चिरतारुण्य…


हजारो लाखो माहित नाही कधी ते. पण खूप वर्षांपूर्वी ब्रम्हांडाची व त्यावरील जीव जंतू मानव प्राणी अशा असंख्य सजीवांची निर्मिती त्या महान अशा अदृश्य शक्तीने केली आहे. मानव तर आता एक दोन शतकापूर्वी इंजिनिअर झाला. नवनवीन मशिनरीचा शोध करू लागला. पण तो ईश्वर तो तर लाखो वर्षापूर्वीच इंजिनिअर झाला होता किंवा मुळातच इंजिनिअर होता. तसे नसते तर त्याने ही चालती फिरती बोलती मशीन कशी तयार केली असती बर. असो.

पण पूर्वी असे देश परदेश असे काही नसायचे. लोकं एकटे दुकट्याने रहात नसत. जंगली जनावरांची भिती. म्हणून कबिले करून रहात. सर्व वसाहती नदी काठीच वसल्या आहेत. मानव व प्राणी ही आले. त्यात जो ताकतवान असतो त्याचेच चालते. कबिल्यात जो ताकदवान तोच प्रमुख. जसा कबिला वाढला तसा तो राजा झाला. आता आतापर्यंत जगात राजेशाही होती. आता म्हणजे एक दोन शतकापूर्वी पर्यंत. मला वाटते सर्वात पहिला लोकशाही अंमलात आलेला देश म्हणजे अमेरिका आहे. जवळपास दोनशे वर्षे झाली आहे त्यांना स्वतंत्र होऊन. असो.

मागील तीन दशकात या जगात अफाट बदल नोंदवला गेलाय. मला वाटते १९९० नंतर आपल्या कडे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात आणले गेले. इंटरनेट तर सन २००० नंतर खूप वापरले जाऊ लागले. मागील दोन दशकात इतक्या झपाट्याने तंत्रज्ञानात बदल झाला आहे कि कल्पना ही करू शकत नाही. अहो २००६ मध्ये फ्लॉपी वापरल्या जात होत्या. त्यांची क्षमता kB मध्ये असायची. मागच्या दशकात तर डोळे दिपवून टाकणारा बदल झालाय. जेव्हा पासून स्मॉर्ट फोन आलाय जग मुठीत सामावल्या सारखे वाटायला लागले आहे. प्रत्येक जण करलो दुनिया मुठ्ठी में असे म्हणू लागलाय.

पण ही प्रगती काय कामात आलीय हो या दिवसात?? एका अतिसूक्ष्म निर्जीवाने हतबल करून सोडले आहे सर्व जगाला. इतके बरे आहे हे इंटरनेट, मोबाईल लेपटॉप असल्याने लॉकडाऊन असून ही वेळ कळत नाही. सहज घरात जगता येतेय आपल्याला. असे म्हणता येईल. पण तसे नसते ही. खरं म्हणजे परिस्थिती नुरूप मनुष्य स्वतःला तयार करत असतो.

पूर्वी ही असे अंधारलेले दिवस पाहिले आहेत की आपण. सन १९७१-७२ मध्ये. घराच्या खिडक्यांना काळे कागद चिकटवून दिले होते की. रात्री घरातून बाहेर उजेड पडू नये हे कारण. प्रसंग आठवत असेलच. भारत पाकिस्तान युद्ध. बांगलादेशासाठी. मला वाटते मी ६ वी मधे होतो तेव्हा. तेव्हा कोठे होते टिव्ही न मोबाईल. तरीही आपण घरात राहत होतो न. काळानुरूप आपल्या सवयी बदलत असतात. म्हणून आपल्याला त्रास होतो.

असो. हे कठिण क्षण ही निघून जातील. आपण खंबीरपणे आलेल्या प्रसंगाला तोंड देऊ.

ईश्वराने निर्मिलेली ही पृथ्वी आणि हे ब्रम्हांड नेहमी चिरतरुणच राहिल यात दुमत नाही.
सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः ।

(10020768)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आपण जगासाठी
एक व्यक्ती आहोत,
परंतू आपल्या कुटुंबासाठी आपण
संपूर्ण जग आहोत”
म्हणून स्वतःची काळजी घ्या
!! घरी राहा – आनंदीत राहा !!
!!…शुभ प्रभात…!!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.ownpoems.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐