भाबडं मन हे….


आज संपतराव स्वतः किचन मध्ये गेले आणि चहासाठी पातेले घेऊन त्यात पाणी घातले आणि गैस पेटवून त्यावर पातेले ठेवले. त्यात चहा पावडर टाकली. साखरेचा डबा घेण्यासाठी हात पुढे केला. तेव्हढ्यात लोकांच्या ओरडण्याचा आवाज म्हणजे कोलाहल कानी पडला आणि संपतराव भान हरवल्यासारखे हॉलकडे धावले. सोबतच सौ.ला सूचना दिल्या मी टिव्ही बघतोय. पटकन चहा झाला कि एक कप मला द्या. त्या ही हो म्हणाल्या आणि किचन मध्ये गेल्या. चहा गैसवर चढवला होता. साखरेचा डबा काढलेला दिसला. म्हणून विचारले, ‘अहो, साखर घातली का?’

संपतराव हॉलमध्ये आल्यावर लक्षात आले कि कोलाहल टिव्ही तील होता. बातम्या सुरु होत्या. त्यांचा आवडता विषय होता. म्हणून ते टिव्ही मध्ये तल्लीन झाले होते.

सौ. काय म्हणाल्या हे त्यांनी ऐकलेच नाही. पण त्यांनी ‘हं’ असे केले. त्या समजल्या कि चहात साखर घातली आहे.

थोड्या वेळाने सौ. चहा घेऊन हॉलमध्ये आल्या. टिपॉयवर चहाचा ट्रे ठेवला.

संपतरावांनी टिव्ही कडे बघता बघता चहाचा कप उचलला. एक घोट चहा घेतल्यावर त्यांचा चेहरा एकदम पांढरा झाला.

चेहरा बघून कोणीही ओळखले असते कि ते खूप घाबरलेले आहेत.

ते खरंच घाबरलेले होते. कारण होते चहा. त्यांचा आवडता पेय चहा. तरीही ते का घाबरले बरं. तर कारण होत चहाचा स्वाद. त्यांनी तोंडात चहा घेतला आणि तो फिका लागल्याने ते घाबरले. कोरोनाचे काळात प्रत्येक मनुष्य असाच घाबरलेला आहे. बातम्या ऐकल्यावर, बातम्या बघितल्यावर किंवा वाचल्यावर, कोणी फोनवर सांगितल्यावर सुद्धा असाच घाबरून जातो. चहाचा घोट घेतल्यावर जेव्हा तो फिकट लागला तेव्हा त्यांना वाटले त्यांच्या तोंडाचा स्वाद गेला. म्हणजे हे कोरोना चे लक्षण आहे.

त्यांच्या चेहऱ्यावर चा रंगच उडाला होता राव. बराच वेळ ते तसेच विचार मग्न बसून राहिले. एव्हाना टिव्हीवर काय सुरू आहे हेच ते विसरले होते.
इकडे सौ. आपलं वाचनात मग्न असल्याने त्यांचे लक्ष संपतरावांकडे गेले नाही. वाचन करता करता त्यांनी दुसरा चहाचा कप उचलला. चहाचा एक घोट घेतला आणि त्या घाबरून गेल्या. त्यांच्या चेहऱ्याचा रंग सुद्धा उडाला.
आता काय करावे त्यांना कळेना.

घरात निःशब्द शांतता पसरली होती. दोघे ही बोलत नव्हते. एक दुसऱ्या कडे पाहत सुद्धा नव्हते. काही काळ लोटल्यावर संपतरावांनी विचार केला कि चहाच्या स्वादाबद्दल हिला उलटा प्रश्न विचारावा.

ते म्हणाले, “चहा खूप गोड झाला आहे न. तुमच्या हातात खूप गोडवा आहे हो.”

त्यांना वाटले होते कि असे विचारले तर ती म्हणेल चहात साखर नाही म्हणून. पण झाले उलटेच.

सौ. खूप घाबरली. “अहो काय म्हणताय. चहा तुम्हाला खूप गोड लागयोय. मला तर यात साखर नसल्यासारखा लागतोय.” असे म्हणून त्या रडायला लागल्या.
आता संपतराव काही बोलणार त्या आधीच त्या म्हणाल्या, ” अह़ो, तुम्ही तो चहा घेऊ नका. आणि माझ्या पासून लांब जा. बहुतेक मला कोरोना झालाय.”

“अग, काय म्हणतेय. मला पण चहा फिकट लागतोय.”

आता तर बाई आणखीनच घाबरली. दोघांना ही या आजाराने पछाडले कि काय? क्षणार्धात डोळ्यासमोर भविष्य काळात घडणाऱ्या घडामोडी दिसून गेल्या. नको नको ते विचार मनात येऊ लागले.

डकडे संपतराव चहा ठेवण्या पासूनचा प्रसंग आठवू लागले. त्यांना आठवले कि त्यांनी चहा पावडर घातली होती. साखर घालणार तोच ते कोलाहल ऐकून काय झाले ते बघायला आले. म्हणजे त्यांनी चहात साखर घातली नव्हती.

त्यांनी सौ.ला विचारले, “तू चहात साखर घातली होती का?”

“अहो, मी तुम्हाला विचारले होते तर तुम्ही हो म्हणाले होते. म्हणून मी घातली नाही. ”

“काय! तुम्ही साखर घातलीच नाही चहात!”

“नाही. का बरं! काय झाले?”

“अग, मी पण साखर घातली नव्हती.”

“म्हणजे हा बिनसाखरेचा चहा आहे तर. मी तर घाबरून गेले होते.”

“अग, मी सुद्धा घाबरलो होतो. मला वाटलं आला तो आपल्या घरी. देवाचे आभार मानायला हवेत आपण.”

“हो न. अहो, सर्व जग कसं घाबरलेलं आहे. क्षणोक्षणी आपल्याला वाटतं आहे कि आपला नंबर आला कि काय आता. प्रत्येक जण दहशती खाली जगतोय.”

“अहो, मानसाचं मन असच भाबडं असते. आणि मरणाची भिती कोणाला नसते हो. ”

“तेव्हा हा विचार आपण करत नाही कि प्रत्येकाला परत जायचेच आहे. कोणी ही अमर नाही.”

(03821854)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आयुष्यात किती ही संकटं आली तरी त्यांना सामोरे जाऊन जो आपले अस्तित्व टिकवून ठेवतो तोच खरे जीवन जगतो.

💐💐सुप्रभात💐💐

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.koshtiravindra.Blogspot.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

2 thoughts on “भाबडं मन हे….

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s