अवघा रंग एक झाला😊…

(मित्रांनो, व्हाट्सएपच्या माध्यमातून एक अक्षरशः डोळ्यात पाणी आणणारी गोष्ट प्राप्त झाली. ती जशीच्या तशी ये सादर करित आहे. लेखक अज्ञात आहे पण तो विठ्ठल स्वरूप असावा.)अवघा रंग एक झाला😊…..सावळी आज येणार नाही आजीच्या बहिणीच्या नातीने शेजारच्या गॅलरीतून ओरडून निरोप दिला,…ते ऐकून आजी अस्वस्थ झाल्या,…पडल्या पडल्या डोळ्यातून पाणी गळायला लागलं आता आपलं नॅपकिन कोण बदलणार ..?खरंतर सावळीमुळे आपण एवढं व्यवस्थित राहू शकतो आणि सावळी येणार नाही म्हणते पण का काय झालं,..? अगतिक होऊन चिडून ओरडून आजींनी विचारलं ,..त्यावर नात म्हणाली,.. “आजी कर्फ्यु लागला आहे रस्त्याने जीवावर उदार होऊन येते ती गेल्या 15 दिवसांपासून तुम्हाला काय माहिती हो बाहेर काय वातावरण आहे ते,..” .एवढं बोलून ती नात आत निघून गेली,…आजीला जाणवायला लागलं खुपच उष्ण पाणी आपल्या गालावरून ओघळतंय आपल्याला आता खरंतर मरून जावं वाटतंय,..देवा काय खेळ लावला आहेस रे ह्या जीवाचा..? लवकर सम्पव तरी अरे आमच्या सारखी मरण मागणारी माणसं सोडून तरुण लोक घेऊन चालला न्याय कुठे तुझा,…?तेवढ्यात आजीला लॅच उघडल्याचा आवाज आला,..आजी ओरडली ,..भयभीत होऊन कारण चावी फक्त सावळीकडेच असते,..आणि आताच तर निरोप असा आजी विचार करत होती तर समोर गोड हसणारी सावळी,.. आजी म्हणाली,” काय गम्मत करतेस का ग माझी म्हातारीची??”सावळी ओढणी कमरेला बांधत म्हणाली,..गम्मत केली नाही माझ्या बापाने केला होता तो फोन कारण खरंच बाहेर वातावरण खराब झालं आहे,..बाप म्हणतो लग्न आहे तुझं,…काही झालं तुला तर,..?
ऐकून आजीला हुंदकाच फुटला आणि आजी चादरीत तोंड लपवून रडू लागली,…सावळे किती करतेस ग माझ्यासाठी,…?नक्की आज पण भांडून आली असशील घरच्या लोकांसोबत,…सावळीने लगेच आजीचा हात हातात घेतला,..आजी रडू नका तुमचे खुप उपकार आहेत माझ्यावर त्यासाठी हे करणं तर काहीच नाही,..चला उठा स्वच्छ व्हा छान सावळीच्या मदतीने आजी अगदी प्रसन्न तयार होऊन मस्त बसली ,…आपल्या काळ्याभोर विठ्ठल मुर्ती समोर,…सावळीची सगळी लगबग सुरू होती,..छोट्याश्या मूर्तीला तुळशीहार तयार होता,.. त्याच्या समोर पुसून नाजुक रांगोळी रेखाटली होती,…चांदीची निरंजन चकचकीत घासुन साजुक तुपाने गच्च भरलेली शांतपणे तेवत होती ,…आजी शांत मनाने जप करत होती,..स्वयंपाक घरातुन सावळी बाहेर आली चहा घेऊन,… आजीने चहा घेताना विषय काढलाच,..”.सावळे तू नस्तीस तर काय झालं असतं ग माझ्या म्हातारीचं,…?? नुसता पैसा असुन उपयोग नसतो बघ …आयुष्यात मायेनं जवळ घेणारं लागतंच कुणीतरी,…नुसतं रक्ताच्या नात्याचं नाही ग बाई मनाच्या नात्याचं,..हो किनी ग,…जशी मला तू,…!”
सावळी म्हणाली आजी,..”.हे सगळं तुम्ही जीव लावला म्हणून आहे,..टाळी एका हाताने वाजत नाही,…आजी मला आजही आठवतं,.. एक तर पोरगी आणि त्यात काळी म्हणून बाप चिडत होता,..मारत होता,..म्हणून आई तुमच्याकडे कामाला येताना घेऊन यायची,.. तुमच्या मनाला पाझर फुटला माझं शिक्षण केलं,…आज मी चांगल्या हॉस्पिटलमध्ये नर्स आहे ती तुमच्यामुळे आणि मग माझं शिक्षण जर तुमच्या कामाला नाही आलं तर काय उपयोग हो,…मध्ये आई गेली तेंव्हा तर खरा आधार पैशानं, मनानं तुम्ही दिला मला,…आणि त्या पैश्यापेक्षा संस्काराची शिदोरी दिलीये आजी,…तुमच्याकडे असलेले सणवार,भजन,पुजा आनंद कसा मिळवावा ते शिकवून गेले,…ते सगळं मला अनुभवू दिलंत तुम्ही,…आजोबांना जाऊन वर्ष पण झालं नाही तर तुम्ही अश्या पॅरॅलीस झाल्या,… तुम्हाला मुलबाळ नसलं तरी तुम्ही मला मुली सारखंच जपलं ना,…मग माझं कर्तव्य मी करतीये आणि करणार,…होणाऱ्या नवऱ्याला पण सांगितलं आहे मी,… सकाळचे दोन तास माझे आजीसाठी आहेत खास लग्नानंतर सुद्धा,…म्हणुन सांगते आजी तुम्ही काळजी करू नका,…मी येते बरोबर कशीही,… मला माहित आहे मी गेल्यावर तुमच्या बहिणीची नात जी वर राहते ती येते तुमच्या मदतीला,… पण तुम्हाला पण मी येऊन गेल्या शिवाय करमत नाही ना,???”…दोघी हसल्या,…
हसता हसता आजीच्या डोळ्यात पाणी आलं,…आजी म्हणाली,..”सावळे तू हि विठ्ठल मुर्ती दिली आणि तेंव्हा पासुन मला तू सतत जवळ असल्यासारखं वाटतं,… तू तशी फार हुशार मी केलेल्या सगळ्या पंढरपूर वाऱ्या तुला माहीत होत्या,… पण ह्या 3 वर्षापूर्वी गुढग्यांच्या दुखण्याने मला वारीला जाता नाही आलं म्हणून मी नाराज होते तर तू चक्क हि मूर्ती आणून ठेवली माझ्या हातात,…काळीभोर आणि शांत,…
बरं आजी आता जाऊ का मी,…”आहो माझी आजीसासू सिरीयस आहे म्हणून लग्न उद्याच करायचं ठरलंय,… हे लॉकडाऊन काही उघडत नाही म्हणून घरातच करणार आहे ,…उद्या फक्त धकवून घ्या,…परवा येतेच मी आशीर्वाद द्या मला,…आजीला गहिवरून आलं,..सगळ्यांनी काळी म्हणून हिणवलेलं लेकरू,…कष्टाळू आणि प्रामाणिक होतं,… उद्या तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात होणार होती,…तिला जवळ घेत आजी म्हणाली काय देऊ ग तुला,…?तशी सावळी म्हणाली,..”.आनंदी रहाण्याचा आशीर्वाद बस बाकी काही नको,…”
आजीला तेवढ्यात काहीतरी आठवलं,…आजी म्हणाली,”सावळे तू खरेदी केली कि नाही तुला माझ्या त्या पैठणी लुगड्यासारखं लुगडं घालायचं होतं ना ,…आणि त्यावर मोत्याची नथ,…”
सावळी हसली आणि म्हणाली,”आजी हे लॉकडाऊन इतकं झटपट झालं ,…खरंतर आईने पैसे साठवून ठेवले होते मला तस पैठणी लुगडं घ्यायला पण आता राहिलं,… जाऊ द्या,… नंतर घेऊ चला येऊ मी,..?”
आजी म्हणाली,” थांब ते कपाट उघड,…ती खालच्या कप्प्यात सुती कापडाची घडी आण इकडे,…”
सावळीने पटकन ती घडी ठेवली हातात,…आजींन त्यातुन लालचुटुक पैठणी काढली,…आणि सावळीला म्हणाली,” घाल लग्नात,… आणि परवा मला आणुन दाखव कशी दिसली ते,…”
तशी सावळी म्हणाली,” आजी,… अहो मी तुमच्यासारखी पैठणी घेणार होते पण रंग हा नाही अहो माझ्या सारख्या काळीला चांगली तरी दिसेल का,..?”
आजी म्हणाली सावळे,…”अग माणसाचा कातडीचा रंग गौण असतो ग,…त्याच मन ज्या रंगाचं असतं ना,..त्यावर त्याच सौन्दर्य असतं,…. म्हणजे,…. कपटी,धूर्त,प्रेमळ,निरागस असे वेगवेगळे रंग असतात त्यावर विचार करायचा,…आणि आता मला सांग ह्या विठ्ठलाचं वस्त्र कोणत्या रंगाच आहे ग,…?”
सावळी हसुन म्हणाली ,”अगदी असंच लाल,…”
आजी लगेच म्हणाली,…मग त्याला ते वाईट दिसतंय का,???
सावळी म्हणाली,” आजी तो देव आहे,…त्याला चांगलंच दिसणार,…”
आजी हसली म्हणाली,…”सावळे देवत्व मूर्तीत नसतं असं नाही पण मूर्तीशिवाय जेंव्हा ते बघायच असतं ना तर ते,…माणसाच्या कृतीत,कष्टात,स्वभावात बघायच असतं,… आता ह्या महामारीच्या काळातच तर तू म्हंटली ना,…हे शेतकरी, पोलीस,नर्स,डॉकटर,सफाई कामगार अगदी देव बनुन पृथ्वीवर वावरत आहेत म्हणून,…”
सावळीने दोन्ही हात कोपऱ्यापासून जोडले आणि आजीला म्हणाली,”बोलण्यात मी तुम्हाला काही हरवू शकणार नाही,…द्या ते लुगडं मी परवा नेसुन आणि नवऱ्याला घेऊन येईल आशीर्वाद घ्यायला आणि सेवेला पण येईन,…जाऊ का आता,…??आजीने नथीची डबी पण ठेवली हातात,..तशी ती घाबरत म्हणाली,सोन्याची आहे आजी हि नथ मला नको,…आजी म्हणाली “घालुन परत आणुन दे मग तर झालं,…अग पैठणीवर शोभुन दिसेल,…”
सावळीचे डोळे पाणावले,…ती पटकन आजीच्या गळ्यात पडली,…आणि चटकन निरोप घेऊन निघाली,..
आजी हताशपणे पडून राहिली,…विठ्ठलाकडे पहात,…
तिसऱ्या दिवशी लालचुटूक पैठणी घालुन नवऱ्यासोबत ती आजीच्या अपार्टमेंटच्या गेटमधून आत शिरली तसं आजीच्या नातीने तिला वर ये म्हणून हाक मारली,…सावळीला खरंतर आधीआजीला भेटायचं होत पण आधी तिच्याकडे जावं लागलं,…
नातीने दरवाज्यातच तिला थांबवलं,…तोंडाला मास्क बांधूनच ती बोलत होती,..तिने सावळीला आजीच्या फ्लॅटची चावी मागितली आणि म्हणाली सावळे”,… अग परवा तू गेल्यावर काही तासात आजी गेली अग,…तू केलेलं जेवण द्यायला मी फ्लॅटमध्ये गेले तर आजी रडत होती,…मला म्हणाली,…” माझ्या सावळीच लग्न आहे,…तिला दिलेली पैठणी आणि नथ तिला माझी आठवण म्हणून सांग ,…मी जवळ बसले तर मला म्हणाली,ती विठ्ठल मूर्ती दे माझ्या जवळ,…त्या मूर्तीला कवटाळून म्हणत होती खरं सांग तूच सावळी बनून येत होतास ना,…आणि प्राण सोडले ग तिने,…
सावळी सुन्न होऊन गेली,…नवऱ्याने तिला सावरलं,…ती निघाली आणि निघताना म्हणाली त्या नातीला मला ती विठ्ठल मूर्ती देता का???नातीने लगेच फ्लॅटचे कुलूप उघडून ती मूर्ती तिच्या हातात दिली,…सावळी विठ्ठल घेऊन चालू लागली,…पण सावळीच्या मनातला प्रश्न विठ्ठल ऐकत होता,…
सावळी मनात म्हणत होती,..”आजी तुझी सेवा केली म्हणून मी तुझा विठ्ठल कि तू मला चांगलं जगणं दिलंस म्हणून तू माझा विठ्ठल,..??”माणुसकीचा हा अवघा रंग एक झालेला पाहून विठ्ठलमूर्ती हसुन म्हणत होती,… अवघा रंग एक झाला😊

(9320761)💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐www.rnk1.wordpress.com💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

माघार कोणी घ्यावी?

नेहमीप्रमाणे व घरोघरी नवरा बायको ची जशी भांडणं होतात तशीच अगदी तशीच आमच्या घरी ही होतच असतात. आम्ही काही मंगळावरून आलेलो नाही मित्रांनो. दिवसातून दोन तीनदा, नाही नाही दररोज, नाही हो दोन तीन दिवसातून छे. असा काही नियम नाही या भांडणांचा. कधीही, कोठेही, केव्हाही भांड्याला भांड न कळत आदळत असते. असेच वाद होतात, वाढतात आणि शेवटी मिटतात ही. मिटल्यावर एक दुसऱ्याला विचारतो आपला वाद कशावरून सुरू झाला होता बर? दोघांना ही माहिती नसते मुळ कारण काय होते ते. मग एक दुसऱ्याकडे बोट दाखवून तुझ्या मुळे झाला होता वाद असे पुन्हा सुरू होते. पूर्वी हे जीवनाचे अभिन्न अंग होते. आणि हळूहळू अंगवळणी पडत असे. हल्ली कसल अंग आणि अंगवळणी. असे वाद व्हायला लागल्याचे लक्षात आले कि आयुष्यात वादळ येते आणि दोघांच्या आयुष्याची शोकांतिका होते. जाऊ देत. आपल्या मुळ विषयाकडे वळू या परत.

दोघांमध्ये भांडण झाले तर माघार घ्यायची कुणी? हा फार गहन प्रश्न आहे.

काय आश्चर्य बघा राव. नेमकी याच विषयावरील एक पोस्ट मोबाईल मध्ये एका ग्रुपवर आली होती. आणि ती योग्य वेळी माझ्या समोर होती.

दोघांमध्ये भांडण झाले तर माघार घ्यायची कुणी? ज्याचे विचार बरोबर असतात त्याने माघार घ्यावी की ज्याचे विचार चुकीचे आहेत त्याने माघार घ्यावी? स्वामी विवेकानंदाना असा प्रश्न विचारण्यात आला. स्वामी विवेकानंद म्हणाले “चूक कोण,बरोबर कोण याला अजीबात महत्व नाही.ज्याला सुखी रहायचे आहे, त्याने या भांडणातून माघार घ्यावी.
स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की,आनंद घेता येतो आणि देताही येतो. अपेक्षा, गैरसमज अहंकार, तुलना यामुळे आपली नाती बिघडू शकतात. असे होऊ नये म्हणून, विसरा अन् माफ करा हे तत्त्व केव्हाही चांगल.”

किती छान पोस्ट होती ती. लहानशी पण अर्थपूर्ण. माघार कोणी घ्यावी? अर्थात ज्याला सुखी राहायचे आहे त्याने माघार घ्यावी. किती छान संदेश आहे हा. पण याचे जास्त विश्लेषण केले तर असे लक्षात येईल कि घरोघरी भांडण झाल्यावर माघार नवर्याने का घ्यावी ? त्याला एकट्याला सुखी राहायचे असते का?

पत्नीला सुखी राहायचे नसते का? जर असते तर मग ती असा विचार करून माघार का बर घेत नाही? पुरुष बिचारा मनात म्हणतो, मी माघार घेतली नाही तर उद्या बायको मला घरात घेणार नाही. किंवा दार उघडणार नाही. म्हणून विसरा आणि माफ करा हे तत्व तो अवलंबितो.

कदाचित पत्नी ही असाच विचार करत असावी. ती ही म्हणत असेल मनात कि मी माघार का घ्यावी. ती माघार घेण्यास तयार होत असेल ही आणि नेमके त्याच क्षणी त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडत असतील कि “बर माझेच चुकले!” आणि विषय संपला असे त्याला वाटते.

आणि नेमके उलटे होते. त्याला काही कळायच्या आणि बाईसाहेब, “तुम्ही माझेच चुकले असे का म्हणालात? तुम्हाला काय म्हणायचे आहे मी चुकले पण क्षमा तुम्ही मागताय.”

तीचा सुर पाहून तो दचकला आणि म्हणाला, “हे बघ प्रिये, वर स्वामीजी काय म्हणत आहेत चूक कोण,बरोबर कोण याला अजीबात महत्व नाही.ज्याला सुखी रहायचे आहे, त्याने या भांडणातून माघार घ्यावी. बरोबर आहे कि नाही.

बरोबर आहे.

मग उगाच एक दुसऱ्या च्या चुका काढण्यापेक्षा मला एक मार्ग सूचत आहे. आपण त्याप्रमाणे करू या. चालेल?”

“बर ठिक आहे.”

“आपण अस करू, दोघे ही एकत्र म्हणू माझेच चुकले.”

स्वारी जाम खुश. “हो हो. चालेल.”

आम्ही ही जाम खुश झालो.

(8820756)
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

माणसाचे अनुभव आणि कर्म हे दोन गुरू आहेत
कर्म लढायला शिकवतात तर अनुभव जिंकायला शिकवतात

🌷🙏शुभ सकाळ🙏🌷

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.manachyakavita.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

सुंदर जग हे…

जगात प्रत्येक गोष्ट सुंदर आहे…
मात्र ती तुमच्या विचारांवर आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर
अवलंबून आहे…. शुभ सकाळ👍👍

हा संदेश व्हाट्सएपच्या माध्यमातून (नाही तरी सध्या हा एकच माध्यम आहे संदेशवहन करण्यासाठी) आला आणि मनाला जरा आधार (सध्या ह्या व्हर्च्युअल आधाराचे महत्त्व खूप वाढले आहे. माणसाला आता हा एकमेव आधार राहिला आहे) मिळाला. हा संदेश परत परत वाचून मनाला उभारी देत होतो. तितक्यात अर्धांगिनी शेजारी येऊन बसली.

“लक्ष संदेशावर होते म्हणून समजले नाही कोण आलय ते.” मी म्हणालो. (नाही तरी घरात दोघेच असल्याने येऊन येऊन कोण येणार होतं)

पण तीने संदेश वाचला होता.

ती म्हणाली, “अहो, माझं ही हेच म्हणणं आहे तुम्हाला. जग खूप सुंदर आहे. प्रत्येक गोष्ट सुंदर आहे. फक्त तुम्हाला आपला दृष्टिकोन बदलायची आवश्यकता आहे.” असे बोलत असतांना ती आपला पदर ठिक करून माझे लक्ष तिच्या कडे वेधून घेण्याचा प्रयत्न करित असल्याचे माझ्या लक्षात आले. जणू ती खूप सुंदर आहे असे सांगण्याचा प्रयत्न होता तिचा.

“हे बघा ही साडी किती सुंदर आहे न! त्यावरील ही फुलं बघा हो किती सुंदर दिसत आहेत” मी आपला हुं हुं करत होतो.

तिने पुन्हा सुरू केले “अहो मला कशी दिसतेय ही साडी?”. मी काहीच प्रतिसाद न दिल्याने तिने पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहिला, “अहो, मी कशी दिसतेय या साडीत??” आता मात्र मला प्रत्युत्तर देणे भाग होते. नाही तर सांगता येत नाही काय झाले असते. “अग, खूप छान आहे ही साडी. कधी घेतली होती आपण? मला आठवत नाही म्हणून विचारले बस?”. मी सहज विचारले. “आपण? किती साड्या घेतल्या आहेत हो तुम्ही माझ्या साठी आतापर्यंत. आणि हो एखाद्या विषयाची वाट लावण्यासाठी मुळ विषयाला वेगळी वाट करून देण्यात हातखंड आहे तुमचा. याबाबतीत कोणीही तुमचा हात धरु शकणार नाही बर. प्राविण्य मिळविले आहे आपण याविषयात नाही का?” ती अक्षरशः डाफरलीच. मोठ्या तावातावाने ती बोलली. “अग, तसं नाही काही. मला खरचं आठवत नाही म्हणून म्हणालो मी! आणि ते तू काय म्हणालीस विषय…” “अहो, मी सुंदरतेचा विषय करत होते. तुम्ही साडी कधी घेतली असा विषय करून मुळ विषयाची वाट नाही का लावली.” “सॉरी सॉरी बर का. माझ्या मनात असे काही नव्हते. असो तर तू सुंदर आहेच मुळात.”

“पण तुम्हाला मी कधी सुंदर दिसलेच नाही. सर्व जग म्हणतं कि मी किती सुंदर आहे. सिनेमात जावे म्हणून. पण माझा नवरा कधीच मला सुंदर म्हणत नाही. जाऊ द्या. नाही तरी जगात कोणत्या पुरुषाला आपली पत्नी सुंदर वाटते.”

“अग, पण मी कधी म्हणालो आणि कोणाला म्हणालो कि माझी बायको कुरुप आहे. मला अभिमान आहे कि तू माझी पत्नी आहे. परवा काय झाले बघ. आपण नाही का बाजारात गेलो होतो.”

“हो हो. गेलो होतो. मग काय त्याचं??” मी,” काय झाले? काल मला कॉलेजचा एक वर्गमित्र भेटला. चहा पीत असतांना तो म्हणाला कि परवा तुझ्या बरोबर कोण बाई होती बाजारात?” “अरे तुझी वहिनी आहे ती!” मी म्हणालो. ओ तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून मी नर्व्हस झालो. तर तो नाराजीने म्हणाला “यार जास्त विचार करू नको. होते असे प्रत्येकाला अप्सरा मिळत नसते.” मी पण “चलता है यार!” असे म्हटले. तो पुढे म्हणाला “यार तू आपल्या कॉलेज मधील हिरो होतास. सर्वात सुंदर. किती मुली तुझ्या मैत्री साठी आसुसलेल्या असायच्या.” मी म्हटले, “जाऊ दे रे. कोण म्हणतं माझी बायको सुंदर नाही.” तो, “तसे नाही रे पण …..” “गप्प बस मित्रा. मला आता हा माझ्या बायकोचा अपमान सहन होत नाही.” आणि मी त्याला हाकलून दिले. तूच सांग बर माझे काही चुकले का यात. ती लगेच खुश. “तुम्ही खर बोलत आहात न!” “अग तुझी शप्पथ.” आणि ती “मला क्षमा करणार न तुम्ही. उगीच मी तुमच्या वर शंका घेत होते. अहो पण तुमचे खरच माझ्यावर प्रेम आहे का?” मी आपलं फुगलो आणि फिल्मी स्टाईल मधे म्हणालो, “तेरे लिए तो मै आसमान से तारे भी तोडकर ला सकता हुँ.” “बर बर. ते तारे तोडायचे राहू द्या. आणि प्रेमाची परिक्षा द्या आता.” मी, “म्हणजे काय करावे आम्ही?” “महाराज आम्ही थकलो आहोत काम करून. लॉकडाऊन मुळे तुम्ही घरात बसून थकला असणार. व्यायाम पण नाही. सकाळची सैर पण सैरभैर झाली. मग थोड उभे राहा, चालत चालत किचनमध्ये जा परत या परत जा. तितकेच वाकिंग होईल. आणि नुसतेच वाकिंग करून काय होणार. दोन कप चहा केला तर थकवा निघून जाईल आमचा.” आम्ही आ वासून बघतच राहिलो महाराणींकडे. “अहो पण दोन कप चहा पिणार आपण. पित्त वाढेल आपले.” मी पण महाराजांच्या आविर्भावात उत्तरलो. “महाराज आम्ही एकटीने चहा पीणे शोभून दिसत नाही. आपण ही घ्या आमच्या सोबत चहा.” महाराणी उत्तरल्या. आता काय करणार स्वारी(अर्थात मी हो ) आपल्याच जाळ्यात अडकली होती. गुपचूप जाऊन चहा करून आणला.

(ही एक काल्पनिक कथा आहे. या लॉकडाऊन च्या काळात नवविवाहित पण साधारण दोन वर्षे लग्नाला झालेल्या व घरात कंटाळलेल्या जोडप्याची ही काल्पनिक कथा. टाईमपास कसा करावा. बस. इतकेच. )

(8520753)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात… त्यांना तोडण हा क्षणाचा खेळ असतो तीच माणस जोडणं हा मात्र आयुष्याचा मेळ असतो…! 🌹🌹🌹 सुप्रभात🌹🌹🌹. 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐www.koshtirn.wordpress.com. 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

सुंदर शब्द…

संपतराव आपल्या पत्नीवर ओरडले होते. त्यामुळे त्या रूसून होत्या व मोबाईल विनाकारण चाळत होत्या . कोपऱ्यात जाऊन बसल्या नव्हत्या त्या इतर बायकांसारख्या (म्हणून मी फक्त रूसून होत्या असे लिहिले आहे). (नाही तर त्यांच्या हाती यावेळी मोबाईल ऐवजी लाटने दिसले असते.😊) तिची हिच विशेष बाब संपतरावांना मनापासून आवडते (लाटण्याची नाही हो फक्त रूसून असण्याची बसण्याची नव्हे, काय राव परत परत तेच तेच सांगावे लागतेय मला) आणि यामुळेच ते प्रत्येक वेळा स्वतः पुढे होऊन त्यांचा रूसवा काढण्यासाठी जवळ जातात.

पण आज उलटेच झाले. सौ. समोरून आल्या. त्यांनी संपतरावांना हसवण्यासाठी प्रयत्न केला पण, हे काय? त्यांचा तो प्रयत्न फसला. इतकेच नव्हे तर चांगलाच अंगलट ही आला. झाले असे कि गंमत केली कि ते हसतील असे त्यांना वाटले. म्हणून त्यांनी व्हाट्सएपवर आलेला खालील संदेश संपतरावांना वाचून दाखविला.

शरीर सुंदर असो किंवा नसो
पण शब्द सुंदर असले पाहीजेत
कारण लोक चेहरा विसरतात
शब्द नाही.

💞 शुभ सकाळ 💞

संपतरावच ते. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता उलट विचारले, “काय तुम्हाला काय म्हणायचे आहे कि ‘तुम्ही सुंदर नाहीत'”. आणि हे ऐकून सौं.चा चेहरा बघण्यासारखा झाला. “अहो काय बोलताय तुम्ही?”

“मी कुठे काय बोलतोय. तुम्हीच तर म्हणालात.”

“जा बुआ. तुम्ही प्रत्येक वेळी थट्टा करून वेळ मारून नेतात.”

“बर बर. तुमच म्हणणं नेमकं काय आहे? ते तरी कळू द्या आम्हाला. तुम्ही सुंदर आहात न!!” सौ. लाजल्या.

“अहो, हे म्हातारपणी काय….”

“सॉरी बर का!! पण तुमचे शरीर आणि शब्द दोन्ही सुंदर आहेत बर का?”

“तेच म्हणत होते मी. माझे आहेत हो पण तुमचे नाहीत न. म्हणून तर तो संदेश दाखवित होते मी.”

“मी काय केले??”

“आताच माझ्यावर खेकसला होता. विसरले सुद्धा इतक्या लवकर!!”

“पुन्हा एकदा सॉरी म्हणतो. झालं!!”

आणि दोन्ही खूप हसले. हसरी सकाळ सुरू झाली एकदाची.

(7420742)

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

जगात प्रत्येक गोष्ट सुंदर आहे…
मात्र ती तुमच्या विचारांवर आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे….

💐💐शुभ प्रभात💐💐

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

http://www.koshtirn.wordpress.com

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

देव आणि भक्त

तो रोज रोज देवाची पूजा करून देवाला प्रसन्न करायचा प्रयत्न करीत होता. अर्ध आयुष्य संपल पण काही केल्या देव प्रसन्न झाला नाही. आणि त्याची परिस्थिती काही सुधारली नाही.

एके दिवशी तो देवाच्या देवळात गेला आणि रागे रागे त्याला म्हणाला देवा मी आयुष्य भर तुझी पूजा अर्चा केली पण काय उपयोग झाला. मी आज पासून तुझी पूजा करणार नाही. इतकेच काय दर्शन सुध्दा घेणार नाही.

असे म्हणून तो रागाने देवळातून बाहेर पडला. तितक्यात देव ओरडून म्हणाला. ‘अजी रुठ कर अब कहा जाईयेगा, जहा जाईयेगा हमे पाईयेगा. त्याला देवाच्या तोंडून ते शब्द ऐकल्यावर खरे वाटते. कारण देव सर्व ठिकाणी वास करतो हे त्याला माहीत होते.

पण त्याला देवाचा राग आलेला असतो म्हणून तो म्हणतो ‘आंसू भारी है ये जीवन की राहे, कोई उनसे (म्हणजे देवाला) कह दे हमे भूल जाये.’

हत्ती आणि मुंगी

मुंगी कानात चावते आणि हत्ती मारतो असे लहान पाणी ऐकले आहे. म्हणून हत्ती मुंगीपासून वाचण्याचा अतोनात प्रयत्न करीत असतो. पण एव्हढा मोठा हत्ती तो एव्हढ्या लहानश्या मुंगीला सध्या डोळ्यांनी बघू हि शकत नाही तर तिच्या पासून वाचायचा प्रयत्न करणे विफल ठरते. कोठून तरी ती मुंगी येते आणि पटकन एक चावा घेते आणि निघून जाते.  एव्हढा मोठा विशाल शरीर असलेला हत्ती छोट्याश्या मुंगी समोर  हतबल ठरतो. त्याला काहीच करता येत नाही. तो देवाला कोसतो. देवा तू मला येव्हढे मोठे शरीर दिले काय उपयोग. सर्व मला घाबरतात माझे मोठे शरीर बघून पण मी इतक्या लहान मुंगीला घाबरतो. देवा माझे जीवन निरर्थक आहे.

पण असे हातावर हात धरून बसून काहीच उपयोग नाही. काही तरी उपाय शोधायला हवा. हत्ती खूप विचार करतो. विचार करता करता तो चालत असतो जंगला तून आणि त्याच्या अंगावर मुंग्या पडत असतात. त्यांच्या पासून तो बचाव करत करत विचार करत असतो आणि समोर त्याला वाळवंट दिसते. तो विचार करतो ह्या मुन्ग्यांपासून वाचायचे असेल तर ह्या वाळवंटाचा सहारा घेणेच योग्य. कारण तेथे अति उष्णतेने मुंगी जगू शकणार नाही. आणि तो वाळवंटाचा सहारा घेतो. आता त्याला थोडा  दिलासा मिळतो. म्हणून तो अत्यानंदाने चालत राहतो. चालता चालता तो बराच लांब निघून जातो. त्याला तहान लागते. जवळपास कोठेच त्याला पाणी दिसत नाही. मागे पाहतो तर जंगल हि दिसत नाही.  शेवटी पाणी पाणी करत तो हत्ती मरून जातो. मरता मरता तो म्हणतो देवा अशा मरण पेक्षा मुंगीने चावा घेऊन आलेल मरण बर.

परिकल्पना (शेवट)

समीर त्यांची आतुरता परमोच्च बिंदुला भिडण्याची व त्याच्या तोंडून विचारणा होण्याची आतुरतेने वात बघत होता. ऐकून म्हणाजे दोघी बाजूने आतुरता वाढत चालली होती. समीर ने तिच्या प्रश्न कडे दुर्लक्ष केले व आपल्या कामाला लागला. इतक्यात तो ससा उडत येऊन तिच्या जवळ टेबल वर येऊन बसला. ते बघून समीर त्या सस्याला म्हणाला,”अरे रघु घाबरू नकोस ती माझी प्रिय वहिणी आहे हा जो तिच्या शेजारी बसला आहे न अनोळखी प्राणी तो तिचा नवरा व माझा जिवलग मित्र आहे. जा त्या वहिणी जवळ जा तिच्या मांडीवर खेळ खूप मायाळू आहे रे ती.” समीरचे बोलणे ऐकून तो पंख असलेला ससा तिच्या जवळ सरकला व चाचपत चाचपत हळू वर पाने तिच्या मांडीवर चढला. तिला इतका आनंद झाला कि तो तिच्या पोटात छातीत आणखी काय म्हणतात तिच्या सर्वांगत दाटून बाहेर यायला करीत होता. ती अत्यानंदित झाली होती. तिने त्या सश्याला हात लावायचा प्रयत्न केला थोड्या  प्रतिकारानंतर ससा तयार झाला व तिला हात लावू दिला. आता तिने त्या सश्याला हातात घेतले होते व त्याला हात लावून लावून ती त्याचे पंख बघत होती. त्या सश्याचे पंख हि एक कौतुकास्पद गोष्ट होती तिच्या साठी. त्याला मनापासून तो ससा बघावासा वाटत होता पण त्याचा ते काय म्हणतात न तो जमीर आपला अहंकार हो तो बोलू देत नव्हता. समीर तिरक्या नजरेने त्याच्या चेहऱ्यावरील हाव भाव वाचायचा प्रयत्न करीत होता. शेवटी त्याने आपले तोंड उघडले आणि त्याला डायरेक्ट प्रश्न केला ” समीर मित्र हे काय आहे? आणि हे तू केले आहेस?” समीर ह्याच क्षणाच्या प्रतीक्षेत होता. त्याच्या तोंडून हे प्रश्न ऐकून समीरच्या चेहऱ्यावर गौरव साफ दिसून येत होता. त्याचीकॉलर ताठ झाली होती. नाही तो स्वतःला त्याच्या पेक्षा श्रेष्ठ आहे असे समजत नव्हता पण आपल्या जिवलग मित्राने आपले कौतुक केले याचा त्याला अभिमान वाटत होता.आता समीरने उठून त्याला मिठी मारली व तो अक्षरशः रडू लागला. समीर म्हणाला, ” मित्र मी तुझ्या तोंडून माझे कौतुक ऐकून घेण्यासाठी किती वर्षापासून वाट पाहत होतो. आज तू ते केले आणि मी धन्य झालो.  मला जितका आनंद ह्या प्रयोगात मिळालेल्या यशाने झाला होता त्यापेक्षा किती तरी पतीने आज आनंद होत आहे.” समीर चे उदगार ऐकून तो आश्चाया चकित झाला होता व आपली चूक त्याच्या लक्षात येत होती. त्याला स्वतः वरच राग येत होता. तो समीरला म्हणाला “मित्र मला माफ  कर माझे चुकलेच.” समीरने त्याला आणखीनच जवळ ओढले आणि त्यांची ती मगरमिठी सैल झाल्यावर ते दोघे खाली बसले.

मग समीरने सांगायला सुरुवात केली.

“मला एके दिवशी अचानक अशी कल्पना सुचली कि पक्षी आकाशात उडतात तसे   आपण सुद्धा उडून पाहावे. पण ते इतके सोपे नव्हते. मग सश्यावर प्रयोग करायचे ठरविले. त्यासाठी प्रथम एका पक्ष्याच्या शरीराचा अभ्यास केला. त्याला पंख का फुटतात हे शोधून काढले. आणि मग सश्याच्या शरीरामध्ये पक्षाच्या शरीरात पंख फुटण्यासाठी जे आवश्यक असते ते केले. हा जो ससा आहे न ह्याला जन्म पूर्वीच आवश्यक घटक त्याच्या दिले. जन्म झाल्यावर याला पंख फुटले. हा माझा लाडका आहे.”
“ह्या नंतर मी एकदा “पा” नावाचा सिनेमा पहिला होता त्यावर विचार केला आणि आपणच माणसाला लवकर मोठे केले तर. असा विचार माझ्या मनात आला आणि त्यावर मी प्रयोग करून पाहिला तो यशस्वी सुद्धा झाला.” ती,” भाऊजी, तुम्ही आम्हाला ते दाखवाल का?”
समीर,”हो चला माझ्या बरोबर.” आणि ते तिघे सोबत निघाले. एका लेब मध्ये पोहोचल्यावर समीरने त्यांना कुत्र्याचे एक लहानसे पिल्लू दाखविले. हे दोन दिवसापूर्वीच जन्मलेले आहे. ह्याच्यावर मी तो प्रयोग करून दाखवितो.” समीरने आपल्या सहाय्यकाला निर्धारित सूचना केल्या. त्याने त्या कुत्र्याला विशिष्ठ वातावरणात व विशिष्ठ तापमानात ठराविक इंजेक्शन दिले.
समीर ह्या दोघांना म्हणाला,”आता मी तुम्हाला दोन दिवसांनी येथे घेऊन येईल. त्यावेळी तुम्ही हेच पिल्लू केव्हडे झाले आहे ते पहाल.”

आता त्याच्या डोक्यात थोडा थोडा प्रकाश पडत होता.
तो समीरला म्हणाला.” समीर तू आम्हाला हे सर्व दाखवितो आहेस पण ह्या मागे तुझा काही उद्देश तर नाही ना.”
समीर म्हणाला, ” उद्देश काय असेल.”
तो  “मग तू आम्ही आमच्या बाळाचा  प्रश्न केल्यावर आम्हाला येथे का घेऊन आलास.”
तो पुन्हा म्हणाला,” अरे बाबा आम्हाला असा कोणताही प्रयोग आमच्या बाळावर करून घ्यायचा नाही बर का? ती कल्पना डोक्यातून काढून टाक बर.”
आणि त्याने तडक तेथून काढता पाय घेतला. त्याच्या पाठोपाठ ती सुद्धा बाहेर.

परिकल्पना भाग-४

समीर चा प्रस्ताव त्या दोघांनी मान्य केला व तिघे सामिरच्याच गाडीने बाहेर  पडले. रस्त्यात समीरचे विश्व म्हणजे त्याची लेब लागली. त्यावेळी समीर काहीच बोलला नाही. तो व ती सुद्धा काहीच बोलले नाहीत. तोढे पुढे गेल्यावर समीर म्हणाला,”अरे यार, मला ऑफिसमध्ये एक फारच महत्वाच्या कागदांवर सह्या करायच्या राहून गेल्या आहेत. “जरा फक्त पाच मिनिटांसाठी आपण माझ्या लेब मध्ये गेलो तर चालेल का?” असा प्रश्न समीर ने त्या दोघांना केला आणि तो त्यांच्या चेहऱ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागला. ना इलाजास्तव त्यांनी होकारार्थी मान हलविली व समीरने आपली गाडी पुढील चौफुलीवर पलटविली. गेट उघडले आणि थोड्या वेळातच त्यांची गाडी समीरच्या विश्वात शिरली. आज प्रथमच ती दोघे समीरच्या ह्या विश्वात शिरली होती. म्हणून त्यांना अवघडल्या सारखे होत होते. शेवटी समीरने बोलायला सुरुवात केली. “मला माहित आहे तुम्हाला अवघडत असेल. तुम्हाला आवडत नाही अशा टिकाणी मी आज घेऊन आलो आहे. मला माफ कराल अशी अपेक्षा मी बाळगून आहे.” आणि ती दोघे समीरच्या पाथोपात चालत राहिली. समीर त्यांना आपल्या दालनात घेऊन चला होता. त्याच्या दल्नाजावला पोहोचल्यावर समीरच्या माणसाने साहेबांना नास्कर केला व दार उघडले. समीर आत शिरण्यापूर्वी त्याने त्या दोघांना आत चला म्हणून इशारा केला. ते दोघे आत शिरली. त्यांच्या मागे समीर सुद्धा शिरला. सहज म्हणून त्या दोघांनी इकडे तिकडे पाहायला सुरुवात केली. आणि त्यांच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही. त्यांनी एक असे दृश्य बघितले होते जे अशक्य होते. समीरच्या दालनामध्ये एक ससा चक्क पंख असलेला ससा त्या दोघांनी पहिला होता. त्यांनी तोंडात बोटे घातली. ना इअलजस्तव जसे ते दोघे समीरच्या लेब मध्ये शिरले होते तसेच न इलाजास्तव त्या दोघांना समीरला प्रश्न विचारणे भाग पडत होते. त्यांनी समीरला प्रश्न टाकला,”समीर, अरे हा कोणत्या प्रकारचा ससा आहे?” ती सुद्धा म्हणाली”अहो भाऊजी, हा ससा कोणत्या देशातील आहे हो.?” समीर ह्याच प्रश्नाच्या प्रतीक्षेत होता. त्याचा त्या दोघांना येथे आणण्याचा प्रयत्न सफल झाला होता. आता समीर म्हणाला,” अहो वहिणी हा ससा आपल्याच देशातील आहे. फक्त यावर मी काही प्रयोग केले आहेत.” ती, “भाऊजी मला सांगा हो काय केले आहे तुम्ही?” ती समीरच्या तोंडून त्या सश्या बद्दल एकूण घ्यायला आतुर झालीहोती. तो सुद्धा आतून आतुर झाला होता पण कोणत्या तोंडाने बोलावे हेच त्याला काळात नव्हते. तो समीरला उगाच काही तरी उटपटांग गोष्टी करीत असतो असा समजून होता.

[ 😦 ]

परिकल्पना भाग -३

समीरने ससा या प्राण्यावर एक प्रयोग केला होता. त्याने सश्याचे  एक नुकतेच जन्माला आलेले पिल्लू घेतले. त्याला त्याने विशिष्ट प्रकारचे एक इंजेक्शन दिले आणि त्याला विशिष्ट वातावरणात ठेवले. बरोबर ४८ तासांनी  आपल्या सर्व सहपाठ्यांना सोबत घेऊन त्या सस्याला पाहण्यासाठी त्यांनी प्रयोगशाळेची ती खास रूम उघडली. या क्षणाची तो व त्याचे सर्व सहपाठी आतुरतेने वाट पाहत होते. आणि तो क्षण आता जवळ म्हणजे काही क्षणांवर येऊन ठेपला होता. प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके जोरजोरात पडत होते.
सर्वांनी समीरला आग्रह केला की त्यानेच रिमोटचे बटन दाबून त्या रूमचे द्वार उघडले. आणि दार उघडता बरोबर तेथे असलेल्या काचाच्या भिंतीवर एक भला मोठा ससा धडक मारून बाहेर पडायचा प्रयत्न करू पाहत होता. त्याला बघून समीरने पालटून आपल्या सहकार्यांकडे पहिले आणि सर्वांनी आनंदाने उद्या मारल्या. सर्वांनी युरेका  म्हणून जोराने ओरड केली. मग समीर व इतर दोघे आत गेले आणि त्या सश्याला बाहेर घेऊन आले. मग त्याच्या विविध तपासण्याकरून पहिले असता तो ससा एक वर्षाने वाढला होता. त्याचा मेंदू सुद्धा एक वर्षाच्या सश्या एवढा वाढला होता. त्याला बघून असे वाटत नव्हते की हा एक नवजात ससा आहे. हि गोष्ठ कोणाकडे ही बोलून दाखवायची  नाही अशी ताकीद समीरने सर्वांना  दिली होती. त्याने यावर एक पेपर तयार करून सादर केला ही होता. त्याची मंजुरी लवकरच अपेक्षित होती. असा हा जगविख्यात समीर नावाचा प्राणी त्याचा (म्हणजे कथानकातील तो याचा) मित्र होता. आज समीर ह्या विशिष्ट आणि जीवनातील अशक्य अशी गोष्ठ शेअर करण्यासाठी त्याच्या कडे आला होता.पण एक विशेष बाब मी येथे आपल्या नजरेस आणून देऊ इच्छितो कि ते दोघे आप आपल्या फिल्ड बद्दल कधीच एक दुसऱ्याशी चर्चा करीत नाहीत. कारण एकच की समीर ला त्याच्या फिल्डची आवड नाही व त्याला समीरच्या फिल्डची आवड नाही. परंतु तरी ही ते दोघे जिवलग मित्र आहेत हे विशेष. आज समीरच्या समोर त्याच्या जिवलग मित्राच्या त्रासाचा विषय निघाला आणि त्याला ह्या त्रासातून कशी सुटका करून देता येईल ह्याचा विचार समीर करू लागला. त्याला प्रथम आपल्या प्रयोगाचा उपयोग करावा असा विचार मनात आला पण  मन मारून तो गप्पा बसला. कारण हेच की त्याला समीरच्या ते प्रयोग व इतर गोष्ठीत रस नव्हता. पण मग काय करावे याचा विचार करता करता तो अचानक समीरला म्हणाला तुम्ही दोघे माझ्या बरोबर फिरायला येणार का? आपण बाहेर जाऊ जेवण करू थोडे फिरू तितक्यात मनात काही तरी मार्ग सुचेल. येथे समीरचा प्रयत्न असा होता की त्या दोघींना फिरायला घेऊन जायचे आणि शक्य झालेच तर काही तरी बहाणा करून आपल्या लेब मध्ये न्यायचे. तेथे त्या दोघींना आपले विश्व दाखवायचे.

क्रमशः (मित्रांनो माफ करा पण हल्ली का कुणास ठाऊक फार नैराश्य आले आहे. आज मोठ्या मुश्किलीने ही पोस्त टाकत आहे.)

परिकल्पना भाग-२

परिकल्पना च्या पुढे

समीरचे शब्द ऐकून ती भानावर आली आणि म्हणाली,”काही नाही हो भाउजी सहज जरा!”
समीर,”अस कस काय वहिणी. सहजच कोणी अस उदास बसतो का? आपला जिवलग मित्र घरी आला आहे तरी ही जर मित्र बोलत नसेल तर याचा अर्थ असा होतो की काही तरी गूढ  आहे. आता तुम्ही मला सांगणार आहात का? का मी जाऊ.”
ती,”काय रे सांगू का भाऊजींना?”
तिने त्याच्या कडे प्रश्नार्थक नजरेने  पाहिले आणि त्याने नजरेनेच होकार दिला. नंतर तिने सांगायला सुरुवात केली.
“हे बघा भाऊजी तुमचे अजून लग्न झालेले नाही त्यामुळे  संसार बद्दल तुम्हाला काही गोष्ठी माहित नाहीत. पण तुम्ही आता बघा मी तीन महिन्यापासून घरी आहे. पुढील महिन्यात मला कोणत्याही परिस्थितीत  कामावर जावे लागणार आहे. तेव्हा बाळाला कोठे व कोणाच्या भरवश्यावर ठेवायचे हा प्रश्न मला व आम्हा दोघांना सतावत आहे. आता तुम्ही यावर काही तरी उपाय सुचवा म्हणजे आम्ही निवांत होऊ.”
समीर हा एक जगप्रसिद्ध वैज्ञानिक आहे ज्याने ४० वर्षाचा झाला तरी ही लग्न केलेले नव्हते. तो कायम म्हणत असतो कि माझे अजून लग्न करायचे वय नाही. किंवा मनपसंद मुलगी मिळाली नाही. अशीच काही तरी कारण सांगून तो मित्र मंडळी व आई-वडिलांनी लग्नाचा विषय काढल्यावर सांगत असतो. आता तर सर्वांनी त्याला टोकनेच सोडून दिले आहे. असा हा समीर एक जगप्रसिद्ध वैज्ञानिक. सतत आपल्या संशोधना मध्ये गुंतलेला असतो. जगात काय चालले आहे याचे त्याला भान नसते. त्याने कमी वयातच संशोधन करून जगात नाव कमाविले आहे. त्याचा आवडता विषय आहे बायो-टेक्नोलोजी आणि माइक्रो बायोलोजी. त्याची  स्वतःची एक अवाढव्य लेबोरेटारी आहे ज्यात तो व त्याचे सहपाठी सतत बायो-टेक्नोलोजी आणि माइक्रोबायोलोजीवर  संशोधन करीत असतात. नुकतेच त्याने एक विशिष्ठ प्रकारचे संशोधन केले आहे. त्याने सस्याच्या पिल्लावर एक प्रयोग केला आहे. त्यात  तो यशस्वी झाल्यावर त्याने लगेच आपला पेपर अमेरिकेला आंतरराष्ट्रीय संस्थेला सादर केला आहे. समीरने सस्याचे एक नुकतेच जन्मलेले पिल्लू घेतले होते. त्याला त्या पिल्लाला प्रकृतीच्या नियमाच्या विरुद्ध जाऊन कमीत कमी कालावधी मध्ये मोठे करायचे होते. ही कल्पना त्याला “पा”  हा  सन २००९ मधील जुना  सिनेमा पाहिल्यावर मनात आली होती. त्याने विचार केला कि प्रकृती माणसाला लहान वयात मोठे करू शकते तर मानव तसे का करू शकत नाही. पा मध्ये दाखविलेला एक आजार होता. पण तो आजार जर आजार म्हणून न धरता त्याला विज्ञानाची एक देण म्हणून बघितले तर.  त्याने आपण मानवाला कमी वयात चांगल्या प्रकारे मोठे करू शकतो ,  त्याची व्यवस्थित वाढ करू शकतो  आणि हा विचार आल्यावर तो जिद्दी ला पेटला होता. त्याने वर्ष भराच्या अथक प्रयत्नाने ते करून ही दाखविले होते. अर्थात त्याचा तो प्रयोग अद्याप जगासमोर आलेला नव्हता.

क्रमशः