निर्जंतुकीकरण….

मित्रांनो, कोरोनाने आपले राहणीमान बदलून टाकले आहे. निर्जंतुकीकरण हा आता आपल्या जीवनाचा अविभाज्ज भाग होऊन गेला आहे. दिवस भर हात धुवून धुवून हातांचा रंग बदलून गेला आहे. कदाचित डोळ्यांचा रंग बदलला असेल माहि नाही. तसेच हात बारिक झाल्या सारखे ही वाटते. हा गंमतीचा भाभ झाला. पण बदल झाला आहे हे नक्की.

घराबाहेर पडलो तर सोसायटीच्या गेटवर सेनिटाईझर दिसते. दुकानात गेलो तर हात सेनिटाईझ केल्याशिवाय गत्यंतर नाही. प्रत्येक दुकानात हिच अवस्था. दिवसातून किती वेळा हे हात सेनिटाईझ करायचे कळत नाही राव. कंटाळा आलाय आता या सर्वांचा.

बाहेरून काही सामान घरात आणला तर त्याला स्वच्छ करून घेणे. हे आता नित्य कर्म झाले आहे. (बायको डोक्यावर बसून करून घेते ते वेगळे.) (हा गमतीचा भाग समजावा.).

भाजीपाला आणला कि मिठाने स्वच्छ धूवून काढणे. मग सुकायला ठेवणे. साधारण १२ तास तसे हवेशीर ठेवले कि वायरस निघून जातो असे म्हणतात बुआ. आंबे, चिकू, सफरचंद अशी फळ आणली कि धुवून काढावी. ठिक आहे. पण किराणा आणतो त्याला धुता येत नाही. मग गुगल युट्यूब वर सांगितले कि त्याचे ७२ तास विलगीकरण करावे. कारण प्लास्टिकवर ७२ तास तो भाऊ वास्तव्य करतो.

असेच सामान आणल्यावर मी सौ.ची गम्मत करायचे ठरव

ले.

गिरणी वरुन दळण सुद्धा आणले होते.

अग सर्व धुवून स्वच्छ करून झाले. फक्त पिठ राहिले आहे.

ती हसायला लागली. त्याला पण धुवायचे का?

मग निर्जंतुकीकरण केलेच पाहिजे नाही का?

ती पण निरुत्तर झाली. येथे तुम्ही काहीच करू शकत नाही. आहे तसे स्विकारावे लागते.

एकदा साखर आणली.

अग ती साखर दुकानदाराने पिशवीत माझ्या समोर भरली आहे. तीला पण स्वच्छ करणे भाग आहे.

मित्रांनो, असे बरेच पदार्थ असतात जे इतरांकडून हाताळले जातात. पण ते आपल्याला तसेच वापरात आणावे लागतात.

तरीही तुम्ही साखरेचा पाक करून भरून ठेऊ शकतात.

पिठाचे काय? हो तुम्ही स्वतःची घरघंटी घेतली तर गोष्ट वेगळी.

म्हणून आपल्याला कोरोना सोबत जगायला शिकावेच लागेल असे वाटते.

मात्र काळजी ही घ्यायलाच हवी. मास्क बांधणे अत्यावश्यक आहेच. सोशल डिस्टेंसिंग सुद्धा महत्त्वाचे आहे. शक्य तो कामाशिवाय बाहेर पडू नये.

कोरोनाने काय दिवस दाखवले आहेत. एकेकाळी मास्क वापरला तर दंड होता. आता नाही वापरला तर दंड आहे.

(10920777)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

ह्या जगात प्रत्येक गोष्ट सुंदर आहे पण ती तुमच्या विचारांवर आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबुन आहे.

जशी सकाळची शाळा भरतांना घंटेचा आवाज कर्कश वाटतो पण त्याच घंटेचा आवाज शाळा सुटतांना कानाला मंजुळ वाटतो

💐शुभ सकाळ💐

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.koshtirn.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

गजर….

मित्रांनो, लहानपणी हातचेच काय भिंतीवर चे किंवा गजरचे सुद्धा घड्याळ नव्हते. कारण हलाखीची परिस्थिती. बहुतेक घरांमध्ये हिच परिस्थिती होती. पण तरीही सकाळी उठायला किंवा शाळेत जायला उशीर झाला नाही. आणि उशिरा आला म्हणून शिक्षकांच्या छडीचा मार खाल्लेला आठवत नाही. तसे होमवर्क झाले नाही किंवा कुठल्याही कारणाने मार खाल्लेला नाही. असो. तो मुद्दा नसून मुद्दा घड्याळ हा असल्याचे एव्हाना आपल्या लक्षात आले असेलच.

तर त्याकाळी घड्याळाची गरज कधी भासत नव्हती. सकाळी कोंबडा आरवला कि सकाळ झाली असा अलिखित नियम होता. तर आई सकाळी साडे तीन चारला उठायची.

गुगल ईमेज

मग जात्यावर ज्वारी दळली जायची. अर्थात दररोज नव्हे. नंतर सडा सारवण होई. आपल्याला जाग आली तर आईला कामात हातभार लावत असू. तसे सकाळी लवकर उठायचा प्रघात होताच. सकाळी पाच वाजेपर्यंत सर्वांच्या आंघोळी होऊन शाळेसाठी तयार होत असत. जाऊ दे हे सर्व. घरोघरी असच असायच.

पुन्हा मुळ मुद्याकडे येऊ. कोंबड्याची बांग म्हणजे गजर.

आता शहरात कुठे भेटणार कोंबडे गजर द्यायला. तसे खायला जे मिळतात ते बिच्चारे जीव वाचवण्यासाठी नाकाम धडपड करत असतात. त्यामुळे त्यांना कधी आरवताना बघितल्याचे आठवत नाही. (कधीतरी भविष्यात असे झाले कि कोंबडा भव्य आकाराचा झाला आणि त्यासमोर माणसे मुंगी सारखी झाली तर काय होईल? दाना चुगेगा मुर्गा.☺️ कल्पना करवत नाही न. तर हे चित्र बघा. हे चित्र अज्ञात कलाकाराने रेखाटले आहे. व्हाट्सएपच्या माध्यमातून प्राप्त झाले होते. भन्नाट कल्पना आहे न!)

पण मी एक गम्मत सांगू का? मला एक शोध लागला आहे. आमच्या परिसरात प्रचंड झाडे आहेत. तसे पुणे हे हिरवळीचे शहर म्हणून ही ओळखले जाते. त्या झाडांवर खूप पक्षी असतात. विविध प्रकारच्या चिमण्या, कोकिळ, पोपट असे अनेक पक्षी वास्तव्याला असतात. मी बर्याच वेळेला उशीरा झोप येते किंवा लवकर जाग येते तेव्हा सुमारे साडे तीन चार च्या वेळी पक्षी मोठ्या प्रमाणात कलरव करतात. कोकिळ तर खूप जोरात गाते. तिचे ते अगदी शांततेच्या प्रहरीचे ते गाणे खूप मधूर वाटते.

गुगल ईमेज

तर मला वाटते कोंबड्याची मक्तेदारी पक्ष्यांनी मोडून काढली आहे. आपला याबद्दल अनुभव असेल तर अवश्य कळवा.

(10820776)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

जीवनरुपी फुलातील मधाचा आस्वाद घेत घेत जीवन व्यतित करा मित्रांनो, जीवनाचा वेगळाच आनंद अनुभवायला येईल.

👍शुभ प्रभात👍

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.koshtiravindra.blogspot.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

श्रेष्ठदान…

अवयव दान श्रेष्ठ दान

मित्रांनो, काही दिवसांपूर्वी आपल्या व्हाट्सएपवर एक मनाला मोहून टाकणारा डोळ्यातून अश्रूच्या धारांना वाट करून देणारा अप्रतिम संदेश आला होता. तो मी शेअर करित आहे. मला खात्री आहे आपणास नक्की आवडेल.

एक डॉक्टर आई आपल्या तरुण मुलाचे अपघाती निधन झाल्यावर त्याचे ह्रुदय एका रूग्णालयाला दान करते.

काही दिवसांनी ते रूग्णालय ज्याला तिच्या मुलाचे ह्रुदय लावून जिवंत ठेवलेले असते त्या व्यक्तीला तिच्या क्लिनिक वर आणतात. तेव्हा ती आई त्या व्यक्ती च्या ह्रदयाचे ठोके स्टेथिस्कोपने ऐकते. त्यावेळी आईच्या चेहऱ्यावरील हावभाव बघा मित्रांनो. तिला ते ठोके ऐकून आपल्या बाळाचा भास होत असावा. खालील व्हिडीओ बघा. मन हेलावून टाकणारा आहे.

मला खात्री आहे हा व्हिडीओ पाहून आपले ही मन अवयव दान करण्यास प्रव्रुत्त होईल.

(10720775)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

एका ठराविक वयानंतर तुम्हाला कोणीही विचारत नाही की तुमची प्राॅपर्टी किती, गाड्या किती, बँक बॅलन्स किती परंतु एक गोष्ट नक्की विचारली जाते कि तुमची तब्येत कशी आहे, म्हणून जी गोष्ट विचारली जाते त्यात योग्य गुंतवणूक करा.!!
🙏 शुभदिवस🙏

🍀Health is wealth 🍀

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.ownpoems.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

कुतुहल…

लहानपणी म्हणजे अगदीच लहान असतांना जेव्हा बाळ फक्त बसायला सुरुवात करते तेव्हा आपण त्याच्या सोबत खेळताना त्याला एखादी गोळी किंवा आणखी काही तरी मुठीत घेऊन त्याला मुठ दाखवतो. तो उत्सुकतेपोटी मुठ उघडायचा भरघोस प्रयत्न करतो. बराच प्रयत्न करून थकला कि तो रडायला लागतो. ही उत्सुकता म्हणजे कुतूहल हा आजचा विषय.

मित्रांनो, उत्सुकताला मला वाटते थोडी वरची पदवी म्हणजे कुतूहल असावी.

अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना एखादी लपलेली गोष्ट बघायची उत्सुकता असतेच. माणसाचा हा निसर्गतः स्वभावच आहे. जे अज्ञात असते त्याचे कुतूहल व एकदाचे उलगडले कि तू कोण आणि मी कोण. अगदी मुठीत काही नसल्यासारखे करतो तो ते कोडं उलगड्यावर.

प्राणी सुद्धा यातून सुटलेले नाहीत. त्यांना ही निसर्गाने माणसासारखेच बनवले आहे. अगदी ते माणसाळलेले नसलेले किंवा वनचर असले तरीही. असेच काही व्हिडीओ व्हाट्सएपच्या महासागरातून समुद्र मंथन केल्याने सापडल्यासारखे अवतरलेले असतात. असे व्हिडीओ मी सहज म्हणून येथे आपल्या साठी सादर करत आहे. मला कुतूहल राहिल आपल्या कशा प्रतिक्रिया मिळतात त्याच्या. आता खालील व्हिडीओ पहा. मांजरीला चिमणीचं कुतुहल आहे म्हणून तिला लावून बघायचा प्रयत्न करतेय कदाचित. किंवा चिमणीला हात लावल्यावर वाईट प्रतिक्रिया येईल कि काय असे दडपन मनावर असेल. किंवा ही खरोखर ची चिमणी आहे न! इ.इ.

हा दुसरा व्हिडीओ बघा. येथे मणी मावशीच आहे. तिने कदाचित खेकड्याला पहिल्यांदा पाहिले असावे. म्हणून ती सावधानतेने त्याला स्पर्श करत आहे. खेकडा ही हुशार आहे. जेव्हा कंटाळला तेव्हा माऊला सळो की पळो करून टाकले.

(10620774)
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

जगातील प्रत्येक गोष्ट सुंदर आहे…
मात्र तीची सुंदरता तुमच्या विचारांवर आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे.

👍शुभ सकाळ👍

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.koshtirn.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

एक मित्र असा असावा…

मित्रांनो, ही पोस्ट लिहित असताना अचानक माणसाचा जन्म नेमका केव्हा होतो?असा एक विकट प्रश्न माझ्या पुढे येऊन उभा राहिला. आता तुम्ही मला नक्की वेड म्हणाल. आईने ज्या दिवशी ज्या क्षणी जन्माला घातल तोच तर जन्माचा दिवस असतो. प्रत्यक्षात तर तोच असतो.

पण मला वाटते हा जन्म दिवस नसून फक्त जगात आल्याचा दिवस असावा. खरा जन्म तर आईच्या पोटात असताना जेव्हा आत्मा किंवा जीव शरिरात प्रवेश करतो तो आपला जन्म दिवस असायला हवा. तेव्हा पासून आपले शिक्षण सुरू होते. समजायला लागते. जग बघितले नसते. पण समजते. चाहूल समजते. हालचाल सुरू होते. म्हणजे आपण जिवंत असतो. म्हणून तर अभिमन्यू जन्माला येतात. आणखी एक. याचा अर्थ जगातील पहिली ओळख किंवा मैत्री ही आईशीच होते तेही पोटात असतांना पासून. पण जन्मानंतर हळूहळू आपल्या भोवतीचे वलय विस्तारत जाते आणि नवनवीन मित्र मैत्रीण आयुष्यात डोकावत जातात. कारण काही फक्त डोकावून निघून जातात. म्हणजे क्षणिक मैत्री होते. काही तहहयात मैत्री च्या बंधनात बांधले जातात. शाळेतील मित्र मंडळी शक्य तो आयुष्य भर सोबत असतात. अगदी जगातील कोणत्याही कोपऱ्यात तुम्ही गेला तरीही. बालपणीची मैत्री कधीच विसरता येत नाही.

असो, व्हाट्सएपच्या महाजालावर एक अज्ञात कवीने लिहिलेली मैत्री वरील कविता मला फार आवडली. म्हणून मी येथे सादर करित आहे. अज्ञात कवीवर्य क्षमस्व.

💞एक मित्र असा जरुर असावा
ज्याच्यापुढे ह-दयातलं प्रत्येक पान उलगडावं💞
आठवणींच्या रथात बसुन💞
मनाच्या बागेतुन फिरुन यावं💞

एक मित्र असा जरुर असावा💞
त्याच्या भरलेल्या घरात💞
एक खुर्ची आपली असावी💞
स्वार्थ,अहंकार,गर्व,
गैरसमज याला अजिबात जागा नसावी.💞

एक मित्र जरुर असावा💞
थकलेल्या संसारातुन निवांत💞
दोन दिवस त्याच्याकडे 💞
राहायला जावं💞
Bye करताना त्याच्या डोळ्यातुनच💞
” मी वाट बघतो रे तुझी परत” असं💞
पाणावल्या डोळ्यांनी सांगावं.💞

एक मित्र असा जरुर असावा.
भेटताच त्याला भुक लागल्यासारखे बोलावं💞
कोष्ट्याच्या जाळ्यासारखे💞
त्याच नी माझे भांडण असावे….💞
जे त्याला मिठी मारताच💞
मीठासारखे विरघळुन जावे.💞

एक मित्र असा जरुर असावा.💞
वेडया…इतक्या दिवसांनी का फोन केलास?..💞
असं बोलताना ही त्याच्या💞
रागात गोडवा असावा💞
एकमेकांच्या हक्कांचा जणु💞
त्यात आरसाच दिसावा.💞

एक मित्र असा जरुर असावा💞
शेवटचे श्वास घेताना💞
आपल्या उशाला त्यानं बसावं💞
पुढच्या जन्मी आपण नक्की भेटु💞
असं रडत नाही तर💞
त्यानं हसत सांगावं….💞

एक असा मित्र जरुर असावा….💞

(10520773)
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

जगातील प्रत्येक गोष्ट सुंदर आहे…
मात्र तीची सुंदरता तुमच्या विचारांवर आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे.

👍शुभ सकाळ👍

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.koshtirn.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

अभिमान…

माणसाला थोडा जरी पैका जवळ आला कि त्याचा अभिमान वाढतो. त्याला आकाश ठेंगणे वाटायला लागते. काय करू आणि काय नाही असे होऊन जाते. आपल्या जवळची सर्व माणसे त्याला तुच्छ वाटायला लागतात. हा निसर्ग नियम प्रत्येक प्राण्याला लागू पडतो बर का? माणूस असो अगर प्राणी येथून तेथून सारखेच. इतकेच कशाला वनस्पतींना सुद्धा हा नियम लागू पडतो. एरव्ही ऐटीत उभी असलेली झाडे वादळाने कशी झुकून जातात माहित आहे न. अक्षरशः आडवी होतात. तेव्हा कुठे जातो त्यांचा तो ताठरपणा, तो अभिमान!हे विचार मनात येण्याचे कारण शेवटी कोरोनाच. हा अतिसूक्ष्म निर्जीव विषाणू. कोठून आला आणि जगाला कोठे नेऊन ठेवले आहे. यापुढे कोठे नेऊन ठेवणार आहे हे कदाचित देव सुद्धा सांगू शकत नाही अशी आता माझी खात्री होत चालली आहे.जे शिखरावर होते जसे अमेरिका त्यांना लोटांगण घालायला भाग पाडले आहे त्याने. त्याच्या पुढे धनवान – गरीब, नेता- जनता, लहान-मोठा असा काहीच भेदभाव नाही. इतकेच कशाला? मोठ्या अभिमानाने शिर उंचावणारी शहरं न्युयार्क आणि मुंबई यांना सुद्धा शरमेने मान खाली घालायला भाग पाडलय त्याने. ज्या शहरात २४ तास वर्दळ असते, जे शहर कधी झोपत नाही ते शहर श्मशानासारखे सूनसान झाले आहे. हा फोटो बघा. जर तुम्ही मुंबई बघितली असेल तर आठवून बघा येथे किती गर्दी असते माणसांची. काही वर्षांपूर्वी असे वाचण्यात आले होते कि मुंबई सिएसटी स्टेशन वर एका दिवसात ५० लक्ष लोकं भेट देतात. कदाचित आकडा थोडाफार कमी जास्त असेल. पण मुद्दा तो नाही. इतक्या गजबजलेल्या शहराची काय अवस्था केली आहे. ती ही एका विषाणू ने. (मित्रांनो, आता लॉकडाऊन शिथिल केले असल्याने काही प्रमाणात वर्दळ सुरू झाली आहे. तो विषय वेगळा.)

मुळ मुद्दा हा आहे कि माणसाने कुठल्याही गोष्टींचा अभिमान कधी बाळगू नये. ज्याने अभिमान बाळगला त्याला निसर्ग त्याची जागा दाखवतोच.जंगलाचा राजा सिंह किंवा वाघ किती ताकदवान आहेत. पण यूट्यूबवर किंवा जिओग्राफिक चैनलवर व्हिडीओ पाहिले असतीलच. जेव्हा जिवावर बेतते तेव्हा जंगली म्हैस सुद्धा त्याला हाकलून लावते. असो. रामराम.

(10420772)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐ह्या जगात प्रत्येक गोष्ट सुंदर आहे पण ती तुमच्या विचारांवर आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबुन आहेजशी सकाळची शाळा भरतांना घंटेचा आवाज कर्कश वाटतो पण त्याच घंटेचा आवाज शाळा सुटतांना कानाला मंजुळ वाटतो💐शुभ सकाळ💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐www.rnk1.wordpress.com💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

लवचिकता…

रबराची लवचिकता आपणा सर्वांना माहिती असेलच. माणसाने आपल्या जीवनात ही अशी च लवचिकता बाळगायला हवी म्हणतात बुआ. जो मनुष्य अंगी लवचिकता बाळगतो तो यशस्वी होतो असे माझे व्यक्तिगत मत आहे. रबराची लवचिकता काय असते. त्याला जसे वाकवले तसे ते वाकते. दाबले कि दाबते. पण सोडले कि पुन्हा पूर्व परिस्थितीत येते.

आयुष्यात क्षणोक्षणी सुख दुःख येतच असतात. सुखाचा अनुभव आनंद देणारा असतो. पण दुःख सर्वांनाच नकोसे असते. तरीही आलेले दुःख झेलावेच लागते. तुम्ही त्यातून स्वतःला वेगळे करू शकत नाही. हो पण त्या दुःखाच्या क्षणांना लवकर विसरून जाऊ शकता. यालाच मी लवचिकता म्हणतोय. यात काही चुकले का माझे?

तसेच प्रत्येक कठिण प्रसंगाला सामोरे जायला हवे व रबरासारखे लगेच त्यातून बाहेर ही पडता यायला हवे. हवे कशाला तशी सवयच करून घ्यायला हवी.

आता तुम्ही मला प्रश्न करणार किंवा हे वाचत असतांना ☺️ तुम्हाला प्रश्न पडला असणार कि ही लवचिकता किती व कशी हवी? तर त्यासाठी हा व्हाट्सएपच्या माध्यमातून वायरल होत होत माझ्या गाठीत जमा झालेला एक व्हिडीओ बघा. काय म्हणावे या माणसाला? जणू देवाने बिन हाडांचा माणूस बनवून पाठवला आहे असे वाटते.

बघितला न! इतकीच किंबहूना यापेक्षा अधिकच लवचिकता अंगी बाळगा जीवन सुकर होईल.

(10320771)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

इच्छेतून हक्कात आणि
हक्कातून शब्दात जी उमटते
ती खात्री…
स्मृतीतून कृतीत आणि
कृतीतून समाधानात जी दिसते
ती जाणीव…
मनातून ओठावर आणि
ओठावरून पुन्हा मनात जाते
ती आठवण…

🌹शुभ सकाळ🌹

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.manachyakavita.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

तंत्रस्पर्श

मित्रांनो, या लॉकडाऊन च्या काळात तंत्रज्ञानाचा पुरेपूर फायदा झाला आहे किंवा घेण्यात आला आहे असे म्हणणे जास्त रास्त होईल असे मला वाटते.

अहो, लहान मुलांच्या ऑनलाइन क्लासेस होत आहेत. मुलं मोबाईल वर अभ्यास करत आहेत. नाही तरी आताची पिढी ही अत्यधिक टेक्नोसॅव्ही झाली आहे. अहो स्री असो अगर पुरुष रात्रंदिवस मोबाईलशी खेळत असतो. गरोदर स्री सतत मोबाईल हाताळत असेल तर येणारं बाळ हे अभिमन्यू असणारच. यात कोणाचेही दुमत असूच शकत नाही. हल्ली जन्मानंतर लगेच नवजात मुल मोबाईल चे दर्शन घेते. वडील तेथे नसल्याने बाळाचे फोटो व्हाट्सएपवर नाही का पाठवले जातात. नेहमी अशा टेक्नोसॅव्ही मुलांचे व्हिडीओ व्हाट्सएपवर वायरल होत असतात. आता हा खालील व्हिडीओ बघा. किती सहजतेने हाताळत आहे हा चिमुकला तो मोबाईल. अहो आज ही माझ्या सारख्या म्हातार्यांना ( सॉरी यांना हल्ली सिनियर सिटीजन म्हणतात) स्मार्टफोन हाताळायला भिती वाटते.पण ही आताची पिढी तर अभिमन्यू आहेत. अहो, जन्म झाल्या झाल्या जरी त्यांच्या हाती मोबाईल दिला तरी ते व्यवस्थित हाताळतील अशी माझी खात्री आहे.

बघा किती सहजपणे हाताळतोय हा बाळ मोबाईलला. जणू मागच्या जन्मापासून सर्व शिकून आलेला आहे.

मी मुद्दाम हून ह्या नविन पिढीला अभिमन्यू संबोधले. कारण हल्ली प्रत्येक स्रीकडे स्वतंत्र मोबाईल हा असतोच. आणि तो सतत हाताळला जातोय. कोणी यूट्यूबवर आवडीचे व्हिडीओ बघत असते किंवा सोशल मीडियावर चेटिंग तरी सुरू असते. हल्ली काय झालं आहे कि घरात प्रत्यक्ष उपस्थित लोकांशी संवाद कमी आणि व्हर्चुअल लोकांशी संवाद जास्त होतो. किंबहुना करायला आवडतो. गरोदर स्री ही हेच करत असते. मग ते बाळ का नाही हो शिकत असणार अभिमन्यू सारखे.

असे किती तरी व्हिडीओ वायल होत असतात.

आताची पिढी तंत्र स्पर्शाने न्हावून निघाली आहे बुआ.( बुआ म्हणजे आत्या नव्हे. आमच्या सारखे म्हातारे यांना आम्ही गावंढळ पणे बुआ म्हणतो. ☺️☺️)

(10220770)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

सुखापेक्षा दुःखामध्ये असताना मिळणारे ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आणि परिणामकारक असते.

🌹🌹🌹 सुप्रभात 🌹🌹🌹

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.ownpoems.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐