सल्ल्यांची खिचडी😊


हाँ, तर आपण काल कोठे होतो? अरे हो, खिचडीचा सल्ला ऐकत होतो. आज त्या सल्ल्यांची खिचडी करू या.☺️☺️

गणपतरावांना मोबाईल मुळे होत असलेल्या त्रासाजवळ आपण होतो.

दिवसभर मोबाईल वर म्हणजे यूट्यूबवर कोरोना चे व्हिडीओ बघत बसतात. आणि त्यांनी ऐकून झाले कि मला ( मी नव्हे हे गणपतराव म्हणत आहेत. उगाच तुमचा गैरसमज होईल. आणि मग माझे काही खरे नाही. आणि हो आता हे लक्षात ठेवा. …….परत परत सांगणार नाही😊) ऐकायला देतात. देतात कसले भाग पाडतात ऐकायला. नाही ऐकले तर दुपारचा चहा व संध्याकाळ चे जेवण मिळणे दुरापास्त होईल अशी भिती मनी असते. अहो, बाहेर सर्व बंद नसतं न तर हॉटेलमध्ये जाऊन प्रथम चहा, मग जेवण आणि नंतर कॉफी घेऊन दोन तासानेच उठलो असतो.
मी ही त्यांनी दिलेला तो व्हिडीओ ऐकतो. एक म्हणतो पाण्याची वाफ घ्या. लगेच वाफेच मशीन काढलं जातं. आणि वाफ घेतली जाते .
सौ. “कसे वाटले हो?”
आम्ही,” अहो, किती फ्रेश वाटल सांगू.” असे तोंड आ करून पुढे बोलणार तोच, “सांगा की मग. मी तेच तर विचारतेय.” पुढील प्रश्न समोर हजार झाला.
आम्ही लागलीच प्रत्त्युरतरलों, “खूप छान वाटलं बघ.”
“आता रोज सकाळ संध्याकाळ घेत चला ही वाफ. ही मशीन येथे पलंगाच्या बाजूलाच असू द्या.” असे म्हणून स्वारी किचन कडे निघाल्या. थोडा वेळ घरात स्मशान शांतता पसरली. मी ही गाणे ऐकत बसलो. अर्थात कानात. जोरात तर शक्यच नाही. परवानगी नाही न तशी. कोणाची भिती? शेजारी पाजार्यांची. नाही हो. ती देव माणसं काहीच बोलत नाहीत. आमच्या घरात बंदी आहे मोठ्या आवाजाची.
जूनी गाणी ऐकता ऐकता कसे आपण स्वर्गात पोहोचल्यासारखे वाटते. कधी झोप लागते कळत ही नाही. पाच वाजेला जाग आली. तसा दररोज चारलाच उठतो. आज उशीर झाला. स्वर्गात स्वर्गीय आनंदात मग्न असल्याने☺️.
“अहो, जरा ही यादी घ्या आणि सामान आणून द्या बर.” सौ. हातातील कागद आमच्या हातात देत म्हणाल्या.
“बर आणतो.”
मी तयारी केली. लगेच स्वारी चहा घेऊन हजर. मस्त पैकी चहा घेतला. खूप छान चहा करते ही. पण मी कधी बोलून दाखवले नाही. आपले तत्वच वेगळे. बोललो की चव बिघडते चहाची. हा अनुभव आला. म्हणून स्तूति करणे बंद केले. परिणाम असा झाला कि प्रत्येक वेळेला चहाची चव मागील पेक्षा उत्तम असते.( कोणाला पाहिजे असेल तर हा सल्ला नोंद करून ठेवा. फुकट आहे.) असो. तर आम्ही बाहेर जाऊन सामान आणला. दुकानदाराने पिशवीत भरून दिला. पैसे दिले आणि पिशवी घेतली, तर वजन काहीच नाही. काय असेल बर? विचार करत करत घरी पोहोचलो. स्वारीने लांबूनच आम्हाला येताना पाहिले. बेल वाजवण्यापूर्वीच दार उघडे दिसले. आम्हाला बघता बरोबर “ती चप्पल बाहेरच काढा. कशाला ही हात न लावता सरळ बाथरूम मध्ये जा. कपडे काढा. ओले करा आणि मग दोन वेळा संपूर्ण अंगाला साबण लावून आंघोळ करा.” असे आदेश जरी झाले.
” हे काय नवीन.”
“अहो मी आताच यूट्यूबवर पाहिले.”
आम्ही गूपचूप मान हलवली आणि सरळ बाथरूम गाठले. सांगितलेल्या सूचनांप्रमाणे सर्व आटोपले आणि बाहेर आलो. तोच स्वारी वाफेची मशीन तयार करून हजार. “आता हि वाफ घ्या. बाहेरून आल्यावर वाफ घ्या म्हणून सांगितले आहे.”
काय करणार घेतली वाफ. पुन्हा मस्त चहा आला. आज आम्ही खुश झालो. कारण आमचे आवडते पेय चहाच. आपली चादर लहान आहे. तर हि संध्याकाळ ची वेळ. आता. पिशवीतील सामान काढण्याची फर्माईश झाली. आणि आम्ही आदेशाचे पालन केले. सामान काढल्यावर आम्ही बघताच राहिलो. अहो हे काय आहे. अहो त्या युट्युबवर काढा बनवायचा सांगितला आहे. हा त्याचा सामान. अरे देवा. आता काढा प्यावा लागणार बहुतेक. हा काढा कोणासाठी अर्थात तुमच्यासाठी. का? अहो तुम्हीच तर बाहेर जातात न. आम्ही बिच्चारे घरातच असतो.
झाले. त्या रात्री काढा घेऊनच झोपलो. रात्री गारठ वाढल्याने आम्ही मोठ्याने शिंकलो. आणि शिंक येताना सौ.ने पाहिले व ती रुमाल घेऊन ती मला देण्यासाठी धावली. पण ती म्हणजे पी. टी . उषा नव्हे. म्हणून तिची गती कमी पडली. ती पडता पडता वाचली. आणि आम्ही शिंक थांबवता थांबवता. पण शिंक मात्र आलीच. आम्ही एक मात्र छान काम केले. शिंकताना हाताच्या कोपरात शिंकलो.
सौ. म्हणाल्या, “तुम्ही पहिल्यांदा एक चांगले काम केले.”
आम्ही, “कोणते?”
“अहो शिंकले नाही का हाताच्या कोपरात. ते.”
“आम्ही दिवसभर चांगलेच काम करतो. पण कोणाला दिसत नाही.” आम्ही पुटपुटलो.
“काय म्हणालात. तुम्ही आणि चांगले . एक काम जमत नाही हो तुम्हाला. एव्हडे शिकून काय उपयोग.”
आम्हाला प्रश्न पडला. नवरे सर्व अनाडीच असतात का ? सर्व बायका नवऱ्यांना असेच का म्हणतात? टी व्ही. बघा. सिनेमात बघा. सर्व दूर असेच चित्र असते. असे का? देवाने पुरुषांवर इतका अन्याय का हो केला असावा?

आणखी व्हिडीओ पाहावे लागू नये म्हणून आम्ही विचार करत करत झोपी गेलो.

( पुढील भाग नंतर वाचा.)(12720795)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

जगासाठी आपण फक्त
एक व्यक्ती आहात,
परंतू कुटुंबासाठी आपण त्यांचे
संपूर्ण जग असतो.”
म्हणून स्वतःची काळजी घ्या
!! घरी राहा – काळजी घ्या आणि आनंदी राहा !!
!!…शुभ प्रभात…!!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 http://www.koshtirn.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s