पैसा झाला मोठा.. भाग -२


मित्रांनो, काही दिवसांपूर्वी मी हाच शिर्षक घेऊन एक पोस्ट टाकली होती. पैसा आता इतका मोठ्ठा झाला आहे कि त्या पैशातून माणसाला अंतरिक्ष भ्रमणाचे स्वप्न ही पूर्ण करता येणार आहे. यावर ती पोस्ट होती.

आज याच शिर्षकावर आणखी एक पोस्ट लिहाविशी वाटली म्हणून सादर करित आहे.

मित्रांनो, सचिन क्रिकेट खेळायचा तेव्हा मला आठवते ९८- ९९ वर आऊट झाला कि सर्वांना हुरहूर वाटायची. तोंडात आलेला घास निघून गेल्यासारखे व्हायचे. म्हणजे यश फक्त एक पायरी लांब किंवा एक फुटांवर असले कि कसे वाटते तसे. बस्स यार एक रन आणखी हवा होता. कधी कधी सामना इतका अटीतटीचा होतो कि १-२ रन ने सामना हातचा जातो. तेव्हा खूप हळहळ वाटते. जेव्हा पासून “कौन बनेगा करोडपती” हा कार्यक्रम सुरू झाला आहे तेव्हा पासून तेथे हॉट शीट वर बसलेल्या माणसाची काय अवस्था होत असेल याची कल्पना ही करवत नाही. सुरुवातीला हरलो तर खूप वाईट वाटत नसेल. कारण एका प्रश्नाचे मुल्य तेव्हा खूप काही नसते. पण पुढे पुढे एका प्रश्नांची किंमत वाढत जाते तेव्हा फार अवस्था वाईट होते. २५ लाखाचा एक प्रश्न. पन्नास लाखाचा प्रश्न, एक कोटीचा प्रश्न. अरे यार माझ्या जीभेवर उत्तर होते पण शब्द सुचत नव्हते, अरे येत होते मला उत्तर पण १००% खात्री नव्हती. अशी एक ना अनेक कारणं. जसजसा खेळ पुढे सरकत जातो तसतसे पैशाचे अवमूल्यन होत जाते. सुरुवातीला रू. १०० मूल्य असलेल्या प्रश्नाचे पुढे पुढे कोटी मधे मूल्य होत जाते. याला नेमके काय म्हणायचे राव!! प्रश्नांची किंमत वाढली की पैशाची किंमत कमी झाली? असो पण कदाचित दोन्ही ही झाले असावेत. पण माणसाच्या ह्रदयाचे ठोके मात्र ठोकून ठोकून यायला लागतात आणि हार्टफेल होतो कि काय असे वाटायला लागते. पण अख्ख आयुष्य खस्ता खाऊन ही कोटी रुपये जमा करू न शकणारा माणूस त्या खेळात खेळता खेळता काही वेळातच करोडपती होतो. अदभूत बुद्धी ने बुद्धिमानीचा हा खेळ बुद्धिमान लोकांनी रचून लोकांची बुद्धी हरवून टाकली आहे ना का😊😊💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐( 6621882) 💐💐💐💐💐💐💐💐💐

सुमन सुगंधु रे भ्रमरा ।
परिमळु विद्गदु रे भ्रमरा ॥सौभाग्यसुंदरू रे भ्रमरा।
बाप रखुमादेविवरू रे भ्रमरा ॥
सुप्रभात 🙏

http://www.koshtirn.wordpress.com

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s