संपतराव आपल्या पत्नीवर ओरडले होते. त्यामुळे त्या रूसून होत्या व मोबाईल विनाकारण चाळत होत्या . कोपऱ्यात जाऊन बसल्या नव्हत्या त्या इतर बायकांसारख्या (म्हणून मी फक्त रूसून होत्या असे लिहिले आहे). (नाही तर त्यांच्या हाती यावेळी मोबाईल ऐवजी लाटने दिसले असते.😊) तिची हिच विशेष बाब संपतरावांना मनापासून आवडते (लाटण्याची नाही हो फक्त रूसून असण्याची बसण्याची नव्हे, काय राव परत परत तेच तेच सांगावे लागतेय मला) आणि यामुळेच ते प्रत्येक वेळा स्वतः पुढे होऊन त्यांचा रूसवा काढण्यासाठी जवळ जातात.
पण आज उलटेच झाले. सौ. समोरून आल्या. त्यांनी संपतरावांना हसवण्यासाठी प्रयत्न केला पण, हे काय? त्यांचा तो प्रयत्न फसला. इतकेच नव्हे तर चांगलाच अंगलट ही आला. झाले असे कि गंमत केली कि ते हसतील असे त्यांना वाटले. म्हणून त्यांनी व्हाट्सएपवर आलेला खालील संदेश संपतरावांना वाचून दाखविला.
शरीर सुंदर असो किंवा नसो
पण शब्द सुंदर असले पाहीजेत
कारण लोक चेहरा विसरतात
शब्द नाही.
💞 शुभ सकाळ 💞
संपतरावच ते. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता उलट विचारले, “काय तुम्हाला काय म्हणायचे आहे कि ‘तुम्ही सुंदर नाहीत'”. आणि हे ऐकून सौं.चा चेहरा बघण्यासारखा झाला. “अहो काय बोलताय तुम्ही?”
“मी कुठे काय बोलतोय. तुम्हीच तर म्हणालात.”
“जा बुआ. तुम्ही प्रत्येक वेळी थट्टा करून वेळ मारून नेतात.”
“बर बर. तुमच म्हणणं नेमकं काय आहे? ते तरी कळू द्या आम्हाला. तुम्ही सुंदर आहात न!!” सौ. लाजल्या.
“अहो, हे म्हातारपणी काय….”
“सॉरी बर का!! पण तुमचे शरीर आणि शब्द दोन्ही सुंदर आहेत बर का?”
“तेच म्हणत होते मी. माझे आहेत हो पण तुमचे नाहीत न. म्हणून तर तो संदेश दाखवित होते मी.”
“मी काय केले??”
“आताच माझ्यावर खेकसला होता. विसरले सुद्धा इतक्या लवकर!!”
“पुन्हा एकदा सॉरी म्हणतो. झालं!!”
आणि दोन्ही खूप हसले. हसरी सकाळ सुरू झाली एकदाची.
(7420742)
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
जगात प्रत्येक गोष्ट सुंदर आहे…
मात्र ती तुमच्या विचारांवर आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे….
💐💐शुभ प्रभात💐💐
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
http://www.koshtirn.wordpress.com
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺