सं-गणक….


संगणक म्हणजे आपल्या मराठीतील गणकाचे नाव. त्याला इंग्रजीत कंप्यूटर Computer असे म्हणतात.

Compute करणे म्हणजे गणना करणे. अहो गणितातील गणना.

जुन्या जाणत्या लोकांना फेशिट मशीन आठवत असेल.

( फेशिट मशीन-गुगल ईमेज)

असे जुने शब्द आठवले कि आपण किती म्हातारे झालो आहोत याची अजाणतेपणी जाणीव होऊन जाते☺️😊. असो, जे सत्य आहे ते लपवता येत नाही आणि लपवून तरी काय करणार आहोत. ☺️😊 अरे हो स्लाईडिंग रुल तर मी विसरलोच होतो.

(गुगल ईमेज-स्लाईडिंग रुल)

हे जरी त्याकाळी उपलब्ध होते तरी तोंडी गणित करण्यात बहुतेक विद्यार्थी प्रविण असत. पाढे अगदी पहिली पासून पाठ करवून घेतले जात असत.

हळूहळू केल्क्युलेटर मग कंप्यूटर आले आणि आपले डोके त्याने खाऊन टाकले. असेच म्हणावे लागेल आपल्याला नाही का? ही यंत्र आली आणि बुद्धी चा वापर कमी झाला. हळूहळू नाहीसाच झाला. आता तर २ x २ सुद्धा करायला जमत नाही मुलांना.😊😊.

आणि जेव्हा पासून ह्या मोबाईल मध्ये फोन डायरी, केल्क्युलेटर, कैमरा, इ. नी प्रवेश केला तेव्हा पासून तर बुद्धी चा वापर बंदच झाला आहे. पुर्वी ऑफिस, घर इ. फोन नंबर तोंड पाठ असायचे. आज आपलाच नंबर लक्षात रहात नाही😊😊.

पण आयुष्याच्या गणकाचे काय? आपल्या आयुष्याचा गणक तो असतो. ऊपरवाला. त्याची मरजी असेल तोपर्यंत आपले या शरीरात वास्तव्य असते. कदाचित नंतर दुसऱ्या जन्मात आपण जात असू. कुत्री, मांजर किंवा मुंगी माहीत नाही.

आणि आयुष्याची ही गणना होत असतांना संग असते/तो तो जोडीदार. आयुष्याचा जोडीदार. म्हणतांना आपण म्हणत असतो आयुष्य भराचा सोबती, सांगाती किंवा जोडीदार. पण ही सोबत आयुष्यभरासाठी कोणाच्या तरी एकाच्याच वाट्याला येत असते. एक कोणी तरी शेवटी एकटा राहतो. ते एकाकी जीवन त्याला असह्य होते. यात ही काही भाग्यवंत असतात जे जोडीदार गेल्यावर लगेचच जातात. इतके एकमेकांवर त्यांचे प्रेम असते.

असो. ज्याचे त्याचे भाग्य.

(01621832)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

✍🏻साखर गोड आहे, हे फक्त कागदावर लिहून चालत नाही…
खाल्ल्यावरच तिची चव कळते.
तसेच, नाते, मैत्री व प्रेम आहे, असे सांगून भागत नाही…
तर ती प्रतिसाद देवून टिकवावी लागतात…!!!

☕ शुभ सकाळ ☕

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.rnk1.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s