मैत्री ही कोणाशीही केली जाऊ शकते. लहान मुलांशी पालकत्वाचे नाते असते. मुलं मोठी झाली की त्यांच्याशी मैत्रीचे नाते अंगिकारले जाते. लग्न झाले कि बायकोशी मैत्री चे नाते सुरू होते. ☺️
शाळा, कॉलेज, ऑफिस, प्रवास, सोसायटी, वाडा, येथील मित्र मैत्रीण यांचेशी मैत्री चे नाते जुळते.
तरीही मला वाटते बालपणीच्या नात्याला तोड नाही. ते नाते आयुष्य भर टिकते. मग तुम्ही जगात कुठेही असा. कसे ही असा. आणि वय जरी शंभरीचे असले तरी ते नाते आठवणीत राहतेच. कायमचे कोरले गेलेले नाते असते ते.
त्यानंतर झालेली मैत्री क्षणिक असते असे म्हणावे लागेल.
तारुण्यातील मैत्री व पन्नाशीतली मैत्री यात बराच फरक असतो. तारुण्यातल्या मैत्रीत खूप मजा असते, आपण तारुण्यात कोणाची कदर करत नसतो कारण तेव्हां मैत्रीचा खरा अर्थच कळलेला नसतो…. मैत्री टिकली तर टिकली नाहीतर उडत गेली. कधी आपण पुढचा विचार करत नाही व पाठीमागे वळून पण पाहात नाही. आपण आपल्या विश्वात खूप रमून जातो आणि आपलं विश्व त्या बेडकाच्या डबक्यासारखे असते. डबकं सोडून कधी विशाल सागराचा विचारच केलेला नसतो पण जेव्हां पन्नाशीला पोहचतो तेव्हां कधी डबकं सोडून सागराला मिळालेलो असतो ते कळत सुध्दा नाही…
जेव्हा पन्नाशीच्या सागरात मित्र मैत्रिणी भेटतात तेव्हां सगळ्या नात्यात ते मैत्रीचे नाते इतकं आपलसं वाटत असते कि, ती मैत्री खूपखूप हवी हवीशी वाटत असते.
नात्यापेक्षा मैत्रीचा आधार खूप हवासा वाटत असतो. मैत्रीत खूप मोकळेपणा असतो, त्यात भेद अजिबात नसतो. आपली विचारांची तार जर जुळत असेल तर सर्व गोष्टी पडद्या आड न ठेवता आपण मनसोक्त गप्पा – गोष्टी करतो आणि आपलं कोणी ऐकून घेतं किंवा आपल्यासाठी वेळ काढतो, आपल्याला समजावून जो घेतो, सुखादु:खात सहभागी होतो व चुकलं तर बोलतात व माफ ही करतात असे मिळालेले मित्र म्हणजे ‘नवरत्ना’ तल्या रत्नातले कोहिनूर हिरेच म्हटंल तर वावगे ठरणार नाही.
आपण कोणाचे कोणीच नसतो पण आपलं मात्र काहीतरी ऋणानुबंध असतात म्हणूनच आपली भेट कोणत्या ना कोणत्या रुपात ही नक्कीच होते.
आत्ता आयुष्याची पन्नाशी ओलांडल्यावर पुढचे आयुष्य हे बोनस आयुष्य आहे तेव्हां या वळणावर जेवढे मित्र मैत्रिणी भेटतात त्यांना भेटूया….
कोणाला काय माहीत की आपला प्रवास हा कुठपर्यंत आहे? प्रत्येकाचे स्टेशन वेगळे आहे. ते आले की उतरावेच लागते.
म्हणून जो पर्यंत प्रवास आपला चालू आहे त्या प्रवासात सगळे मनातल्या तक्रारींना काढून टाकूया. माहीत नाही परत आपण कधी, कुठे आणि कसे भेटू ? म्हणून मैत्रिची ही साथ खूप आधाराची व समाधानाची वाटते हे मात्र नक्की!!
पण अशी मैत्री समजुन घेणारे फार कमी असतात.ज्याला खरे निस्वार्थी मित्र लाभले ते भाग्यवान…
Friends Forever…!!
( मैत्री सारख्या जगातील सर्वात सुंदर नात्याबद्दल व्हाट्सएपच्या माध्यमातून प्राप्त एक पोस्ट थोड्या बदलासह)
(01421830)
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
कुणाला दु:ख देऊन मिळालेला आनंद कधीच सुख देऊ शकत नाही….
पण कुणाला आनंद मिळावा म्हणून, ‘स्वीकारलेलं दु:ख नेहमी सुख देऊन जातं…..!!
🌸🌸🙏सुप्रभात🙏🌸🌸
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
http://www.koshtirn.wordpress.com
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐