मुल जन्माला आले आणि थोडे से बघून बघून हसायला लागले कि सर्वांचे सुरू बाळ आई कोणती? बाबा कोणते? आत्या कशी मागे राहणार? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजी मागे राहणे कसे शक्य आहे. त्या छोट्या जीवाला वेड करून टाकतात विचारून विचारून. तो इतका थकतो कि पडल्या पडल्या डोळे मिटवून झोपी जातो. येथून परीक्षेला सुरुवात होते. परीक्षा फक्त शाळेत गेल्यावर होते सर्व सामान्यांचा समज असतो. पण तसे नाही. लहान बाळ मान धरायला लागले, नजर देऊन आपल्या कडे बघायला लागले कि त्याची पहिली परीक्षा सुरुवात झाली म्हणून समजावे. आपण काय समजावे. आपल्याला ते कळत नसते. तो बाळच समजून जातो कि आपल्या आयुष्याच्या परीक्षा आता सुरू झाल्या. तेव्हा तो कंटाळून नजर दुसरी कडे वळवून घेत असतो. पुढे दररोज क्षणाक्षणाला परीक्षा होत असते. बोट, डोळे, नाक, कान प्रत्येक अवयव ओळख ही परीक्षाच असते. आई, बाबा, नव्हे मम्मी- पप्पा, काका, मामा आजी आजोबा, एक न अनेक नाती असतात. सर्वांची ओळख परेड होते बाळासमोर. तो ही प्रथम ओळखायला लागतो. कालांतराने हाक मारायला सुरुवात करतो. पहिली गुरु आईच असते. पुढे अंगणवाडी, बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, मग डिग्री, ह्या शिक्षणाच्या परिक्षा उत्तीर्ण होत होत एक एक टप्पा पार करत जावे लागते. सोबतच जीवनातील परिक्षा ही द्याव्या लागत असतात. इतपर्यंत आईवडील यांच्या आशिर्वादाने व सोबतीने आणि मदतीने जीवनातील परिक्षेचे अडथळे पार करत असतो. नौकरी लागली आणि लग्न झाले कि खरे जीवन सुरू होते आणि खरी परिक्षा ही. या परिक्षेत उत्तीर्ण होणे फार कठिण असते. सर्वात कठिण असते ती बायको घेत असलेली परिक्षा. तेथे प्रश्नांना उत्तरे च नसतात. प्रश्नाला उत्तर दिले कि संपले असे कधी होत नाही. कारण प्रतिप्रश्न उपस्थित होत असतात. आणि मास्तर समाधानकारक उत्तर दिले नाही म्हणून नापास करत असतात. नवरोबा त्या परिक्षेत कधीच उत्तीर्ण होत नसतात☺️😊😢 पुढे म्हातारा झाला बाबा कि सर्वच परिक्षक होतात😊😊. मुलं, सुना, नातवंडे आणि अर्थात बायको कशी सुटणार! एकूण काय तर माणसाला आयुष्यभर परिक्षाच देत बसावं लागतं. स्रियांचं बहुधा असं नसत. त्या स्वतः सुन असे पर्यंत थोड्या प्रमाणात परिक्षा द्यावी लागते त्यांना ही. एकदा का त्यांची सासू गेली आणि ही सासू झाली कि फक्त परिक्षकच होतात बाबा त्या😊😊.असे हे पुरुषी जीवन परिक्षा आणि परिक्षकांनी परिपूर्ण. 😊😊😊 मग मला एक प्रश्न पडतो कि आपली संस्कृती पुरुषप्रधान कशी?
(5821874)💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये
खरी परीक्षा असते,
कारण
समजवण्यासाठी अनुभवाचा कस
लागतो,
तर समजून घेण्यासाठी मनाचा
मोठेपणा लागतो
🌹🌹 आणि अशी मोठ्या मनाची माणसे माझ्यासोबत आहेत याचा मला अभिमान आहे 🌹🌹
💐💐 शुभ सकाळ 💐💐
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐www.koshtirn.wordpress.com💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐