(एक काल्पनिक विज्ञान कथा)
मित्रांनो, आता आपण २१व्या शतकाच्या मध्यावर आहोत. आज ची तारीख १ जानेवारी २०५०. २१ व्या शतकात तंत्रज्ञान झपाट्याने बदलत गेले आहे. सर्वत्र यांत्रिकीकरण झाले असून मानव जवळजवळ परावलंबी झाला आहे. बाकी काही लिहिणे म्हणजे भारुड भरती होईल. म्हणून आता मी विषयाकडे वळतो. इमारती ही खूप आधुनिक झाल्या आहेत. शहरी भागात गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या आहेत. आता एक नवीन इमारत बांधली जाणार आहे. ती आतापर्यंत ची सर्वात जास्त आधुनिकीकरण असलेली इमारत आहे. त्या इमारतीत प्रत्येक मजल्यावर एक फ्लॅट आहे. प्रत्येकाला एक स्वतंत्र लिफ्ट आहे. तो आपापल्या लिफ्ट ने डायरेक्ट आपल्या घरात जाईल. त्या छोट्या लिफ्ट आहेत. दोन माणसे बसून जाऊ शकतात. त्यांची रचना जमीनीखाली गोलाकार अशी केलेली आहे. रेल ट्रेक अंथरलेले आहेत. त्यावर लिफ्ट लाईनशीर उभ्या असतात. आपलं बटन दाबल कि आपली लिफ्ट येते. त्यात बसायचे. ती वर सरळ आपल्या फ्लॅट मध्ये नेऊन सोडते. सामानासाठी स्वतंत्र लिफ्ट आहे. आपला सामान आला की तो त्या लिफ्ट मधे ठेवायचा. लिफ्ट त्या मजल्यावर गेली की सामान बाहेर तुमच्या दारावर नेऊन सोडते. त्यासाठी लिफ्ट मधे एक प्लँटफार्म असतो. त्यावर सामान ठेवायचा असतो. तोच दारापर्यंत सामान नेऊन सोडतो. या इमारतीत खाली कार पार्किंग नाही. आपली गाडी आपल्या घरात पार्क करायची. एका घरात चार गाड्या पार्क करता येतील. आपल्या घरात गाडीत बसून गाडी लिफ्टमधे घालायची. लिफ्ट खाली आली , दार उघडले कि सरळ गाडी घेऊन बाहेर पडायचे.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐6921885💐💐💐💐💐💐💐💐
चेहरा चांगला असला तर लोकं थोडा वेळ बघतील,
मात्र मन चांगलं असलं तर लोकं जन्मभर जपतील…!
🌻🌹🌻शुभ सकाळ🌻🌹🌻