ते सद्ध्या काय करतात?

मित्रांनो, सेवानिवृत्त होणे म्हणजे अडगळीत जाण्यासारखे आहे. घरात ही अडचण आणि बाहेर ही.

सेवानिवृत्त झालेली मंडळी नेमके काय करतात, अर्थात त्यांची दिनचर्या कशी असते याबद्दल एक पोस्ट व्हाट्सएपच्या कट्ट्यावर आली होती. ती मी येथे शेअर करित आहे. जे सेवानिवृत्त आहेत त्यांना पोस्ट वाचल्यावर ही आपल्यासाठी किंवा आपल्या दैनंदिनी वर आधारित आहे असेच वाटेल. किंबहुना दररोज आपल्या सोबत असेच घडते याची जाणीव होणार. लिहिणारा नक्की सेवानिवृत्त असावा व त्याने स्वतः सकट आपल्या मित्रमंडळी चा ही अभ्यास केला असावा.

ते रिटायर झाल्यावर सध्या काय करतात,

याची यादी…(स्वत; व इतरांच्या डोक्याला ताप)
😂😂😂
१) गरज नसताना दूध आणायला जाणे.
२) गेटबाहेर झाडू मारणे, सडा टाकणे. (तरी बरं रांगोळी येत नाही, नाही तर ती पण काढली असती)
३) दिवसभर वॉचमनसारखे खिडकीत बसून राहाणे.
४) प्रत्येक काम मीच करायला पाहिजे, असा उगाच तगादा लावणे आणि बाकीचे कसे नालायक आहेत हे दाखवून देणे.
५) पाण्याची टाकी भरेपर्यंत उगाच उभे राहाणे, Automatic असली तरी उगाच गच्चीवर जाऊन टाकीत डोकावणे.
६) गरज नसताना बँकेत जाऊन
निरर्थक वाद घालणे आणि मी किती कामात पटाईत होतो हे पटवून द्यायचा प्रयत्न करणे.
७) मुलाचे फेकून दिलेले शर्ट, टी शर्ट, शूज उगाचच वापरायला काढणे.
८) कार जर बाहेर काढायची म्हंटले, तरी उगाच फालतू चौकश्या करणे.
९) उगाचच चट्ट्या पट्याची हाफ पॅन्ट घालून गेटमधे किंवा मागच्या दारात उभे राहाणे.
१०) बिनकामाचे फोन करुन उगाचच काड्या करीत बसणे.
११) येणाऱ्या जाणाऱ्याला उगाचच एखाद्या नातेवाईका विषयी गाऱ्हाणी सांगत बसणे आणि स्वतःचे हसे करुन घेणे.
१२) नातवांचे मित्र / मैत्रिणी दारात खेळायला आले की अंगावर खेकसणे.
१३) कुठे बाहेर जायचे म्हंटले, तरी कार मधे पुढे बसायचा यांचाच मान आणि परत वर Driving चे धडे. (गाडी चालवायला येत नसली तरी!)
१४) एखादी आवडती सिरीयल / सिनेमा लागला म्हणून बघत बसले, की यांची फालतू बातम्या बघायची वेळ होते!!
१५) बजेट, संसद सभागृहातला गोंधळ समजत नसला तरी वेड्यासारखे tv वर बघत बसणे.
१६) सर्वांचे एकमत झाले असताना मला का विचारले नाही, म्हणून रुसणे आणि विचारले असताना मला कशाला विचारता, म्हणून झटकून टाकणे.
१७) आपल्याला मोबाईल मधले फार कळते, हे समवयीन असलेल्या म्हाताऱ्याला दाखवत काहीतरी सेटींग चेंज करणे.
१८) एखादी गोष्ट नवीन करताना, उदा: घरातील फर्निचर, फॅब्रीकेशन उगाच स्वतःच्या कारागीराला बोलवून ती गोष्ट चौपट खर्च करून बनवणे आणि ती कितीही वेडी वाकडी झालेली असली, तरी जाणाऱ्या, येणाऱ्याला दाखवून हसे करून घेणे.
१९) उगाचच जुने वाहन, उदा: Scooter अथवा मोटर सायकल न विकता ठेऊन देणे, कधीतरी काढून उगाच फार मोठ्ठा मेकॅनीक असल्यासारखे कीका मारत बसणे, प्लग साफ करत बसणे, (नेमके यावेळेस नातवाची मैत्रिण अथवा सुनेची भिशी असते).
२०) लाईटबील, फोनबील जास्त येते म्हणून जाता येता लाईट बंद करणे, आपण फोनवर बोलताना रागाने पहाणे आणि स्वतः फोन वरून कोणाबरोबर तरी तासन तास कागाळ्या करीत बसणे.
२१) संध्याकाळी बागेत फिरायला जाणे आणि तासन् तास बाकडे अडवून बसून राहणे.
२२) पिवळी गोळी, निळी गोळी अशा प्रकारे गोळ्यांची नावे लक्षात ठेवणे म्हणजे डॉक्टर तपासायला आला की वेडाच व्हावा!!
२३) कारण नसताना सोसायटीच्या कामाचे झेंगट गळ्यात घेणे.
👆🏽 सर्व सेवा निवृत्त लोकांनी हे वाचावे व आपण यातले काय काय करतो, ते तपासणे. तुमचा स्कोर १३ पेक्षा जास्त झाला, तर अधून मधून शेगांवला गजानन महाराजांच्या दर्शनाला जात जा!!

मित्रांनो, वाचली का पोस्ट. चपखल बसते न आपल्या दिनचर्येत. मग हसा बर. 😊☺️😊☺️👍👍👍

(14020808)

💐💐💐💐💐💐💐👌💐👌💐👌💐👌💐

आयुष्याने शिकवलेलं एक वाक्य…
“जिंकलो तर आवरायचं आणि हरलो तर सावरायचं…”
🌼🌹 शुभ सकाळ🌹🌼

👌💐👌💐👌💐👌💐👍💐👌💐👌💐👌

http://www.ownpoems.wordpress.com

💐👍💐👌💐👍💐👍💐👍💐👌💐👍💐

ते आठवणीतील दिवस

मित्रांनो, साधारण ५०-५५ वर्षापूर्वीचा काळ आठवा. बारकी बुरकी पोरं कधी नागडी तर कधी लंगोट वजा फडके बांधलेली अंगणात खेळताना दिसायची. कधी कोणाला याची लाज वाटत नसे. कारण घरोघरी असेच होते. ५-६ वर्षाचं पोर होईपर्यंत कपडे नसायचे नेसायला. मग मोठ्या भावाचे जूने कपडे मिळायचे घालायला. ऐपतच नसायची नवीन घेण्याची.

तेव्हा पोरांच्या छातीच्या बरगड्या दिसायच्या आणि पोट अगदी पाठीला टेकलेले दिसायचे. खायला सुद्धा मोठ्या मुश्किलने मिळत होते. आता परिस्थिती बदलली आहे. जन्म होताच मुलांना कपडे घातले जातात. वर्षाचा मुलगा सुद्धा नागडे राहायला लाजतो. एक वर्षाचा होईपर्यंत हजार रूपये खर्च होतात त्याच्या कपड्यावर.

आताची मुलं खाणे आणि बसल्या बसल्या मोबाईल खेळणे. दुसरे काम नाही. त्यामुळे चौथीपाचवीच्या पोरांची सुद्धा सुटलेली पोटे दिसतात.

पूर्वी पोरं दिवसभर खेळून खेळून रात्री बिछान्यावर पडले की गाढ झोपी जात.

त्याकाळी घरात फक्त आजी आजोबांना डोळ्याला चष्मा असायचा. आता दुसरीची मुलं नाकावरील चष्मे सावरत शाळेत बसतात. बरेच आजीआजोबा वयाची८० गाठत पण चष्मा कधी लागला नसायचा.

तेव्हा वडिलांचा फार धाक असायचा. अहो मुलं म्हातारी झाली तरी वडिलांशी बोलायची हिंमत होत नसायची. आता काळ बदलला आहे. पोरं वडिलांच्या डोक्यावर जाऊन बसतात. नाराज होऊ नयेत म्हणून त्यांचे डॅड त्यांना ते म्हणतील तेव्हा हॉटेलात नेऊन ते म्हणतील ते खाऊ घालतात. पूर्वी हॉटेल बघायला ही मिळत नसे.

तेव्हा कधीतरी सणावाराला केलेली पुरणपोळी गोड लागायची. आता मुलांना दररोज झोपेतून उठल्यावर आई मागे लागून खाऊ घालते ते अंजीर, पिस्ते, मनुका पण त्यांना चव नसते. आता दररोज गोडधोड खायला असल्याने त्याचे कौतुक किंवा आकर्षक ते काय असणार! पूर्वी कधीतरी जिन्नसी पदार्थ बघायला मिळायचे. त्यामुळे तोंडाला पाणी सुटायचे. मग खायलाही खूप मजा यायची. आता तोंडाला पाणीच सुटत नाही. त्यामुळे खाण्यातील मजा व पदार्थांची चव हा प्रकारच राहिलेला नाही.

तेव्हा वाढदिवसाला आई औक्षण करून प्रेमाने एखादा बेसनाचा लाडू हातावर ठेवायची. खूप आनंद व्हायचा. आता मुलांच्या वाढदिवसाला तोंडाला फासण्यासाठी एक आणि खाण्यासाठी एक असे दोन मोठे केक्स लागतात. पण ती मजा दिसून येत नाही.

तात्पर्य काय कि

तेव्हा फार काही मिळत नसतानाही आनंदात जगता यायचं.

आता

बरंच काही मिळत असूनही आनंदी जीवन कसे जगावे हे माहित नसते.

म्हणून यावरील सेमिनार्स’ अटेंड करावे लागतात. तरीही आनंदाची वानवाच असते.

(13920807)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

💐💐शुभ सकाळ💐💐

योग्य क्षणाची वाट बघण्यासाठी संयम असणे हिच जीवनातील अवघड परीक्षा आहे.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.koshtirn.wordpress.com

💐💐👌💐👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

विजयादशमी..2020

सस्नेह नमस्कार,

🌹🌹 सुप्रभात🌹🌹
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
आज विजयादशमी.

आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेऊन आली अश्विनातली विजयादशमी, दसऱ्याच्या आज शुभ दिनी, सुख-समृद्धी नांदो आपल्या जीवनी..!! 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आपणांस व आपल्या सर्व कुटुंबीयांस, आप्तेष्टांस, इतर सर्व परिवारांस विजया दशमीच्या मनपूर्वक खूप खूप हार्दिक शुभेच्छा..!!🌳🍀☘️🌿🍃🌳
💐💐💐💐🌺🌺🌺🌺🌺🌷🌷🌷🌷
श्री परमेश्वर आपणा सर्वांना सुख, समृद्धी, भरभराटी, समाधान, ऎश्वर्य, शांती, नवचैतन्य, दिर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य प्रदान करो. 🙏🙏🙏🙏🙏🙏
आपल्या सर्वांच्या मनातील सर्व मनोकामना, स्वप्ने व आशा आकांक्षा पूर्ण होवोत हिच श्री परमेश्वर चरणी प्रार्थना. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

(13820806)

http://www.manachyakavita.wordpress.com

🌲🌹🌺🌷🥀🌼🌻🍀🌸💐🎄🙏🌼🌻🍀🌼🌻🍀🌼🌻🍀

मौन आणि हास्य

मौन 😷आणि हास्य 😀या

दोन्हींचा उपयोग करा..

मौन आपलं रक्षा 🏹कवच आहे…

आणि हास्य स्वागताचे द्वार आहे.🙏🌹…!!!”

👍👍शुभ सकाळ👍👍

किती किती छान संदेश आहे हा मित्रांनो. मौन आणि हास्य.

“मौन हे रक्षा कवच आहे.”

बरोबर आहे मित्रांनो. पण कोणापासून रक्षा करण्यासाठी चे हे कवच असावे. तर ते एकाच ठिकाणी वापरले जाऊ शकते नाही का? जेथे सतत शब्दांचा मारा पडतो तेथे. आणि हा शब्दांचा मारा कोठे पडतो. तर घराघरात. ☺️☺️😊☺️😊☺️😊

म्हणून मला वाटते हा संदेश निश्चितच एखाद्या विवाहित पुरुषाने तयार केला असावा. कारण लग्न झालेली माणसं बोलू शकत नाही न! मुळात त्यांना बोलायचा अधिकारच नसतो. हे मौनच त्यांचे आजन्म कवच असते. नाही का!☺️. बिच्चारे पुरुष☺️

हे शब्दांचे बाण जेव्हा आपल्या दिशेने झेपावतात न तेव्हा हे मौन कवच कामी येते. ढाली सारखे काम करते हे कवच. इतके धारदार शस्त्र अस्तित्वात नाही जगात.☺️😊☺️

जर का तोंड उघडले तर काही खरे नाही. तुम्ही एक शब्द उच्चारला कि दहा शब्द बाण झेपावे लागणार हे नक्की. नव्हे अशी तयारी असेल तरच तोंड उघडावे. एका शब्दाला दहा म्हणजे दहा शब्दांना शंभर आणि शंभरला दहा हजार. गणित चुकले का? अरे हो शंभरला दहा पट म्हणजे एक हजार होतात. मी दहा हजार लिहिले. चुकले नव्हे ते उत्स्फूर्तपणे बाहेर आलेले शब्द आहेत. म्हणजे खरेच आहेत. कारण येथे गणिताचे कोणतेच नियम लागू पडत नाहीत.

येथे फक्त आणि फक्त त्यांचेच नियम लागू पडतात. 😃🤣

तुम्ही गप्प बसा हो.🤫 तुमच तोंड श्वास घेण्यासाठी जरी उघड असले तरी बोलणार आहात असे समजून हे एक वाक्य सतत ऐकविले जाते..

असो.

पण वरील संदेशात “हास्य स्वागताचे दार आहे.” हे जे वाक्य लिहिले आहे ते चुकुन लिहिले गेले असावे असे माझे मत आहे. कारण कुठला पुरुष घरात हसतो बर!

आणि चुकून जरी हसला तर त्याचे अनेक अर्थ नव्हे अनर्थ काढले जाण्याची दाट नव्हे घनदाट शक्यता असते. जसे

काही तरी गोडबंगाल आहे. त्याशिवाय तुम्ही हसणार नाही. किंवा

काही तरी काम असेल म्हणून हसत असणार.

किंवा

नेहमी पेक्षा जास्त पैसे हवे असतील.

किंवा

मित्रांसोबत पार्टी ला जायचे असेल.

किंवा

मित्रांसोबत फिरायला जायचे असेल.

किंवा

मित्रांसोबत सिनेमा पहायला जायचे असेल.

असी अनेक कारणे असू शकतात. त्यामुळे या लेखक महाशयांनी लिहिलेले हे वाक्य, “हास्य स्वागताचे द्वार आहे हे विवाहित पुरूषांच्या बाबतीत चुकीचे आहे असे माझे ठाम मत आहे.

ते तर आ बैल मुझे मार सारखे होईल.😃😃

(13720805)

🤣😃🤣😃🤣😃😃🤣😃🤣😃🤣😃😃

जगातील सर्वात सुंदर व अप्रतिम संगीत म्हणजे आपल्या ह्रदयातील ठोक्यांचा आवाज होय .!! ….
कारण, ह्याला साक्षात परमेश्वराने कंपोझ केले आहे. म्हणुन नेहमी हृदयाचे ऐका.!!!

🌹सुप्रभात🌹

🤣😃🤣😃🤣😃😃🤣😃🤣😃🤣😃😃

http://www.manachyakavita.wordpress.com

🤣😃🤣😃🤣😃😃🤣😃🤣😃🤣

सर्व मंगल मांगल्ये…..

🌹सस्नेह नमस्कार, सुप्रभात🌹

🌹🌺🌸🌼🌷💐🌻🌻💐🌼🌸🌺🌹

🌹 !! सर्व मंगल मांगल्ये,

शिवे सर्वार्थसाधिके, 🌹
🌺 शरण्ये त्रयम्बके गौरी नारायणी नमोस्तुते !! 🌺

🌹🌺🌸🌼🌷💐🌻🌻💐🌼🌸🌺🌹

आजपासुन सुरू होणा-या शारदीय नवरात्रोत्सवाच्या व घटस्थापनेच्या आपणास व आपल्या परिवारास मंगलमय हार्दिक शुभेच्छा !

श्री अंबाबाई माता, श्री महालक्ष्मी माता, श्री तुळजाभवानी माता, श्री रेणुका माता व श्री सप्तशृंगी माता यांची अखंड कृपा आपणावर आणि आपल्या परिवारांवर राहो. श्री मातेच्या कृपेने आपणास व आपल्या परिवारास सुख, समृद्धी, भरभराटी, समाधान, ऐश्वर्य, शांती, नवचैतन्य, दीर्घायुष्य, आनंद आणि उत्त्तम आरोग्य लाभो.

तसेच आपल्या व आपल्या परिवारातील सर्वांच्या मनातील सर्व मनोकामना, स्वप्ने व आशाआकांक्षा पूर्ण होवोत हिच श्री मातेच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना.

(13620804)
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🚩🚩🚩🚩 🚩🚩🚩🚩

!!जय माता दी !!

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🌹🌺🌸🌼🌷💐🌻🌻💐🌼🌸🌺🌹

मोठी माणसं

शिर्षक वाचून मोठी माणसं म्हणजे अंबानी किंवा एखादा मोठा पुढारी यांचं चित्र डोळ्यासमोर येते. पण येथे तसं काही नाही.

का हो? फक्त हिच मोठी माणसं असतात का? आपल्या कुटुंबातील सर्वात मोठ्या व्यक्तीची गणना यात होत नाही का? जितके समाजात त्यांना महत्त्व आहे तितकेच किंबहुना त्यापेक्षा ही जास्त आप आपल्या घरातील मोठ्या व्यक्तीला असते.

पण काळ बदलत गेला आणि घरातील मोठ्या माणसाचे महत्त्व हळूहळू कमी होत गेले.

ही मोठी माणसं आता अडगळीची वस्तू असते तशी झाली आहेत. यांची घराला गरज राहिलेली नाही.

वय झाले कि माणसाचे शरीर आणि बुद्धी दोन्ही क्षीण होत जातात. शरीर जसजसे साथ सोडत जाते आपली माणसं ही तसतशी संगत सोडत जातात.

मित्रांनो, आपण बालवयात होतो तेव्हाचा काळ आठवा. त्याकाळी आपली वडिलांशी बोलायची सुद्धा हिम्मत होत नसायची. काही काम असेल तर दोन तीन दिवस आईचे कान कोरायचे. तेव्हा आई हिम्मत करायची वडिलांना सांगायची. आता लहानपणीच मुल उलटं बोलायला धजावतात. घेऊन द्यायची ऐपत नव्हती तर जन्माला का घातले आम्हाला. असे लहानपणी बोलतात मुलं. आणि पालक कौतुकाने थाप देतात पाठीवर.

एखाद्या बापाने गालात लगावली तर मुलांची आई वर म्हणणार काय चुकल हो त्याचं? तुम्हाला हे शक्य नव्हते तर लग्न का केले? मुलांना जन्माला का घातलं?

आता घरातील मोठ्या माणसाचा धाकच राहिला नाही कोणाला!

पूर्वी मात्र घराचा कारभार मर्यादेत आणि धाकात चालायचा…! कुठल्याही कार्याचा श्रीगणेशा करण्याआधी घरातील जेष्ठ मंडळींचा सल्ला घेतला जायचा. त्यांच्या अनुभवाचा सर्व विचार करायचे. त्यामुळे घरातील देवघरा नंतर महत्वाचे स्थान म्हणजे घरातील वयस्करांचे होते…! आताची वास्तविकता पार वेगळी झाली आहे. आता देवघरालाच घरात जागा नसते तर देवासारख्या जेष्ठांना कोठे मिळणार जागा?

जसजसा जगात आधुनिकता व तंत्रज्ञानाचा पसारा वाढत गेला तसतशी माणसाची बुद्धी आणि मन संकुचित होत गेले.

घरात घरात गुळगुळीत फरश्या बसल्या आणि घरातील जेष्ठ त्यावर घसरत गेले. गेले ते सरळ घराबाहेरच. घरात त्यांना जागाच शिल्लक राहिली नाही. 😭

घरातून मोठी माणसं नाहीशी होत आहेत. त्यामुळे धाक नावाची गोष्ट सुद्धा लोप पावत चालली आहे. मर्यादा, धाक , शिस्त , संस्कृती इत्यादि प्रकारच्या या गोष्टी हल्ली व्हॉट्स ऍप वर सकाळी सकाळी संदेश पत्रावर वाचण्यापुरत्या मर्यादित राहिल्या आहेत. तेही कोणी वाचत नाही. आलेले संदेश शक्य तो कोणी डाऊनलोड करायच्या भानगडीत पडत नाही. जर पडलाच तर डाऊनलोड केले जाते पण वाचण्याच्या भानगडीत न पडता. डाऊनलोड केले कि फॉरवर्ड करायची घाई असते.

एकाला शोकसंदेश प्राप्त झाला होता. न वाचल्यामुळे प्रत्त्युत्तर देतांना अभिनंदन देऊन मोकळा झाला.

अहो सोशियल मिडिया वर शोकसंदेशाला लाईक केले जाते. काय म्हणायचे लोकांना. म्हटले तर काय करणार प्रतिक्रिया देण्यासाठी दुसरे साधनच नाही. अरे पण दोन शब्द लिहून दुःख व्यक्त करू शकत होतास न! पण इतकी तसदी ही घ्यायला मनुष्य तयार नाही. तास न तास वेळ घालवेल मोबाईल वर. असो.

पूर्वी घरातील मोठी माणसं लहानांना गोष्टी सांगायची. समाजातील चालीरीती शिकवायची.

आता तर मुलांवर ते जूने बुरसटलेले विचार नका बिंबवू. असे म्हणून सुना लहान मुलांना आजी आजोबां जवळ ही जाऊ देत नाहीत. अर्थात ते सोबत रहात असले तर.

पूर्वी संध्याकाळी दिवे लावणीला शुभंकरोति – रामरक्षा- आरतीचे स्वर कानावर पडत असायची. आता तर फक्त टिव्ही, मोबाईल बस.

म्हणून घरात मोठी वयस्कर माणसे पाहिजेत.

स्वयंपाकघर काय अन् देवघर काय.. सगळीकडे घरभर चपला घालून फिरायला सुरुवात झाली आणि घराचे घरपण नाही से झाले. याला उच्चभ्रू संस्कृती म्हणतात म्हणे.

मोजून-मापून पैसा खर्च कसा करायचा याचे धडे शिकवणारं, चुकलं तिथे रागवणारं व कधीतरी तोंड भरून कौतुक करायला ही न विसरणारं असं कुणीतरी मोठं माणूस प्रत्येक घरात पाहिजेच हो. त्याशिवाय घराला घरपण येत नाही!

एकाच छताखाली सर्वांना एकत्रितपणे बांधून ठेवणारं, टिव्ही बंद ठेवायला भाग पाडून सर्वांना सोबत घेऊन जेवण करायला लावणारं, घराबाहेर पडतांना मोठ्यांना वाकून नमस्कार करायची सवय लावणारं व देवापुढचा अंगारा कपाळावर लावणारं, आनंदाच्या वेळी पटकन देवापुढे साखर ठेवणारं, तर संकटाच्या वेळी देवाला साकड घालून प्रार्थना करणारं… असं मोठ्ठ माणूस घरात कुणीतरी पाहिजेच पाहिजे…!

पूर्वी मुलीच काय मुलांना ही घराबाहेर परवानगीशिवाय जायची अनुमती नसायची. आणि कोणी चुकुनही तशी हिम्मत करत नसे. खेळायला जायचे झाले तरी आईची परवानगी घेत असत. रात्री तर घराबाहेर अजिबात पडता येत नसे. तसे जेवण झाले कि घरातील मोठी मंडळी घराबाहेर खाटेवर येऊन बसत. तेव्हा त्यांच्या पुढ्यात येऊन बसता येत होते. मग ते गोष्टी सांगत. नसायची.

एखाद्या वडाच्या झाडासारखी सावली देणारी ही मोठी-वयस्कर माणसं असतात हो..! त्यांच्या असण्यानेच आपल्याला नकळत खूप आधार होतो. त्यांचे अस्तित्व घर व घरातील सर्वांसाठी खुप मोलाचे असते.

म्हणून म्हणतो मित्रांनो, घरातून बाहेर पडतांना डोकं ठेवून नमस्कार करण्याची सवय कायम राहावी म्हणून घरात ते अनुभवी पाय पाहिजेतंच…! त्यांच्याशिवाय घराला घरपण नाही.

( मध्यंतरी व्हाट्सएपच्या शाळेत एक छान पोस्ट वाचण्यात आली. त्याच विषयाचा आधार घेऊन ही पोस्ट लिहिली आहे.)

(13520803)

🌹🙏🙏❤🙏🙏🌹🌹🙏🙏❤🙏🙏🌹

चुका एकांतात सांगाव्या आणि कौतुक चारचौघात करावे. याने नातं जास्त टिकतं.

💐💐शुभ सकाळ💐💐

🌹🙏🙏❤🙏🙏🌹🌹🙏🙏❤🙏🙏🌹

http://www.koshtiravindra.blogspot.com

🌹🙏🙏❤🙏🙏🌹🌹🙏🙏❤🙏🙏🌹

विश्वास

आयुष्यात कोणाच्या विश्चासाचा फायदा कधी घेऊ नका. कारण एकदा का विश्वासाचा धागा तुटला की तो जोडण्यासाठी नात्यात एक गाठ कायमची निर्माण होते आणि अखंड धाग्या पेक्षा गाठीचा धागा नेहमीच कमकुवत असतो !!

शुभ प्रभात !!🌹🙏

होय मित्रांनो, सध्याच्या काळात जग ज्या असाध्य परिस्थितीतून विचरण करित आहे. त्या परिस्थितीत विश्वास हा एक दुवा आहे. म्हणून ईश्वरावरील आपला विश्वास असू द्या. कारण एकदा का तो डळमळीत झाला की परत मिळत नाही. या विश्वासावरच तर दुनिया जीवंत आहे. हा विश्वासच जगाच्या ह्रदयाची धकधक सुरू ठेवत असतो. म्हणून देवावर पूर्ण विश्वास असू द्या. जे बरे वाईट होत असते ते ईश्वराच्या मर्जीने होत असते. आपल्या हातात काहीच नाही. म्हणून त्याच्या वर विश्वास ठेऊन त्याच्या वर सर्व सोपवून शांतपणे पण काळजी घेऊन जीवन जगणे हेच महत्त्वाचे झाले आहे.

या परिस्थितीत हे निदर्शनास येते की माणसाचा एक दुसऱ्या वरील विश्वास पण डगमगला आहे. कोणी कोणाशी बोलत नाही. कोणी कोणाकडे जात नाही. फक्त आपल्या पूरतेच आपले विश्व होऊन बसले आहे. आपले विश्व आपले घरापुरतेच मर्यादित राहिले आहे. हा कोरोना संपेल त्यानंतर ही काही काळ आणखी लागेल परिस्थिती सुधारायला. माझे अंतर्मन सांगते कि येत्या काही महिन्यात हळूहळू कोरोना निघून जाईल. पुढील जुलै महिना हा कोरोना चा जगातील शेवटचा महिना असेल. अर्थात याला काही तथ्य नाही. काही आधार नाही. सहज माझे मन सांगत आहे म्हणून. यापूर्वी ही माझे मन म्हणाले होते कि देशपातळीवरील बाधितांचा आकडा एक लाखाला स्पर्श करून उतरणीला लागेल. आणि काय आश्चर्य तसेच घडले. जणू माझ्या बोलण्याची वाट पाहिली जात होती.☺️☺️

आता हे ही खरे ठरो हिच ईश्वर चरणी प्रार्थना👍

विश्वासावर आधारित खालील संदेश वाचा.

✍✍ 👌👌🏻👌👌🏻👌

“जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते !!

आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते . !! “

म्हणुन तर मैत्री व नाती ही एक कांदया सारखी आहे, ज्याला भरपूर थर आहेत, जे तुम

च्या आयुष्यात स्वादिष्ट चव आणतील..!!
पण
जर तुम्ही त्यांना मध्येच कापण्याचा प्रयत्न केलात तर,
ते तुमच्या डोळ्यात पाणी आणतील…!!💐💐

🌹शुभ सकाळ 🌹

हा संदेश लिहिणारा खरच महान आहे. दुख दोन्ही कारणांनी होते. खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने आणि चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने. अर्थात सुखी कोणीच नाही.

पुढे लेखकाने याचा मैत्री आणि नाती यांच्याशी संबंध जोडून त्यांचा कांद्याशी संबंध जोडला आहे. खरच कवि आणि लेखक यांच्या कल्पना अफाट असतात. परिकल्पनाच त्या.

(13420802)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.manachyakavita.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

लिमिटेड अनलिमिटेड….

🙋🏻‍♂ आपण जेवण करण्यासाठी एखाद्या खानावळीत जातो. फळीवर लिहिलेले असते लिमिटेड थाळी रुपये..५०/- आणि अनलिमिटेड थाळी रुपये ७०/- किंवा त्या त्या शहरातील दर.

लिमिटेड थाळी म्हणजे ३ पोळ्या, २ भाज्या, थोडा भात,इ. आणि अनलिमिटेड म्हणजे किती असणार तर किती ही खा. पण सामान्यतः मनुष्य किती खातो? माझ्या मते बहुतेक जण ३-४ पोळ्या खात असतील. क्वचित त्यापेक्षा जास्त खाणारे असतील. म्हणून तर परवडते त्या खानावळीवाल्याला. नाही तर आताच्या या कलयुगात कोण बसलय दानधर्म करायला.

असो. तर लिमिटेड जे असतं तेच एका अर्थाने बर असतं. अजीर्ण होत नाही.

तसच पूर्वी बरच काही लिमिटेड होतं. आणि तेच बरं होतं असं म्हणायची वेळ आली आहे….☺️

पूर्वी बहुतांश गोष्टी लिमिटेड होत्या व त्यामुळे आपले आयुष्य किती सुखी होते ते खालील उदाहरणांवरून बघा…..

# टी.व्ही.वर 1-2 channels होती व ती पण लिमिटेड वेळेसाठी. रात्री ठराविक वेळेनंतर बंद व्हायची व घरातील लोकं एकतर झोपायला जायची, नाहीतर छान गप्पा मारायची. आजी आजोबा नातवंडांना गोष्टी सांगायचे. कसं कौटुंबिक वातावरण असायच घरात. आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो. घरात सर्व सोबत बसून लांब बसलेल्या काल्पनिक मित्रांशी गप्पा मारत असतात… 😊😃😁😢

# दोन चाकी वाहनांचे उत्पादन लिमिटेड होते, बुकिंग केल्यावर वर्षादीड वर्षाने वाहन मिळायचे. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या लिमिटेड होती. प्रवासाचा आनंद मिळायचा. वाहनाचे कौतुक सायचे. वाहनावर जीवापाड प्रेम करत असत. आता एकेका घरात ३-४ दुचाकी आण१-२ चार चाकी वाहनं असतात. शहरात माणसे कमी व वाहने जास्त दिसतात. माणसे आणि वाहनांची गणना केली तर वाहनांची संख्या जास्त भरेल. 😄😊☺️😢

# पूर्वी गोडाधोडाचे पदार्थ फक्त सणासुदीला असायचे, ते पण लिमिटेड. त्यामुळे स्थूलतेचे प्रमाण कमी होते…पर्यायाने आजाराचे प्रमाण ही कमी होते. क्वचितच कोणी आजारी पडत असत. ह्रदय रोग, मधुमेह, असे आजार तर क्वचितच ऐकायला येत. 😉

# शाळांमध्ये लिमिटेड अभ्यास असायचा. त्यामुळे मुलांना खेळायला खूप वेळ मिळायचा व मुलांची मानसिक व शारीरिक जडण घडण नीट व्ह्यायची.. 💪👍आता परिस्थिती अशी आहे कि मुलं दिवसभर पुस्तकं व मोबाईल शिवाय दुसरे काहीच करत नाहीत. खेळायला जागा ही नसतात.

पण आताची मुल कंप्युटर युगातली आधुनिक मुलं आहेत. त्यामुळे काळानुसार अभ्यासक्रम उच्च प्रतीचा होत जायलाच हवा. आताची मुलं खूप चाणाक्ष व हुशार असतात. जणू अभिमन्यूच. जन्मतःच सर्व समजायला लागते.

अशा अजून अनेक गोष्टी आहेत ज्या लिमिटेड होत्या. पण आनंद अनलिमिटेड होता. त्यामुळे आपले आयुष्य खूप सुखी होते……

……….. पण आता सगळंच अनलिमिटेड झालंय…. 😢आणि त्यामुळे जीवनातील सुख मात्र खूपच लिमिटेड झालंय !!😧😩

(कुणी लिहिलंय माहित नाही, पण तथ्य आहे. व्हाट्सएपच्या शाळेत प्राप्त झालेला संदेश. मला आवडला. थोडे मी बदल केले आणि आपणासाठी सादर करित आहे.)

(13320801)

💐🌹🙏🏼🌹💐💐🌹🙏🏼🌹💐💐🌹🙏🏼🌹💐

आनंद देणार्या व्यक्तीपेक्षा हक्काने त्रास देणार्या माणसाच्या आठवणी जास्त आल्हाददायक असतात.

👌 आल्हाददायक सकाळ👌

💐🌹🙏🏼🌹💐💐🌹🙏🏼🌹💐💐🌹🙏🏼🌹💐

http://www.rnk1.wordpress.com

💐🌹🙏🏼🌹💐💐🌹🙏🏼🌹💐💐🌹🙏🏼🌹💐