शंखनाद…..

मित्रांनो, पूर्वी एखादे युद्ध सुरू होण्यापूर्वी युद्ध भूमीवर शंखनाद केला जात होता हे आपण महाभारत सारख्या मालिकांमध्ये पाहिले आहे.

आज असाच शंखनाद आपल्या देशात पुन्हा सुरू झाला आहे. तो म्हणजे कोरोना विरुद्ध. एका डोळ्यांना ही न दिसणार्या विषाणू विरुद्ध आपण १३० कोटी भारतीयांनी आज शंखनाद सुरू केला आहे.

मा. पंतप्रधानांनी कोरोना सारख्या आव्हानाचा सामना करण्यासाठी आज जनता कर्फ्यु पाळायचे आवाहन केले होते. त्यामुळे सकाळ पासून च आमच्या सोसायटीच्या आवारात निरव शांतता पसरली होती. अक्षरशः चिटपाखरूही दिसत नव्हते. १५० लोकांची सोसायटी असूनही नेहमी दिसणारे बालमंडळी सुद्धा खेळण्यासाठी बाहेर पडली नव्हती.

(फोटो:सकाळ वर्तमानपत्र)

इतकचं काय तर घरातून सुद्धा कोणाचा आवाज येत नव्हता. असे वाटत होते जसे सर्व गावी गेले आहेत. माणस तर माणस कुत्री मांजरी पक्षी यांचा सुद्धा आवाज येत नव्हता. एरव्ही सकाळ झाली कि प्राण्यांचा आवाज येतोच. मांजराच्या भांडण्याचा तर हमखास येतोच. आमच्या सोसायटीच्या आवारात भरपूर झाडं आहेत. त्यामुळे पक्षी ही भरपूर आहेत. सकाळी चार वाजल्यापासून त्यांचा कलरव सुरू होतो. पण आज नव्हता. जणु पशु पक्षी हे सर्व ही या कोरोना पासून सुटका करण्यासाठी मानवाला सोबत आले होते. सकाळी सकाळी कोकीळ चा आवाज तर मन मोहून टाकतो. पण आज ती ही नव्हती.

(फोटो:सकाळ वर्तमानपत्र)

सायंकाळी चार वाजता कोकीळीच्या आवाजाने सुरुवात झाली. मग इतर पक्ष्यांचे आवाज यायला लागले.

असो, मा. पंतप्रधानांनी फक्त ५ मिनिटे एकत्र येऊन घंटानाद, टाळ्या किंवा शंखनाद करण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. देशवासियांनी ही हातोहात ते आवाहन उचलले आणि आज २२ मार्च सायंकाळी ५ वाजता अभूतपूर्व असा प्रतिसाद देऊन देश कोणत्याही आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी एकजूट असल्याचे दाखवून दिले.

हा शंखनाद अशा आपात्कालीन परिस्थितीत २४ तास सेवा पुरविणाऱ्या वर्गाप्रती आभार व्यक्त करण्यासाठी होता. जसे डॉक्टर, दवाखान्याशी संबधित सर्व वर्ग, पोलीस विभागातील सर्व वर्ग, धान्य व दुग्ध पुरवठा करणारा वर्ग, वीज पुरवठा करणारा वर्ग, मंत्रालयीन विशिष्ट अधिकारी व कर्मचारी वर्ग, मंत्री मंडळ, नगरपालिकेतील अत्यावश्यक सेवापुरवठा करणारा वर्ग, असे अत्यावश्यक सेवा पुरवणारे सर्व यांचे प्रथमच देशवासियांनी असे जाहिर आभार मानले असावेत.

या संपूर्ण वर्गाला माझेकडून ही अभिवादन🙏🙏. विशेष करून वैद्यकीय सेवा पुरविणारा वर्ग. वायरस ची लागण होऊ शकते अशी भिती असूनही अहोरात्र मानवजातीच्या सेवेत तत्पर असणारा हा वर्ग. संपूर्ण जग वायरस च्या भितीने घरात स्वतः ला डांबून ठेवत आहे आणि हे आपल्या मुलाबाळांच्या जीवाची, घरच्यांची परवा न करता सेवा देत आहेत. धन्य आहेत ही लोकं.🙏🙏

मित्रांनो, हा जो शंखनाद होता याने एका तीराने कित्येक पक्षी मारले गेले आहेत.

ह्या १३० कोटी जनतेच्या थाळीनाद/शंखनाद किंवा टाळीने जी तरंग म्हणजे ध्वनी लहरी उत्पन्न झाल्या असतील त्यांनी मला खात्री आहे कोरोना मेला असणार. नाही तर तो पळून तरी जाणार.

दुसरे म्हणजे या ध्वनी लहरींमुळे आपल्या शरीरातील रक्त संचार सुरळीत झाला असेल. त्याने कुठलाही आजार राहणार नाही असे वाटते.

आपण समाजात एकटे नाही ही जाणीव प्रत्येकाला झाली असेल.

देशवाशी देशासाठी एकत्र येऊ शकतात हे दिसून आले.

हे जे आपल्या व आपल्या कुटुंबातील लोकांची पर्वा न करता मानवाच्या सेवेसाठी तत्पर असतात त्या सर्व अधिकारी कर्मचारी वर्गाला जोमाने काम करण्याचा हुरूप येईल. उत्साह संचारेल शरीरात.

याने मानव एक दुसर्याच्या मदतीला धावून जाण्यासाठी तत्पर राहील.

देशाची सुरक्षा सैनिक करतात. तशी आपल्या आरोग्याची रक्षा वैद्यकीय करतात. त्यांना पुन्हा पुन्हा मनःपूर्वक अभिवादन🙏🙏

(7320741)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

“चूक नसताना सुध्दा
निव्वळ वाद टाळण्याकरिता
मागितलेली माफी
जीवनातील संयमाचं
एक मोठं उदाहरण ठरतं !!”

🌹शुभ सकाळ🌹

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://koshtirn.wordpress.com/

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

पथ्य कुपथ्य

एक आजारी मनुष्य आणि डॉक्टर यांच्या मधील खालील संवाद बघा.

“अहो, डॉक्टर पथ्य काय काय करावे?” डॉक्टरांनी तपासून झाल्यावर व औषध लिहून दिल्यावर पेशंट सहसा त्यांना हा प्रश्न विचारतो.

डॉक्टर म्हणतात, “मुगाच्या डाळीची खिचडी खा. आंबट चिंबट खाऊ नका.”

आपण यातून काय समजलो. मुगाच्या डाळीची खिचडी ही पथ्य आहे कि आंबट चिंबट हे पथ्य आहे.

सहसा जे खायचे नाही ते पथ्य असेच आपण मानतो. पथ्य या शब्दाचा उच्चार केल्यावर प्रथम डोक्यात येते ते परवानगी नसलेले किंवा मना असलेले किंवा बंदी असलेले.

पण याचा अर्थ एकदम विरुद्ध आहे मित्रांनो. पथ्य म्हणजे परवानगी असलेले. अर्थात जे तुम्ही खाऊ शकतात ते. आणि जे खायची परवानगी नसते त्याला म्हणतात कुपथ्य.

पथ्य आणि कुपथ्य हे दोन शब्द एकत्र उच्चारले तर मात्र लगेच लक्षात येते कि पथ्य काय आणि कुपथ्य काय ते. कारण कु लावल्यावर अर्थ नकारात्मक किंवा वाईट असा होतो. जसे प्रथा विरुद्ध कुप्रथा, कर्म विरुद्ध कुकर्म,…

माय मराठी ही भाषाच निराळी.

(7120739)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

जीवन जगण्याची कला
त्यांनाच माहित असते..
जे स्वतःसोबत दुसऱ्याच्याही
आनंदाचा विचार करतात…

🌼🌸🌼 शुभ सकाळ🌼🌸🌼

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://manacheslok.blogspot.com/?m=1

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

अहंकार ……

जगामध्ये जेवढी गर्दी वाढत आहे, तेवढेच लोक एकटे पडत चालले आहेत. कोणीही कोणाच्या जवळ नाही हीच मोठी समस्या आहे. म्हणून जगण्यात पौर्णिमा कमी आणि अमावस्या जास्त आहे.
मी मोठा आणि तू छोटा बस, हा एकच विचार माणसाला माणूस बनवून देत नसतो. माणसं जोडण्यासाठी धनाची नाही तर चांगल्या मनाची गरज असते. परंतु जेथे अहंकार आहे, तेथे प्रेमही नाही आणि ज्ञानही नाही.
रोज कितीही चांगले शब्द वाचा परंतु जोपर्यंत तुम्ही ते आचरणात आणणार नाही, तोपर्यंत काहीही फायदा नाही. ज्ञानाला अर्थ कृतीमुळे प्राप्त होतो. कृती नाही तर ज्ञानाला अर्थ नाही.

(7020738)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

💥💥शुभ सकाळ💥💥

😊👏
ठेचण्यासारखी सर्वात चांगली कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे आपला अहंकार…🙏🌹🌹🌹🌹🙏

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.manachyakavita.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

कौतुकास्पद……

माझा बालपणी चा एक जिवलग मित्र. नाव विजयकुमार शाह. आम्ही शाळेपासून सोबत शिकत होतो. दोन्ही एकाच तुकडीत होतो. एकत्र अकरावी झालो. इंजिनिअरिंग सुद्धा एकाच कॉलेज मधून केले. नौकरी मात्र वेगळी झाली.

त्या मित्राच्या मुलाचे कौतुक करावे तितके कमीच पडेल. त्याचे नाव अपेक्षित शाह अमेरिकेत शिक्षण पूर्ण केले. नौकरी ही तिकडेच करत आहे, अमेरिकन कंपनी “एप्पल मधे. या वयात चार पेटेंट आपल्या नावावर करून ठेवले आहेत भाऊने.

नुकतेच त्या मुलाचे लग्न झाले. मी तब्येतीमुळे जाऊ शकलो नाही याचे फारच वाईट वाटतेय. पण हे लग्न अगदी अनोखेच झाले.

त्यांच्या समाजातील ३०० वर्षे जूनी एक परंपरा त्यांनी पूनर्जिवित केली. ती अशी कि नवरी मुलगी नवरदेवाला वरातीसाठी लागणारी घोडी स्वतः त्या घोडीवर बसून वाजतगाजत वरात काढून मुलाला लग्नासाठी तुम्ही माझ्या कडे वरात घेऊन या असे निमंत्रण देते. तदनंतर नवरदेव वरात घेऊन नवरीच्या घरी जातो.

याशिवाय पर्यावरण वाचवण्यासाठी मित्राने निमंत्रण पत्रिका हात रुमालावर छापली. कव्हर सुद्धा कापडी पिशवीच्या स्वरूपात होते. निमंत्रण पत्रिकेत एक स्लोगन छापले होते, “प्लास्टिक आणि कागदाचा वापर कमीतकमी करा आणि अधिकाधिक वृक्षारोपण करा.

इतकेच नव्हे तर मुलीच्या लग्नाच्या वेळी सुद्धा मित्राने कापडी पिशव्यांचा उपयोग केला होता.

आहे न कमाल. असे मित्र मिळण्यासाठी सुद्धा भाग्य लागते. तसे पाहिले तर लग्न सराय असेल तर जिकडेतिकडे वराती व लग्नाचे मांडव दिसतात. म्हणून ती काही बातमी होत नाही.

पण हे लग्न परिसरातील प्रत्येक वर्तमानपत्रात बातमीच्या रुपात झळकले. इतकेच नव्हे तर स्थानिक टिव्हीवर सुद्धा बातम्या झळकत राहिल्या.

असो. नव वरवधूंना अनेक आशिर्वाद.

( विशेष टिपः मी ही पोस्ट तयार करून त्या मित्राला पाठविली होती. कारण एखाद्या ची वैयक्तिक माहिती विनापरवाना लिहिण योग्य नाही. मित्राने त्यात नावे घालून दुरुस्त करून परत पाठविले. पत्रिकांचे फोटो ही पाठवले. पण मला ते योग्य न वाटल्याने मी पुन्हा त्याला विचारले. त्याने पुन्हा परवानगी दिल्यानंतर मी ही पोस्ट टाकली.)

(6920737)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

💥💥शुभ सकाळ💥💥

” स्पष्ट ” बोला पण असे बोला कि समोरच्याला ” कष्ट ” होणार नाही
अन् त्याचे आणि तुमचे नाते “नष्ट ” होणार नाही..”
प्रयत्न करा की कोणी आपल्यावर रुसु नये जिवलगाची सोबत कधी सुटु नये.
नाते मैत्रीचे असो की प्रेमाचे असे निभवा की त्याचे बंध आयुष्यभर तुटु नये.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.manachyakavita.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

बंब रंगांचा

मित्रांनो, कुठे आग लागली कि ती विझविण्यासाठी फायर ब्रिगेडच्या गाड्या टनटन घंटा वाजवत येतात. लहानपणी या गाड्यांना आग विझविणारे बंब असे म्हणत. अर्थात हा निव्वळ गावंढळपणा होता.

पुढे मी इंदूरला उच्च शिक्षणासाठी गेलो. तेथे होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलीवंदनाच्या दिवशी सामूहिक रंगाचा कार्यक्रम होतो. तेथे मी पाहिले कि एक मोठ्ठा बंब ट्रक वर ठेवलेला रंगाने भरलेला आणि आठ दहा पंप रंग उधळण्यासाठी असत. संपूर्ण शहर रंगमय झालेलं असायचं. रंगांची उधळण करत हजारोच्या संख्येने लोकं मिरवणूक काढत. जिकडे तिकडे आनंदी आनंद असायचा.

लहानपणी पाणी तापविण्यासाठी हे बंब एक यंत्र म्हणून वापरल जात असे. विशेष म्हणजे लहान मोठे असे वेगवेगळ्या आकारात ते मिळत असत. आणखी एक विशेष कि ज्यांच्या कडे हा बंब असायचा तो श्रीमंत. म्हणजे श्रीमंतीची ही एक निशाणी होती. आज ही गावाकडे गेलो तर जून्या घरांमध्ये असे बंब रोज सकाळी अंगणात दिसतात.

साभार: गुगल

एकदम साधं असं हे गावठी यंत्र होतं. त्याची अंतर्गत रचना खालील रेखाचित्रात पहा.

साभार ः गुगल

एक साधी पाण्याची टाकी आहे. मध्यभागी एक उर्ध्व नलिका असून तिला खालून आग पेटवून तापविले जाते. वरतून धूर बाहेर पडतो. तापलेल्या नळीच्या अवतीभवती असलेले पाणी तापते. हाच सिद्धांत गिजर मध्ये वापरला आहे. आपले पूर्वज होते अतिशय हुशार बुद्धिमान.

लहानपणी धुलीवंदनाच्या दिवशी गुलाल खेळत असत. हे रंग खूप उशिरा आले. तीच गुलालाची होळी चांगली होती. खेळून घरी आलो. गरम पाण्याने आंघोळ केली कि झालो स्वच्छ. हे रंग चार चार दिवस निघत नाहीत. किती ही आंघोळ करा समाधानच होत नाही.

असो. सर्वांना होळी आणि धुलीवंदनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.

(6820736)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आयुष्य जगण्याचा एक छोटासा नियम आहे…..

रोज काहितरी नविन चांगले लक्षात ठेवा… आणि रोज काहितरी जुनं वाईट विसरा..!

🌱🌟शुभ सकाळ🌟🌱

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.ownpoems.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

तीन वाटसरू

तीन वाटसरू एका धर्मशाळेत रात्रीसाठी एकत्र आलेले असतात. तिथे स्वयंपाकासाठी एकच चूल आणि एकच भांडं असतं…

तिघांनाही भूक लागलेली असते, मग ते एकत्र स्वयंपाक करायचा असं ठरवतात. चुलीवर भांडं ठेवून त्यात पाणी उकळायला ठेवतात आणि त्यात प्रत्येकानं आपापल्या जवळच्या तांदुळाची एक एक मूठ टाकायची असं त्यांचं ठरतं…

पाण्याला उकळी फुटल्यावर त्यात तांदूळ टाकायची वेळ येते. पहिला वाटसरू विचार करतो तसंही बाकीचे दोघं एक एक मूठ तांदूळ टाकतीलच, तेवढा भात तिघांना पुरेल. मी कशाला माझे तांदूळ वाया घालवू…?? म्हणून तो स्वतःच्या पिशवीत हात घालून रिकामीच मूठ घेऊन येतो आणि पातेल्यावरचं झाकण बाजूला सारून तांदूळ आत टाकल्याचं नाटक करतो…

गंमत म्हणजे exactly असाच विचार बाकीचे दोघंही करतात आणि पातेल्यात तांदूळ टाकल्याचा नुसता अभिनयच करतात…

थोड्या वेळानं ते झाकण दूर करून बघतात तेंव्हा अर्थातच पातेल्यात फक्त गरम पाणी असतं, भाताचा पत्ताच नसतो…!!

तिघेही चडफडत आणि एकमेकांना शिव्या देत उपाशीच झोपतात….!!!!!

सध्या समाज असाच झालाय. मी का? तो करेल की.

आता परवाच एक व्यक्ती भेटली. आयकरावर विषय निघाला. “अरे, शक्य तितकी बचत करावी.”

“अरे पण कोणीच आयकर भरला नाही तर कसे चालेल?”मी म्हणालो.

“अरे कशाला रे. ज्याला वाटेल तो भरेल. मी कशाला?”

मला आश्चर्य वाटलं. असे जर प्रत्येक जण म्हणाला तर देश चालेल कसा?

प्रत्येक बाबतीत लोकं असेच म्हणत असतात. नियम मी का पाळायचे. हे मी का करायचे. तो करेल, तो नियम पाळेल.

जर रस्त्यावर उलट्या दिशेने वाहन चालवत गेलो तर काय होईल. अपघात. कोणाचा. नियम न पाळणार्याचा.

जिऊ दे. मला काय त्याचं.

(6720735)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

लिहिल्याशिवाय
दोन शब्दातील अंतर

कळत नाही….
हाक आणि हात
दिल्याशिवाय माणसांचे
मनं जुळत नाही…
💐💐शुभ सकाळ💐💐

😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆

http://www.ravindra1659.wordpress.com

😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆

तू नारी……💐💐

रीना तू नारी आहेस

सर्व जगावर भारी आहेस

पिता, पुत्र, पति सर्वांना

तू अतिशय प्रिय आहेस.

(मोबाईल वर स्वहस्ते तयार केलेले स्केच)

गिर्यारोहण ही केले तू

अंतरिक्ष ही भ्रमण केले

सर्व मार्ग क्रमण केले तू

संरक्षण ही तू केले.

रीना तू फक्त तू आहेस

रीना तू नारी आहेस

सर्व जगावर भारी आहेस.

(6320731)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐