बालिशपणा..


बालिशपणा या शब्दातच मुळी अर्थ लपलेला आहे. बालिश म्हणजे लहानपण म्हणायला हरकत नाही. अर्थात लहानपणाचे चाळे म्हणजे बालिशपणा असे म्हणायला हरकत नसावी. पण लहान मुले असे चाळे करतात तेव्हा आपण त्यांना काय बालिशपणा करतोय असे कधी म्हणत नाही. कारण तो त्यांचा हक्क आहे. त्यांनी नाही करायचा बालिशपणा तर मग कोणी करायचा?? आणि तो त्यांना शोभून ही दिसतो.

थोडे मोठे झाल्यावर म्हणजे मिसरूड आल्यावर मुलाला काय बालिशपणा करतोय असे म्हटले कि त्याची चिडचिड होते. त्याला हा शब्द प्रयोग आवडत नाही. कारण तो आता मोठा झालेला असतो. पण तो बालिशपणा करता करताच मोठा होतो. जरी हा शब्दप्रयोग आवडत नसला तरी. मग भाऊचे लग्न होते. आता हाच शब्दप्रयोग बायको पाऊलो पाऊली वापरते. तेव्हा बिचारा काहीच बोलत नाही. कारण बायकोचा हक्कच आहे असे ही म्हणता येत नाही. मग आईवडील ऐकून मनोमनी हसतात. आणि गप्प बसतात. आणि असच बालिशपणा करत करत तो म्हातारा होतो.

आता त्याचे आईवडील नसतात किंवा असले तरी जर्जर म्हातारे असतात. त्यामुळे त्याला ते बालिशपणा असे संबोधित नाही. बायको चा सूर ही बदललेला असतो. ती आता बालिशपणा न म्हणता म्हातारचळ या शब्दाचा वापर करते कारण तो बालिशपणा एव्हाना म्हातारा झालेला असतो.

म्हातारपणी शरीर जर्जर होते तशे एक एक अवयव कमकुवत होत जातात. म्हणून तोंडाचा स्वाद बिघडत असावा. जीव्हा फिकट लागत असावी. माझे बाबा म्हातारपणी तोंडात मिठ किंवा साखर चघळत असत. तेव्हा मला वाटे हा काय बालिशपणा करतात हे म्हातारपणी. आता मी म्हातारा झाल्यावर समजले की या वयात अवयव निकामी होत जातात म्हणून जिभ नेहमी फिकट लागते. त्यामुळे गोड किंवा खारट चव बरी वाटते. तसे लहानपणी सुद्धा मुलांना गोळी सतत चघळायला आवडते. फक्त म्हातारपणी त्याला म्हातारचळ म्हणतात बाकी विशेष काही नाही.

नाही तरी म्हातारपणी काही ही केले तरी त्याला म्हातारचळ किंवा बालिशपणा असेच नाव दिले जाते. बैललो तरी आणि नाही बोललो तरी. हसलो तरी रडलो तरी. टिव्ही बघितला तरी आणि नाही बघितला तरी. आता म्हातारपणी टिव्हीवर बातम्या बघतो मनुष्य. हे काय दगवसभर बातम्या लावून बसतात. त्याच त्याच तर असतात. उगाच विजबील वाढते. मनोरंजन चैनल बघून थोडं चैनीत बसावं म्हटले तर सिनेमा बघावासा वाटत नाही. समजा लावलाच एखादा सिनेमा तर या वयात शोभते असे सिनेमा बघणे म्हणून बंद केला जातो. आता म्हातारा झालोय म्हटलं तर असे कितीक वय झालय तुमच? हे काय वय आहे बसून रहायचं. चला थोडे हिंडा फिरा. असे म्हणतात. आता काय करायच माणसाने?? 😁😁😁

काही करू नये. गुपचूप ऐकायचे. मनातल्या मनात हसायचे. जे नको करायला सांगितले ते करायचे. आपला बालिशपणा सुरू ठेवायचा आणि निवांतपणे जगायचे. 😀😛🤣🤪🤫🤫🤫7221889😊😊

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s