कढीपत्ता…


आपल्या रोजच्या जेवणातील कढीपत्ता हे अत्यंत उपयुक्त व आवश्यक घटक मानले गेले आहे. बहुतेक भाज्यांमध्ये न चुकता हा पदार्थ घातला जातो. हा मसाला म्हणून मानला गेलेला पदार्थ आहे. गोडलिंब म्हणून ही याला ओळखले जाते. भारतात याला एक आयुर्वेदिक वनस्पती म्हणून ही ओळखले जाते. याच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडँट, अँटिडायबेटिक, अँटिइंफ्लेमेटरी म्हणजे सूज प्रतिबंधक असे गुण असतात. याशिवाय पदार्थ स्वादिष्ट ही बनतो.

विषय वेगळाच आहे. या झाडावर एक विशिष्ट प्रकारचा किटक वास करतो. हे आपल्याला कदाचित माहिती असेल ही. विशेष म्हणजे त्याचे वास्तव्य फक्त याच झाडावर असते. बर तो कायम या झाडावर राहत नाही. कसा येतो तेही माहिती नाही. पण अचानक उगवतो. पंख ही नाहीत त्याला. मग तो झाडावर कसा येतो माहित नाही. आणखी एक निरिक्षण केले कि तो नेहमी जोडीने येत असतो. दोन्ही म्हणजे कुटुंब एकत्र प्रवास करत असते. त्याचे फोटो मी काढले आहेत. खालील कोलाज बघा. भयानक वाटतो न. त्याची नजर बघा किती तिक्ष्ण आहे. भिती वाटते त्याला बघून. अगदी पानांसारखा हिरवा गडद रंग असतो. कारण तो पानं खाऊन जगतो.

मी त्याचा फोटो काढला आणि गुगल लेंस वर सर्च केले तर त्याची माहिती समोर आली. हा प्राणी लिंबाच्या झाडावर पण असतो. याचे विविध रुप बघायला मिळाले. हा citrus swallowtail caterpillar या नावाने ओळखला जातो. असे लक्षात आले कि या मोठ्या फुलपाखराचे लहानपणी चे रुप असावे. मोठा झाल्यावर याला पंख फुटत असावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s