सेवानिवृत्ती….


मित्रांनो, आम्ही रिटायर म्हणजे सेवानिवृत्त हो, होऊन आता बराच काळ लोटला आहे. तशी चारच वर्षे झालीत. पण हा चार वर्षांचा काळ म्हणजे खूप मोठ्ठा वाटतोय. (कारण आम्हाला खूप म्हातारे झाल्या सारखे वाटतेय. )

आयुष्याची ३२ वर्षे नौकरी केली. संपूर्ण काळ धावपळ धावपळीत गेला. हा चार वर्षांचा काळ तेव्हढाच मोठा वाटतोय.

असो, मध्यंतरी व्हाट्सएपवर रिटायर्ड लोकं सध्या काय करतात अशी एक छान पोस्ट आली होती. कोणी लिहिली होती माहिती नाही. पण अप्रतिम पोस्ट होती. त्याची तुलना आपल्या आयुष्याशी करण्याचा हा प्रयत्न:-

ते रिटायर झाल्यावर सध्या काय करतात, याची यादी…
(स्वत; व इतरांच्या डोक्याला ताप)
😂😂😂
१) गरज नसताना दूध आणायला जाणे.

( मी दुध आणायला जातो पण गरज असेल तरच. दुध पिशवी टाकायला कोणी आले तर मी बाहेर जाण्यासाठी काही कारण तर हवं. आणि गरज असेल तरच आणायचे ही सक्त ताकिद आहे. विनाकारण आणून करणार तरी काय? म्हातारपणी दुध घेतले तर कोलेस्टेरॉल वाढल्याची भिती. म्हणून बंधने आहेत.😊)
२) गेटबाहेर झाडू मारणे, सडा टाकणे. (तरी बरं रांगोळी येत नाही, नाही तर ती पण काढली असती) ( हे शहरामध्ये शक्य नाही. कारण आम्ही इतके मोठे नाही कि बंगला असेल. गावात राहिलो असतो तर ही सर्व कामे सकाळ संध्याकाळ पार पाडली असती.😊)
३) दिवसभर वॉचमनसारखे खिडकीत बसून राहाणे. ( खिडकीत बसून बघणार काय? हो पुस्तक वाचत बसता आले असते. पण स्मॉर्ट फोनने पुस्तके कपाटात बंद करून टाकली आहेत. )
४) प्रत्येक काम मीच करायला पाहिजे, असा उगाच तगादा लावणे आणि बाकीचे कसे नालायक आहेत हे दाखवून देणे. ( हा अनुभव मात्र रात्रंदिवस येत असतो. पण आम्हाला जागेवर जाऊन बसा अशी सक्त ताकिद देणारे असल्याने असे करण्याला थोडा अटकाव येतो.😊)
५) पाण्याची टाकी भरेपर्यंत उगाच उभे राहाणे, Automatic असली तरी उगाच गच्चीवर जाऊन टाकीत डोकावणे. ( बंगलेवाले जिंदाबाद.)
६) गरज नसताना बँकेत जाऊन
निरर्थक वाद घालणे आणि मी किती कामात पटाईत होतो हे पटवून द्यायचा प्रयत्न करणे.( हे ही खरे. पण डोक्याला किती ताप द्यायचा आपल्या आणि इतरांच्या ही .म्हणून स्वतः ला आवरण्याची सवय करून टाकली. आता आठवण सुद्धा येत नाही.)
७) मुलाचे फेकून दिलेले शर्ट, टी शर्ट, शूज उगाचच वापरायला काढणे. ( मुलगा नसल्याने आपलेच जुने कपडे काढून वापरणे शक्य असल्याने ही हौस ही भागविता येते.😊)

८) कार जर बाहेर काढायची म्हंटले, तरी उगाच फालतू चौकश्या करणे.( पांढरा हत्ती पाळणे चुकीचे म्हणून आम्ही यापासून लांबच राहतो. तसेही आम्ही फार पर्यावरणवादी आहोत.)
९) उगाचच चट्ट्या पट्याची हाफ पॅन्ट घालून गेटमधे किंवा मागच्या दारात उभे राहाणे.( अरे बाप रे. हे तर अशक्य आहे. आम्हाला घर सोडून जावे लागू नये म्हणून हा विचार सुद्धा मनात येत नाही☺️)
१०) बिनकामाचे फोन करुन उगाचच काड्या करीत बसणे. (बिनकामाचे फोन करत असायचो पण काड्या नाही. फक्त फुकटचे सल्ले. आता आवर घातला आणि फोन करणे बंद केले. फक्त हालचाल तपासण्यासाठी फोन करणे योग्य अशा ज्ञानाची आम्हाला प्राप्ती झाल्याने☺️😊)
११) येणाऱ्या जाणाऱ्याला उगाचच एखाद्या नातेवाईका विषयी गाऱ्हाणी सांगत बसणे आणि स्वतःचे हसे करुन घेणे. (हे आपण अजीबात करत नाही.)
१२) नातवांचे मित्र / मैत्रिणी दारात खेळायला आले की अंगावर खेकसणे.( प्रश्नच उद्भवत नाही)
१३) कुठे बाहेर जायचे म्हंटले, तरी कार मधे पुढे बसायचा यांचाच मान आणि परत वर Driving चे धडे. (गाडी चालवायला येत नसली तरी!) (हे खरे असले तरी आम्हाला लागू नाही कारण तेच पांढरा हत्ती😊😊)

१४) एखादी आवडती सिरीयल / सिनेमा लागला म्हणून बघत बसले, की यांची फालतू बातम्या बघायची वेळ होते!! हा हा. येथे आम्ही सुखी आहोत कारण आमच्या कडे मला सोडून कोणालाही टिव्ही बघायला इवडत नाही. मी पण बातम्या बघायला आवडतात. सिरियल क्वचित.)
१५) बजेट, संसद सभागृहातला गोंधळ समजत नसला तरी वेड्यासारखे tv वर बघत बसणे. (हे मात्र खरे आहे😊)
१६) सर्वांचे एकमत झाले असताना मला का विचारले नाही, म्हणून रुसणे आणि विचारले असताना मला कशाला विचारता, म्हणून झटकून टाकणे. (लागू पडत नाही )
१७) आपल्याला मोबाईल मधले फार कळते, हे समवयीन असलेल्या म्हाताऱ्याला दाखवत काहीतरी सेटींग चेंज करणे.( नो कमेंट्स)
१८) एखादी गोष्ट नवीन करताना, उदा: घरातील फर्निचर, फॅब्रीकेशन उगाच स्वतःच्या कारागीराला बोलवून ती गोष्ट चौपट खर्च करून बनवणे आणि ती कितीही वेडी वाकडी झालेली असली, तरी जाणाऱ्या, येणाऱ्याला दाखवून हसे करून घेणे. ( नो कमेंट्स)
१९) उगाचच जुने वाहन, उदा: Scooter अथवा मोटर सायकल न विकता ठेऊन देणे, कधीतरी काढून उगाच फार मोठ्ठा मेकॅनीक असल्यासारखे कीका मारत बसणे, प्लग साफ करत बसणे, (नेमके यावेळेस नातवाची मैत्रिण अथवा सुनेची भिशी असते).( आपल्याला नाही लागू पडत)
२०) लाईटबील, फोनबील जास्त येते म्हणून जाता येता लाईट बंद करणे, आपण फोनवर बोलताना रागाने पहाणे आणि स्वतः फोन वरून कोणाबरोबर तरी तासन तास कागाळ्या करीत बसणे. ( हल्ली फोन करणे बंद करणे भाग पडले आहे. 😢)
२१) संध्याकाळी बागेत फिरायला जाणे आणि तासन् तास बाकडे अडवून बसून राहणे. (आवडत नाही)
२२) पिवळी गोळी, निळी गोळी अशा प्रकारे गोळ्यांची नावे लक्षात ठेवणे म्हणजे डॉक्टर तपासायला आला की वेडाच व्हावा!!(😊☺️)
२३) कारण नसताना सोसायटीच्या कामाचे झेंगट गळ्यात घेणे. (लावूनच घेतले नाही😊☺️)
👆🏽 सर्व सेवा निवृत्त लोकांनी हे वाचावे व आपण यातले काय काय करतो, ते तपासणे. तुमचा स्कोर १३ पेक्षा जास्त झाला, तर अधून मधून शेगांवला गजानन महाराजांच्या दर्शनाला जात जा!!

(02521841)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

👍👍शुभ सकाळ👍👍

पारखून घेतलं तर कोणीच आपल नसतं

आणि समजून घेतलं

तर कोणीच परकं नसतं.👌

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.koshtirn.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s