मित्रांनों,
आपण सर्व किंबहुना संपूर्ण जगच एका विचित्र काळातून मार्गक्रमण करत आहे. संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट ओढवले आहे. व्हाट्सएपवर निधन वार्ता,भावपुर्ण श्रध्दांजलीची पोस्ट दिसली की आपल्याला शॉक बसतो. धस्स होत. त्यावर श्रद्धांजली चे शब्द टाईप करायला सुध्दा हिम्मत होत नाही. आपल्यातील गोड-गोड आणि जीवाभावाची माणसं आज आपल्यातून अचानक निघुन जात आहेत. जवळची मित्र, जिवलग नातेवाईक आपल्यातून अचानक निघून गेल्यावर काय दुःख होते, याची जाणीव आपल्या सर्वांना होत असेलच. वाईटात वाईट हे कि इच्छा असून ही आपल्याला त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी सुद्धा जाता येत नाही. हे शल्य आपल्याला कायम बोचत राहील. भिती असते कि तेथे गेल्यावर आजार सोबत घेऊन येऊ कि काय. शासनाने ही बंधने घातली आहेतच.
टिव्हीवर आपण बघत असतो कि सख्खे नातेवाईक सुद्धा अंत्यसंस्कार करायला पुढे येत नाहीत. मग समाजसेवक बिचारे समोर येतात आणि अंत्यसंस्कार करतात. नातेवाईकांचे ही चुकत नाही.
आज आपण बघतो आहोत कुटुंब ची कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत या महामारीत. एका घरातील ४ जणं गेली, दुसरी बातमी संपूर्ण कुटुंब गेलं. अशा बातम्या अशा घटना समोर येत आहेत. तेव्हा कोणाची हिंमत होईल. पण मग ते समाजसेवक देवदूतासारखे समोर येऊन दाहसंस्कार करतात. त्यांना नाही का नातेवाईक! त्यांना नाही का भिती. जीवावर उदार होऊन ते हे काम करत आहेत. म्हणून ते देवदूतच नाही का!!
मध्यंतरी एक अत्यंत वाईट बातमी वाचली. एकाच घरातील ४-५ माणसं एका पाठोपाठ एक असे कोरोना ने गेली. कोणीतरी सांगितले की ती बारशाला गेली होती. घरातील एकाला लागण झाली. मग दुसरा, तिसरा, चौथा असा एक एक जण गेला. कोणाला काहीच करता आले नाही. सद्यस्थितीत पैसा असूनही आपल्या माणसाला वाचविणे अशक्य होत आहे. अशा वेळी देव ही वाचवू शकत नाही.
म्हणून मित्रांनो, आपणा सर्वांना हात जोडून विनंती आहे कि सर्वांनी स्वतःची व आपल्या आप्तेष्टांची खुप काळजी घ्यावी. घरच्यांची काळजी तर डोळ्यात तेल घालून घ्यावी. विनाकारण स्वतः बाहेर फिरु नये व घरातील सदस्यांना ही फिरू देऊ नये. अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच बाहेर पडावे. पण तेही तोंडाला मास्क लावूनच. तोही परत घरी आल्यावरच काढायचा. घरी येईपर्यंत मास्कला हात सुद्धा लावायचा नाही. अनेक लोकांना पाहिले आहे, मास्क असतो, फक्त तोंडावर. नाक उघडेच असते. वायरस हा नाकातून ही शिरतो हे ते विसरतात.
माझ्या एकट्याने मास्क लावल्याने काय होणार? असे बरेच महाभाग म्हणतात. पण ते हा विचार करत नाही कि प्रत्येक माणसाने असा विचार केला तर रस्त्यावर कोणाच्या ही तोंडावर मास्क दिसणार नाही. तेव्हा काय होईल.
आणि मास्क लावल्याने काय फरक पडतो हो? असा प्रतिप्रश्न कित्तेकांना पडतो. मित्रांनो, आपल्या तोंडावर मास्क आहे याचा अर्थ आपण स्वतःला विषाणूपासून सुरक्षित करून घेतले आहे. हे तर नक्की झाले नाही का!!
पण दिवसभरात आपल्या जवळून वावरणाऱ्या, आपल्या सान्निध्यात येणाऱ्या हजारो माणसांना आपण अपरोक्षपणे विषाणू पासून सुरक्षा पुरवित आहोत, हे विसरून कसे चालेल. अर्थात आपल्या मास्क लावण्याने या हजारो लोकांना विषाणूंपासून (जर असला तर ), सुरक्षा मिळत आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे आपण अप्रत्यक्षपणे समाज कार्य किंवा परोपकार करत आहोत.
मित्रांनो, लक्षात ठेवा पूर्वी पैसा नाही म्हणुन दवाखान्यात उपचार घेता येत नव्हते. आता तसे नाही. आता पैसा असूनही दवाखान्यात जागा नाही म्हणून उपचार घेता येत नाहीत. या कोरोना काळात पैश्याची किंमत कवडी मोल झाली आहे. हे या कोरोनाने आपल्याला दाखवून दिले आहे. पैसा असून सुद्धा आज दवाखान्यात रुग्णांना खाटा मिळत नाहीत. ही दयनीय अवस्था झाली आहे. कारण आपली सामान्य व्यवस्था इतका मोठा भार सहन करु शकत नाही. कोणालाही अपेक्षा नसावी कि अचानक इतकी भयावह परिस्थिती निर्माण होईल. म्हणून च व्यवस्था तयार करता आली नसावी. असो.
आपल्या रुग्णाला दवाखान्यात खाट मिळाली तरी ईच्छा असुनही जवळची व्यक्ती रुग्णाजवळ सेवा करण्यासाठी थांबू शकत नाही. इच्छा असूनही कोणाला कोणाशी भेटता योग येत नाही. या कोरोनाने अशी हतबलता निर्माण केली आहे.
असे म्हणता येईल कि हा कोरोना भावनाशून्य आहे. त्याच्या जवळ माफी नाही. म्हणून आपले कर्तव्य पार पाडत असताना काळजी घ्या, सुरक्षित राहा.
मित्रांनो, मृत्यूला तुमच पद, नाव, घरदार, गरीबी- श्रीमंती, हे काहीच माहिती नसते. वेळ आली कि प्रत्येकला जावेच लागते. कोरोनाने जे जात आहेत ते असे म्हणता येईल का कि अपघाताने जात आहेत. म्हणू शकतो. कारण अचानक मोठ्या प्रमाणात मृत्यूतांडव होते त्याला नैसर्गिक म्हणजे उचित होणार नाही. मग अशी अनैसर्गिक आपत्ती जेव्हा ओढवते तेव्हा प्रत्येकाने आपापले कर्तव्य पार पाडायचे असते.ज्यांना नेमून दिलेली कामे आहेत ते डॉक्टर,वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी,इ.सर्व कोरोना वारियर्स हे आपले
कर्तव्य पूर्ण क्षमतेने पार पाडत असतातच. पण आपण! आपण पार पाडतो का आपले कर्तव्य? हे आपणच आपल्याला विचारले पाहिजे. आम्ही काय बोलू शकतो? आपल्याला सांगितले आहे शासनाने घरीच थांबा तर आपण घरीच थांबावे. या आपात्कालीन परिस्थितीत हेच आपले कर्तव्य आहे.
मित्रांनो घाबरू नका, पण आताचा काळ हा खूप वाईट आहे. मृत्यु कधी कुठून आणि कसा येऊन कवटाळेल काही सांगता येत नाही. म्हणून सर्वांनी सर्वांशी प्रेमाने वागा, रुसवे, फुगवे, वैरभाव, तिरस्कार करणे या गोष्टी सोडून द्या. सर्वांशी आपुलकीने वागा. आयुष्यात आलेल्या प्रत्येक क्षणाचा मनभरुन आनंद घ्या. कोणाला माहिती आहे आपण पुढचा क्षण पाहू शकतो कि नाही!
घरी राहा, सुरक्षित राहा. आपली आणि आपल्या कुटूंबाची काळजी घ्या. हीच काळाची गरज आहे
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹(मित्रांनो, आपण कोरोना परिस्थितीतून मार्गक्रमण करत आहोत म्हणजे आपला शत्रू कोरोनाच आहे. त्यापासून सावध राहणे हे आपले कर्तव्य आहे. म्हणून मी हा शिर्षक निवडला आहे.)
(03521851)
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
😊फुल कितीही सुंदर असू द्या
कौतुक त्याच्या सुगंधाचे होते.🌹
माणूस कितीही मोठा झाला तरी
कौतुक त्याच्या गुणांचे होते.
चांगल्या हृदयाने खुप नाती बनतात.
आणि
चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात.😊
🌹🌹शुभ सकाळ 🌹 🌹