निर्जंतुकीकरण….


मित्रांनो, कोरोनाने आपले राहणीमान बदलून टाकले आहे. निर्जंतुकीकरण हा आता आपल्या जीवनाचा अविभाज्ज भाग होऊन गेला आहे. दिवस भर हात धुवून धुवून हातांचा रंग बदलून गेला आहे. कदाचित डोळ्यांचा रंग बदलला असेल माहि नाही. तसेच हात बारिक झाल्या सारखे ही वाटते. हा गंमतीचा भाभ झाला. पण बदल झाला आहे हे नक्की.

घराबाहेर पडलो तर सोसायटीच्या गेटवर सेनिटाईझर दिसते. दुकानात गेलो तर हात सेनिटाईझ केल्याशिवाय गत्यंतर नाही. प्रत्येक दुकानात हिच अवस्था. दिवसातून किती वेळा हे हात सेनिटाईझ करायचे कळत नाही राव. कंटाळा आलाय आता या सर्वांचा.

बाहेरून काही सामान घरात आणला तर त्याला स्वच्छ करून घेणे. हे आता नित्य कर्म झाले आहे. (बायको डोक्यावर बसून करून घेते ते वेगळे.) (हा गमतीचा भाग समजावा.).

भाजीपाला आणला कि मिठाने स्वच्छ धूवून काढणे. मग सुकायला ठेवणे. साधारण १२ तास तसे हवेशीर ठेवले कि वायरस निघून जातो असे म्हणतात बुआ. आंबे, चिकू, सफरचंद अशी फळ आणली कि धुवून काढावी. ठिक आहे. पण किराणा आणतो त्याला धुता येत नाही. मग गुगल युट्यूब वर सांगितले कि त्याचे ७२ तास विलगीकरण करावे. कारण प्लास्टिकवर ७२ तास तो भाऊ वास्तव्य करतो.

असेच सामान आणल्यावर मी सौ.ची गम्मत करायचे ठरवले.

गिरणी वरुन दळण सुद्धा आणले होते.

अग सर्व धुवून स्वच्छ करून झाले. फक्त पिठ राहिले आहे.

ती हसायला लागली. त्याला पण धुवायचे का?

मग निर्जंतुकीकरण केलेच पाहिजे नाही का?

ती पण निरुत्तर झाली. येथे तुम्ही काहीच करू शकत नाही. आहे तसे स्विकारावे लागते.

एकदा साखर आणली.

अग ती साखर दुकानदाराने पिशवीत माझ्या समोर भरली आहे. तीला पण स्वच्छ करणे भाग आहे.

मित्रांनो, असे बरेच पदार्थ असतात जे इतरांकडून हाताळले जातात. पण ते आपल्याला तसेच वापरात आणावे लागतात.

तरीही तुम्ही साखरेचा पाक करून भरून ठेऊ शकतात.

पिठाचे काय? हो तुम्ही स्वतःची घरघंटी घेतली तर गोष्ट वेगळी.

म्हणून आपल्याला कोरोना सोबत जगायला शिकावेच लागेल असे वाटते.

मात्र काळजी ही घ्यायलाच हवी. मास्क बांधणे अत्यावश्यक आहेच. सोशल डिस्टेंसिंग सुद्धा महत्त्वाचे आहे. शक्य तो कामाशिवाय बाहेर पडू नये.

कोरोनाने काय दिवस दाखवले आहेत. एकेकाळी मास्क वापरला तर दंड होता. आता नाही वापरला तर दंड आहे.

(10920777)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

ह्या जगात प्रत्येक गोष्ट सुंदर आहे पण ती तुमच्या विचारांवर आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबुन आहे.

जशी सकाळची शाळा भरतांना घंटेचा आवाज कर्कश वाटतो पण त्याच घंटेचा आवाज शाळा सुटतांना कानाला मंजुळ वाटतो

💐शुभ सकाळ💐

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.koshtirn.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s