आदर….

ताटातले पुर्ण अन्न संपवणा-या एका मुलाचे मित्र त्याची थट्टा करत असत. एक दिवस त्याच्या एका मित्राने त्याला विचारले, तु रोज ताटात अन्नाचा एक कण सुध्दा सोडत नाहीस? यावर त्या मुलाने खूप सुंदर उत्तर दिले..

तो म्हणाला त्याचे तीन कारण आहे..

१) हा माझ्या वडिलांप्रती आदर आहे, जे हे अन्न मेहनतीने कमवलेल्या रुपयांनी विकत घेतात,

२) हा माझ्या आई विषयी आदर आहे, जी सकाळी लवकर उठून मोठ्या चवीने हे अन्न शिजवते,

३) हा माझ्या देशातल्या त्या शेतकऱ्यांविषयीचा आदर आहे, जे शेतात उपाशी राहून, खूप मेहनत करून हे पिकवतात..

म्हणून ताटात उष्टे अन्न टाकू नये..

💐 शुभ सकाळ💐

(व्हाट्सएपच्या माध्यमातून प्राप्त संदेश )

(14520814)

शब्द….

शब्दांमुऴेच जुऴतात मनामनाच्या तारा..
आणि
शब्दांमुऴेच चढतो एखाद्याचा पारा..
शब्दच जपुन ठेवतात त्या गोड आठवणी
आणि
शब्दांमुऴेच तरऴते कधीतरी
डोऴ्यात पाणी
“म्हणूनच जो जीभ जिंकेल..
तो मन जिंकेल आणि जो मन जिंकेल …
तो जग जिंकेल……!

🙏🌹 शुभ सकाळ🌹🙏
सुंदर दिवसांच्या सुंदर शुभेच्छा

(14520814)

किंमत एका पेल्याची…

(व्हाट्सएपच्या माध्यमातून प्राप्त एक अत्यंत उपयुक्त संदेश…)

. *🌼 किंमत एका पेल्याची 🌼*
वडील आपल्या मुलाला सद्गुणांची किंमत समजावुन सांगत असतात. एक काचेचा पेला हातात घेऊन ते विचारतात,

*वडील :* “बाळ, या पेल्याची किंमत किती आहे.?”
*मुलगा उत्तरतो :* “असेल पंधरा रुपये.”
*वडील :* “समज या पेल्यात पाणी भरले तर.?”
*मुलगा :* “वीस रुपये”.
*वडील :* “आता या पेल्यात केशर विलायचीयुक्त उत्तम दूध भरले.”
*मुलगा :* “आता याची किंमत शंभर रुपये होईल,
*वडील :* “ठीक आहे. आता मी यात सोन्याचे काही दागिने भरतो.”
*मुलगा :* “आता तर याची किंमत लाखोंच्या घरात होईल.”
*वडील :* आता मी अनमोल अशा जवाहिरांनी
हा पेला भरतोय.”
*मुलगा :* “आता तर याची किंमत अब्जावधीच्या घरात जाईल किंवा त्याहीपलीकडे होईल.”
*वडील :* “बघ हं. नक्की ना.?” असे विचारतात,
आणि हातातला पेला फरशीवर सोडून देतात.
काचेचा पेला तो. फुटून त्याचे तुकडे होतात.
*वडील :* “आता याचे किती रुपये येतील.?”
*मुलगा :* “आता याची किंमत शून्य आहे बाबा.
उलटपक्षी काचा गोळा करताना त्रास होईल
तो वेगळाच.”
*वडील सांगतात :* “माणसाचेही जीवनही त्या काचेच्या पेल्यासारखेच आहे,
बाळा. जितका तू सद्गुणांनी युक्त होत जाशील,
तसतसा तू अनमोल बनत जाशील. समाजासाठीही आणि तुझीही योग्य दिशेने
उन्नती होत राहिल.
पण अवमूल्यन व्हायला, मातीमोल ठरायला,
आणि अधःपतन व्हायला मात्र एक क्षणही
पुरेसा असतो. तेंव्हा सतत सावध राहून
सद्गुणांची जोपासना कर.”

(आपल्याला मिळालेला जीवनरुपी पेला
कसा भरायचा तो ज्याने त्याने ठरवायचा.)🙏

(14420813)

आत्मबल..

(व्हाट्सएपच्या माध्यमातून प्राप्त सुंदर संदेश)
‼️शब्द शिल्प‼️
“”'””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
कुणी चांगले म्हणावे म्हणून
काम करू नका ,
आपण करीत असलेल्या कामाने
अनेकांचे भले होणार असल्यास
ते काम सोडूच नका.
जर आपला हेतुच शुध्द आणि
प्रामाणिक असेल तर…
आपल्यावर टीका करणाऱ्यांच्या
टीकेला काहीच महत्व नसते.
चांगल्या कर्मांची फळे
चांगलीच असतात.
मुखातून गेलेला साईराम आणि
निस्वार्थापणे केलेले काम
कधीही व्यर्थ जात नाहीत.”
कठीण परिस्थितीमध्ये
संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते…
ज्याच नाव आहे….

🌲आत्मबल – Will Power🌲

(14320811)

वेळ निघून गेल्यावर …..

वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार
आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस
यांची किंमत सारखीच असते.
डोळे बंद केले म्हणून………
संकट जात नाही .
आणि
संकट आल्या शिवाय ,..
डोळे उघडत नाहीत.
राग आल्यावर थोडं थांबलं,.. आणि चूक झाल्यावर थोडं नमलं,……….
तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात …..

🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻

☀️गुड मॉर्निंग☀️

(14220810)

ऐश्वर्यसंपन्न दिपावली

दिपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी! 🏮🏮

ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य🏮🏮 अधिकाधिक सुंदर व्हावं, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी,🪔🪔 विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा अधिकाधिक वर्षाव करोत हिच सदिच्छा…🪔🏮🪔🏮🪔🏮🪔🏮🪔

आपणांस व आपल्या संपूर्ण परिवारास दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.🏮🪔🪔🏮🪔🏮🪔🏮🪔🏮🪔🏮🪔🏮🪔🏮

ईश्वरकृपेने आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समाधान, आनंद, आरोग्य, आणि ऐश्वर्य अखंड नांदो याच मनापासून शुभेच्छा.
🪔🏮🪔🏮🪔🏮🪔🏮🪔🏮🪔🏮🪔🏮🪔🏮🪔

(14120809)

🏮🪔🏮🪔🏮🪔🏮🪔🏮🪔🏮🪔🏮🪔🏮🪔