किंमत…


आज रविवार. वीर १० वाजले तरी तोंडावर पांघरूण घेऊन डाराडूर झोपलेलाच होता. आई बिचारी प्रेमापोटी ‘बाळा उठ आता. खूप उशीर झाला आहे’. असे अधूनमधून सौम्य पणे हाक मारायची (आईच ती काठी थोडच मारणार). बाबांचा नुकताच पेपर वाचून संपला. आता आईला धाकधूक सुरू झाली. आता बाबा ओरडतील म्हणून ती बेडरूममध्ये गेली व वीरला कानात म्हणाली ‘बेटा बाबांचा पेपर वाचून झालाय. आता ते नक्की चिडतील’.

‘आई, अग झोपू दे न मला’.

‘पण, बाबा !!’

‘ते मी बघून घेईन’.

“काय म्हणालास? तू मला बघून घेशील. इतकी हिंमत झाली का रे तूझी.”

“अहो बाबा. अहो १० तर वाजले आहेत अजून.”

“नालायका. एवढा इंजिनिअर झाला आहे. नौकरी न शोधता झोपा काढतोय.”

“मला नौकरी नाही करायची हे मी वारंवार सांगितले आहे न. तरीही पुन्हा पुन्हा तेच कि बोलता. मी मस्त स्वतः ची स्टार्टअप सुरू करणार आहे. ”

“अशा झोपा काढून. स्वप्नात काढतोय का कंपनी?.”

“हो, स्वप्नात च काढतोय. अहो, मी रात्रभर नियोजन करत होतो.”

“हे कार्ट काय दिवे लावणार कोण जाणे?”संपतराव.

“ते जाऊ द्या बाबा. हा संदेश वाचा:-

🌻🌻👌सुंदर विचार 👌🌻🌻

एक कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला त्याला शोधण्यासाठी पाच रुपयाची मेणबत्ती उपयोगी आली. एखाद्या गोष्टीचे महत्व त्याच्या किंमतीवर नसते तर तीच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असते.🌹

🌻🌻शुभ सकाळ 🌻🌻

“आता याचे काय करू?” बाबा.

“बाबा, ती एक कोटी ची आयडिया रात्रभर शोधत होतो मी मेणबत्ती घेऊन. ती मला सापडली आहे. आणि आज तुमचं हे कार्ट दिवे लावणार आहे.”

“काय????” बाबा तोंड आ करून त्याच्या कडे बघत राहिले. त्यांना अशा अवस्थेत बघून आई घाबरली.

कार्ट म्हणालं,”अग आई, अजून काही झाले नाही तर यांची ही अवस्था झाली आहे. कंपनी स्थापन झाली तर काय होईल यांचं.”

आणि बाबांना तशा अवस्थेत सोडून तो बाथरूमकडे निघून गेला.

आई,”आता तरी कळाली का आपल्या मुलाची खरी किंमत??”

(7520743)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

डोळे तर जन्मतः मिळालेले असतात. कमवायची असते ती नजर,
चांगल्यातलं वाईट आणि वाईटातलं चांगलं ओळखायची पारखी नजर…..
🙏सुप्रभात🙏

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.ownpoems.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐