे म्हणतात.

मी काही इंग्रजी चा क्लास चालवत नाही आहे. काही तरी वेगळ वाटलं म्हणून शेअर करत आहे बस.

काही शब्द असेही असतात कि ज्यांचे उच्चार सारखेच असतात, पण स्पेलिंग व अर्थ वेगळे असतात.

जसे buy याचा उच्चार बाय असा होतो. व अर्थ खरेदी करणे. आणखी एक शब्द आहे ज्याचा उच्चार बाय असाच होतो. तो म्हणजे bye. याचा अर्थ मात्र विलग होताना टाटा करतो तो होतो.

इतकेच नव्हे मित्रांनो, आणखी एक बाय आहे by. याचा अर्थ आहे द्वारा.

आणखी काही उदाहरणं सांगता येतील. Fair आणि fare. पहिल्याचा अर्थ छान व दुसरा भाडे/ टिकिट

Our / hour, know / no, role/ roll, read/red, sea/ see

वरील प्रकारच्या शब्दांना Homophones असे म्हणतात.

बापरे भाषा काय किचकट असते न! यात आणखी एक प्रकार सापडला हो.

त्याला Homographs असे म्हणतात. यात स्पेलिंग सारखी असते. पण उच्चार आणि अर्थ वेगळे असतात.

याचं सोप उदाहरण म्हणजे read रिड वर्तमान काळ आणि read रेड म्हणजे भूतकाळ. आणखी एक उदाहरण wind. विंड असा उच्चार केला तर हवा अर्थ होतो. आणि वाइंड असा उच्चार केला तर गुंडाळणे असा अर्थ होतो.

मजेशीर आहे न. आणि क्लिष्ट ही.

यावरून तुम्हाला चुपके चुपके सिनेमा आठवला असेल. धर्मेंद्र ने त्यात असे भाषेच्या गंमती जमतीवर आधारित डायलॉग म्हटले होते. Do उच्चार डू होतो तर go चा उच्चार……

आठवले न!

(1820685)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

नको रे मना क्रोध हा खेदकारी।

नको रे मना काम नानाविकारी।।

नको रे मना लोभ हा अंगिकारूं।

नको रे मना मत्सरू दंभ भारू।।

💐💐शुभ प्रभात💐💐

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://manacheslok.blogspot.com/

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐