परमानंद….


मित्रांनो,

आनंद हा कशातून प्राप्त करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. आनंद प्राप्त करण्याची अनेक साधनं आहेत.

कोणाला चित्रकलेतून, तर कोणाला संगीत कलेतून, तर कोणाला न्रुत्यकलेतून ही आनंद प्राप्त होतो.

कोणाला कथा लिखाणातून, तर कोणाला कवितेतून आनंदाची अनूभूति येते.

कोणाला भक्ती तून, कोणाला सिनेमा पाहून तर कोणाला मोबाईल वर गेम खेळून आनंद अनूभवता येतो.

अहो, कोणाकोणाला तर काहीही न करता फक्त निश्चल बसूनच आनंदाची अनूभूति घेता येते.

असे एक आणि अनेक प्रकारे आनंदाची अनूभूति घेता येते.

वर दिलेले सर्व प्रकार सकारात्मक आनंदात मोडतात असे मला वाटते.

या उलट ही अनेक प्रकार असतात आनंदाचे.

जसे कोणाची निंदा करण्यातून आनंद मिळविणे.

कोणाला बरेवाईट बोलून आनंद मिळविणे.

एखादा पाय घसरुन पडला कि त्यावर हसून आनंद मिळवता येतो.

अहो टोमणे मारण्यातून सुद्धा परमानंद मिळवतात म्हणे लोकं.

( हे वाक्य मुद्दामहून जोरात बोलून लिहिले मी. कारण लक्षात आले असेलच हो तुमच्या! काय ?काय विचारताय राव. स्वयंपाक घराच्या कानावर पडले पाहिजेत न हे शब्द. 😊😊)

हे मी लिहित नाही आहे बर का? हे संपतराव लिहित आहेत😊

(हे ही मला जोरात बोलावे लागले. नाही तर काही खरं नाही आमच.)

संपतराव सेवानिवृत्त झाल्यापासून त्यांच्यापेक्षा जास्त त्रास झाला असेल तर तो त्यांच्या घरच्यांना झाला आहे.

संपतरावांना सेवानिवृत्त झाल्यावरची पहिली सकाळ आठवली.

सकाळचे सात वाजले असावे. ते निवांत झोपले होते. आता कसलाच ताण नाही डोक्याला असा विचार मनात आला. पण हे काय स्वयंपाक घरातून काही शब्द कानावर पडले. ‘आता काय झोपाच काढायच्या आहेत दिवसभर.’ आणि पाठोपाठ हसण्याचा आवाज ही.

संपतरावांनी ओळख हा टोमणा आहे. आपल्याला आता हे असेच ऐकत राहावे लागेल असे त्यांना वाटून गेले. ते हि साहजिकच आहे. कारण स्त्रीला घर कामातून कधीच निवृत्ती मिळत नाही. म्हणून ती वैतागलेली असते. असो. प्रथम त्यांनी कानाडोळा केला. पण लागलीच घाबरून उठले. “अहो, गरम गरम चहा मिळेल का?” असे शब्द तोंडातून बाहेर पडतील असे त्यांना वाटले! पण त्यांनी जिभेवर ताबा मिळवला आणि स्वतः स्वयंपाक घरात पोहोचले. “अरे वा! सकाळी सकाळी काहि तरी छान नास्ता मिळणार बुआ सेवानिवृत्त माणसाला असे ते बोलले. आणि स्वारी पुन्हा तापली. संपतराव डोक्यावर थापटी मारून परत निघाले. फ्रेश झाल्यावर पुन्हा किचन मध्ये गेले आणि स्वतः चहा चढवल. सौ खुश झाल्या “अरे वा आज सूर्य नारायण पश्चिमेकडून उगवलेले दिसत आहेत.”अनायासे हे वाक्य तिच्या श्रीमुखातून बाहेर पडले.

“अहो, आता निवांतच असणार आहे न मी. मग काय साधा चहा सुद्धा करू नये का सेवानिवृत्त माणसाने. असतात काही काही महाभाग जे फक्त दिवसभर एका जागी बसून आदेश देत असतात. बिच्चारी बायको! तीला कधी निवांतपणे बसताच येत नाही. नाही का!!!!” कसे ठाऊक नाही. पण माझ्या तोंडून अनायासपणे इतके चांगले वाक्य बाहेर पडले? मला फार बरे वाटले राव. असे संपतरावांना मनोमन वाटून गेले.

ते मनाची समजूत काढत पुटपुटले, होत अस कधी कधी! अजानतेपणी खूप उच्च प्रतीची वाक्य तोंडून बाहेर पडतात. कुठली तरी बाहेरची शक्ती तेव्हा कार्यरत होत असावी. नाही तर मी इतका साहित्यिक कसा असू शकतो. असे आमच्या हिने जर हे वाक्य माझ्या तोंडून ऐकले असते तर असे म्हणाली असती. असे ते मनोमनी म्हणाले.☺️

ते काही ही असो पण टोमणे मारण्यात जो आनंद होतो न तो वेगळाच राव. पण मला ते जमत नाही न. मग मला कसं ठाऊक किती आनंद मिळतो ते. पण टोमणे मारणार्याच्या चेहर्यावरील मिस्किल हास्य बघून तर कळतं न राव!!

(14720816)
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*लिहिल्याशिवाय✍🏻*
*दोन शब्दातील अंतर*
*कळत नाही….*
*_तसेच.._*
*हाक 🗣 आणि हात 🤝🏻*
*दिल्याशिवाय माणसांची*
*मनंही 💓 जुळत नाहीत …!!*

*शुभ सकाळ*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

🌹🌹🌹🌹🌹

http://www.manachyakavita.wordpress.com

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s