खालील संदेश वाचून धर्मपत्नी संपतरावांना म्हणाली, “अहो, वाचा जरा किती छान सकाळ संदेश आहे. ” असे म्हणत तो संदेश त्यांनी संपतरावांना दाखविला.
🌹⚜🌹⚜🌹
” सकाळ तर रोजच होते परंतु शुभ सकाळ काय असते”?
विवेकानंद यांनी सुंदर उत्तर दिले
” आयुष्यात ज्या दिवशी आपण आपल्या मनातले वाईट विचार समाप्त करतो आणि चांगल्या विचारांनी आपल्या अंतरआत्माला शुद्ध करून दिवसाची सुरुवात करतो तीच शुभ सकाळ असते ….🌸🌸
🙏🏻 शुभ सकाळ🙏🏻
. 🌹💐🌹💐🌹💐
“हो न किती छान संदेश आहे. पण लोकं चांगले विचार करून सकाळची सुरुवात कधी करतील देव जाणे.” इति संपतराव.
“अहो, कळताय मला टोमणे. कटाक्ष टाकून टोमणा मारणे छान जमत बुआ एकेकाला.”
“अहो, माझं इतकंच म्हणणं आहे की चांगले विचार करून दिवसाची सुरुवात केली पाहिजे प्रत्येकाने.’
“मग मी काय वाईट करते बरे”
“रोज आपलं अस करू नका. तस करू नये. घरात बसून नका राहू. मुलांना अडचण होते. थोडे बाहेर पडत चला. बाहेर गेलो तर काय सतत बाहेर बाहेर असते तुमचे घरात बसत चला. मुलांशी गप्पा मारत चला. याने आमचा दिवस चांगला कसा हो जाईल.”
“अहो तसे नाही. कामावर होता. तेव्हा घरी मोकळ राहता येत होते सर्वांना. आता तुम्ही सतत घरात बसून असता. काही तरी बडबड करत असता. सर्वांना त्रास होतो. आणि दडपण ही असते तुमचे. सुनबाई पण दडपणाखाली वावरते बिच्चारी. म्हणून मी आपल दाखविण्यासाठी म्हणत असते. तुम्ही वाईट वाटून घेत जाऊ नका.”
“हे काय. म्हणजे यापुढे ही तुम्ही असे बोलत राहणार आहात वाटते”
संपतराव हसत हसत म्हणाले. आणि आजच्या दिवसाची सुरुवात छान झाली असे मनात आणून हसू लागले.
(6321879)
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
💐💐शुभ सकाळ💐💐🌹🌹
जगात येताना तुमच्यापाशी काहीच नसते, पण त्या शून्यातून काहीतरी चांगले निर्माण करणे हे तुमच्या जीवनाचे उद्दिष्ट असते…
⭐श्री स्वामी समर्थ⭐
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Www.koshtirn.wordpress.com
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Very nice article.
LikeLike