जागतिक मीटर

होय मित्रांनो, आताच मी कोरोना ची जागतिक स्तरावर काय परिस्थिती आहे हे पहाण्यासाठी सुरुवात केली तर समोर एक साईट दिसली.

https://www.worldometers.info

मी ओपन केली तर अहो आश्चर्यम्.

मी अचंबित झालो. त्यावर लाईव्ह अपडेट्स सुरू आहेत. सेकंदाला अपडेट्स होत आहे. बरेच आकडे मला वाटते सेकंदाला शेकड्यापेक्षा जास्त असावेत. प्रचंड माहिती उपलब्ध आहे. जसे

१)आताची जगाची जनसंख्या

२) या वर्षातील आतापर्यंत चे जन्म

३) आजचे आतापर्यंत चे जन्म

४) या वर्षातील म्रुत्यु

५) या वर्षातील आतापर्यंत ची जनसंख्या वाढ.

६) आजची आतापर्यंत ची जनसंख्या वाढ

अशी अनेक प्रकारची माहिती उपलब्ध आहे.

या वर्षात आतापर्यंत बनवलेल्या कार, सायकली, संगणक, मोबाईल, टि.व्हि., लेप टॉप.

हेच नव्हे तर आतापर्यंत किती ब्लॉग पोस्ट लिहिल्या गेल्या?, किती ईमेल, किंवा ट्विट पाठवले गेले?, गुगलवर किती सर्च झाले?कोणत्या आजाराने किती गेले, किती सिगारेट ओढल्या गेल्या. अशा एक न अनेक बाबी तेथे आहेत. आणि सर्व लाईव्ह सुरू असतात.

मी फक्त आपणास नवीन काही माहिती व्हावी. म्हणून हे येथे सादर करित आहे.

बघा तर मग.

(11420782)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

👍सुमंगल प्रभात👍

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.rnk1.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

पाठीला डोळे

मित्रांनो, देवाने आपल्याला डोळे दिले आहेत समोरच बघायला. पण काही लोक असतात ज्यांची सहावी इंद्रिय म्हणजे सिक्स्थ सेंस जबरदस्त एक्टिव असते. इतकी कि ते समोर बघत असतात पण त्यांना पाठीमागे काय चालले आहे हे ही बघता येते.

अर्थात हे काही आपल्या साठी नवीन नाही. कारण आपण सिनेमा मध्ये हिरो गुंडांना मारत असतो तेव्हा त्याला पाठीमागे कोण आहे हे कळते. व तो मागच्या गुंडाला पाठीमागे न बघता बरोबर मारतो. हे झाले सिनेमाचे जे काल्पनिक असते. पण प्रत्यक्षात असे होऊ शकते ही कल्पना केली आहे का आपण? नसेलही कदाचित. चला तर मग खालील व्हिडिओ पहा. अर्थात हा ही व्हाट्सएपच्या माध्यमातून प्राप्त झाला आहे. खूप जूना आहे. संग्रहात होता. अचानक सापडला. यावरून ही पोस्ट लिहिण्याची कल्पना सूचली.

बघितलं का? किती प्राविण्य मिळवलेले आहे ह्या कारागिराने. बघा तो मागचा विटा फेकणारा वेगवेगळ्या एंगल ने विटा फेकतो आहे. तरीही हा मागे वळून न पाहता अचूकपणे विट झेलत आहे. पाठीला डोळे असल्यासारखे. हे ते डोळ्यावर पट्टी बांधून सायकल/मोटार/मोटार सायकल चालवण्या सारखे आहे. मन लावून सराव केला तर हे होते असे मला वाटते. यात जादू नाही बर का!

सराव केला तर अशक्य ही शक्य होऊ शकते! हेच यावरून सिद्ध नाही का होत?

(11320781)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

इच्छेतून हक्कात आणि
हक्कातून शब्दात जी उमटते
ती खात्री…
स्मृतीतून कृतीत आणि
कृतीतून समाधानात जी दिसते
ती जाणीव…
मनातून ओठावर आणि
ओठावरून पुन्हा मनात जाते
ती आठवण…

🌹शुभ सकाळ🌹

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.manachyakavita.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आडनावे भाग-२

मित्रांनो, वडील व मुलगी यांच्यातील खालील संवाद वाचा. आणि काही उमगले का? ते अवश्य कळवाः-

मंजुळे‘ बेटा जरा ‘फावडे‘ आणि ‘कुदळे‘ आण. आपण ‘हिरवे‘ ‘पोपट‘, ‘काळे‘ ‘कावळे‘, ‘पाखरे‘ यांना ‘घरटे‘ बांधण्यासाठी ‘आवळे‘ ‘जांभळे‘ ‘करवंदे‘ ‘बाभळे‘ अशी ‘झाडे’ लावू. आणि हो येतांना त्या बागेत झाडाखाली पडलेली ‘सदाफुले‘, ‘पांढरे‘, ‘लाल‘, ‘हिरवे‘, ‘निळे‘ ‘फुले‘ व इतर ‘कचरे‘ पडलेली आहेत ती उचलण्यासाठी ‘पितळे’ च्या पराते‘ पण आण.

थोड्या वेळाने बाबा खाली बसले. मंजूळेने विचारले, ‘काय झाले बाबा?’

बाबा म्हणाले, ‘मंजुळे, बेटा थकलो ग काम करुन. माझे ‘डोके‘, ‘खोपडे‘ आणि ‘कपाळे’ भन्नाटलेले आहे. डोळ्यासमोर ‘काजवे‘ चमकत आहेत. ‘भांगे‘ खालल्यासारखे वाटते आहे. मन ‘गोंधळे’‘लेले’ आहे. ‘डोळे‘ ‘आंधळे‘ झाल्यागत वाटत आहेत. जीभ ‘कडू‘ झाली आहे. मला ‘गोडे‘ ‘साखरे’चा चहा करतेस का थोडा.’

‘बाबा, चहा हवा असेल तर देते. पण चहासाठी उगाच ‘खोटे‘ खोटे नाटकं करू नका.’ मंजूळा.

‘अग चहासाठी ‘खरे‘ ‘खोटे’ करू नको. मला ‘उभे’आडवे‘ ‘आपटे‘ल्यासारखे होते.’ बाबा.

‘जा माझ्या ‘नातू’ला पाठव. तो चांगला आहे. ‘लहाने’च बरे असतात ग.’ बाबा.

‘बाबा, नातूचा जास्त ‘लाड’ करू नये.’ मंजूळा.

थोड्या वेळाने.

मंजूळा, ‘बाबा, बस आता. चला घरी.’

‘अग काही वर्षांनी ही ‘झाडे‘ ‘मोठे‘ व ‘जाडे’ होतील. मोठी ‘राणे‘ होतील येथे. मग या ‘क्षीरसागर‘वर पाणी प्यायला ‘गाढवे‘, ‘वाघ‘, ‘हत्ती’, ‘हरणे‘, ‘लोमडे‘, ‘बकरे‘, ‘कोल्हे‘, ‘लांडगे‘, ‘डुकरे‘, ‘मांजरे‘,’उंदरे‘, ‘कुत्रे‘,’घोडे‘, असे अनेक प्राणी पाणी पिण्यासाठी येतील. पाण्यात ‘मगर‘ वास्तव्य करतील. झाडांवर ‘फुलपाखरे‘ ‘मुंगुस‘ फिरतील. तेव्हा किती प्रसन्न होईल मन.’ बाबा.

‘बर बाबा चला आता जेवण करा.’

‘अग, बेटा येताना ‘कापडे‘, ‘फडके‘ काही आणलीत का हात पुसायला. आणि खायला ‘भाजीभाकरे‘ ‘कांदे‘ आणली आहेत न.’

अरे हो बेटा ‘फुलपात्रे‘, ‘तांबे‘ आणली आहेत कि नाही. ही ‘धरणे‘ आहेत न. येथील पाणी घेऊ प्यायला.’

हा बाप बेटीचा संवाद असाच सुरू राहिला. आणि संध्याकाळी दोघे घरट्यात परतले.

लक्षात आले असेलच मित्रांनो हा आपल्या मराठीतील आडनावे वापरून तयार केलेला संवाद आहे.

(11220780)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

दगडासारख्या कठीण

परिस्थितीवर
घाव घालण्याची

जिद्द असली की,
मूर्तीसारखी सुंदरता

आयुष्याला लाभते…

🌹सुप्रभात🌹

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.ownpoems.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

गुरु पौर्णिमा

ध्यानमूलं गुरुर्मूर्तिः

पूजामूलं गुरुर्पादम् ।
मन्त्रमूलं गुरुर्वाक्यं

मोक्षमूलं गुरूर्कृपा ।।
ध्यानाचे मूळ गुरूंची मूर्ती,

पूजेचे मूळ गुरूंचे चरण,

मंत्रांचे मूळ गुरुंचे वाक्य आणि मोक्षाचे मूळ गुरूंची कृपा!!!

🙏🙏🙏

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू

गुरुर्देवो महेश्वरः
गुरुःसाक्षात् परब्रम्ह

तस्मैश्रीगुरवे नमः।।”

गुरू पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!!

(11120779)
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.koshtiravindra.blogspot.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

टिव टिव

तुम्ही म्हणत असणार हे टिव टिव काय भानगड आहे बुआ.☺️

मित्रांनो, सध्या सर्व जगच टिव टिव करत आहे. टिव टिव करत करत एक निळ्या रंगाचा पक्षी आकाशात उडत असतो आणि एक एक सावज हेरत असतो. एव्हाना लक्षात आले असेलच सर्वांना.

नसेल तर आणखी क्ल्यु देतो. पत्र व्यवहाराची जागा या टिव टिव ने बळवावली आहे.

आता नक्कीच लक्षात आले असावे. तेच ते ट्विटर. या ट्विटर ने जगाचे राजकारण बदलून टाकले आहे.

मोठ मोठे निर्णय या ट्विटर ने होतात. मोठमोठ्या जागतिक घडामोडी या ट्विटर वरील एक साध्या संदेशाने होत आहेत.

इतके हे प्रभावी साधन झाले आहे. कोणी कधी कल्पना ही केली नसेल कि हे संदेशवहन करणारे एक साधे साधन इतके प्रभावी ठरेल.माझे ही अकाऊंट आहे. पण मी त्यावर काहीच करत नाही. तसे सध्या मी दुसरेही काहीच करत नाही. तो भाग वेगळा. आता तर लॉकडाऊन ने काही करण्यासाठी ठेवलेलेच नाही. कोरोना बाहेर आणि आपण घरात☺️.

साध्या एका ट्विट वर विदेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणायची व्यवस्था होते.

आणि हो विशेष हे आहे कि कोणीही कोणालाही ट्विट करून संदेश पाठवू शकते.

भविष्यात इतिहास लिहिला जाईल तेव्हा २१ व्या शतकातील सर्वात प्रभावी संदेशवहन साधन म्हणून ट्विटर हेच लिहिले जाईल अशी मला खात्री आहे.

(11020778)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.rnk1.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐