मित्रांनो, वर्तमानपत्रात नुकतीच एक आगळी वेगळी बातमी वाचण्यात आली. एका मुलीने आपल्या ५० वर्षीय विधवा आईचे लग्न लावून दिले. बातमी खरंच आगळीवेगळी वाटली. म्हणून मी लक्षपूर्वक व पूर्ण बातमी वाचली. तर मुलीचे वडील १०-१२ वर्षापूर्वी वारले होते. मुलीचे लग्न झाल्यावर आई घरी एकटीच राहत होती. आणि एकटेपणा माणसाला जगू देत नाही. तीहि स्त्री असेल तर एकटे राहणे अवघड असते. म्हणून त्या मुलीने आपल्या माउलीचे लग्न लावून द्यायचे ठरविले असावे. विशेष म्हणजे जावयाने सुद्धा यात सहभाग घेतला. हि घटना म्हणजे समाजात नवीन प्रथा किंवा पायंडा सुरु होत आहे असेच म्हणावे लागेल.
पण यानिमित्त नेहमीप्रमाणे माझ्या मनात बरेच प्रश्न घर करून गेले. गेले म्हणजे निघून गेले असे नव्हे. ते प्रश्न मनात येऊन पक्के घर करून राहू लागले. गमतीचा भाग वेगळा ठेऊन मूळ विषयावर परत येऊ.
त्यातील एक प्रश्न माझ्या मनात आला तो असा कि हि परिस्थिती का उदभवली. ५० वय असून एक जावई असताना लग्न करणे का आवश्यक वाटले. अर्थात त्या माउलीला नव्हे. भारतीय स्त्री या वयात लग्न करायचा विचार सुद्धा मनात आणत नाही. तर मुलगी आणि जावयाने त्या माऊलीचा एकटेपणा, सुरक्षितता या सर्वांचा विचार नक्कीच केला असणार. पूर्वीच्या काळी सुद्धा महिला कमी वयात विधवा होत असत. तेव्हा त्या माहेरी जाऊन राहत असत. मुलीचा पुनर्विवाह अजूनही समाजात तितकासा रुजलेला नाही. हा स्त्रीवर एका प्रकारे अन्यायच आहे. तेव्हा मामाच्या मुलीसोबत आत्याचा मुलगा मोठा होत असल्याने कदाचीत म्हणूनच मामाच्या मुलीशी लग्न करण्याची प्रथा जडली असावी. असो. तर त्या काळी एकेक घरात ४ ते ८ मूल मुली असत. मोठे कुटुंब असे. त्यामुळे ती विधवा माउली भावाकडे किंवा वडिलांकडे राहत असे. मुलांनाहि काही वाटत नसे. आता काळ बदललेला आहे.
एका कुटुंबात मुलगा असो व मुलगी एकच अपत्य असते. त्याचेच हे परिणाम आहेत. एकच मुलगी किंवा मुलगा असतो. मुलगी असेल तर सासरी जाते. मुलगा बहुतेक नौकरीसाठी विदेशात किंवा बाहेरगावी गेलेला असतो. किंवा सुनेला सासू आवडत नाही. अशी एक न अनेक कारणे असतात. ज्यामुळे सासूला एकटे राहावे लागते. अहो अशी अशी कुटुंब पाहायला मिळतात कि ८० वर्षाची आई वेगळी एकटी राहते व मुलगा थोड्याच अंतरावर आपल्या कुटुंबासोबत राहतो. त्या म्हातारी सोबत एक बाई असते सांभाळ करणारी. बारा तास ती सोबत राहते. रात्रीची वेगळी बाई येते सोबत म्हणून. पण त्या म्हातारीला नातवंडांचे सुद्धा सुख भोगता येत नाही. एक म्हातारी बिचारी दिवसभर एक बाई असते तिच्या सोबत. आणि रात्री. झोपेची गोळी घेऊन झोपायचे. अरे काय हे जीवन? देवा कोठे आहेस रे तू ? याचे मूळ कारण मला वाटते एक एक अपत्य असावं.
या एका अपत्यामुळे त्या अपत्याला ही तो एकटेपणा सलतो. हेवेदावे करता येत नाहीत. जीवनात जोपर्यंत प्लस मायनस म्हणजे सुख दुःख, चांगला वाईट हे सोबत अनुभवत नाही तोपर्यंत जीवनाचा आनंद उपभोगता येत नाही. फक्त सुख असेल तर त्याचे महत्त्व काय? दुःखाशिवाय त्याचे मुल्य शून्य. म्हणजे तुलना केली तरच सरसता लक्षात येते. म्हणून घरात एकटे मुल असेल तर तो कोणाशी भांडेल? बर वडील ही एकटे असल्याने काका किंवा आत्या असे कोणी नसते. म्हणजे त्यांच्या मुलात कधीतरी मिसळता येते. पण तसे ही नाही. तेव्हा पर्याय उरतो फक्त मित्रांचा. मित्र हे असतातच. पण शेवटी नातलग हे नातलगच. याने झाले काय कि काका- काकू, मामा- मामी, आत्या, चुलत भाऊ -बहिण, अशी नातीच राहिली नाहीत.
भला उसकी कमीज मेरी कमीज से सफेद कैसी? हे समोर जास्त पांढरे शर्ट असेल तर कळते. असा एकटेपणा माणसाला नंतर हिस्टेरिक करून टाकतो. चिडचिडेपणा वाढतो.
याचे रुपांतर मग कुटुंब विस्कटून टाकण्यात होते.
देव जाणे पुढे काय मांडून ठेवले आहे. १०० वर्षाने समाज कसा असेल ह्याची कल्पना केलेलीच बरी.
(12320791)
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
😊फुल कितीही सुंदर असू द्या
कौतुक त्याच्या सुगंधाचे होते.
माणूस कितीही मोठा झाला तरी
कौतुक त्याच्या गुणाचे, विश्वासाचे होते.
चांगल्या हृदयाने खुप नाती बनतात. आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात.💐🙏😊
🌹शुभ सकाळ 🌹
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
http://www.koshtiravindra.blogspot.com
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐