एक गाणे सर्वांना आठवत असेल, हम बने तुम बने एक दुजे के लिए…..रबर आणि पेंसिल चे ही तसेच आहे. एक दुसऱ्या साठीच तयार झाले आहेत हे. फक्त पहले अंडा या मुर्गी ही भानगड आहे.म्हणजे रबरासाठी पेंसिल तयार केली कि पेंसिल साठी रबर हा प्रश्न आहे. म्हणजे बघा कि रबर जर आधी तयार केले असेल तर त्याचा काही तरी उपयोग व्हावा म्हणून पेंसिल तयार केली असावी. जेणेकरून पेंसिल चे लिहिलेले पुसून टाकण्यासाठी रबराचा उपयोग करता येईल😊जर पेंसिल चा शोध आधी लागला असेल तर तीने लिहिलेले पुसून टाकण्यासाठी रबराचा शोध लावला असावा.
ता.क.:- आताच मी विकिपीडियावर पाहिले तर समजले कि पेंसिल चा शोध रबरापेक्षा आधी लागलेला आहे.
अर्थात पेंसिल साठी रबर तयार केले आहे तर.
पेंसिल ने लिहिलेले कोणीही पुसू शकत नसल्याने कोणी तरी असावं तिचा गर्वहरण करायला म्हणून रबराचे निर्माण केले गेले असावे.
पण ह्या रबर आणि पेंसिल चे नाते कसे नवरा बायकोच्या नात्या सारखेच आहे असे नाही का वाटत आपल्याला?
पण त्यात एक महत्त्वाचा फरक आहे बर का!!
“तो काय?” कोण बोलले बर. इकडे तिकडे पाहिले कोणीही दिसले नाही. नंतर लक्षात आले कि ‘माझ्या मना’ने प्रश्न केला होता तो.
“अरे तुला कळत कसे नाही!” मी आंसरलो.
“!!!” माझे मन.
“अरे बाबा! हे बघ, रबर पुल्लिंगी व पेंसिल स्री लिंगी. तसे बघितले तर नवरा म्हणजे रबर व बायको म्हणजे पेंसिल. 😅 रबर पेंसिल चे लिखाण पुसू शकतो. पण नवरा …….”
“अरे ही अशक्यप्राय गोष्ट आहे.” मनाचा आवाज.
“लिखाणच काय बायकोच्या तोंडातील शब्द सुद्धा खोडून काढायची हिंमत नाही तुझी.”
“हो, बरोबर आहे. जो खोडायची हिंमत दाखवतो त्याची अवस्था कशी होते माहीत आहे न!”
“कशी? “
“अरे काय मित्रा! इतके ही कसे रे तुला कळत नाही. ☺️”
“खोडून खोडून रबर झिजून संपत नाही का?”☺️😊
म्हणून म्हणतो गुमान ऐकत रहावे माणसाने. उगाच तोंड उघडून येणारे शब्द रुपी बाण अडवण्याचा प्रयत्न करू नये☺️
मित्रांनो, सहज वाटले म्हणून लिहिले.
पण मला एक विचारायचे आहे.
रबर व पेंसिल ही दोन्ही इंग्रजी नावे आहेत. यांना मराठीत काय म्हणतात? कोणाला माहित असेल तर कळवावे.☺️😊
(01721833)
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
गेलेले दिवस परत येत नाहीत. येणारे दिवस कसे येतील हे सांगता येत नाही.
म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षण हसत आणि मनमोकळेपणाने जगा.
👍शुभ सकाळ👍
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
http://www.ownpoems.wordpress.com
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐