शंखनाद…..


मित्रांनो, पूर्वी एखादे युद्ध सुरू होण्यापूर्वी युद्ध भूमीवर शंखनाद केला जात होता हे आपण महाभारत सारख्या मालिकांमध्ये पाहिले आहे.

आज असाच शंखनाद आपल्या देशात पुन्हा सुरू झाला आहे. तो म्हणजे कोरोना विरुद्ध. एका डोळ्यांना ही न दिसणार्या विषाणू विरुद्ध आपण १३० कोटी भारतीयांनी आज शंखनाद सुरू केला आहे.

मा. पंतप्रधानांनी कोरोना सारख्या आव्हानाचा सामना करण्यासाठी आज जनता कर्फ्यु पाळायचे आवाहन केले होते. त्यामुळे सकाळ पासून च आमच्या सोसायटीच्या आवारात निरव शांतता पसरली होती. अक्षरशः चिटपाखरूही दिसत नव्हते. १५० लोकांची सोसायटी असूनही नेहमी दिसणारे बालमंडळी सुद्धा खेळण्यासाठी बाहेर पडली नव्हती.

(फोटो:सकाळ वर्तमानपत्र)

इतकचं काय तर घरातून सुद्धा कोणाचा आवाज येत नव्हता. असे वाटत होते जसे सर्व गावी गेले आहेत. माणस तर माणस कुत्री मांजरी पक्षी यांचा सुद्धा आवाज येत नव्हता. एरव्ही सकाळ झाली कि प्राण्यांचा आवाज येतोच. मांजराच्या भांडण्याचा तर हमखास येतोच. आमच्या सोसायटीच्या आवारात भरपूर झाडं आहेत. त्यामुळे पक्षी ही भरपूर आहेत. सकाळी चार वाजल्यापासून त्यांचा कलरव सुरू होतो. पण आज नव्हता. जणु पशु पक्षी हे सर्व ही या कोरोना पासून सुटका करण्यासाठी मानवाला सोबत आले होते. सकाळी सकाळी कोकीळ चा आवाज तर मन मोहून टाकतो. पण आज ती ही नव्हती.

(फोटो:सकाळ वर्तमानपत्र)

सायंकाळी चार वाजता कोकीळीच्या आवाजाने सुरुवात झाली. मग इतर पक्ष्यांचे आवाज यायला लागले.

असो, मा. पंतप्रधानांनी फक्त ५ मिनिटे एकत्र येऊन घंटानाद, टाळ्या किंवा शंखनाद करण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. देशवासियांनी ही हातोहात ते आवाहन उचलले आणि आज २२ मार्च सायंकाळी ५ वाजता अभूतपूर्व असा प्रतिसाद देऊन देश कोणत्याही आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी एकजूट असल्याचे दाखवून दिले.

हा शंखनाद अशा आपात्कालीन परिस्थितीत २४ तास सेवा पुरविणाऱ्या वर्गाप्रती आभार व्यक्त करण्यासाठी होता. जसे डॉक्टर, दवाखान्याशी संबधित सर्व वर्ग, पोलीस विभागातील सर्व वर्ग, धान्य व दुग्ध पुरवठा करणारा वर्ग, वीज पुरवठा करणारा वर्ग, मंत्रालयीन विशिष्ट अधिकारी व कर्मचारी वर्ग, मंत्री मंडळ, नगरपालिकेतील अत्यावश्यक सेवापुरवठा करणारा वर्ग, असे अत्यावश्यक सेवा पुरवणारे सर्व यांचे प्रथमच देशवासियांनी असे जाहिर आभार मानले असावेत.

या संपूर्ण वर्गाला माझेकडून ही अभिवादन🙏🙏. विशेष करून वैद्यकीय सेवा पुरविणारा वर्ग. वायरस ची लागण होऊ शकते अशी भिती असूनही अहोरात्र मानवजातीच्या सेवेत तत्पर असणारा हा वर्ग. संपूर्ण जग वायरस च्या भितीने घरात स्वतः ला डांबून ठेवत आहे आणि हे आपल्या मुलाबाळांच्या जीवाची, घरच्यांची परवा न करता सेवा देत आहेत. धन्य आहेत ही लोकं.🙏🙏

मित्रांनो, हा जो शंखनाद होता याने एका तीराने कित्येक पक्षी मारले गेले आहेत.

ह्या १३० कोटी जनतेच्या थाळीनाद/शंखनाद किंवा टाळीने जी तरंग म्हणजे ध्वनी लहरी उत्पन्न झाल्या असतील त्यांनी मला खात्री आहे कोरोना मेला असणार. नाही तर तो पळून तरी जाणार.

दुसरे म्हणजे या ध्वनी लहरींमुळे आपल्या शरीरातील रक्त संचार सुरळीत झाला असेल. त्याने कुठलाही आजार राहणार नाही असे वाटते.

आपण समाजात एकटे नाही ही जाणीव प्रत्येकाला झाली असेल.

देशवाशी देशासाठी एकत्र येऊ शकतात हे दिसून आले.

हे जे आपल्या व आपल्या कुटुंबातील लोकांची पर्वा न करता मानवाच्या सेवेसाठी तत्पर असतात त्या सर्व अधिकारी कर्मचारी वर्गाला जोमाने काम करण्याचा हुरूप येईल. उत्साह संचारेल शरीरात.

याने मानव एक दुसर्याच्या मदतीला धावून जाण्यासाठी तत्पर राहील.

देशाची सुरक्षा सैनिक करतात. तशी आपल्या आरोग्याची रक्षा वैद्यकीय करतात. त्यांना पुन्हा पुन्हा मनःपूर्वक अभिवादन🙏🙏

(7320741)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

“चूक नसताना सुध्दा
निव्वळ वाद टाळण्याकरिता
मागितलेली माफी
जीवनातील संयमाचं
एक मोठं उदाहरण ठरतं !!”

🌹शुभ सकाळ🌹

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://koshtirn.wordpress.com/

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s