मित्रांनो, जीवन काय आहे. आईवडिलांनी जन्माला घातल म्हणून हे जग पाहिले. हळूहळू मोठे झालो. शिकलो सवरलो, नौकरी मग लग्न मग मुलबाळ मग म्हातारपण मग परतीचा प्रवास. बस्स. इतकंच. याच साठी हा अट्टाहास!! मोठमोठ्या दार्शनिकांनी जीवनाचे विविध अर्थ सांगितले आहेत. विविध पैलू उलगडून सांगितले आहेत. पण तरीही मला वाटते जीवन म्हणजे नक्की काय हा उलगडा अद्याप तरी कोणाला झाला नसावा. एका महापुरूषाने जीवनाला काय म्हटले आहे ते पहा.
“Life is a long headache in a noisy street.” — John Masefield म्हणजे काय तर एका “कोलाहलपूर्ण रस्त्यावरील मोठ्ठी डोकेदुखी म्हणजे जीवन.” John Medfield हा १९ व्या शतकातील एक मोठा इंग्रज कवि होता. त्याला ही हे जीवन म्हणजे निव्वळ एक डोकेदुखीच वाटली तर. आणखी एक महापुरुष जीवनाबद्दल काय म्हणतो ते पहा.
“Life is a misery to be born, a pain to live, a trouble to die. ” St. Bernard of Clairvaux. आता याला काय म्हणावे बर. याने तर जन्मापासून मरणापर्यंत दुखच दुख अशीच व्याख्या करून टाकली या जीवनाची. जन्मासाठी पण दुःख, जगण्यासाठी तर दुःखच, पण मरण्यासाठी सुद्धा दुःख. दुसरा एक महापुरुष काय म्हणतो ते बघा.
“There is no cure for birth and death save to enjoy the interval ” -Santayana. जन्म तर तुम्हाला घ्यावाच लागतो. त्याला काही इलाज नाही. आणि मरण हे मधला काळ आनंदाने जगण्यासाठी जपून ठेवलेले आहे. मी पण जीवनावर बरच काही लिहिले आहे. एक कविता लिहिली होती मी
जीवन एक कादंबरी आहे फरक एव्हढाच कि कादंबरीची पाने आपण पलटू शकतो जीवन रूपी कादंबरीची नव्हे.
जीवनावर मी एक हिंदी कविता केली आहे शिर्षक आहे, ” जिंदगी एक सफर है” खाली दिली. वाचा.
जिंदगी एक सफर है
आज यहां कल वहां
परसो कही और है।।
जिंदगी एक गाना है,
प्यार से गाओ
तो लगता सुहाना है।।
जिंदगी एक मिल्कीयत है
जीसका कोई मोल नही
यही इसकी खासियत है।।
माझी आणखी एक हिंदी कविता. शिर्षक आहे ” जिंदगी एक तमाशा है।”
ज़िन्दगी एक तमाशा है,
कुछ पाने की आशा है।
पर हाथ लगी,
कभी आशा कभी निराशा है।
ज़िन्दगी एक तमाशा है..
ज़िन्दगी बुलबुला ये पानी है,
पल में फटने से
जो ख़त्म हो जाए
वो इसकी कहानी है,
पहले बचपन
अंत में बुढ़ापा,
बीच में जिसके ज़वानी है
अशा अनेक कविता आहेत. यासाठी माझा हिंदी ब्लॉग “कुछ पल” ला अवश्य भेट द्यावी आणि हो वाचून प्रतिक्रिया ही द्यावी. लिंक येथे देत आहे http://www.koshtiravindra.blogspot.com
<<>>
बुद्ध, महावीर अशा काही जणांनी आपल्याला जीवन काय आहे याचा उलगडा झाला आहे असा दावा केला आहे.
LikeLike