ऋणानुबंध….

असे आपण नेहमी ऐकत असतो कि नवरा बायको ची जोडी वरूनच तयार करून तो म्हणजे देव पाठवतो. अर्थात असे ही म्हणता येईल कि पूर्व जन्माचे ऋणानुबंध असल्याशिवाय ते दोघे एकत्र येत नाहीत. अर्थात हे माणण्यावर आहे. जेव्हा नवरा बायको यांचे खूप चांगले संबंध असतात तेव्हाच असे म्हटले जाते. जर संबंध खराब असले तर दोष संबंध जोडणाराला किंवा आईवडिलांना दोष दिला जातो.

असेही म्हणतात कि ऋणानुबंध असल्याशिवाय दोन माणसे कधीच एकत्र येत नाही. मग ते कोणीही असो. मित्र असोत, नातेवाईक असोत, शाळेतील मित्रमैत्रिणी असोत किंवा कार्यालयातील सहकारी असोत, किंवा इतर अनेक जण असोत जे आपल्या संपर्कात येत असतात.

सोशल मीडिया आल्यापासून असे असंख्य लोकं आहेत ज्यांना कधीच पाहिले किंवा भेटले नाही. जगातील कानाकोपऱ्यात राहणारे काहीही संबंध नसतांना संपर्कात येत असतात.

अर्थात चांगले संबंध. हे त्या व्यक्ति विशेष वर अवलंबून असते.

याशिवाय ही काही असतात ज्यांच्याशी ऋणानुबंध असतात. ते असतात प्राणी, पक्षी, झाडेझुडपे, इ. एकदा का त्यांचेशी संबंध जुडला कि तो आयुष्यभर राहतो.

असाच एक प्राणी आमच्या घरी पंधरा दिवस राहून गेला. एक मांजरीचे पिल्लू. नाव होते टिटू. मुलीची खूप दिवसांपासून इच्छा होती. ती पूर्ण झाली. ज्यांच्या कडून ती आली होती ते सदग्रुहस्थ खरोखर प्राणीमित्र. त्यांची दिनचर्या डॉग फिडिंग ने सुरू होते.

खरे म्हणजे तिला कायम सांभाळण्यासाठी आणले होते. पण बायकोचे आजारपण आणि आता माझे आजारपण याशिवाय वाढते वय अर्थात म्हातारपण यामुळे पंधरा दिवसांत लक्षात आले कि आपले घर या सतकर्मासाठी योग्य नाही.

त्यांना विनंती केली. आणि मुली ने नेटवर कोणाला किटन पाहिजे का अशी विचारणा केली. काही लोकांनी प्रतिसाद दिला. त्यातील एका व्यक्ती शी मी बोललो. ते लगेच तयार झाले. मग ज्यांचेकडून आमच्या कडे आली होती, त्यांना सांगितले ते ही त्यांचेशी बोलले. शेवटी रविवारी आम्ही तिला त्यांचेकडे सोडून आलो. ते हि लगेच तिला पुढील घरी घेऊन गेले.

तेव्हा ते सदग्रुहस्थ म्हणाले ती भाग्यवान आहे. तिला चांगले घर मिळाले आणि आता ही चांगले च घर मिळत आहे.

या टिटू मुळे माझ्या शब्दकोशात नवीन शब्दांची भर पडली. मांजरीच्या पिल्लाला किटन म्हणतात हे मी प्रथमच ऐकले.

तीला घरात शी व सु करण्यासाठी केट लिटर लागते. ते आम्ही अमेझॉन वरून मागविले. हेही नवीन होते.

मांजर हा प्राणी एक कोपरा निवडला कि त्याच कोपऱ्यात शी व सु करते. घरभर घाण करत नाही. हा अत्यंत स्वच्छ राहणारा प्राणी आहे. तसेच शिस्त प्रिय ही आहे.

आमच्या कडील किटन खूप हुशार होती. तिला सर्व कळायचे. दिवसभर मांडीवर बसायला आवडायचे. बसू दिले नाही तर नाराजी दर्शविण्यासाठी कोपऱ्यात गुपचूप बसून राहायची.

तिला सोबत खेळायला खूप आवडायचे. लपाछपी व बॉल खेळणे हा तिचा आवडता खेळ.

वरील व्हिडीओ बघा. किती मस्ती करत असेल ती हे यावरून लक्षात येईल.

तीची खूप आठवण येते. आज आम्ही घरात सर्व शांत आहोत. केवळ तिच्या मुळेच.

एक मात्र चांगले व समाधानी वाटले कि ती एका चांगल्या घरात गेली आहे. तिला तेथे खूप प्रेम मिळेल.

(01521831)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

🌹🌹❣️शुभ प्रभात ❣️🌹🌹
आपल्या आयुष्यातील चांगल्या माणसांचं महत्त्व आणि स्थान, हृदयातील ठोक्यांसारखं असतं. जे कधीही दिसत नाहीत; पण त्यांची स्पंदनं, त्यांचं अस्तित्व, आपणास सदैव जाणवतं.

☘️शुभ सकाळ☘️

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.koshtirn.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

मैत्री….

मैत्री ही कोणाशीही केली जाऊ शकते. लहान मुलांशी पालकत्वाचे नाते असते. मुलं मोठी झाली की त्यांच्याशी मैत्रीचे नाते अंगिकारले जाते. लग्न झाले कि बायकोशी मैत्री चे नाते सुरू होते. ☺️

शाळा, कॉलेज, ऑफिस, प्रवास, सोसायटी, वाडा, येथील मित्र मैत्रीण यांचेशी मैत्री चे नाते जुळते.

तरीही मला वाटते बालपणीच्या नात्याला तोड नाही. ते नाते आयुष्य भर टिकते. मग तुम्ही जगात कुठेही असा. कसे ही असा. आणि वय जरी शंभरीचे असले तरी ते नाते आठवणीत राहतेच. कायमचे कोरले गेलेले नाते असते ते.

त्यानंतर झालेली मैत्री क्षणिक असते असे म्हणावे लागेल.

तारुण्यातील मैत्री व पन्नाशीतली मैत्री यात बराच फरक असतो. तारुण्यातल्या मैत्रीत खूप मजा असते, आपण तारुण्यात कोणाची कदर करत नसतो कारण तेव्हां मैत्रीचा खरा अर्थच कळलेला नसतो…. मैत्री टिकली तर टिकली नाहीतर उडत गेली. कधी आपण पुढचा विचार करत नाही व पाठीमागे वळून पण पाहात नाही. आपण आपल्या विश्वात खूप रमून जातो आणि आपलं विश्व त्या बेडकाच्या डबक्यासारखे असते. डबकं सोडून कधी विशाल सागराचा विचारच केलेला नसतो पण जेव्हां पन्नाशीला पोहचतो तेव्हां कधी डबकं सोडून सागराला मिळालेलो असतो ते कळत सुध्दा नाही…

जेव्हा पन्नाशीच्या सागरात मित्र मैत्रिणी भेटतात तेव्हां सगळ्या नात्यात ते मैत्रीचे नाते इतकं आपलसं वाटत असते कि, ती मैत्री खूपखूप हवी हवीशी वाटत असते.

नात्यापेक्षा मैत्रीचा आधार खूप हवासा वाटत असतो. मैत्रीत खूप मोकळेपणा असतो, त्यात भेद अजिबात नसतो. आपली विचारांची तार जर जुळत असेल तर सर्व गोष्टी पडद्या आड न ठेवता आपण मनसोक्त गप्पा – गोष्टी करतो आणि आपलं कोणी ऐकून घेतं किंवा आपल्यासाठी वेळ काढतो, आपल्याला समजावून जो घेतो, सुखादु:खात सहभागी होतो व चुकलं तर बोलतात व माफ ही करतात असे मिळालेले मित्र म्हणजे ‘नवरत्ना’ तल्या रत्नातले कोहिनूर हिरेच म्हटंल तर वावगे ठरणार नाही.

आपण कोणाचे कोणीच नसतो पण आपलं मात्र काहीतरी ऋणानुबंध असतात म्हणूनच आपली भेट कोणत्या ना कोणत्या रुपात ही नक्कीच होते.

आत्ता आयुष्याची पन्नाशी ओलांडल्यावर पुढचे आयुष्य हे बोनस आयुष्य आहे तेव्हां या वळणावर जेवढे मित्र मैत्रिणी भेटतात त्यांना भेटूया….
कोणाला काय माहीत की आपला प्रवास हा कुठपर्यंत आहे? प्रत्येकाचे स्टेशन वेगळे आहे. ते आले की उतरावेच लागते.
म्हणून जो पर्यंत प्रवास आपला चालू आहे त्या प्रवासात सगळे मनातल्या तक्रारींना काढून टाकूया. माहीत नाही परत आपण कधी, कुठे आणि कसे भेटू ? म्हणून मैत्रिची ही साथ खूप आधाराची व समाधानाची वाटते हे मात्र नक्की!!

पण अशी मैत्री समजुन घेणारे फार कमी असतात.ज्याला खरे निस्वार्थी मित्र लाभले ते भाग्यवान…
Friends Forever…!!

( मैत्री सारख्या जगातील सर्वात सुंदर नात्याबद्दल व्हाट्सएपच्या माध्यमातून प्राप्त एक पोस्ट थोड्या बदलासह)

(01421830)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

कुणाला दु:ख देऊन मिळालेला आनंद कधीच सुख देऊ शकत नाही….
पण कुणाला आनंद मिळावा म्हणून, ‘स्वीकारलेलं दु:ख नेहमी सुख देऊन जातं…..!!
🌸🌸🙏सुप्रभात🙏🌸🌸

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.koshtirn.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

शेवटी अंतर तेवढचं राहीलं !

आपण गरीब असलो कि आवडते. आपल्या कडे जे नसते तेच आपल्याला आवडत असते. आणि ते एकदाचे मिळाले कि त्याचे कौतुक क्षणात संपते ही. हा माणसाचा गुणधर्म आहे. माणसाचाच कशाला प्राणी सुद्धा. नुकतीच आमच्या कडे एक मणिमाऊ रहायला आली आहे. तिचा अभ्यास केल्यावर हे निरिक्षण लिहित आहे बघा. माणसाच्या याच गुणधर्मावर आधारित एक छान पोस्ट अर्थातच व्हाट्सएपच्या माध्यमातून आली आहे ती खाली पोस्ट करित आहे. जरूर वाचा.

शेवटी अंतर तेवढचं राहीलं !

लहानपणी, लोकांना हॉटेलमध्ये खाताना बघितले की खूप वाटायचं… आपण ही खावं…, ती श्रीमंत माणसं म्हणून पैसे खर्च करून खाऊ शकतात, आपण नाहीं…

मोठा झाल्यावर हॉटेलचं खायला लागलो, तर आरोग्याच्या काळजीनं लोकं घरचा डबा खाताना दिसू लागली…

शेवटी अंतर तेवढच राहीलं!

लहानपणी गरिबीमुळे मी सुती कपडे घालायचो, तेव्हा लोक टेरिकॉट, पॉलीस्टरचे कपडे घालायचे, खूप वाटायचं आपणही असे घालावे…
मोठेपणी टेरिकॉट घालायला लागलो तर लोकं सुती वापरायला लागले… सुती कपडे महाग झाले.

शेवटी अंतर तेवढच राह्यलं!

लहानपणी खेळताना पडलो तर गुडघ्यावर पँट फाटायची,… शिवलेलं कोणाला दिसू नये म्हणून धडपड असायची…
मोठेपणी लोकांना फाटलेल्या जिन्स दामदुपटीने घेताना बघितले…

शेवटी अंतर तेवढच राह्यलं!

लहान होतो तेव्हा दूध नसल्यानं घरी गुळाचा, काळा चहा मिळायचा… अन् लोकांना साखरेचा पितांना बघायचो… वाटायचं आपणही प्यावा पण ?

आता मी साखरेचा प्यायला लागलो तर लोकं गुळाचा ब्लॅक टी पिताहेत.

शेवटी अंतर तेवढच राह्यलं!

लहानपणी सायकल दामटायचो तेंव्हा लोक दुचाकी चार चाकी मधून फिरताना बघायचो, वाटायचं, आपणही फिरावं, आता सकाळी सकाळी सर्वांना सायकल वरून व्यायाम करताना बघितले की वाटत…

शेवटी अंतर तेवढंच राहीलं!

लहानपणी जेंव्हा चपाती मिळत नसल्यानं ज्वारी बाजरीची भाकरी खायचो तेंव्हा लोकं पोळी, चपाती भात खाताना आपणही खावं असं वाटायचं…
आज तीच लोकं भाकरी खाण्यासाठी हॉटेल मध्ये पैसे मोजून रांगा लावताना बघितलं की वाटत…

शेवटी अंतर तेव्हढच राहीलं!

लहानपणी चाळीत राहायचो तेंव्हा बंगल्यात राहण्याऱ्याकडे बघून वाटायचं आपणही मोठ्या घरात राहावं, आज तीच मनशांती साठी दूर खेड्यात जंगलात जाऊन झोपडीत (रिसॉर्ट) मध्ये राहतात तेंव्हा वाटत…

शेवटी अंतर तेव्हढच राहीलं … !

_आता कळलं…हे अंतर असंच कायम राहणार, मग मनाशी पक्क केलं जसा आहे, तसाच राहाणार… कुणाचं पाहून बदलणार नाही…_

म्हणून तर जगद्गुरु तुकोबारायांनी* म्हंटले होते ,

*_ठेविले अनंते तैसेचि राहावे,_*
*_चित्ती असू द्यावे समाधान …_*

मित्रांनो खूश रहा, *समाधानी राहा,* लाइफ छान आहे, ती एन्जॉय करा …!!!

*_कुणाचं पाहून आपल्या स्व-आनंदाची व्याख्या बदलवू नका._*

_कुणाला सिनेमा पाहायला आवडतो, कुणाला नव नवीन गाडी चालवायला आवडतात._

_कुणाला new कपडे आवडतात, कुणाला ब्रँडेड वस्तू_

_कुणाला new mobile आवडतो तर, कुणाला फिरायला आवडत._

_कुणाला परदेशात फिरायला आवडत, कुणाला स्वदेशात आवडत तर कुणाला आपल्या जवळील शेतात निवांत, शांत बसून राहायला आवडत_

_कुणाला अति Celabration आवडत, कुणाला नॉर्मल Celebration आवडत, तर कुणाला सौजन्यपूरता केलेलं आवडत_

_कुणाला पोहायला आवडत तर कुणाला वाचायला आवडत_

_प्रत्येकाची आवड-निवड वेगळी असून,आपली स्वतःची आवड काय आहे, ती ओळखा आणि मनापासून त्यासाठी वेळ द्या._

*कारण, शेवटी अंतर सारखाच राहत…!*

आपल्या आयुष्याची तुलना दुसऱ्यांशी करून आपला स्व बदलू नका, चांगल्या गोष्टी शिका, वाचा, life एंजॉय करा.

*या जन्मावर या जगण्यावर.. शतदा प्रेम करावे…*् 💐
💐

(01321829 )

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

✴️ ✴️
🖋️ *आयुष्यात स्वतःच्या शारिरीक ताकतीवर आणि कमावलेल्या संपत्तीवर कधीच गर्व आणि जास्त भरवसा करू नका. कारण आजार आणि गरिबी यायला वेळ लागत नाही. इतिहास पाहिला तर इथ राजे पण भिकारी झालेत आणि देवांचही गर्वहरण झालय. आणि आपण तर साधी माणसं.*
🌷 *शुभ सकाळ*🌷

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.koshtirn.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

मनस्थिती…

व्हाट्सएपवर जो नाही त्याला अमूल्य ज्ञानपानाला वंचित राहावे लागते. अशी जाणिव होत असल्याने मला येथून बाहेर पडणे अवघड होऊन बसले आहे राव.. मला वाटते आज जवळजवळ संपूर्ण जग या विश्वाच्या ज्ञानपानात बुडालेले आहे. आमच्या सकट.☺️

असेच जगाचे ज्ञान शिकवणारी एक पोस्ट. वाचा आणि अवश्य विचार करा.

कोण सुखी आहे आणि कोण दुखी आहे ते तुम्हीच ठरवा.😊😊

नोकरी करणाऱ्याला वाटतं धंदा बरा,
व्यवसाय करणाऱ्याला वाटतं नोकरी बरी,
घरी राहणाऱ्याला वाटतं काही तरी करावं पण घराबाहेर पडावं,
एकत्र राहणाऱ्याला वाटतं वेगळा राहतो त्याचंच आईला कौतुक जास्त,
वेगळा राहतो त्याला वाटतं एकत्र राहतो त्याला जबाबदारी आणि खर्च नाही,
गावात राहणाऱ्याला वाटतं शहरात मजा,
शहरातला म्हणतो गावातलं आयुष्य साधं सरळ सोपं आहे,
देशात राहतात त्यांना वाटतं परदेशी जावं,
परदेशात राहणाऱ्याना वाटतं आपण इथे खूप तडजोड करतो,
केस सरळ असणारी म्हणते कुरळे किती छान
कुरळे केसवाली म्हणते किती हा गुंता
एक मूल असतं त्याला वाटतं दोन असती तर,
दोन असणाऱ्याला वाटतं एक वाला मजेत,
मुलगी असली की वाटतं मुलगा हवा होता,
मुलगा असला की वाटतं मुलीला माया असते,
ज्याला मूल नसतं तो म्हणतो काहीही चालेल,
नावे ठेवणारे रामातही दोष बघतात
कौतुक करणारे रावणाचीही स्तुती करतात

मिळून काय?
नक्की चांगलं काय ते काही केल्या कोणाला कळत नाही.
मी बरोबर आहे पण सुखी नाही दुसरा मात्र पक्का आहे तरी मजेत आहे.
किती गोंधळ रे देवा हा?
तू बसलाय वर निवांत आम्ही मात्र खाली बसलोय धक्के खात!

म्हणुन म्हणतो जे आहे ते स्विकार करा आणि आयुष्य आनंदात जगा….✌🏻✌🏻✌🏻

(01221828)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

सुखापेक्षा दुखाः मध्ये असताना मिळणारे ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आणि परिणामकारक असते

🌹🌹 सुप्रभात 🌹🌹

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.ownpoems.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

दिवा…

आज आश्चर्य झाले. सकाळी सकाळी मित्रमंडळींनी पाठविलेल्या संदेशांना उत्तर देणे क्रमप्राप्त असते. ती हल्ली एक दिनचर्या होऊन बसली आहे. सौ.ला स्मॉर्ट फोन चालवायला दिल्यापासून आनंदी आहे. बरे झाले मी आपला मोबाईल घेऊन काही तरी करण्यासाठी मोकळा झालो. कारण ती सतत मोबाईल वरच असते. आज ती मोबाईल घेऊन आली आणि म्हणाली, “अहो, हा संदेश किती छान आहे बघा.”

मी खालील संदेश वाचला.

🌹दिवा सोन्याचा, चांदीचा किंवा मातीचा असू द्या त्यात तेल असो नाहितर तुप…..
एकदा का तो उजळला की त्याच कार्य फक्त एकच सगळ्यांना प्रकाशमान करण्याच …..🌹

शुभ प्रभात !!🌹🙏

आणि परत आपल्या मोबाईल मध्ये डोके घुसवले.

“अहो, काय झाले?”

“काय होणार? वाचून दुखी झालो.”

“त्यात दुःखा सारखे काय आहे?”

“अग, नवरे बिच्चारे असेच असतात.”

“????” प्रश्नार्थक चेहरा माझ्या कडे एकटक बघत होता.

“अग, नवरा बिच्चारा दिव्या सारखाच असतो न.”

“????”पुन्हा तेच.

“अग बाई, दिव्यासारखा नवरा सुद्धा राजा असो अगर रंक, एकदा का लग्न झाले कि त्याचे एकच काम असते.??”

“???”

“अहो, घर साभाळायचं. दुसरं काय?’ बरं झालं जीभ चावली गेली नाही तर तोंडून निघणार होतं, बायको समोर मूग गिळून बसायचं.☺️😊☺️😊

(01121827)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

वर्तमानातूनच सुख वेचण्याचा प्रयत्न करा….भविष्य फार धुर्त आहे….
ते फक्त आश्र्वासन देते…….
खात्री नाही….!!!

🙏🙏 शुभ सकाळ🙏🙏

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.koshtirn.wordress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

अपेक्षा आणि तडजोड..

मित्रांनो, जेव्हा पासून ही व्हाट्सएपची शाळा सुरु झाली आहे न, तेव्हा पासून आमच्या सारख्या अरसिक लोकांना डोक्याला सतत खुराक मिळत असते. रोज नवनवीन संदेश, उपदेश, बोधपर गोष्टी वाचायला आणि ऐकायला मिळत असतात. त्यातील बहुतेक छान व आत्मसात करण्याजोग्या असतात. पण काही वाचल्यावर मात्र डोके वेगळ्या दिसेला वळते. अर्थात ठिकाणावर असले तर!😊

तसे पाहिले तर आपण प्रत्येक संदेश वाचत कुठे असतो. पण नजर चुकीने वाचला तर खुराक मिळाल्यासारखे होते आणि आपल्या डोक्याला पाय फुटतात. अर्थात डोके चालायला लागते हो. असाच हा खालील संदेश वाचला आणि डोक्याला पाय फुटले.☺️

मी संपतराव. आज बायकोचा वाढदिवस होता. वेळ सकाळची स्थळ: अर्थात घरच

“अहो, आज माझा वाढदिवस आहे. मला काय देणार आहात आपण. ”

“काय? आज आणि तुमचा वाढदिवस? मला माहित कसे नाही? असो, तुम्हाला काय हवे आहे ते सांगा. नेहमी प्रमाणे घेऊन देतो कि नाही ते बघाच तुम्ही.”

सौ. काही बोलायच्या आधीच आम्ही बोललो.

“काही विशेष नाही फक्त पैठणी घेतली तरी चालेल!”

“काय?” आम्ही जागेवरून उडालोच. “अहो, इतक्या मोठ्या अपेक्षा ठेवताना समोरच्या ची क्षमता पण बघायची असते.”

“ते काही नाही. दर वर्षी तुम्ही हो हो म्हणतात आणि घेऊन देत नाहीत. आता म्हातारपणी तर हौस पूर्ण करु देत.”

“अहो, आता म्हातारपणी काय हौस करायची! ”

“????”

“मी काय म्हणतो. एक साधी हजार दिढ हजाराची साडी घेऊन दिली तर चालेल नाही का??”

सौ. काही ऐकायला तयार नाही. शेवटी मोबाईल मधील हा संदेश केला आणि हे वाचा म्हणालो.

इतरांकडून
कमीत कमी “अपेक्षा”

आणि

स्वतः कडून
जास्तीत जास्त “तडजोड”

या दोनच गोष्टी प्रत्येकाचं जीवन आनंदी आणि यशस्वी बनवू शकतात.🙏

🌹 शुभ सकाळ 🌹

संदेश वाचून झाल्यावर त्या माझ्या तोंडाकडे बघत बसल्या.

“आल न लक्षात. जीवन सुखात जगायचे असेल तर कमीत कमी अपेक्षा ठेवाव्या माणसाने. आणि हो तडजोड करायची सुद्धा तयारी ठेवायलाच हवी कि नाही”

“हो हो. आले लक्षात. ”

काय गम्मत कि सौ. हसत हसत “आले ग! ” असा आवाज देत खोलीतून लगबगीने निघून गेल्या. आणि आम्ही हा संदेश लिहिणारे कोण आहेत त्या महानुभावाला मनोमन धन्यवाद दिला.

(01021826)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा।
गमूं पंथ आनंत या राघवाचा ॥१॥

👍👍मंगल प्रभात👍👍

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.manacheslok.blogspot.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

🔸नातं म्हणजे काय ?

मित्रांनो, व्हाट्सएपच्या माध्यमातून एक मनाला भावलेली छोटीशी पण भारावून टाकणारी कथा मी आपल्या साठी घेऊन आलो आहे.

“एका गावात एक पोस्टमन पत्रवाटप करायचा. एके दिवशी एका घरासमोर उभा राहून त्याने आवाज दिला, “पोस्टमन ssssss”
आतून एका मुलीचा आवाज आला, “जरा थांबा, मी येतेय”
दोन मिनिटे झाली, पाच मिनिटे झाली. दार काही उघडेना. शेवटी पोस्टमन वैतागला. आणि जोरात म्हणाला, “कुणी आहे का घरात ? पत्र द्यायचे आहे”
आतून मुलीचा आवाज आला, “काका, दाराच्या खालच्या फटीतून पत्र सरकवा. मी नंतर घेते”
पोस्टमन…. “तसे चालणार नाही, रजिस्टर पत्र आहे. सही लागेल” पाच मिनिटे पुन्हा शांतता.
आता पोस्टमन रागावून पुन्हा आवाज देणार इतक्यात दार उघडले. दारातली मुलगी पाहून पोस्टमन शॉक्ड !! दोन्ही पायाने अपंग असलेली एक तरुण मुलगी दारात उभी होती. काठीच्या आधाराने चालत यायचे असल्याने तिला वेळ लागला होता. हे सगळे पाहून तो पोस्टमन वरमला. पत्र देऊन, सही घेऊन तो निघून गेला.
असेच अधून मधून तिची पत्र यायची, आता मात्र पोस्टमन न चिडता तिची वाट पाहत दारासमोर उभा राहत असे.
असेच दिवस जात होते. दिवाळी जवळ आलेली तेव्हा एकदा मुलीने पाहिले की आज पोस्टमन अनवाणी पायानेच आलाय. ती काही बोलली नाही. मात्र पोस्टमन गेल्यावर दाराजवळच्या मातीत पोस्टमनच्या पावलाचे ठसे उमटले होते, त्यावर कागद ठेवून तिने ते माप घेतले. नंतर काठी टेकत टेकत तिने गावातील चांभाराकडे तो कागद देऊन एक सुंदर चप्पल जोड खरेदी केली.
रिवाजाप्रमाणे पोस्टमनने गावात इतरांकडे “दिवाळी पोस्त” (म्हणजे बक्षिशी) मागण्याची सुरुवात केली. अनेकांनी त्याला बक्षिशी दिली. असे करता करता तो त्या मुलीच्या घराजवळ आला. हिच्याकडे काय बक्षिशी मागणार ? बिचारीवर आधीच अपंगत्वाचे दुःख आहे. पण आलोच आहोत तर सहज भेटून जाऊ, असा विचार करून त्याने तिला आवाज दिला.
मुलीने दार उघडले. तिच्या हातात सुंदर पॅकिंगचा बॉक्स होता. तो तिने त्याला दिला आणि सांगितले, ही माझ्याकडून बक्षिशी आहे. पण घरी जाऊन बॉक्स उघडा”
घरी येऊन त्याने बॉक्स उघडला. त्यात सुंदर चप्पला, त्याही त्याच्या मापाच्या पाहून त्याचे डोळ्यातून पाणी वाहू लागले.
दुसऱ्या दिवशी पोस्टमन नवीन चप्पल घालून त्याच्या ऑफिसात साहेबांकडे गेला. आणि म्हणाला, ” मला फंडातून कर्ज हवे आहे.”
साहेब म्हणाला,” अरे आधीच तुझ्यावर कर्ज आहे. पुन्हा आता कशाला ?
पोस्टमन म्हणाला, “मला जयपूर फूट (लाकडी पाय) घ्यायचे आहेत. त्यासाठी हवे आहेत.”
साहेब : “पण तुझा मुलगा तर धडधाकट आहे. जयपूर फूट कुणासाठी?
पोस्टमन : “साहेब, जे माझ्या धडधाकट मुलाला उमजले नाही, ते एका परक्या अपंग मुलीला उमजले आहे. माझे “अनवाणी” दुःख तिने कमी केले आहे. तिच्यासाठी मी किमान कर्जाने ना का होईना पण पाय घेऊन देऊ शकतो. म्हणून कर्ज हवे आहे.
साहेबासह सर्व स्टाफ निशब्द !! सारेच गहिवरलेले!!
नाती ही केवळ रक्ताची असून भागत नाही ! तर नात्याची भावना रक्तात असावी लागते. ती ज्याच्या अंगी, (मग भले ही तो कुटुंबातला नसला तरी) तो आपला नातेवाईक मानायला हरकत नाही !!

(00921825)

🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀

🌀🌀🌀🌀🌀

आयुष्यात जेव्हा वादळ येतं तेव्हा मातीत पाय घट्ट रुतून उभं रहायचं….
प्रश्न वादळाचा नसतो….
ते जेवढ्या वेगानं येतं….
तेवढ्याच वेगानं निघून जातं….
आपण किती सावरलो आहे….
हे महत्त्वाच असतं.

शुभ सकाळ. 🚩🙏🏼🚩

🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀

http://www.manachyakavita.wordpress.com

🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
🌀🌀🌀🌀🌀

गर्व….हरण

✴️ 🖋️ आयुष्यात स्वतःच्या शारिरीक ताकतीवर आणि कमावलेल्या संपत्तीवर कधीच गर्व आणि जास्त भरवसा करू नका. कारण आजार आणि गरिबी यायला वेळ लागत नाही. इतिहास पाहिला तर इथ राजे पण भिकारी झालेत आणि देवांचही गर्वहरण झालय. आणि आपण तर साधी माणसं.✴️
🌷 शुभ सकाळ🌷

खुपच बोलका संदेश आहे. सत्यतेची जाण करून देणारा. पण धनप्राप्ती झाली कि माणूस जमिनीवर राहतोच कुठे. तो तर फुग्यात हवा भरल्यासारखा आकाशात भ्रमण करित असतो. त्याला भानच नसते कसले. फुगा हा फुगाच असतो. कधी त्याला पिन टोचेल आणि तो फुटेल. सांगता येत नाही. माणसाने गर्व कधीच करु नये.

(00821824)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

🌹“जीवनात आनंद शोधण्यापेक्षा मिळवा आणि आनंदी जगा.“🌹

🌷शुभ प्रभात 🌷🙏🏻🙏🏻

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.ownpoems.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

अनुभव….

अवेळी आलेल्या अवकाळी पावसाने ओलाचिंब झालेलो असताना एकेठिकाणी आसरा घेण्यासाठी पाण्याबरोबर वाहून आलेला चिखल तुडवत मी आंत शिरलो.

आणि काय योगायोग बघा…

समोरच एक सुभाषित भिंतीवर टांगलेले दिसले. त्यावर लिहिलेले होते, “आयुष्यात किती पावसाळे पाहिले हे महत्त्वाचे नाही तर त्या पावसाळ्यात तुम्ही किती चिखल तुडवला व त्यातून कसा मार्ग काढला हे महत्वाचे असते.

काय योगायोग बघा. मी पावसात भिजलेलो, चिखल तुडवत आंत आलेलो आणि समोर तेच सुभाषिताच्या रुपात वाचायला मिळालं.

वाचून गम्मत वाटली. हे सुभाषित ज्यांनी कोणी लिहिले आहे ते अतिशय उत्तम लिहिले आहे. पण जेव्हा हे लिहिले असेल तेव्हा सर्वदूर चिखल असायचा. प्रगती झाली नव्हती. पण आता शहरच काय गावांमध्ये ही चिखल सापडत नाही. त्यामुळे आताच्या पिढीला या सुभाषिताचा अर्थ काय कळणार!

(00721823)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

🌹“उंची किती ही गांठली तरी पाय जमिनीवर राहिलेलाच खरा यशस्वी”🌹

🌷शुभ प्रभात 🌷🙏🏻🙏🏻

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.manachyakavita.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आयुष्य..

रांगोळी ही पुसली जाणार आहे हे माहीत असून देखील
आपण ती अतिशय सुबक आणि रेखीव व सुंदर काढण्याचा प्रयत्न करतो,
तसच आपलं आयुष्य हे
कधीतरी संपणार आहे
ते अधिक सुंदर आणि
सुंदर जगण्याचा प्रयत्न करा!

💐💐 *शुभ सकाळ* 💐💐

(व्हाट्सएपच्या शाळेतील सुप्रभात संदेश)

किती छान संदेश लिहिला आहे लिहिणार्याने. पण मला वैयक्तिक रित्या एक गोष्ट यातील खटकली. कोणती ती? तर ती आहे रांगोळी आणि आयुष्य यांची तुलना कशी काय होऊ शकते? मुळात रांगोळी काढली जाते दुसऱ्याला सुंदर दिसावी म्हणून. डोळ्याचे पारणे फिटावे म्हणून.

(00621822)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

🌹✍️माणूस इतर गोष्टीत कितीही कच्चा असला तरी चालेल, पण तो माणुसकी मध्ये पक्का असला पाहिजे…!!

🌷शुभ प्रभात 🌷🙏🏻🙏🏻

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.ownpoems.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐