मनस्थिती…


व्हाट्सएपवर जो नाही त्याला अमूल्य ज्ञानपानाला वंचित राहावे लागते. अशी जाणिव होत असल्याने मला येथून बाहेर पडणे अवघड होऊन बसले आहे राव.. मला वाटते आज जवळजवळ संपूर्ण जग या विश्वाच्या ज्ञानपानात बुडालेले आहे. आमच्या सकट.☺️

असेच जगाचे ज्ञान शिकवणारी एक पोस्ट. वाचा आणि अवश्य विचार करा.

कोण सुखी आहे आणि कोण दुखी आहे ते तुम्हीच ठरवा.😊😊

नोकरी करणाऱ्याला वाटतं धंदा बरा,
व्यवसाय करणाऱ्याला वाटतं नोकरी बरी,
घरी राहणाऱ्याला वाटतं काही तरी करावं पण घराबाहेर पडावं,
एकत्र राहणाऱ्याला वाटतं वेगळा राहतो त्याचंच आईला कौतुक जास्त,
वेगळा राहतो त्याला वाटतं एकत्र राहतो त्याला जबाबदारी आणि खर्च नाही,
गावात राहणाऱ्याला वाटतं शहरात मजा,
शहरातला म्हणतो गावातलं आयुष्य साधं सरळ सोपं आहे,
देशात राहतात त्यांना वाटतं परदेशी जावं,
परदेशात राहणाऱ्याना वाटतं आपण इथे खूप तडजोड करतो,
केस सरळ असणारी म्हणते कुरळे किती छान
कुरळे केसवाली म्हणते किती हा गुंता
एक मूल असतं त्याला वाटतं दोन असती तर,
दोन असणाऱ्याला वाटतं एक वाला मजेत,
मुलगी असली की वाटतं मुलगा हवा होता,
मुलगा असला की वाटतं मुलीला माया असते,
ज्याला मूल नसतं तो म्हणतो काहीही चालेल,
नावे ठेवणारे रामातही दोष बघतात
कौतुक करणारे रावणाचीही स्तुती करतात

मिळून काय?
नक्की चांगलं काय ते काही केल्या कोणाला कळत नाही.
मी बरोबर आहे पण सुखी नाही दुसरा मात्र पक्का आहे तरी मजेत आहे.
किती गोंधळ रे देवा हा?
तू बसलाय वर निवांत आम्ही मात्र खाली बसलोय धक्के खात!

म्हणुन म्हणतो जे आहे ते स्विकार करा आणि आयुष्य आनंदात जगा….✌🏻✌🏻✌🏻

(01221828)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

सुखापेक्षा दुखाः मध्ये असताना मिळणारे ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आणि परिणामकारक असते

🌹🌹 सुप्रभात 🌹🌹

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.ownpoems.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

One thought on “मनस्थिती…

  1. आपणी आपले विचार स्पष्ट केले आहेत.उदाहरणे सुद्धा छान आहेत.पण तरीही आपल्या वैयक्तिक मतां बरोबर मी सहमत नाही.हे थोडेसे असे झाले,कि सर्वजण नसले तरी बहुतांश लोक पश्चिमेला ‘पूर्व’ म्हणावे असे म्हणतात,तर ठीक आहे,मी सुद्धा तेच मान्य करतो.सूर्य काही आपले काम सोडत नाही,तो बापडा जिथून उगवणार असेल, तिथूनच उगवेल !!! मी ह्या गोष्टीशी सहमत नाही. कारण काय तर हे हा जगप्रसिद्ध आणि सिद्ध झालेला आहे कि व्हॉट्सऍप हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कळीचा नारद आहे.तो सांगून लावालाव्या करतो,इकडच्या गोष्टी तिकडे करतो.मग हार मानून त्याचाच ध्यास का घ्यायचा?? इतरही नव्या वाटा आहेत, पण त्या तुडवलेल्या आणि गुळगुळीत,बिन काट्याकुट्यांच्या नाहीत.मी ह्या मताचा आहे कि जिवात जीव असेपर्यंत काहीतरी नवीन करण्या साठी धडपड करत रहावे.

    Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s