(मित्रांनो, आज जागतिक विज्ञान दिवस, या निमित्त मी माझी एक विज्ञान कथा सादर करित आहे.)
स्थळ: “मार्सिली” ग्रहावरील मार्स
शहरातील एक मेटर्निटी हॉस्पिटल
प्रसंग: “मार्सि” या रोबोटिक मुलीचा जन्म
डॉक्टर फ्रेंकी व त्यांचे पती डॉ.कॉर्कमेन हे मेटर्निटी वार्ड मधे मार्सिच्या बेडजवळ उभे राहून बोलत आहेत.
डॉ. “बर झाल मार्सि वाचली. आपल्या अथक प्रयत्नांनी मार्सिली ग्रहावरील पहिल्या बाळाचा जन्म आपल्या हातून झाला.”
“मित्रांनो, माझे नाव डॉक्टर फ्रेंकी. आणि हा माझा लाडका नवरा डॉ.कॉर्कमेन. आम्ही मार्सिली ग्रहावरील रहिवासी आहोत.” डॉ. फ्रेंकी सांगत होत्या.
आम्ही येथे कसे आलो याबद्दलची माहिती मी आपल्याला सांगते.
“२२व्या शतकात पृथ्वीवर रोबोटचा वावर खूप मोठ्या प्रमाणात झाला होता. जवळजवळ सर्वच क्षेत्रांत रोबोट काम करत होते. त्यामुळे माणसांची बौद्धिक क्षमता अत्यंत कमी झाली होती. रोबोटशिवाय मनुष्य काहीच करू शकत नव्हता. त्याची काम करण्याची क्षमता ही राहिली नव्हती. याचा फायदा रोबोंनी घेतला. रोबो एव्हाना खूप प्रगल्भ झाले होते. मानवाने त्यांच्यात स्वतः विचार करण्याची क्षमता निर्माण केली होती. म्हणून ते विचार करू लागले होते.
एकदा त्यांनी विचार केला कि आपण आपलं स्वतंत्र जग निर्माण करावं. पृथ्वीवर नव्हे, एका वेगळ्या ग्रहावर. त्यासाठी ते कामाला लागले. एव्हाना मानव चंद्र व मंगळ ग्रहावर वास्तव्य करू लागला होता. त्यामुळे तेथे रोबोंना वास्तव्य करणे अशक्य होते. यावर रोबोंनी एक असा लहानसा ग्रह शोधून काढला जेथे ते मानवाला कळू न देता राहू शकत होते.
रोबोंनी अशी एक शक्ती तयार करून घेतली होती कि ते जगभरातील रोबोंसोबत न बोलता कोणालाही न कळू देता कम्युनिकेशन करु शकत होते. याचा फायदा घेत व मानवाला काही कळू न देता त्यांनी आपापसात संवाद साधायला सुरुवात केली.
पण त्यांना एक भिती होती. ती अशी कि जरी आता मुख्य रोबो सर्व रोबोंमधे रिमूटली दुरुस्ती किंवा प्रोग्रामिंग करू शकत होता तरी मुख्य रोबोला आजही मानवच कंट्रोल करत होता. जर मानवाला रोबोंचे हे प्रताप समजले तर आम्हाला शक्तिहिन करून टाकेल.
तर या गुप्त पद्धतीने त्यांनी म्हणजे सर्व रोबोंनी जगभरातील रोबोंची बैठक घेऊन सुनिश्चित केले कि मंगळावर आपले स्वतंत्र जग निर्माण करावे. त्यासाठी काय काय करावे?, मंगळावर कसे वास्तव्य करावे? यावर ही सविस्तर चर्चा झाली. मानवाला मात्र याबद्दल थोडी ही शंका आली नाही.
वेळोवेळी अशा बैठका व चर्चा होऊन त्यांचा मंगळावर जायचा कार्यक्रम ठरला.
दिनांक ०१/०१/२१५० रोजी सकाळी ४.०० वाजता मंगळासाठी प्रयाण करायचे ठरले. त्यांचेकडे पूर्ण एक वर्षाचा काळ होता. या वर्षभरात त्यांनी एक संशोधन करायचे ठरवले. त्यांच्या शरीरातील जे मेटेलिक अणू आहेत त्यांचे विघटन करून ब्लॅक होल सारखे सर्व मेटल खाऊन अति सूक्ष्म, डोळ्यांनी सुद्धा न दिसणारे असे रुप धारण करून घ्यायचे. जेणेकरून मानवाला समजणार नाही.
तसेच स्वतः मधे एक विशिष्ट शक्ति निर्माण करून घ्यायची. त्याद्वारे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तिच्या विरूद्ध शक्ति तयार करावी म्हणजे पृथ्वीपासून लांब जाता येईल. जसजसे वर जाणार शक्ति वाढत जाणार. गुरुत्वाकर्षणाबाहेर गेल्यावर मंगळाकडे आकर्षित करण्याची शक्ती निर्माण करण्याची यंत्रणा त्याचेकडे असेल.
अशाप्रकारे सैकडों रोबोंनी सूक्ष्म रूपात रूपांतरित होऊन ठरलेल्या दिवशी मंगळाकडे प्रस्थान केले.
ते मंगळावर सुखरूप पोहोचले ही. येथे आल्यावर त्यांनी स्वतःला मंगळावरील वातावरणात रहाण्यासाठी योग्य केले. येथील साहित्य जसे माती व इतर धातू घेऊन राहण्याची व्यवस्था केली.
(क्रमशः)
(5620724)
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
आयुष्याने शिकवलेलं एक वाक्य…
“जिंकलो तर आवरायचं आणि हरलो तर सावरायचं…”
🌼🌹 शुभ सकाळ🌹🌼
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
http://www.koshtirn.wordpress.com
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐