मित्रांनो, जेथे मन असते तेथे इच्छा असते. मग तो माणूस असो कि प्राणी. जीवंत जीव असेल तर त्याची इच्छा ही होतेच. मग ती गोडधोड खायची असो कि ग्रंथ वाचणाची किंवा काही तरी जिन्नस पदार्थ खायची. अहो कधी कधी गोड नव्हे तर चक्क तिखट खायची इच्छा होते. कधी कधी गम्मत च होते बघा. गोड खाल्ले तर तोंड गोडगोड होत. जास्त गोड पदार्थ असला तर बराच वेळ जीभ गोड असते. मग मात्र कंटाळा येतो. मग काही तरी तिखट खायची इच्छा होते. मग तिखट खायला मागतो. बरोबर आहे तुम्ही एकटे थोडेच आहात घरात! आणि स्वयंपाक खोलीत जायचीच बंदी केली गेली असेल सेवानिवृत्त माणसाला तर तो बिच्चारा ती बायको ने रेखाटलेली अद्रुष्य लक्ष्मण रेखा स्वप्नात तरी ओलांडायची हिम्मत करू शकेल का हो? नाही न. हाच अनुभव संपतरावांना उठसूट येत असतो. पण ते बिचारे काहीच करू शकत नाहीत. हात चोळत बसतात. नाही तर एका खोलीत जाऊन गुपचूप भिंती वर राग काढून मोकळे होतात.😊☺️😢 पण विषय हा नाहीच आहे मुळी. विषय वेगळाच आहे. अहो परवा सौ. स्वयंपाक घरात होत्या. संपतरावांनी आवाज दिला, “अहो, मला थोडा चहा हवा होता.” बस मग काय? सौं.ची चक्री सुरू झाली की राव. “ही काय चहाची वेळ आहे. किती वेळा चहा घ्यायचा माणसाने? उठसूट चहा चहा. ” राग राग राग आणि राग. “अहो, आता परवाच आपल ठरल कि दिवसातून चार वेळा चहा मिळेल म्हणून.” असे संपतराव म्हणाले. आता पुन्हा सुरू झाली कटकट. संपतराव कंटाळले. आणि मैदान सोडून निघून गेले. पण त्यांची चहाची तलब काही केल्या जात नव्हती. थोड्या वेळाने परत ते किचन कडे वळले. सौ.च्या लक्षात आले की स्वारी डोकावत आहे. “आले, लक्षात आले बर का! थांबा थोडे. पण मी काय म्हणते? अहो, मी कामाच्या व्यापात काही बोलले रागावले तर गुपचूप ऐकून घ्यायला काय होते.” “अग पण विनाकारण?” संपतराव. “मग काय त्यात. मी कोणावर रागावणार मग. मुलं आता मोठ्ठी झालीत. त्यांना काही बोलता येत नाही. माझी पण इच्छा होते रागवायची कधीतरी. तर स्वारी ऐकून घ्यायला ही तयार नाही. इतकी इच्छा ही पूर्ण करू शकत नाही तुम्ही माझी.” सौ. उवाच. संपतराव आ वासून सौ.कडे बघतच राहिले. त्यांना असे बघून सौ. हसल्या. मग दोघे मनसोक्त हसले आणि चहाची इच्छा पूर्ण झाली.💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃
कितीही कोणापासून दूर व्हा
परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते.
म्हणूनच
स्वभावसुध्दा माणसाने कमावलेलं सर्वांत मोठं धन आहे..!!_
🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃
☺ सुप्रभात ☺
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐www.ownpoems.wordpress.com💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
उत्तम माहिती पण जगातील जुना खेळ यावर काही लेख दिला तर चालेल का
LikeLike