प्रसिद्ध शब्द


लोकांच्या तोंडून सतत बाहेर पडणारे शब्द म्हणजे प्रसिद्ध शब्द असे सर्वसाधारणपणे म्हणणे उचित होईल.

पण गुगल बाबा आले आणि याची परिभाषा बदलून गेली. गुगलवर सर्वाधिक सर्च केला गेलेला शब्द म्हणजे प्रसिद्ध शब्द असे समजले जाऊ लागले असे मला तरी वाटते. असो.

पण जेव्हा पासून ह्या नवीन संक्रमित रोगाने जन्म घेतला आहे, तेव्हा पासून जगामध्ये सर्वात जास्त उच्चारला जाऊ लागलेला शब्द म्हणजे कोरोना हाच असावा. अहो प्रत्येकाच्या तोंडून दिवसाला सैकडो वेळा उच्चारला जात असावा. इतकी या कोरोनाची दहशत पसरली आहे जगात.

पण हे सुरुवातीला असावे. नंतर जेव्हा हे लक्षात आले कि हा औषध नसलेला आजार आहे. तेव्हा याच्या पासून सुरक्षित कसे राहाता येईल हे शोधले गेले. मग जगाला समजले इम्युनिटी चांगली असेल तर आपण सुरक्षित राहतो. आता हा कोरोना जवळजवळ सात महिन्याचा झाला आहे. दररोज नवनवीन संशोधन समोर येत आहेत. पण परिणामशून्य. कारण याच्या वर कसलाच परिणाम होत नाही. तो दररोज नवनवीन रिकॉर्ड प्रस्थापित करू पहातोय. आता तर दरदिवशी होणार्या चाचण्यांचे प्रमाण वाढवणार आहेत म्हणे. ते दुप्पट म्हणजे रूग्ण संख्या ही दुप्पट. तेव्हा आकडेवारी पाहून धडकीच भरेल. आजच ५५ हजार ची रोजनिशी गाठली आहे त्याने. तेव्हा तर दररोज लाखभर आकडे जाहीर झाले कि आकडे वाचूनच अंगाला कांपरे सुटेल आणि माणसाला कोरोना झाल्याचा संशय मनात घर करून घेईल.

तेव्हा एक तिनके का सहारा म्हणून इम्युनिटी हा शब्द कामी येईल अशी माझी खात्री आहे.

दररोज इम्युनिटी हा शब्द शेकड्याने काय हजाराने कानी पडतो. इतका की तो कपाळी बसल्या सारखी जाणीव होऊन जाते.

टिव्ही लावला कि जाहिराती दिसतात. आता बहुतेक जाहिराती मध्ये इम्युनिटी शब्द उच्चारला जातोच. अहो जे पदार्थ यापूर्वी ही आपण वापरत होतो पण इम्युनिटी चा कधी विचार केला नाही. त्यातून आता इम्युनिटी मिळायला लागली आहे. असे टिव्हीवरुन कळते. मंत्रांचा जाप करतो तसा हा शब्द कानी पडतो. आणि दररोज चा डोज कानी पडल्यावर आटोमेटिकच इम्युनिटी वाढल्याचा भास होतो.

असो. तुम्हाला ही तुमची इम्युनिटी वाढल्याची जाणीव झाली असेलच बघा. बघा बघा. झाली न!! तेच ते.

(11520783)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

कौतुक हा शब्द खूप छोटा आहे. पण ते करायला मात्र मन मोठे लागते.

👍सुमंगल प्रभात👍

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.koshtirn.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

2 thoughts on “प्रसिद्ध शब्द

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s