बिछडे सभी बारी बारी…..


गुरुदत्त या कलाकाराचा एक सिनेमा होता “कागज के फूल”. त्यातील एक गाणे होते…

देखी जमाने की यारी, बिछडे सभी बारी बारी

क्या लेके मिले अब दुनिया से, आँसू के सिवा कुछ पास नही

या फूल ही फूल थे दामन में, या काँटों की भी आस नहीं

मतलब की दुनिया है सारी, बिछडे सभी बारी बारी

दुखाने ओतप्रोत भरलेला हा सिनेमा मोठ्या प्रमाणात फ्लॉप झाला आणि गुरुदत्त ने नंतर जीवनच संपवलं. असा एका सिनेमा पर्वाचा अंत झाला.

मुद्दा हा नाहीच. मुद्दा आहे हे भावनिक गीत. तशी या चित्रपटातील सर्वच गाणी भावनिक होती. दिल को छू जानेवाली म्हणतात न तशी. गाण्यांचे बोल, शब्द रचना अक्षरशः काळजाला भिडते राव.

देखी जमाने की यारी. या पहिल्या कडव्यात च दर्द आहे. देखी जमाने की यारी म्हणजे जगाचे प्रेम बघितले. यातच गहरा दर्द लपलेले आहे. माझ्या मते हे उपरोधक आहे. म्हणून यात दर्द वाटतो. कारण लगतच्या ओळीत निकले सभी बारी बारी… असे आहे. दोन्ही ओळी मिळून अर्थ काढला “तर व्वा काय प्रेम आहे, एक एक करत सर्वच निघत आहेत.” असा असावा असे मला तरी वाटते. आयुष्यात डोकावून पाहिले तर हे असेच आहे असे वाटते. कारण जग मतलबी आहे असेच वाटते. लहानपणापासून जर आयुष्याच चलचित्र डोळ्यासमोर आणलं तर दिसून येते कि एक एक मित्र आयुष्यात आला कालांतराने निघून गेला. असे वाटून जाते कि त्याचे काम झाले म्हणून तो निघून गेला. कदाचित त्याला आपल्या कडून तितके प्रेम मिळणे अपेक्षित असावे किंवा आपण त्याला तितकेंच प्रेम देणे लागत असावे. किंवा आपल्याला त्याच्या कडून इतकेच प्रेम घेणे असावे. काय असावे हे कोणीच सांगू शकत नाही. पण असं कोणी आयुष्यातून निघून गेले तर फार वाईट वाटते. असे वाटते इतक निष्ठूर कसं असू शकतं हे जग?? पण आपण काही करू शकत नाही. जो आला आहे तो एक दिवस जाणारच आहे. मित्रांनो, ऋणानुबंध असल्याशिवाय कोणीही कोणाच्या आयुष्यात येत नसते.

वय झाले कि असच होत जात. एक एक जण या वलयातून निघत जातो. शेवटी शेवटी तर अक्षरशः एकांतवास भोगावा लागतो. दिर्घ आजार असेल तर घरचे ही जवळ येत नाहीत तर परक्यांचे काय! अशावेळी मनुष्य ईश्वराच्या विनवण्या करतो कि मला घेऊन जा. भोग हे कोणालाच चुकलेले नाहीत. भोगायचे असेल ते भोगावेच लागणार. अहो, श्रीकृष्ण भगवान च्या आईवडिलांना सुद्धा दिर्घकाळ कारावास भोगावाच लागला होता न. जेव्हा आई देवाला विचारते कि तू तर देव होतास मग आम्हाला हा कारावास का भोगावा लागला? तेव्हा देव म्हणतात, माते तू नाही का मला चौदा वर्षे वनवास भोगायला पाठवले होते मागच्या जन्मी! म्हणजे देवाला सुद्धा भोगावेच लागते न. असे जीवन आहे मित्रांनो. सर्व जाण्यासाठी च येत असतात मग ते आयुष्यात असो वा जगात. कोणीही येथे कायम थांबले नाहीत.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐www.koshtirn.wordpress.com💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃
कितीही कोणापासून दूर व्हा
परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते.
म्हणूनच
स्वभावसुध्दा माणसाने कमावलेलं सर्वांत मोठं धन आहे..!!_
🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃
☺ शुभ सकाळ ☺

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s