आंबा….

फळांचा राजा आंबा. त्याला चाखल्यावरच कळत फळांचा राजा का म्हणतात ते. तो सर्व फळांचा राजा असला तरी त्याच्यात वेगवेगळ्या जाती आहेत.

गरिबात गरिब आंबा म्हणजे तो अगदी लहान असतो. रस जवळजवळ नसतोच. पण गोड. गरिबाला परवडणारा. आणि श्रीमंतांना परवडणारा म्हणजे देवगड हापूस. सर्वात महागडा. हा आंब्याचा राजा.

हापूस मधे ही रत्नागिरी, कर्नाटकी हापूस असे काही प्रकार असतात.

पण आपल्याला त्याचे काय आंबा गोड आणि स्वादिष्ट लागला म्हणजे झालं.

माझा हे शीत पेय आंब्याच्या रसापासून तयार केलेले. प्रवासात सोबत घेतले की काही खायची गरज वाटत नाही.

मस्त

मिसळ….

आपण जन्माला येतो तेव्हा निर्विकार असतो. कसलाही मोह नाही. फक्त आईच दुध पिणे आणि झोपने हे एकच काम असतं. नाही मिळाल तर रडणे.

हळु हळु आपल विश्व वाढत जात. पहिल्यांदा आईला ओळखतो. मग घरातील इतर मंडळी. थोड्या दिवसांनी बाहेर घेऊन जातात. तेव्हा विश्वाच वलय वाढत जात. जस जसे मोठे होतो आणखी मंडळी आपल्या विश्वात जुळत जातात.

पण आणखी एक गोष्ट आपण विसरतो. ती म्हणजे आपली विचार करण्याची क्षमता. आपल विश्व जस वाढत जात तस आपली बौद्धिक पातळी ही वाढत जाते. वेगवेगळे विषय डोक्यात शिरतात.

आणखी मोठे झालो कि शाळा सुरू होते. नवीन मित्र त्या वलयात शामिल होतात. विषय वाढतात.

जसजस वय वाढत त्या प्रमाणे बौद्धिक क्षमता वाढत जाते आणि डोक्यात अनेक विषय साठले जातात.

शिक्षण संपले कि नोकरी आणि नंतर लग्न. आता तर जिव्हाळ्याची मानस त्या वलयात शामिल होतात. एक नवीन विश्वात आपण पदार्पण करतो. नवनवीन विषय डोक्यात घर करु पाहतात.

मग मुलं, नंतर त्यांची लग्न, मग नातवंड. एव्हाना आपण म्हातारी झालेली असतो.

येथे येईपर्यंत डोक्यात अक्षरशः विचारांची मिसळ झालेली असते. तरुण असतांना या मिसळीतून बरोबर गरजेचा विषय बाहेर येतो. पण वय झाले कि त्या मिसळीतून गरजेप्रमाणे विषय काही केल्या बाहेर येत नाही. कारण डोक्यातील हार्ड डिस्क फिरुन फिरुन घासुन गेलेली असते. डिस्क वरचे वलय घासलेले असतात आणि रिडर पिन सुद्धा घासलेली असते.

अस म्हणणे वावगे ठरणार नाही कि ती मिसळ नासुन गेलेली असते.

आणि एके दिवशी ती हार्ड डिस्क व संपूर्ण हार्डवेयर च करप्ट होते तेव्हा जगाला राम राम म्हणणे भाग पडते.

राम राम.

हे माझे विचार कसे वाटले? आपल्या टिप्पणी च्या प्रतिक्षेत!!!

आणि त्याच बरोबर जाणवायला लागतो बौद्धिक क्षमतेचा र्हास.

जन्मापासून म्हातारपणा पर्यंत असंख्य विषय डोक्यात शिरत असतात. एकदा का बुद्धी ची क्षमता कमी व्हायला लागली की एक एक विषय कायमचा डाऊनलोड व्हायला लागतो.

माझ्या खालील ब्लॉग ला ही भेट द्यावी.

http://www.rnk1.wordpress.com

http://www.ravindra1659.wordpress.com

http://www.manachyakavita.wordpress.com

http://www.koshtiravindra.blogspot.com

चिवचिवाट 

चिमण्या शोधून सापडत नाहीत. चिवचिवाट तर दूरच. म्हणून चिमणीच्या चिवचिवाट चा व्हिडिओ येथे पोस्ट टाकली आहे… .

https://m.youtube.com/watch?v=yraoBCl_Bco

जुगाड

अशी बुद्धि चालविण्यासाठी इंजिनिअरिग करणे आवश्यक नाही याची आता तरी खात्री वाटावी. त्यासाठी हाडाचा इंजिनिअर लागतो. याला आपल्या भाषेत जुगाड असे म्हणतात नाही का!!!

बँक व्यवहार

आता बँकेत गेल्यावर 20 वर्षापुर्वीचे दिवस आठवतातच. इंटरनेट सेवेमुळे बँकेत जायची गरज भासत नाही. बहुतेक व्यवहार घरून किंवा मोबाईल वरून करता येतात. क्वचितच गरज भासते. तेथे गेल्यावर सुद्धा टोकन घेतले की सोपे जाते. 

अमुल्यतेचे मूल्य

जेव्हा पासून जगात आय टी क्षेत्राचा जन्म झाला आहे. रुपयांचे मूल्य अधोगतीला चालले आहे. सध्या कोटी रुपये म्हणजे काहीच नाही. आजच एक बातमी वाचण्यात आली गुगल आणि याहू यांच्या चढाओढीत याहू ने बाजी मारली आणि गुगल कडील एका अधिकाऱ्याला वर्षाला चक्क ५ कोटी ८० लक्ष डॉलर पगार देऊ केला. यांचे रुपये किती हे करायच्या विचारानेच मला धडकी  भरली. आजचे एक डॉलरचे मूल्य ५२.६०  रु. असे होते. ह्या दराने ह्या माणसाचा वर्षाचा पगार काढणे अवघड वाटते. पण एक लक्ष डॉलर म्हणजे ५२.६३ लक्ष रु. ५८० लक्ष रु. म्हणजे ३०५०८ लक्ष रु. म्हणजे वर्षाचा एका माणसाचा पगार ३०५.०८ कोटी रु.  एका महिन्याचा पगार २५.४२ कोटी आणि रोजचा पगार ८४ लक्ष रु. बाप रे. मला वाटते मी हजारो वर्ष जगलो किंवा हजारो जन्म घेतले तरी इतका पगार मिळविणे मला शक्य नाही.

आजच दुसरी एक बातमी वाचली की सिटी ग्रुप ला मागील तिमाहीच्या जवळ जवळ ८८% कमी नफा  झाल्याने विक्रम पंडित यांनी राजीनामा दिला.

किती विरोधाभास वाटतो नाही ह्या दोन बातम्यांमध्ये. हे जगात काय चालले आहे? कोणी सांगेल का? कोटी पेक्षा कमीचे शब्द कोणाच्या ही तोंडून निघत नसल्याने कोटी ह्या शब्दाचे मूल्यच कमी झाले आहे.

 

संयोग …………….

सध्या आमच्या घरातील वातावरण खूप वेगळ आहे. परवा खूप आनंद होता. अगदी गदगदायला होत होत आणि दोनच दिवसांनी वातावरण तंग झालं. माफ करा पण मी काही खाजगी गोष्टी शेअर करत असतो. जे कदाचित सर्वांना आवडत नसेल. पण मला नेहमी प्रसंग जोडायची आवड आहे. असाच एक प्रसंग.

झाल अस की कन्येने पी.एच.डी. साठी पुणे विद्यापीठाची प्रवेश परीक्षा दिली होती. दोन स्तरावरील परीक्षा तीने पार केल्या. आणि आम्ही अगदी अत्यानंदाने  भारावून गेलो. पण पी.एच.डी. करता करता ३-४ वर्ष निघून जातील. फार मोठा काळ आहे हा. हे मनात आले आणि मनावरील ताण वाढला. असो आजच सायंकाळी ती विद्यापीठातून घरी आली आणि त्याच गोष्ठी सुरु होत्या. तेव्हा माझ्या मनातील पी.एच.डी. करायची सुप्त इच्छा जागृत झाली. मनात येऊन गेले की आपण एक वेगळ्या विषयावर पी.एच.डी. का करू नये? तो विषय असा की पौराणिक काळात म्हणजे रामायण महाभारताच्या काळात जी विविध प्रकारची आयुध वापरली जायची; ज्यात विमान एक होते, यांचा अभ्यास करावा. थोड्या वेळाने सौ.ने वाचनालयातून पुस्तक बदलून आणा असा आदेश फर्मावला. सौ. च्या आदेशापुढे श्रींचे कधी चालले आहे का? ( आणि मी नाही कसा म्हणणार कारण मला बाहेर पडायला कारण हवेच असते. सिगारेट ओढायला.) मी ग्रंथालयात गेलो आणि पुस्तक चाळता-चाळता माझ्या हाती एक छानस पुअस्तक लागल. शीर्षक वेगळाच होता. “देवांच्या राज्यात” लेखक “राजेंद्र खरे” मुख पृष्ठावरच लिहील आहे,” देवांच्या राज्यातून प्रवास करत आनंद मार्गी जीवनाचा वेध घेणारं अनोख पुस्तक” खरोखर अनोख पुस्तक हाती पडल होत. घरी आल्यावर थोड चाळल तर पुस्तक आणण्यापूर्वी जे विचार मनात घोळत होते अगदी त्याच विषयाच पुस्तक होत हे जाणवलं. याला संयोग म्हणायचं की आणखी काही. अस माझ्या बाबतीत नेहमीच घडत. कदाचित इतरांच्या बाबतीत ही घडत असेल.

हा माझा खूप आवडता विषय. मग मी सौ. ला बसवलं आणि आपल प्रवचन सुरु केल. काही परिच्छेद वाचून दाखविले. त्यातील एक येथे देत आहे.

“अनेक उपासक भ्रामरी,ओंकाराच अथवा मंत्रांच विशिष्ट लयीन,आघातान उच्चार करून त्या प्रांतात जाण्याचा प्रयत्न करतात.त्यामुळे मेंदू अक्षरश: charged होतो,प्रभारित होतो. संपूर्ण शरीर प्रभारित होत.वैत विचार, नकारात्मक विचार त्यामुळे दूर होतात. सातत्यान भ्रमारीचा अभ्यास केला तर एक वेळ अशी येते की उपासकाला दिव्यानुभूती मिळून जाते.” “मंत्रांच प्रतिदिन धीरगंभीर खर्ज स्वरात उच्चारण  केल तर अतिशय प्रभावी, आल्हाददायक, उत्साहवर्धक सकारात्मक कंपनं सभोबाती निर्माण होतात. घरातील वातावरण प्रसन्न बनून जात. वाईट विचार, दुष्ट लहरी नाहीशा होतात.”

याबद्दल मला माझ्या मित्राने सांगितलेला एक प्रसंग आठवला. मित्राने सांगितले की तो कोकणात नौकरीला होता. कुटुंब सोबत नव्हते. सर्व एकटेच होते. एकदा ते सर्व मित्र कोठे जंगलात गेले. फिटर असतांना त्यांच्या पैकी एक मित्र अचानक गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पण तो केव्हा गायब झाला हे समजले नाही. सर्व घाबरले आणि त्याला शोधायला लागले. लांबून त्यांना एक नाद ऐकायला येऊ लागला. हळूहळू ते त्या नादाकडे जाऊ लागले. जवळ गेल्यावर त्यांना ओंकार सुरु असल्याचे ऐकू आले. तेथे एक देऊळ होते. देऊलासामोरचे दृश्य बघून ते चकित झाले. देऊलासमोर त्यांचा मित्र बसलेला होता पण जमिनीवर नव्हे तो जमिनीपासून साधारण पाने २ फुट वर होता. म्हणजे अधांतरी. हे जवळ गेले आणि त्याची तंद्री मोडली. तसा तो जमिनीवर येऊ लागला. ह्या मंत्रात इतकी शक्ती आहे. माझे म्हणणे असे आहे की मंत्रात नव्हे तर तल्लीनतेत इतकी शक्ती आहे. तुम्ही कोणतेही काम पूर्ण आत्मीयतेने व तल्लीनतेने केले तर फळ निश्चितच चांगले मिळते.

असो विषय खूप भरकटला आहे. आणखी ही काही सांगायचे होते पण पुनः कधी तरी.

ध्वनी प्रदूषण

मित्रांनो हल्ली शहरांमध्ये जनसंख्या प्रचंड प्रमाणात वाढत चालली आहे. ज्या प्रमाणात जनसंख्या वाढत आहे त्यापेक्षा जास्त प्रमाणात वाहनांची संख्या वाढत आहे. आणि त्याचे परिणाम म्हणजे शहरातील प्रचंड प्रमाणात वाढलेले प्रदूषण. ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण. मी पुण्यात आल्यावर अनुभवले कि येथे प्रदूषण फार मोठ्या प्रमाणात आहे. रस्त्यावर पायी चाललो तर स्वस घेता येत नाही. असे वाटते घर बाहेर पडतांना तोंडाला कपडा बांधूनच बाहेर पडावे. मी तर येथे आल्यापासून अत्यावश्यक असेल तेव्हाच शहरात जातो. नाही तर घर आणि आपले कार्यालय. याच कारणामुळे मी कार्यालयापासून जास्त लांब घर घ्यायचे टाळले. आताचे घर फक्त १.५ किमी. लांब आहे. स्कुटीवर ५-६ मिनिटे लागतात. हे तर रस्त्यावरील प्रदूषणाचे बोलून झाले.

आता पुढील गोष्ट. आम्ही राहतो ते घर में रोडला लागून आहे. रोड वर इतकि वाहतूक असते कि दारे खिडक्या उघडता येत नाहीत. उघडल्या तर स्वास गुदमरतो आणि कान बहिरे होतात. काहीच ऐकायला येत नाही. मी आमच्या घरातील एक खिडकी थोडी उघडी ठेऊन बाहेरील आवाज व्हिडीओ रेकॉर्डिंग  करायचा प्रयत्न केला आहे. ते ऐकल्यावर आपल्या लक्षात येईल कि रस्त्यावरील वाहनांचा आवाज Fraction of second साठी सुद्धा बंद होत नाही. हेच नव्हे तर ह्या रेकॉर्डिंग मध्ये एक सतत येणारा आवाज आहे. तो एखाद्या कारखान्यात चालणाऱ्या भट्टी च्या आवाजासारखा वाटतो.

मी तर पुण्यात आल्या पासून नाक गळतीने पारेषण हैराण आहे. प्रदूषणाचा परिणाम दुसरे काय!