असंवेदनशील जग हे…


मित्रांनो, कोरोना ने जगभरात चांगलेच पाय पसरलेले आहेत. आपल्या कडे ही काही वेगळी परिस्थिती नाही. पण ह्या अतिसूक्ष्म विषाणू ने जगाचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे अशी जाणिव व्हायला लागली आहे.

वर्तमानपत्र (ऑनलाइन) वाचले कि कोरोनाने दगावल्याची एखादी बातमी असतेच. आज कोरोनाने इतके रुग्ण गेले. फार वाईट वाटते. धस्स होते वाचून. पुढे बातमीत लिहिलेले असते. नातेवाईकांनी बॉडी स्विकारण्यास नकार दिल्याने परस्पर विल्हेवाट लावण्यात आली. हे वाचल्यावर जास्त मन खिन्न होते. इतके असंवेदनशील कसे झाले आहोत आपण. अंत्यसंस्कार नाही कि रडणे भडणे नाही. गंगा जल पाजणे नाही. पूजा पाठ काही ही नाही. एका लावारिसासारखी विल्हेवाट लावली जाते त्या बॉडीची. होय बॉडीची. ती आई, बहिण, बायको, मुलगी, बाप, नवरा, भाऊ, लेक कोणीच रहात नाही. फक्त आणि फक्त संक्रमण ग्रस्त माणसाची बॉडी असते. म्हणून कोणीही हात लावत नाही. विल्हेवाट कोण लावते तर अशी माणसे ज्यांचा तुमच्या शी काडीमात्र ही संबंध नसतो. पूर्णपणे अनोळखी माणसं. ती तुमची नातेवाईक होता काही काळासाठी.

म्हणून म्हणतो मित्रांनो, कोरोनाने तुम्हाला दाखवून दिले आहे कि जगात कोणीच कोणाचे नाही. हे नाते फक्त देखावा आहे. मेल्यावर माझा नवरा गेला, मी उघडे पडले हे रडणे हे सर्व खोटे असते. आतापर्यंत वाटत होते कि इतर सर्व नाती सोडून देतात पण शेवटपर्यंत सोबत असतात ती नवरा बायको. पण कोरोनाने दाखवून दिले कि हे नाते ही खोटे आहे.

परवा एक बातमी वाचली. एक ८० वर्षाचा म्हातारा हार्टफेल झाल्याने गेला. कोरोना झाला असावा या शंकेने कोणीही मदतीला आले नाही. अगदी जवळचे नातेवाईक सुद्धा. ती बॉडी न्यायची कशी व विल्हेवाट लावायची कशी हा प्रश्न पडतो. हल्ली मुलं एक किंवा दोनच असतात. तीही नौकरी निमित्त लांब असतात. म्हणजे म्हातारा म्हातारी दोघे घरी. अशा वेळी काय होईल त्या शिल्लक राहिलेल्या म्हातारीचं. शेजारी पाजारी नाही नातेवाईक नाही. ती म्हातारी काय करणार. किती असंवेदनशील झालेले आहे हे जग. हे ईश्वरा, हेच का दिवस बघायचे राहिले होते. असे म्हणायची वेळ आली आहे.

अहो, हल्ली आजारी पडल्यावर सुद्धा लोकं एक दुसऱ्याची विचारपूस करत नाहीत. दवाखान्यात बघायला जात नाहीत. सांत्वन करायला कोणी तयार नसते. लांबचे मित्र मंडळी तर सोडाच सगेसोयरे सुद्धा!!

आजारी माणसाला सांत्वनेची गरज असते. त्याने माणसाला धीर येतो. आजाराला सामोरे जाण्यासाठी आत्मबल मिळते.

आजारी माणसाला दवाखान्यात भेटायला जातो ते कशासाठी? एक कर्तव्य पार पाडायला? तसे असेल तर न गेलेच बरे. काही लोकं भेटायला येतात तेव्हा खूप लांब उभे राहून रुग्नाकडे केविलवाण्या नजरेने बघतात. तेव्हा तू रुग्ण घायाळ होतो हे त्यांना लक्षात ही येत नाही. याने रुग्नाचे दुःख आणखी वाढते हे त्यांना समजत ही नाही. इतकी असंवेदनशील असतात ती माणसं. एखाद्या ने आजारपणाचा विषय काढला कि सर्व लांब पळतात. गंमतीजमती केल्या कि सर्व खुश असतात. म्हणजे काय? सुखात तर सर्व मदतीला हजर असतात हो. दुःखात मदतीला धावून येईल तो देव. पण अशी देवमाणसं दिवा घेऊन शोधली तरी सापडणार नाही.

मी याबद्दलचा माझा अनुभव शेअर करू इच्छितो. माहित नाही आपणास आवडेल कि नाही ते. पण तरीही मला लिहावेसे वाटत आहे.

माझे एक घनिष्ठ मित्र व कार्यालयात वरिष्ठ अधिकारी होते. ते कर्करोगाने आजारी होते. शेवटी शेवटी ते खूप जास्त तब्यत खराब झाली तेव्हा मी भेटायला जात होतो तेव्हा त्यांच्या डोक्यावर प्रेमाने मायेने हात फिरवतात तसा फिरवत होतो. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर वेगळेच संतुष्टीचे भाव दिसायचे. शेवटच्या क्षणी मी त्यांना भेटलो तेव्हा त्यांनी माझी गळा भेट घेतली व खूप रडले. मला ही अश्रू आवरता आले नाही. मी भेट घेऊन परत निघालो व ७-८ मिनिटांनी ते गेल्याचा निरोप आला.

आणखी एक उदाहरण. मी मुंबई येथे नौकरीला होतो. लोकलने जाऊन येऊन करत होतो. एकदा माझ्या शेजारी एक अपटूडेट वयस्कर मनुष्य येऊन बसला. काही वेळाने त्या माणसाला अस्वस्थ वाटायला लागले. घामाने अंग ओलचिंब झाले. मी त्यांच्याशी संवाद साधला. लगेच सर्वांना सिटवरून उठवलं. आणि त्यांना सिटवर झोपवलं. पेपर होताच. त्यांना सतत हवा घातली. माझ्या जवळ पाणी होते. ते पाजलं. अर्थात अज्ञान माणसाची मनोभावे सेवा केली. त्यांची विचारपूस केल्यावर लक्षात आले कि त्यांना कुलाब्याला जायचे आहे. राहायला ठाण्याला होते. पण ते म्हणाले मला भायखला येथे बहिणीकडे सोडा. तो मनुष्य पारशी होता. मोठा होता व स्वतः ची कंपनी ही होती. त्यासाठी जात होता. मग मी इतरांशी बोललो.एक जण तयार झाला सोबतीला. मनात चक्र फिरू लागली. काही अडचणीत तर येणार नाही न आपण. पण मग मनाची तयारी केली आणि त्यांना भायखळा येथे उतरवले. पुन्हा मनात विचार आला आणि सोडून दिला. टेक्सीने त्यांच्या बहिणी कडे सोडून दिले. तेथे गेल्यावर जी वागणूक मिळाली त्याने नेकी कर और दरिया में डाल.. ही म्हण आठवली.

तर असे हे जग आहे संवेदनाविरहित किंवा असंवेदनशील.

शेवटी अकेला आया है अकेला ही जाएगा. तसेच खाली हात आया है खाली हात जाएगा रे बाबा.🙏🙏

🙏🙏🙏🙏

(9720765)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

घराच्या बाहेर पडताना SMS हा शब्द लक्षात ठेवा.
S – Senitizer.
M – Mask.
S – Social Distancing.
🧴 😷 👩‍💼 👨‍💼 👨‍💼
Stay home stay safe😊👏
शुभ सकाळ👍👍

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.manachyakavita.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s