मोफत ची आफत..


जगामध्ये मोफत काहीच मिळत नसते मित्रांनो. हे तर आम्ही सर्व जण जाणून आहोतच. पण तरीही आपण मोफत मिळत असेल तर ते सहज स्विकारतो. त्याची आपल्याला सहज भुरळ पडते. नकळत आपण त्याच्या आहारी जातो. अहो, आई सुद्धा आपल्या तान्हुल्या बाळाला तो रडल्या शिवाय दुध पाजत नाही. त्या बाळाला सुद्धा सहज दुध म्हणजे जेवण मिळत नाही.

त्यामुळे मोफत काही मिळत असेल तर तेथे आफत असणार हे नक्की.

असे मोफत बरेच मिळत असते नेटवर पण आपण त्याला बळी पडतो का त्यावर सर्व अवलंबून असते. मला या विषयावर मोफत वेळ घालवायचा नाही आपला. माझा विषय मोफतचा इंटरनेट डाटा बद्दल आहे.

अहो, नेटवर्किंग बाबत अक्षरशः युद्ध सुरू आहे. तू जास्त स्वस्त देतो कि मी. असे कंपन्यांचे होत असल्याचे दिसून येते. चार पाच वर्षांपूर्वी काहीच एमबी डेटा विकत मिळत होता. आणि आपण काम भागवत होतो. ज्या दिवशी गरज असेल तेव्हा डेटा विकत घ्यायचा. आता तर जीबी मध्ये डेटा मिळतो ते ही दररोज. पाच वर्षांपूर्वी एका दिवसात कसाबसा १२५ एमबी डेटा संपवत होतो. तर वाटायचे बाप रे इतका डेटा खाल्ला आपण. आता एका दिवसांत १.५ जीबी संपतो तरी मन भरत नाही. आणि बापरे असे शब्द ही तोंडातून बाहेर पडत नाहीत. अहो सर्व काम धंदे सोडून, मुलं अभ्यास सोडून तो मोबाईल घेऊन बसलेले दिसतात. घरी पाहूणे जरी आले तरी शांतता असते. कारण प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो. एक दुसऱ्या ला बाजूला बसलेला असला तरी मोबाईलवर संदेश पाठवतात. बरेच चुटकूले येतात बघा. सर्व जेवण करत असतात. नवरा म्हणतो अग भाजी वाढ कि मी तुला मोबाईल वर मेसेज पाठवून किती वेळ झाला आहे.

पूर्वी एक मिनिट बोललो तरी खूप व्हायचे. आता अनलिमिटेड बोललो तरी मन भरत नाही. अस्वस्थ होत. अनलिमिटेड तर आहे. बोलत बसू. आपल काय जातय. असे वाटते.

पण, एक मात्र खूप चांगले झाले कि मोबाईल आले आणि स्वस्त कम्युनिकेशन मिळाले. नाही तर या कोरोना काळात मुलांचे काय झाले असते देवच जाणे. ऑनलाईन शाळा कशा भरल्या असत्या माहीत नाही. असो. तर मंडळी या मोफतचा आनंद लूटा आणि स्वानंदाने आफतला निमंत्रित करून घ्या. ☺️😊☺️😊☺️😊 असे म्हटले जाते की इंटरनेट मुळे जग जवळ आलय. पण मला वाटते इंटरनेट मुळे जवळचे लांब गेलेय. आता जवळचं अस कोणी राहिलेले नाही.😢😢😢

7121887😊😊💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐✍….आयुष्यात आपण असंख्य चुका केल्याचे दुःख असतेच पण त्या पेक्षा ही जास्त दुःख असतं ते चुकीच्या माणसांसाठी आपण असंख्य गोष्टी केल्याचं.
” आयुष्य खुप सुंदर आहे. आनंदाने जगा.” ‼ शुभ सकाळ ‼

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 http://www.ownpoems.wordpress.com💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s