मित्रांनो, सध्याच्या अत्यंत शांततेच्या काळा शेजारच्या घरात दिवसा कोणी घोरत असेल तरीही स्पष्ट आवाज ऐकू येतो. इतकेच काय त्या चार बालकण्या सोडून पाचव्या घरात नवरा बायकोची दिवसा झालेली आदळ आपट ही स्पष्ट पणे कानावर येऊन आदळते. इतकी भयाण शांतता सध्या सर्वदूर पसरलेली दिसत आहे. तसे नाही. शांतता कधी दिसते का? पण असे म्हटले जाते. आता हे काही मी तयार नाही केले आहे. आपली भाषा आहे ती. असे महेश मनातल्या मनात पुटपुटला. कारण ही तसेच होते. यापूर्वी चा अनुभव महेश च्या गाठीशी होता.
अहो, असेच एकदा म्हणजे परवाच हो. महेश बाहेरून भाजीपाला घेऊन घरी आल्यावर घर एकदम शांत शांत वाटल्याने त्याने त्याची बायको अनिताला विचारले , “आज काय घरात एकदम शांतता पसरलेली दिसतेय.”
यावर ती जाम भडकली आणि “कोठे दिसतेय रे तुला शांतता? शांतता ही काय वस्तू आहे का दिसायला?” असे तार्किक पणे म्हणाली.
तिच्या तार्किक बोलण्यामुळे महेश नेहमी माघार घेऊन शांत बसून जायचा. कारण येथे डोके लावणे म्हणजे दगडावर, साध्या सुध्या दगडावर नव्हे चांगल्या लाखभर वर्षे आयुष्य मान असलेल्या काळ्याशार अशा बेसॉल्ट दगडावर डोके आपटल्यासारखे आहे.
पण ती शांत बसायला तयार असेल तर ना! “महेश तू उत्तर नाही दिले माझ्या प्रश्नाचे.”
“अग बाई काय उत्तर देऊ मी! बर जाऊ दे माझं चुकलं असेल. नाही तरी माझं व्याकरण विक होतं शाळेत असतांना.”
“तेच म्हणते मी विक आहेस.मग टॉनिक का घेत नाही एखादे.” महेशला आश्चर्याचा आणखी एक धक्का बसला.
“बर, काय झालं आज इतकी शांत शांत का आहेस? असे विचारायचे होते मला.” त्याने विषय समाप्ती कडे वाटचाल केली. तीने ही ओळखले असेल बहुतेक. “असो, आपल्याला काय त्याचे.” कदाचित असाच विचार करून ती तेथून निघून गेली असावी, असेही महेश ला वाटले. तो आपल्या नेहमीच्या सवयी प्रमाणे हातपाय धूवून हॉलमध्ये आला आणि सोफ्यावर बसला. बोर व्हायला लागले कि त्याला चहा लागतो म्हणून त्याने तिला प्रेमळ स्वरात आवाज दिला, “अग, चहा देतेस का?”
खरे म्हणजे त्याला कानोसा घ्यायचा होता कि मंडळी रागात तर नाही न! आणि तो विचार करत होता तसेच झाले ही. तिने काहीच प्रतिसाद दिला नाही. महेशचे विचार चक्र सुरू झाले. माझे नेहमी असे का होते कि मी मनात विचार केला कि तसेच घडते. त्या दिवशी मी विचार केला होता की काही दिवस सुटी घेऊन फिरायला जाऊन यावे मस्त. आणि काय आश्चर्य सरकारने स्वतःच सुटी देऊन टाकली सर्वांना. सर्वांना म्हणजे अख्ख्या जगाला हो. सर्व जगच एका लंब्या सुटीवर आहे. पण माझ्या विचारामुळे असे झाले असे कसे म्हणता येईल. कारण मला सुटी फिरायला जाण्यासाठी हवी होती घरात कोंडून घ्यायला नव्हे. म्हणजे हा माझा भ्रम आहे तर.
सर्व दूर स्मशान शांतता पसरलेली होती. एव्हढ्या मोठ्या सोसायटीत चिटपाखरूही दिसत नव्हते. कोणाचाही आवाज येत नव्हता. सुई पडली तर आवाज येईल असे वाटत होते. अशा विचारांच्या तंद्रीत महेश असतांना अचानक त्याची तंद्री एका विशिष्ट आवाजाने तुटली. आणि तो आवाज होता सौ.च्या त्या लहानग्या ईडियट बॉक्स मधील. आपला तो लाडका मोबाईल हो.
मोबाईल हॉलमध्ये विसरली होती ती. तो आवाज नोटिफिकेशन चा होता. मला वाटते व्हाट्सएपच्या नोटिफिकेशन चा आवाज आहे हा. थोड्या थोड्या वेळाने आवाज यायला लागला होता. ह्या स्मशान शांततेत तो एकच आवाज आला कि जीवंतपणा जाणवत होता. माणसाचे फार वेगळेच असते न. जेव्हा सर्व दूर गजबज असते तेव्हा नकोसे वाटते. असे वाटते लांब कोठेतरी जावे जेथे श्मशान शांतता असावी. निवांत विसावा घ्यावा. आणि जेव्हा अशी शांतता पसरते तेव्हा ती शांतता भयावह वाटायला लागते. अशा शांततेत सुई पडल्याचा जरी आवाज आला तरी दचकायला होते. असे वाटते जसे ती सुई नाही, आकाशातून भलीमोठी उल्का पडली आहे.
माणसाचे मन खरच खूप चंचल असते. जे नसते जवळ ते हवेहवेसे वाटत असते. आणि ते एकदाचे मिळाले कि ते नको नको से होते.
(8220750)
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
माणसाचे अनुभव आणि कर्म हे दोन गुरू आहेत
कर्म लढायला शिकवतात तर अनुभव जिंकायला शिकवतात
🌷🙏शुभ सकाळ🙏🌷
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
http://www.koshtirn.wordpress.com
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍