गुगल मेप


आज दि. १९/०२/२०२० रोजी दै.सकाळ मधे वाचले गुगल मेपला पंधरा वर्षे पुर्ण झाली. जस जसे वय वाढते तसे आपण तारूण्यावस्थेत येत जातो. आपले विविध रंग व कला जगासमोर येत जातात. तसेच गुगल मेपचे ही झाले. तारुण्यात येता येता किती बहरलेला दिसत आहे. मी बातमी वाचल्यावर जरा गुगल मेपवर संचार केला. पूर्वी पेक्षा खूप बदल झालेला दिसून आला आहे. एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ती म्हणजे तुम्ही ज्या राज्यात जाता तेथील स्थळांची नावं इंग्रजीसह स्थानिक भाषेत ही असतात.जसे महाराष्ट्रात मराठीतील, गुजरात मध्ये गुजरातीत, दक्षिणेकडे गेल्यावर त्यांच्या भाषेत. जगात कोठेही फिरला तर त्या त्या स्थानिक भाषेत नावे येतात. मला वाटते हे नव्याने केले असावे. पूर्वी कधी निदर्शनास आले नाही. कदाचित लक्ष गेले नसावे.

(नकाशात मराठी व गुजराती मधील नावे दिसत आहेत.)

आश्चर्य असा वाटतो कि अगदी गल्लीबोळातली माहिती ही त्यावर असते. लहानात लहान स्थळ जसे छोटसं देऊळ असेल तर तेही नमूद असते. बोळातील रस्त्याचे नाव सुद्धा नमूद असते. त्याने आपल्याला पत्ता शोधने खूप सोपे जाते. पुण्यात रहायला आलो. सुरुवातीला पत्ता शोधने कठिण जायचे. कोणाला विचारले तर कोणी निट सांगत नाही. एकदा मुलीने गुगल मेपचा वापर का करत नाही असे म्हटले तेव्हा माझी ट्यूब पेटली. मग काय आता कोठे ही सहज जाता येते.

आणखी एक जर आपण लोकेशन ऑन ठेवले तर तुम्ही कोणत्या तारखेला किती वाजता कुठल्या ठिकाणी होता ही सर्व माहिती नोंद होत जाते. नंतर तुम्ही ती पाहू शकता. म्हणजे हे कि सिक्रेट काहीच राहात नाही. बरीच लोकं आपल्या आप्तेष्टांना (म्हणजे कोण?? ) किंवा बॉसला खोटे सांगतात. असतात घरी सांगतात भलत्याच ठिकाणी.

गुगल मेपमधे आणखी एक छान फिचर आहे. ते ही मी मुलीकडून शिकलो. आपण मेपवर गेल्यावर उजवीकडे +, – अशी चिन्हे येतात. त्याखाली एक पिवळ रंगाची बाहुली दिसते. आता माऊसचा कर्सर त्या बाहुलीवर नेला आणि माऊसचे उजवीकडचे बटन बाहलीवर नेले तर पंजा येतो. तो पंजा दाबून ठेवला तर बाहुली तेथून उचलता येते. ती बाहुली उचलून जगभरातील नकाशावर कोठेही घेऊन जाता येते. समजा आपण अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरावर गेलो तर तेथे आजूबाजूला निळे होऊन जाते. तेथे नेऊन ती बाहुली सोडली तर आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी पोहोचतो. जर रस्त्यावर बाहुली उभी केली तर आपण रस्त्यावर फिरू शकतो. आपण त्या शहरातील गल्ली बोळातून फिरत असल्याचा भास होतो. असे करतांना गुगलने प्रायव्हेशी ही जपल्याचे दिसून येते. गल्लीबोळात फेरफटका मारताना बारकाईने निरीक्षण केले तर उभी असलेली वाहने, घरं यांची ओळख धुसर केलेली आढळते. चला तर मग जगात फेरफटका मारायला. वरील फिचरला “स्ट्रिट व्यु” असे नाव दिले आहे.

आणखी अनेक फिचर्स आहेत. त्यावर नंतर कधीतरी लिहिणार.

करून घ्या जिंदगी का सफर चंद मिनिटात☺️😊👍👍

(4920716)

👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

माणसाचे अनुभव आणि कर्म हे दोन गुरू आहेत
कर्म लढायला शिकवतात तर अनुभव जिंकायला शिकवतात

🌷🙏शुभ सकाळ🙏🌷

👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

http://www.koshtirn.wordpress.com

👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s