अनुभवहिनता


मित्रांनो, तुम्हाला प्रत्येकाला लहानपणाची एक वाळं घातलं गेलं होतं. आता ते नाहीस झालय. कदाचित खेडेगावात अजून ही घालत गोष्ट आठवत असेल. लहान असतांना आपल्या पायात मुलगी असेल तर पैंजण व मुलगा असेल वाळं घातलं गेलं होतं.

आता ते नाहीस झालय. कदाचित खेडेगावात अजून ही घालत असावे. पण हे घातले जात होते. मला वाटते आणि मी ऐकले ही आहे कि मुल जेव्हा चालायचा प्रयत्न करते तेव्हा त्याला स्वतः चा तोल सांभाळता यावा म्हणून. साध्या व सहज समजणार्या भाषेत सांगायचे झाले तर बेलेंसिंग साठी.

म्हणजे बाळाने स्वतः ला स्वतः च सांभाळावे यासाठी आपल्या पूर्वजांनी तरतूद करून ठेवली होती. पण आपण समजू शकलो नाही.

सांगायचा तात्पर्य असा कि जोपर्यंत मनुष्य स्वतः अनुभव घेत नाही तोपर्यंत तो स्वतःला सावरू शकत नाही.

हे कशाला मांडतो आहे मी असे आपल्याला वाटले असेल. एक प्रसंग सांगतो. काही दिवसांपूर्वी एक व्यक्ती भेटली. इकडच्या तिकडच्या गोष्टी सुरू असताना अचानक आजारपणाबाबत विषय निघाला. मी सांगत असताना त्याने थांबवले, म्हणाला, नको रे मला ऐकताना कसे तरी होतेय. मी थांबलो.

आता परवा तो परत भेटला. सांगत होता त्याच्या पत्नीला असे झाले तसे. मी लगेच त्याला थांबवले. म्हटले, अरे मला ऐकून कसेतरी व्हायला लागलेय. तो माझ्या कडे बघतच राहिला. म्हणाला, माझी बायको गंभीर आजारी आहे आणि तू साध ऐकून ही घ्यायला तयार नाही. मी म्हटलं मित्रा, आता कळलं. मागे आपण भेटलो होतो तेव्हा मी माझ्या स्वतःच्या गंभीर आजाराबद्दल सांगत होतो. तेव्हा तू माझे ऐकून ही घेतले नाही.

त्याने लगेच माफी मागितली.

मी म्हटलं, मित्रा माणसाला आनंदाच्या गोष्टी सहसा ऐकायला आवडतात. दुखाच्या गोष्टी कंटाळवाण्या वाटतात. पण एक लक्षात ठेव एकवेळ आनंदात सहभागी झाले नाही तरी चालेल पण दुखात जरूर सहभागी व्हावे. याने दुखी माणसाचे दुःख अर्धे होते.

अजून एक गोष्ट लक्षात ठेव. अनुभवातून मनुष्य शिकतो. जोपर्यंत आपण एखाद्या गोष्टीला सामोरे जात नाही तोपर्यंत त्याचा अनुभव येत नाही.

माझी मुलगी पूर्वी रक्त बघितले कि तिला चक्कर यायचे. दहा बारा वर्षापूर्वी माझा अपघात झाला होता. रक्तबंबाळ झालो होतो. मला बघून तीच बेशुद्ध पडली होती. पण त्या अनुभवातून ती शिकली.

आता ती मोठी झाली आहे. तरी ही तो अनुभव तिच्या पाठीशी असल्याने तीने माझे एवढे मोठे आजारपण स्वतः एकटीने गंभीरपणे हाताळले. आता हा अनुभव पाठीशी असल्याने यापुढे कसाही प्रसंग ओढवला तरी ती सक्षमपणे हाताळू शकेल याची मला खात्री आहे.

म्हणून माझं मत असं आहे कि माणसाने आयुष्यात आलेले बरे वाईट प्रसंग आपल्या मित्रांशी नातेवाईकांशी शेअर केले तर त्यांना ती माहिती नवीन असते व त्यांच्या ज्ञानात भर पडते. हा प्रसंग जर आपणावर ओढवला तर त्यावेळी नेमकं काय करावं हे समजत.

मी तर ह्या व्हाट्सएप बनवणारे जे आहेत त्यांना मनापासून धन्यवाद देतो कि त्यांनी ही एप बनवल्याने समाजातील लोकं असे माहितीपूर्ण लेख किंवा व्हिडीओ शेअर तरी करतात. आणि हे शेअर केलेले व्हिडीओ आमच्या सारखी (☺️)माणसं बघतात. पण ८०% लोकं असे असतील जे न वाचताच पुढे पाठवतात. किंवा पोस्ट उघडून ही बघत नाही. (मी पोस्ट टाकतो त्या कोणी उघडून ही पहात नाही म्हणून म्हणतोय).

(1920686)

😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆

लिहिल्याशिवाय
दोन शब्दातील अंतर
कळत नाही….
हाक आणि हात
दिल्याशिवाय माणसांचे
मनं जुळत नाही…
💐💐शुभ सकाळ💐💐

😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆

http://www.ravindra1659.wordpress.com

😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆