संपतराव आपल्या सौभाग्यवतींसह आपल्या घरी निवांत बसले होते. दोन्ही आपापल्या हातातील स्मॉर्ट फोन शी चाळे करत गप्पा मारत होते.
आजच्या गप्पा दर्शन शास्रावर रंगल्या होत्या. जीवन कसे असते. माणसं कशी असतात. नातेवाईक कसे असतात. अशा विविध विषयांवर गप्पा रंगल्या होत्या. कमी बोलणारे संपतराव ही आज सौ.ना गप्पांत रंगलेले बघून खूप खुलले होते. त्यांना खुललेले बघून सौभाग्यवती आणखी जास्त खुलल्या होत्या.
अचानक सौ. म्हणाल्या, “अहो, नारळ आणि माणूस दोन्ही दर्शनी छान दिसतात नाही का?”
“हो न. ”
मी आश्चर्यचकित होऊन नाईलाजाने होकार दिला. मित्रांनो, माझ्या मते माणूस दोन वेळा असा नाईलाजाने होकार देत असतो.
एक:- जेव्हा प्रश्न विचारला गेल्यावर काही सूचत नाही तेव्हा.
दुसरा:- जेव्हा बायको समोर होकार दिल्याशिवाय गत्यंतर नसते तेव्हा.
अर्थात असे माझे दर्शनशास्र सांगते. जीवनात प्रत्येक माणसाचे आयुष्याचे अनुभव कटु अगर चांगले, आणि वेगवेगळे असतात.
“पण, नारळ जोडल्याशिवाय आणि माणूस फोडल्याशिवाय कळत नाही. बरोबर आहे कि नाही.” सौ. पुन्हा उदगारल्या.
बाप रे. अक्षरशः कोणीतरी चाबुकाने माझे अंग अंग फोडून काढत असल्याचा मला भासच काय विश्वास वाटायला लागला. अंग दुखायला लागले हो माझे. मी अंग चोरायला लागलो तशी बायको म्हणते, “अहो काय झाले तुम्हाला?”
माझी काहीच प्रतिक्रिया दिसून न आल्याने तिने खांदे धरून अर्थात माझेच 😊 गदागदा हलवून ओरडून पुन्हा तोच प्रश्न केला तेव्हा कुठे मी भानावर आलो.
“अग तू काय बोलली ते लक्षात आले का तुझ्या?” संपतरावांनी सौंना विचारले. (जसे लिहिता लिहिता भान हरपून संपतराव ऐवजी मी असे मी लिहितो तसे कथा वाचता वाचता भान हरपून संपतराव ऐवजी ही माझीच कथा मी लिहित आहे असे तुम्हाला मनोमनी वाटू नये म्हणून अधूनमधून संपतराव असे लिहावे असे मला वाटले म्हणून मी लिहिले.) असो.
“अहो, मी काय बोलणार. एका ग्रुप वर एक संदेश आला होता. आता ते समोर नारळ दिसले. आणि संदेश आठवला म्हणून तुम्हाला सांगितला.”
“बघू बरं काय संदेश आहे तो!”
तीने मोबाईल माझ्या हातात दिला. पण मला उघडता येईना.
तिने परत मोबाईल हिसकावून घेतला आणि अगंठा लावला आणि मोबाईल सुरू. अग, अंगठा लावायची काय गरज आहे. ओपनच ठेवायचे की.
“आणि तुम्ही आमच्या महिला मंडळाचे सगळे संदेश वाचत बसायला मोकळे.”
“अरे बापरे. अग मी हात सुद्धा लावणार नाही. बर ते जाऊ दे. तो संदेश वाचू दे मला.”
आणि मी बघितलं संदेश खालील प्रमाणे होता.
💕नारळ आणि माणूस
दर्शनी कितीही चांगले
असले तरीही….
नारळ फोडल्याशिवाय
आणि
माणूस जोडल्याशिवाय
कळत नाही…!!!!💕
💞शुभ सकाळ💞
🍃💐🌸💐🌸
संदेश वाचून मी डोक्याला हात लावला. अग किती छान संदेश आहे हा. आणि तू त्याची किती वाताहत केली. ”
“काय केलं बर मी. !!!!!!?????????” सौंनी पुन्हा मोबाईल घेतला आणि संदेश वाचायला लागल्या. म्हणतात न आपल्या चुका माणसाला दिसतील तो माणूस कसला!
संपतराव वैतागून उठले आणि बालकणीत गेले. दुपारच्या वेळी सोसायटी अगदी सुनसान असते. चिटपाखरूही बाहेर दिसत नाही. संपतराव मनातल्या मनात म्हणाले.
तोच आतून आवाज आला. ”
अहो ऐकलत का?” नाईलाजाने त्यांना आत जावे लागले. बायको चे येरे माझ्या मागल्या सुरूच होते.
“अहो, काय चुकले माझे. सांगा न मला.”
मी तिला ती काय बोलली ते पुन्हा बोलायला सांगितले. नंतर संदेश वाचून दाखविला.तरीही तिला लक्षात येईना. मग मी फोडून सांगितले.
अहो काही तरीच काय विचार करताय तुम्ही राव. फोडून म्हणजे शब्दांचा व्यवस्थित अर्थ समजावून सांगत होतो मी. भलताच अर्थ लावून भानगड लावू नका बिच्चाऱ्या संपतरावांच्या सुखी संसारात.
(01921835)
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसाची निवड चुकली की आयुष्य बिघडते…
शुभ सकाळ🙏🙏🙏
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
http://www.manachyakavita.wordpress.com
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐