प्रहरी स्वप्न

मित्रांनो, मागच्या काही काळापासून मन असे खिन्न होऊन गेले आहे. सकाळ झाल्यापासून चूकून झोप लागलीच तर तोपर्यंत कानावर, डोळ्यावर सॉरी डोळ्यासमोर, टिव्हीवर एक सारख्या त्याच त्या नकारात्मक बातम्या ऐकू येत आहेत. आणि जे काही थोडा वेळ लागलेल्या झोपेत सुद्धा तेच तेच नकारात्मक स्वप्न दिसत आहेत. मला एक कळत नाही, एरव्ही टिव्हीवर बर्याच सकारात्मक बातम्या येत असायच्या. इतर आजारांसारख्या त्याही अचानक कोठे गायब झाल्या असाव्या बर!!

दोन तीन दिवसांपासून बातम्या बघायची वेळ ठरवून दिली. अर्थात स्वतः साठी. सकाळी एकदा पाच मिनिटे व संध्याकाळी पाच मिनिटे. जस्ट बघून सोडून देणे. तुम्हाला काय सांगू मित्रांनो अक्षरशः विचार बदलले. अंगात सकारात्मक ऊर्जा एकवटल्या सारखे वाटले. नवऱ्याला कशी बायको दिवसभर म्हणते ‘तुम्हाला काही कळत नाही.’ आणि हळूहळू नवरोबाला जाणवायला लागते कि त्याला खरच काही कळेनासे झाले आहे. तस असते बघा. सतत ज्या गोष्टीचा डोक्यावर आघात होत असतो न तसेच होत राहते.

ते जाऊ दे. मी आपले एक उदाहरण दिले. पण माझ्या मनावर जो सकारात्मक परिणाम झाला. त्याने रात्री अर्थात तिसऱ्या प्रहरी म्हणजे सकाळी ३-४ दरम्यान एक अतिशय सकारात्मक स्वप्न पाहिले राव. अगदी सकाळ पर्यंत सुरू होते ते स्वप्न. आणि जेव्हा जाग आली तेव्हा ताजेतवाने वाटले. एकदम जग जिंकल्या सारखे. आणि हो असे म्हणतात कि सकाळी सकाळी पाहिलेली स्वप्नं खरी होतात. होतात नव्हे होणारच.

होय मित्रांनो, असेच स्वप्न पाहिले मी. मी पाहिले ते या संक्रमण काळातून बाहेर पडलेले, निसर्गाने वेढलेले सुंदर जग. प्रत्येक मनुष्य सुहास्य वदन घेऊन पहुडत होता. छान से गीत गुनगुनत होता. प्रत्येक जण नकारात्मकतेतून निघून बाहेर पडला होता. आता सकारात्मकतेत विचरण करित होता. एक दुसऱ्या च्या मदतीला धावून जात होता. नवीन जग निर्माण करण्यासाठी धडपडत होता. इतके दिवस वातावरणात पसरलेली नकारात्मकता नाहीसी होऊन तिची जागा सकारात्मकतेने पूर्णपणे व्यापलेली होती. लहान मुलांच्या खेळण्याचा ओरडण्याचा आवाज ऐकून मन प्रसन्न झाले होते. एका मोठ्या अंतराळानंतर ऐकायला आला होता हा सुमधुर कलरव. झाडांवर पक्षांची किलबिल ऐकून असे वाटत होते या पक्षांना बर कोणी लॉकडाऊन मध्ये धाडले असावे.

असे हे माझे सकाळच्या प्रहरी पडलेले सुंदर स्वप्न लवकरच खरे होईलच. अशी ईश्वर चरणी प्रार्थना करू या.🙏🙏🙏

(10120769)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

“शांत व प्रसन्न मन” हे शेवटचे असे हत्यार आहे की, जे जीवनातील “कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना” सामोरे जाण्यास सज्ज असते.

🌺शुभ सकाळ🌺

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.koshtirn.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

चिरतारुण्य…

हजारो लाखो माहित नाही कधी ते. पण खूप वर्षांपूर्वी ब्रम्हांडाची व त्यावरील जीव जंतू मानव प्राणी अशा असंख्य सजीवांची निर्मिती त्या महान अशा अदृश्य शक्तीने केली आहे. मानव तर आता एक दोन शतकापूर्वी इंजिनिअर झाला. नवनवीन मशिनरीचा शोध करू लागला. पण तो ईश्वर तो तर लाखो वर्षापूर्वीच इंजिनिअर झाला होता किंवा मुळातच इंजिनिअर होता. तसे नसते तर त्याने ही चालती फिरती बोलती मशीन कशी तयार केली असती बर. असो.

पण पूर्वी असे देश परदेश असे काही नसायचे. लोकं एकटे दुकट्याने रहात नसत. जंगली जनावरांची भिती. म्हणून कबिले करून रहात. सर्व वसाहती नदी काठीच वसल्या आहेत. मानव व प्राणी ही आले. त्यात जो ताकतवान असतो त्याचेच चालते. कबिल्यात जो ताकदवान तोच प्रमुख. जसा कबिला वाढला तसा तो राजा झाला. आता आतापर्यंत जगात राजेशाही होती. आता म्हणजे एक दोन शतकापूर्वी पर्यंत. मला वाटते सर्वात पहिला लोकशाही अंमलात आलेला देश म्हणजे अमेरिका आहे. जवळपास दोनशे वर्षे झाली आहे त्यांना स्वतंत्र होऊन. असो.

मागील तीन दशकात या जगात अफाट बदल नोंदवला गेलाय. मला वाटते १९९० नंतर आपल्या कडे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात आणले गेले. इंटरनेट तर सन २००० नंतर खूप वापरले जाऊ लागले. मागील दोन दशकात इतक्या झपाट्याने तंत्रज्ञानात बदल झाला आहे कि कल्पना ही करू शकत नाही. अहो २००६ मध्ये फ्लॉपी वापरल्या जात होत्या. त्यांची क्षमता kB मध्ये असायची. मागच्या दशकात तर डोळे दिपवून टाकणारा बदल झालाय. जेव्हा पासून स्मॉर्ट फोन आलाय जग मुठीत सामावल्या सारखे वाटायला लागले आहे. प्रत्येक जण करलो दुनिया मुठ्ठी में असे म्हणू लागलाय.

पण ही प्रगती काय कामात आलीय हो या दिवसात?? एका अतिसूक्ष्म निर्जीवाने हतबल करून सोडले आहे सर्व जगाला. इतके बरे आहे हे इंटरनेट, मोबाईल लेपटॉप असल्याने लॉकडाऊन असून ही वेळ कळत नाही. सहज घरात जगता येतेय आपल्याला. असे म्हणता येईल. पण तसे नसते ही. खरं म्हणजे परिस्थिती नुरूप मनुष्य स्वतःला तयार करत असतो.

पूर्वी ही असे अंधारलेले दिवस पाहिले आहेत की आपण. सन १९७१-७२ मध्ये. घराच्या खिडक्यांना काळे कागद चिकटवून दिले होते की. रात्री घरातून बाहेर उजेड पडू नये हे कारण. प्रसंग आठवत असेलच. भारत पाकिस्तान युद्ध. बांगलादेशासाठी. मला वाटते मी ६ वी मधे होतो तेव्हा. तेव्हा कोठे होते टिव्ही न मोबाईल. तरीही आपण घरात राहत होतो न. काळानुरूप आपल्या सवयी बदलत असतात. म्हणून आपल्याला त्रास होतो.

असो. हे कठिण क्षण ही निघून जातील. आपण खंबीरपणे आलेल्या प्रसंगाला तोंड देऊ.

ईश्वराने निर्मिलेली ही पृथ्वी आणि हे ब्रम्हांड नेहमी चिरतरुणच राहिल यात दुमत नाही.
सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः ।

(10020768)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आपण जगासाठी
एक व्यक्ती आहोत,
परंतू आपल्या कुटुंबासाठी आपण
संपूर्ण जग आहोत”
म्हणून स्वतःची काळजी घ्या
!! घरी राहा – आनंदीत राहा !!
!!…शुभ प्रभात…!!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.ownpoems.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

कुशलता…

जन्म झाल्यावर आपल्याला रेंगणे, चालणे, बोलणे, इ. सर्व करण्यासाठी प्रेक्टिस म्हणजे मराठी त म्हणायचे झाले तर सराव करावा लागतो. सराव केल्याशिवाय कोणतेच काम मनुष्य असो किंवा प्राणी कोणीच करू शकत नाही. आणि सरावानेच अनुभव येतो आणि अनुभवांती मनुष्य कौशल्य प्राप्त करतो. तेव्हा त्याला कुशल किंवा पारंगत असे म्हटले जाते. आज कोरोना मुळे असंख्य कुशल कारागीर स्वगृही परतत आहेत. ते परत त्याकामावर परतणार नाही असे वाटते. पण जास्त काळ त्या कामापासून आपण वंचित राहिलो तर ते कौशल्य अंगातून निघून जाते हा निसर्गाने शरीराला दिलेली दुर्दैवी अवगुण आहे. असो, यानिमित्ताने हा एक व्हिडिओ मी येथे शेअर करत आहे. ही माऊली शिकली सवरलेली दिसत नाही. पण किती कुशलतेने गोवर्या तयार करुन शरीराच्या उंचीपेक्षा दुप्पट उंचीवर अगदी मोजमाप घेऊन गोवर्या थापल्यासारख्या थापत आहे. हाच तो सरावाने आलेला अनुभव व कौशल्य.

पूर्वी गावोगावी हे द्रुष्य दिसत असे. हल्ली तसे दुर्मिळ झाले आहे. (व्हाट्सएपच्या माध्यमातून प्राप्त व्हिडीओ)

(9920767)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

😊फुल कितीही सुंदर असू द्या
कौतुक त्याच्या सुगंधाचे होते.🌹

माणूस कितीही मोठा झाला तरी
कौतुक त्याच्या गुणांचे, विश्वासाचे होते.💐🙏😊

🌹🌹शुभ सकाळ 🌹 🌹

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.koshtiravindra.blogspot.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

असे कसे हे घडले..

मित्रांनो, जूने वर्ष संपते आणि नवीन वर्ष सुरू होते तेव्हा प्रत्येक जण एक दुसऱ्या ला नवीन वर्ष सुखासमाधानाने जावो अशा शुभेच्छा देतो. कोणी कोणासाठी वाईट व्हावे असा विचार करत नाही. पण या वर्षी काय झाले काही कळत नाही. नवीन वर्ष लागल्यापासून संपूर्ण जग हैरान झाले आहे. असो.

पण एक मला कळत नाही. जगात बलाढ्य समजले जाणारे देश, प्रत्येक बाबतीत प्रथम क्रमांक असलेला अमेरिका जसे चंद्रावर पहिले पाऊल ठेवणे म्हणा कि आणखी काही म्हणा. तसेच जगात सर्वात जास्त पुढारलेले पाश्चात्य देश एका सूक्ष्म शक्ती समोर अक्षरशः साष्टांग लोटांगण घालत आहेत. असे कसे शक्य आहे? ही कल्पना ही सहन होत नाही.

माझे मत आणखी असे ही होत आहे की आपल्या कडे आजही अधिकाधिक लोकं नदीचे पाणीच पितात. सामान्य ठिकाणी राहतात. त्याने त्यांची कशाही परिस्थिती मध्ये जगण्याची शक्ती वाढत असावी. जो रोज आर.ओ. चे पाणी किंवा मिनरल वाटर पितो त्याला एक दिवस साधे नळाचे पाणी दिले तर सहन होत नाही. कारण त्याचे शरीर त्याच पाण्यासाठी तयार होऊन गेलेले असते. म्हणूनच आपल्या लोकांची प्रतिकारशक्ती चांगली असावी.

याचे साधे उदाहरण द्यायचे झाले तर आपल्या बगीचा मधे लावलेली झाडे आहेत. तुम्ही त्यांना वेळोवेळी खाद्य दिले नाही किंवा पाणी दिले नाही तर ती कोमेजून जातात. मात्र तीच झाडं रस्त्यावर लावारिसासारखी उगलेली असतात किंवा वनात उगलेली असतात त्यांना कोणीही पाणी घालायला जात नाही कि खाद्य देत नाही. ती व्यवस्था ती स्वतः करून घेतात. जगण्यासाठी स्वतः धडपड करत असतात. सांगायचा तात्पर्य असा कि आपल्या कडील लोकांची इम्युनिटी इतर लोकांपेक्षा जास्त असावी.

याउलट पाश्चात्य देशातील लोकं हायजिनीक खातात व पितात. मग त्यांची इम्युनिटी कमी का असावी? असे वाटते कि आपण शरिराची जितकी काळजी घेऊ तितके ते कमजोर होते असेच म्हणावे लागेल आता. कोणी तरी यावर शोधनिबंध लिहायला हवा.

मला वाटते आता जगाने चंद्र, मंगळ या ग्रहांवर रहायचे स्वप्न पाहण्या पेक्षा आपल्या या ग्रहावरील मानव सुरक्षित कसा राहील यावर भर दिला पाहिजे.

(9820766)
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
💐💐💐💐💐

“मी” आहे म्हणुन “सगळे” आहेत या ऐवजी “सगळे” आहेत म्हणुन “मी” आहे हा विचार ठेवा आयुष्यात कधीच एकटेपणा वाटणार नाही.

💐💐शुभ सकाळ💐💐

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.manachyakavita.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

असंवेदनशील जग हे…

मित्रांनो, कोरोना ने जगभरात चांगलेच पाय पसरलेले आहेत. आपल्या कडे ही काही वेगळी परिस्थिती नाही. पण ह्या अतिसूक्ष्म विषाणू ने जगाचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे अशी जाणिव व्हायला लागली आहे.

वर्तमानपत्र (ऑनलाइन) वाचले कि कोरोनाने दगावल्याची एखादी बातमी असतेच. आज कोरोनाने इतके रुग्ण गेले. फार वाईट वाटते. धस्स होते वाचून. पुढे बातमीत लिहिलेले असते. नातेवाईकांनी बॉडी स्विकारण्यास नकार दिल्याने परस्पर विल्हेवाट लावण्यात आली. हे वाचल्यावर जास्त मन खिन्न होते. इतके असंवेदनशील कसे झाले आहोत आपण. अंत्यसंस्कार नाही कि रडणे भडणे नाही. गंगा जल पाजणे नाही. पूजा पाठ काही ही नाही. एका लावारिसासारखी विल्हेवाट लावली जाते त्या बॉडीची. होय बॉडीची. ती आई, बहिण, बायको, मुलगी, बाप, नवरा, भाऊ, लेक कोणीच रहात नाही. फक्त आणि फक्त संक्रमण ग्रस्त माणसाची बॉडी असते. म्हणून कोणीही हात लावत नाही. विल्हेवाट कोण लावते तर अशी माणसे ज्यांचा तुमच्या शी काडीमात्र ही संबंध नसतो. पूर्णपणे अनोळखी माणसं. ती तुमची नातेवाईक होता काही काळासाठी.

म्हणून म्हणतो मित्रांनो, कोरोनाने तुम्हाला दाखवून दिले आहे कि जगात कोणीच कोणाचे नाही. हे नाते फक्त देखावा आहे. मेल्यावर माझा नवरा गेला, मी उघडे पडले हे रडणे हे सर्व खोटे असते. आतापर्यंत वाटत होते कि इतर सर्व नाती सोडून देतात पण शेवटपर्यंत सोबत असतात ती नवरा बायको. पण कोरोनाने दाखवून दिले कि हे नाते ही खोटे आहे.

परवा एक बातमी वाचली. एक ८० वर्षाचा म्हातारा हार्टफेल झाल्याने गेला. कोरोना झाला असावा या शंकेने कोणीही मदतीला आले नाही. अगदी जवळचे नातेवाईक सुद्धा. ती बॉडी न्यायची कशी व विल्हेवाट लावायची कशी हा प्रश्न पडतो. हल्ली मुलं एक किंवा दोनच असतात. तीही नौकरी निमित्त लांब असतात. म्हणजे म्हातारा म्हातारी दोघे घरी. अशा वेळी काय होईल त्या शिल्लक राहिलेल्या म्हातारीचं. शेजारी पाजारी नाही नातेवाईक नाही. ती म्हातारी काय करणार. किती असंवेदनशील झालेले आहे हे जग. हे ईश्वरा, हेच का दिवस बघायचे राहिले होते. असे म्हणायची वेळ आली आहे.

अहो, हल्ली आजारी पडल्यावर सुद्धा लोकं एक दुसऱ्याची विचारपूस करत नाहीत. दवाखान्यात बघायला जात नाहीत. सांत्वन करायला कोणी तयार नसते. लांबचे मित्र मंडळी तर सोडाच सगेसोयरे सुद्धा!!

आजारी माणसाला सांत्वनेची गरज असते. त्याने माणसाला धीर येतो. आजाराला सामोरे जाण्यासाठी आत्मबल मिळते.

आजारी माणसाला दवाखान्यात भेटायला जातो ते कशासाठी? एक कर्तव्य पार पाडायला? तसे असेल तर न गेलेच बरे. काही लोकं भेटायला येतात तेव्हा खूप लांब उभे राहून रुग्नाकडे केविलवाण्या नजरेने बघतात. तेव्हा तू रुग्ण घायाळ होतो हे त्यांना लक्षात ही येत नाही. याने रुग्नाचे दुःख आणखी वाढते हे त्यांना समजत ही नाही. इतकी असंवेदनशील असतात ती माणसं. एखाद्या ने आजारपणाचा विषय काढला कि सर्व लांब पळतात. गंमतीजमती केल्या कि सर्व खुश असतात. म्हणजे काय? सुखात तर सर्व मदतीला हजर असतात हो. दुःखात मदतीला धावून येईल तो देव. पण अशी देवमाणसं दिवा घेऊन शोधली तरी सापडणार नाही.

मी याबद्दलचा माझा अनुभव शेअर करू इच्छितो. माहित नाही आपणास आवडेल कि नाही ते. पण तरीही मला लिहावेसे वाटत आहे.

माझे एक घनिष्ठ मित्र व कार्यालयात वरिष्ठ अधिकारी होते. ते कर्करोगाने आजारी होते. शेवटी शेवटी ते खूप जास्त तब्यत खराब झाली तेव्हा मी भेटायला जात होतो तेव्हा त्यांच्या डोक्यावर प्रेमाने मायेने हात फिरवतात तसा फिरवत होतो. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर वेगळेच संतुष्टीचे भाव दिसायचे. शेवटच्या क्षणी मी त्यांना भेटलो तेव्हा त्यांनी माझी गळा भेट घेतली व खूप रडले. मला ही अश्रू आवरता आले नाही. मी भेट घेऊन परत निघालो व ७-८ मिनिटांनी ते गेल्याचा निरोप आला.

आणखी एक उदाहरण. मी मुंबई येथे नौकरीला होतो. लोकलने जाऊन येऊन करत होतो. एकदा माझ्या शेजारी एक अपटूडेट वयस्कर मनुष्य येऊन बसला. काही वेळाने त्या माणसाला अस्वस्थ वाटायला लागले. घामाने अंग ओलचिंब झाले. मी त्यांच्याशी संवाद साधला. लगेच सर्वांना सिटवरून उठवलं. आणि त्यांना सिटवर झोपवलं. पेपर होताच. त्यांना सतत हवा घातली. माझ्या जवळ पाणी होते. ते पाजलं. अर्थात अज्ञान माणसाची मनोभावे सेवा केली. त्यांची विचारपूस केल्यावर लक्षात आले कि त्यांना कुलाब्याला जायचे आहे. राहायला ठाण्याला होते. पण ते म्हणाले मला भायखला येथे बहिणीकडे सोडा. तो मनुष्य पारशी होता. मोठा होता व स्वतः ची कंपनी ही होती. त्यासाठी जात होता. मग मी इतरांशी बोललो.एक जण तयार झाला सोबतीला. मनात चक्र फिरू लागली. काही अडचणीत तर येणार नाही न आपण. पण मग मनाची तयारी केली आणि त्यांना भायखळा येथे उतरवले. पुन्हा मनात विचार आला आणि सोडून दिला. टेक्सीने त्यांच्या बहिणी कडे सोडून दिले. तेथे गेल्यावर जी वागणूक मिळाली त्याने नेकी कर और दरिया में डाल.. ही म्हण आठवली.

तर असे हे जग आहे संवेदनाविरहित किंवा असंवेदनशील.

शेवटी अकेला आया है अकेला ही जाएगा. तसेच खाली हात आया है खाली हात जाएगा रे बाबा.🙏🙏

🙏🙏🙏🙏

(9720765)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

घराच्या बाहेर पडताना SMS हा शब्द लक्षात ठेवा.
S – Senitizer.
M – Mask.
S – Social Distancing.
🧴 😷 👩‍💼 👨‍💼 👨‍💼
Stay home stay safe😊👏
शुभ सकाळ👍👍

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.manachyakavita.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

होमाफिस

नवीन वर्ष उजाडल्या उजाडल्या जगावर एक महाभयंकर संकट येऊन पडले. नाही नाही. ते काही महाकाय संकट नाही कि एखादी उल्का ही नाही. ते आहे एक अतिशय सूक्ष्म साध्या डोळ्यांना न दिसणारा निर्जीव असा अतिसूक्ष्म विषाणू.अशा ह्या निर्जीव अतिसूक्ष्म विषाणू ने सजीव व महाकाय अशा या पृथ्वीची दारूण अवस्था करून टाकली आहे. संपूर्ण जगातील माणसे घरात बंदिस्त होऊन बसली आहेत आणि प्राणी स्वच्छंद फिरत आहेत. असो, फिरो बिचारे.पण यामुळे जीवनशैली बदलत चालली आहे. अनेक परिवर्तनांपैकी वर्क फ्रॉम होम ही एक नवशैली अस्तित्वात येऊ पहात आहे.मी ह्या नवशैलीला शॉर्ट नाव “होमाफिस” असे दिले आहे. असे का? तर यांच्या साठी घरच ऑफिस झाले आहे. होम आणि ऑफिस यांची संधी करून होमाफिस हा शब्द योग्य वाटला.इंटरनेटवर काम करणारी जवळ जवळ सर्वच मंडळी होमाफिस चालवत आहेत. मला वाटते यापुढे बहुतेक कंपन्या याच पद्धतीने काम करणे पसंत करतील.याने कंपन्याची फार मोठी बचत संभवते. जसे, १) मोठमोठ्या इमारतीमध्ये ऑफिस सुरू करायची गरज भासणार नाही. फक्त अत्यावश्यक असेल त्याच कर्मचाऱ्यांना बैठकीसाठी बोलवावे लागेल. याने खूप मोठी बचत होईल.२) ऑफिस छोटे असेल तर फर्निचर कमी लागेल, विज कमी लागेल, पाणी कमी लागेल, इ. बराच खर्च वाचेल. याबदल्यात कर्मचाऱ्यांना घरीच एक छोटे कार्यालय सुरू करण्यासाठी आपूर्ती करता येईल.३) कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्या- जाण्यासाठी वाहन व्यवस्था करण्याची गरज नसल्याने मोठा खर्च वाचेल.४) कंपनीचा इतर ही बराच खर्च कमी होऊ शकेल.तसेच कर्मचारी सुद्धा घरीच रहात असल्याने कुटुंबासोबत जास्त वेळ घालवू शकतील. मुलाबाळांच्या संगोपनात कमतरता राहणार नाही. पति पत्नी दोन्ही नौकरी करत असल्यास त्यांना एकाच छताखाली दररोज राहाता येईल. यामुळे परस्पर जिव्हाळा वाढेल.असे खूप फायदे होतील. मला ओझरते आठवते कि मध्यंतरी वर्तमानपत्रात बातमी झळकली होती कि केंद्र सरकारचे काही कर्मचारी घरून काम करणार आहेत. हे खरे असले तर हा केव्हढा मोठा बदल म्हणावा लागेल.यापुढील आपले आयुष्य व येणारे जग हे वेगळेच असणार आहे हे नक्की.

(9620764)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आपण जगासाठी
एक व्यक्ती आहात,
परंतू कुटुंबासाठी आपण
संपूर्ण जग आहात”
म्हणून स्वतःची काळजी घ्या
!! घरी राहा – आनंदीत राहा !!
!!…शुभ प्रभात…!!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐www.ravindra1659.wordpress.com💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

कशासाठी….

मित्रांनो,

अनंतकाळापासून चालत आले आहे कि मानव जन्म झाल्यापासून जगण्यासाठी खूप जिवापाड धडपड करित असतो. अगदी शेवटच्या घटकेपर्यंत अर्थात मरेपर्यंत त्याची ही धडपड सुरु असते. पूर्वी मानवाची फक्त जगण्यासाठी धडपड असायची. ती तर प्रत्येक प्राणी करतच असतो. पण मागच्या काही काळापासून मानवाची ही धडपड फक्त जगण्यासाठी नसून संग्रहासाठी सुरु झाली आहे. माणसांत जे मिळेल ते संग्रह करण्याची होड लागलेली आहे .

पण हे सर्व जमा करून करून शेवटी रिकाम्या हाती तो निघून जातो. कायमचा या शास्वत जगाचा अखेरचा निरोप घेऊन कधी परत न येण्यासाठी. पण त्याला कळेपर्यंत खूप उशीर झालेला असतो. त्याला वास्तविकता कळण्या आधीच हे शरीर थकून जात असते.

पण आता ईश्वराने अशी चक्र फिरवली आहेत कि मानवाला त्याच्या हयातीत हे कळले आहे कि पैसा धन दौलत किती ही जमा केली तरी संकटकाळी ती कामी येत नसते. आज एका सूक्ष्म जीवाच्या भितीपोटी संपूर्ण मानवजग हे घराच्या चार भिंतीत दबकून बसलय.
ड्रोन च्या सहाय्याने जगभरातील मोठ्या शहरातील व्हिडीओची एक क्लिप मध्यंतरी व्हाट्सएपवर वायरल झाली होती. तीत ती अफाट पसरलेली विराण शहरं पाहून मन खिन्न होऊन गेले. रस्त्यावर या आपणच निर्मिलेल्या जगाचा उपभोगघेण्यासाठी चिटपाखरूही दिसत नव्हते. मानवाने निर्मिलीली मानव विरहित ही शहरं खंडहरं वाटत होती. (असे लिहिलेले कोणालाही आवडणार हे मी मान्य करतो. तरीही ते मला नाईलाजाने लिहावे लागत आहे.) पण प्रत्येक मानवाला असे वाटले असेल का हो? हे कशासाठी सर्व निर्माण करत आहोत आपण? हा विचार त्याला आला असेल का? असेल. माझे मन सांगतेय मला कि त्याच्या मनात हा विचार निश्चितच आला असेल. प्रत्येक माणसाच्या मनात हा विचार आला असेलच. त्याला निश्चितच वाटले असेल कि हे अफाट विश्व आपण का उभे करतोय? एकेका घरात शंभर माणसं राहू शकतील एव्हढ्या घरात चार माणसं राहतात!! आणि फक्त एका माणसाला पुरेल एव्हढ्या १० × १० च्या घरात दहा माणसं राहतात. ही प्रचंड मोठी तफावत का? मध्यंतरी वाचण्यात आले होते कि जगातील अर्धी संपत्ती ही हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्या लोकांकडे एकवटलेली आहे. जगातील असंख्य लोकांकडे रोजच्या पोट भरण्यासाठी ही पैसे नाहीत. अर्थात संपत्ती एकवटली आहे. एक प्रचंड मोठी दरी किंवा तफावत समाजामध्ये निर्माण झाली आहे.
जाऊ देत.

पण आता मानवाला उमजेल कि आपण किती ही धावपळ करून संपत्ती एकवटली तरी ती संपत्ती ऐनवेळी कामी येत नाही. जातांना रिकाम्या हातीच जावे लागते.

(9520763)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

नेहमी सुखापेक्षा आनंदात रहाव … कारण सुखात नेहमी व्यवहार असतो आणी आनंदात कायम तडजोड असते

🌹🌹🌹 सुप्रभात🌹🌹🌹

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.ownpoems.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

अवघा रंग एक झाला😊…

(मित्रांनो, व्हाट्सएपच्या माध्यमातून एक अक्षरशः डोळ्यात पाणी आणणारी गोष्ट प्राप्त झाली. ती जशीच्या तशी ये सादर करित आहे. लेखक अज्ञात आहे पण तो विठ्ठल स्वरूप असावा.)अवघा रंग एक झाला😊…..सावळी आज येणार नाही आजीच्या बहिणीच्या नातीने शेजारच्या गॅलरीतून ओरडून निरोप दिला,…ते ऐकून आजी अस्वस्थ झाल्या,…पडल्या पडल्या डोळ्यातून पाणी गळायला लागलं आता आपलं नॅपकिन कोण बदलणार ..?खरंतर सावळीमुळे आपण एवढं व्यवस्थित राहू शकतो आणि सावळी येणार नाही म्हणते पण का काय झालं,..? अगतिक होऊन चिडून ओरडून आजींनी विचारलं ,..त्यावर नात म्हणाली,.. “आजी कर्फ्यु लागला आहे रस्त्याने जीवावर उदार होऊन येते ती गेल्या 15 दिवसांपासून तुम्हाला काय माहिती हो बाहेर काय वातावरण आहे ते,..” .एवढं बोलून ती नात आत निघून गेली,…आजीला जाणवायला लागलं खुपच उष्ण पाणी आपल्या गालावरून ओघळतंय आपल्याला आता खरंतर मरून जावं वाटतंय,..देवा काय खेळ लावला आहेस रे ह्या जीवाचा..? लवकर सम्पव तरी अरे आमच्या सारखी मरण मागणारी माणसं सोडून तरुण लोक घेऊन चालला न्याय कुठे तुझा,…?तेवढ्यात आजीला लॅच उघडल्याचा आवाज आला,..आजी ओरडली ,..भयभीत होऊन कारण चावी फक्त सावळीकडेच असते,..आणि आताच तर निरोप असा आजी विचार करत होती तर समोर गोड हसणारी सावळी,.. आजी म्हणाली,” काय गम्मत करतेस का ग माझी म्हातारीची??”सावळी ओढणी कमरेला बांधत म्हणाली,..गम्मत केली नाही माझ्या बापाने केला होता तो फोन कारण खरंच बाहेर वातावरण खराब झालं आहे,..बाप म्हणतो लग्न आहे तुझं,…काही झालं तुला तर,..?
ऐकून आजीला हुंदकाच फुटला आणि आजी चादरीत तोंड लपवून रडू लागली,…सावळे किती करतेस ग माझ्यासाठी,…?नक्की आज पण भांडून आली असशील घरच्या लोकांसोबत,…सावळीने लगेच आजीचा हात हातात घेतला,..आजी रडू नका तुमचे खुप उपकार आहेत माझ्यावर त्यासाठी हे करणं तर काहीच नाही,..चला उठा स्वच्छ व्हा छान सावळीच्या मदतीने आजी अगदी प्रसन्न तयार होऊन मस्त बसली ,…आपल्या काळ्याभोर विठ्ठल मुर्ती समोर,…सावळीची सगळी लगबग सुरू होती,..छोट्याश्या मूर्तीला तुळशीहार तयार होता,.. त्याच्या समोर पुसून नाजुक रांगोळी रेखाटली होती,…चांदीची निरंजन चकचकीत घासुन साजुक तुपाने गच्च भरलेली शांतपणे तेवत होती ,…आजी शांत मनाने जप करत होती,..स्वयंपाक घरातुन सावळी बाहेर आली चहा घेऊन,… आजीने चहा घेताना विषय काढलाच,..”.सावळे तू नस्तीस तर काय झालं असतं ग माझ्या म्हातारीचं,…?? नुसता पैसा असुन उपयोग नसतो बघ …आयुष्यात मायेनं जवळ घेणारं लागतंच कुणीतरी,…नुसतं रक्ताच्या नात्याचं नाही ग बाई मनाच्या नात्याचं,..हो किनी ग,…जशी मला तू,…!”
सावळी म्हणाली आजी,..”.हे सगळं तुम्ही जीव लावला म्हणून आहे,..टाळी एका हाताने वाजत नाही,…आजी मला आजही आठवतं,.. एक तर पोरगी आणि त्यात काळी म्हणून बाप चिडत होता,..मारत होता,..म्हणून आई तुमच्याकडे कामाला येताना घेऊन यायची,.. तुमच्या मनाला पाझर फुटला माझं शिक्षण केलं,…आज मी चांगल्या हॉस्पिटलमध्ये नर्स आहे ती तुमच्यामुळे आणि मग माझं शिक्षण जर तुमच्या कामाला नाही आलं तर काय उपयोग हो,…मध्ये आई गेली तेंव्हा तर खरा आधार पैशानं, मनानं तुम्ही दिला मला,…आणि त्या पैश्यापेक्षा संस्काराची शिदोरी दिलीये आजी,…तुमच्याकडे असलेले सणवार,भजन,पुजा आनंद कसा मिळवावा ते शिकवून गेले,…ते सगळं मला अनुभवू दिलंत तुम्ही,…आजोबांना जाऊन वर्ष पण झालं नाही तर तुम्ही अश्या पॅरॅलीस झाल्या,… तुम्हाला मुलबाळ नसलं तरी तुम्ही मला मुली सारखंच जपलं ना,…मग माझं कर्तव्य मी करतीये आणि करणार,…होणाऱ्या नवऱ्याला पण सांगितलं आहे मी,… सकाळचे दोन तास माझे आजीसाठी आहेत खास लग्नानंतर सुद्धा,…म्हणुन सांगते आजी तुम्ही काळजी करू नका,…मी येते बरोबर कशीही,… मला माहित आहे मी गेल्यावर तुमच्या बहिणीची नात जी वर राहते ती येते तुमच्या मदतीला,… पण तुम्हाला पण मी येऊन गेल्या शिवाय करमत नाही ना,???”…दोघी हसल्या,…
हसता हसता आजीच्या डोळ्यात पाणी आलं,…आजी म्हणाली,..”सावळे तू हि विठ्ठल मुर्ती दिली आणि तेंव्हा पासुन मला तू सतत जवळ असल्यासारखं वाटतं,… तू तशी फार हुशार मी केलेल्या सगळ्या पंढरपूर वाऱ्या तुला माहीत होत्या,… पण ह्या 3 वर्षापूर्वी गुढग्यांच्या दुखण्याने मला वारीला जाता नाही आलं म्हणून मी नाराज होते तर तू चक्क हि मूर्ती आणून ठेवली माझ्या हातात,…काळीभोर आणि शांत,…
बरं आजी आता जाऊ का मी,…”आहो माझी आजीसासू सिरीयस आहे म्हणून लग्न उद्याच करायचं ठरलंय,… हे लॉकडाऊन काही उघडत नाही म्हणून घरातच करणार आहे ,…उद्या फक्त धकवून घ्या,…परवा येतेच मी आशीर्वाद द्या मला,…आजीला गहिवरून आलं,..सगळ्यांनी काळी म्हणून हिणवलेलं लेकरू,…कष्टाळू आणि प्रामाणिक होतं,… उद्या तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात होणार होती,…तिला जवळ घेत आजी म्हणाली काय देऊ ग तुला,…?तशी सावळी म्हणाली,..”.आनंदी रहाण्याचा आशीर्वाद बस बाकी काही नको,…”
आजीला तेवढ्यात काहीतरी आठवलं,…आजी म्हणाली,”सावळे तू खरेदी केली कि नाही तुला माझ्या त्या पैठणी लुगड्यासारखं लुगडं घालायचं होतं ना ,…आणि त्यावर मोत्याची नथ,…”
सावळी हसली आणि म्हणाली,”आजी हे लॉकडाऊन इतकं झटपट झालं ,…खरंतर आईने पैसे साठवून ठेवले होते मला तस पैठणी लुगडं घ्यायला पण आता राहिलं,… जाऊ द्या,… नंतर घेऊ चला येऊ मी,..?”
आजी म्हणाली,” थांब ते कपाट उघड,…ती खालच्या कप्प्यात सुती कापडाची घडी आण इकडे,…”
सावळीने पटकन ती घडी ठेवली हातात,…आजींन त्यातुन लालचुटुक पैठणी काढली,…आणि सावळीला म्हणाली,” घाल लग्नात,… आणि परवा मला आणुन दाखव कशी दिसली ते,…”
तशी सावळी म्हणाली,” आजी,… अहो मी तुमच्यासारखी पैठणी घेणार होते पण रंग हा नाही अहो माझ्या सारख्या काळीला चांगली तरी दिसेल का,..?”
आजी म्हणाली सावळे,…”अग माणसाचा कातडीचा रंग गौण असतो ग,…त्याच मन ज्या रंगाचं असतं ना,..त्यावर त्याच सौन्दर्य असतं,…. म्हणजे,…. कपटी,धूर्त,प्रेमळ,निरागस असे वेगवेगळे रंग असतात त्यावर विचार करायचा,…आणि आता मला सांग ह्या विठ्ठलाचं वस्त्र कोणत्या रंगाच आहे ग,…?”
सावळी हसुन म्हणाली ,”अगदी असंच लाल,…”
आजी लगेच म्हणाली,…मग त्याला ते वाईट दिसतंय का,???
सावळी म्हणाली,” आजी तो देव आहे,…त्याला चांगलंच दिसणार,…”
आजी हसली म्हणाली,…”सावळे देवत्व मूर्तीत नसतं असं नाही पण मूर्तीशिवाय जेंव्हा ते बघायच असतं ना तर ते,…माणसाच्या कृतीत,कष्टात,स्वभावात बघायच असतं,… आता ह्या महामारीच्या काळातच तर तू म्हंटली ना,…हे शेतकरी, पोलीस,नर्स,डॉकटर,सफाई कामगार अगदी देव बनुन पृथ्वीवर वावरत आहेत म्हणून,…”
सावळीने दोन्ही हात कोपऱ्यापासून जोडले आणि आजीला म्हणाली,”बोलण्यात मी तुम्हाला काही हरवू शकणार नाही,…द्या ते लुगडं मी परवा नेसुन आणि नवऱ्याला घेऊन येईल आशीर्वाद घ्यायला आणि सेवेला पण येईन,…जाऊ का आता,…??आजीने नथीची डबी पण ठेवली हातात,..तशी ती घाबरत म्हणाली,सोन्याची आहे आजी हि नथ मला नको,…आजी म्हणाली “घालुन परत आणुन दे मग तर झालं,…अग पैठणीवर शोभुन दिसेल,…”
सावळीचे डोळे पाणावले,…ती पटकन आजीच्या गळ्यात पडली,…आणि चटकन निरोप घेऊन निघाली,..
आजी हताशपणे पडून राहिली,…विठ्ठलाकडे पहात,…
तिसऱ्या दिवशी लालचुटूक पैठणी घालुन नवऱ्यासोबत ती आजीच्या अपार्टमेंटच्या गेटमधून आत शिरली तसं आजीच्या नातीने तिला वर ये म्हणून हाक मारली,…सावळीला खरंतर आधीआजीला भेटायचं होत पण आधी तिच्याकडे जावं लागलं,…
नातीने दरवाज्यातच तिला थांबवलं,…तोंडाला मास्क बांधूनच ती बोलत होती,..तिने सावळीला आजीच्या फ्लॅटची चावी मागितली आणि म्हणाली सावळे”,… अग परवा तू गेल्यावर काही तासात आजी गेली अग,…तू केलेलं जेवण द्यायला मी फ्लॅटमध्ये गेले तर आजी रडत होती,…मला म्हणाली,…” माझ्या सावळीच लग्न आहे,…तिला दिलेली पैठणी आणि नथ तिला माझी आठवण म्हणून सांग ,…मी जवळ बसले तर मला म्हणाली,ती विठ्ठल मूर्ती दे माझ्या जवळ,…त्या मूर्तीला कवटाळून म्हणत होती खरं सांग तूच सावळी बनून येत होतास ना,…आणि प्राण सोडले ग तिने,…
सावळी सुन्न होऊन गेली,…नवऱ्याने तिला सावरलं,…ती निघाली आणि निघताना म्हणाली त्या नातीला मला ती विठ्ठल मूर्ती देता का???नातीने लगेच फ्लॅटचे कुलूप उघडून ती मूर्ती तिच्या हातात दिली,…सावळी विठ्ठल घेऊन चालू लागली,…पण सावळीच्या मनातला प्रश्न विठ्ठल ऐकत होता,…
सावळी मनात म्हणत होती,..”आजी तुझी सेवा केली म्हणून मी तुझा विठ्ठल कि तू मला चांगलं जगणं दिलंस म्हणून तू माझा विठ्ठल,..??”माणुसकीचा हा अवघा रंग एक झालेला पाहून विठ्ठलमूर्ती हसुन म्हणत होती,… अवघा रंग एक झाला😊

(9320761)💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐www.rnk1.wordpress.com💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मित्रांनो, मातृदिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.💐या निमित्त मी एक चित्र सर्व मातांना सादर सादर करित आहे.वर दोन वेळा सादर शब्द आला आहे. तो चुकुन नव्हे. योग्य प्रकारे सादर केला आहे.पहिल्या सादर चा अर्थ आदराने असा आहे. व दुसऱ्या सादर चा अर्थ प्रेसेंट करणे असा आहे.

(9220760)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐

💐💐💐💐💐

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

www. koshtirn.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐

💐💐💐💐💐