मी रिटायर्ड …

मित्रांनो,

प्रत्येक व्यक्ती जो जन्माला येतो तो म्हातारपणी रिटायर म्हणजे सेवानिवृत्त होतोच. फक्त म्हातारपणाचे वय वेगवेगळे असते. मात्र सरकारी नौकरीत असलेल्यांचे सेवानिवृत्तीचे वय ठरलेले असते. स्वेच्छानिवृत्ती हा विषय वेगळा आहे.

खाजगी नौकरीवाल्यांचे सुद्धा सेवानिवृत्तीचे वय ठरलेले असतेच. इतर क्षेत्रात जसे संगीत, गायन, कला, अभिनय, राजनीती, इ. क्षेत्रात विशिष्ट असे वय ठरलेले नसते. मनुष्य थकला व त्याला स्वतःला वाटले तेव्हा तो रिटायर होतो. मी पण रिटायर्ड व आता सिनिअर सिटिजन झालोय. आमचे सेवानिवृत्तीचे वय ५८ असून आता माझी ६१ ठी सुरू झाली आहे.😆🤣😆🤣

असेच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे “अमिताभ बच्चन”

अफाट व्यक्तिमत्त्वाचा धनी असा हा मनुष्य आज सत्त्यात्तरी पार करून सुद्धा शांत बसून नाही आणि सेवानिवृत्त तर प्रश्नच उदभवत नाही. त्यांना, मला वाटते, तुम्ही सेवानिवृत्त कधी होणार असा प्रश्न कोणीही विचारायची हिम्मत करणार नाही.

मला वाटते त्यांनी मनापासून ठरवलेले आहे “मी रिटायर होणार नाही”.

आजही टिव्हीवर त्यांच्याच जाहिराती असतात.

७७ वर्षे वय असून सुद्धा तरुण वाटणारा जगातील हा एकमेव मनुष्य असावा अशी माझी आता खात्री पटत चालली आहे. आजही सहारा नाही की काठी नाही. तरूणांना लाजवेल असे एकदम ताडताड चालणे. भारदस्त आवाज. कोणालाही हेवा वाटेल असे हे व्यक्तिमत्त्व.

असो, त्यांना उद्दंड आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी मनोकामना.

(4720714)

🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔

तन स्वस्थ तर मन स्वस्थ आणि मन स्वस्थ तर सर्व सुखी

💐💐शुभ सकाळ💐💐

🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔

http://www.ravindra1659.wordpress.com

🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔

शायरी…

शेर ओ शायरी. म्हणजे शेरोशायरी.

मिर्झा गालिब महान शायर. पण ह्या शायरांनी तेव्हा कल्पना ही केली नसेल कि २१व्या शतकात राजकारणात त्यांच्या शायरीचा सुद्धा वापर होईल. मिर्झा गालिब हे मशहुर शायर इंग्रजांच्या काळातील. त्यांनी त्याकाळी केलेली शायरी आताच्या घडीला कशी काय लागू पडते ? पण पाडली जाते. आणि ती बरोबर चपखलपणे लागू ही पडते या काळातील घटनांसाठी.

आता पहा न दरवर्षी बजट सादर करतांना जे कोणी असतील ते अर्थमंत्री महोदय शायरी ने सुरुवात तरी करतात किंवा मधे एखाद्या वेळी शायरी तरी करतातच. मागे कोणीतरी “हजारों जवाबों से अच्छी है मेरी खामोशी, न जाने कितने सवालों की आबरू रखी” हा शेर म्हटला होता. आणि विशेष म्हणजे अजूनही अधूनमधून वर्तमानपत्र या विषयावर लिहित राहतात.

आता मध्यंतरी एका राजकारण्यांनी

“मेरा पानी उतरता देखकर किनारे पर घर मत बना लेना, मै समंदर हुँ लौटकर वापस आऊँगा…..” असा शेर म्हटल्याचे वर्तमान पत्रात वाचले होते.

शायरीच कशाला अहो चार शे पाचशे वर्षापूर्वीचे समर्थांचे श्लोक आजच्या परिस्थितीला लागू पडतातच की.

असे म्हणतात कि ज्ञानेश्वरी तसेच गीता हे ग्रंथ व्यवस्थापन शिकण्यासाठी उत्तम आहेत. हेच कशाला चाणक्य निती त्यानंतर शिवाजी महाराजांचा गनिमी कावा व इतर रणनीती आज ही वापरली जाते.

(19653)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आयुष्याने शिकवलेलं एक वाक्य…
“जिंकलो तर आवरायचं आणि हरलो तर सावरायचं…”
🌼🌹 शुभ सकाळ 🌹🌼

🌼🌹🌹🌼🌼🌹🌹🌼🌼🌹🌹

http://www.manachyakavita.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

विविध भावमुद्रा…

मित्रांनो, मी रिकामटेकडा म्हणून सहज संगणकावर एम.एस. पेंट वर चित्र काढत होतो. सर्कल टूल पूर्ण भरीव घेऊन काळे डोळ्यातील बुब्बुळ काढली. त्यात नंतर पाढरी ठिपकी काढली. असे डोळे व नंतर ओंठ काढले. हेच सर्कल टूल घेऊन त्यावर चेहरा काढत असताना कल्पना सुचली. सर्कलचा आकार बदलला तर चेहरामोहरा बदलू शकतो असे वाटले. म्हणून मी प्रयोग करून पहायचा असे ठरवले. आता मी सर्कल टूल धरून आकार बदलत गेलो. त्याने आश्चर्य झाला. जस जसा सर्कल चा आकार बदलत गेला चेहर्याचे हाव भाव ही बदलत गेले. बघा खालील चित्रे.

प्रथम मी १ नं.चे चित्र काढले ज्यात फक्त डोळे आणि ओंठ दिसत आहेत. तदनंतर चित्र क्र. २,३,४……९, प्रत्येक चित्रात भाव मुद्रा वेगळ्या दिसतात. कुठे समोर चालत असून मागे वळून तिरक्या नजरेने बघणारा, तर कुठे समोर उभा असतांना तिरपा पाहणारा,कुठे डोळे वटारून पाहणारा, तर कुठे मिस्कील कटाक्ष टाकणारा अशा विविध भावमुद्रा दिसून येतील.

चित्र क्र. २ :- पुढे चालत असताना मागे वळून पाहणे

चित्र क्र. ३:- पुढे चालत जाताना मागे कटाक्षाने पाहणे

चित्र क्र. ४:-पुढे चालत असताना उभे राहून आश्चर्याने मागे वळून पाहणे

चित्र क्र. ५:- पुढे चालत असताना डावीकडे वळून पुन्हा डाव्या बाजूला कटाक्षाने पाहणे

चित्र क्र. ६:- बसलेले असताना आश्चर्याने मागे नजर टाकणे

चित्र क्र. ७:- पुढे पळत जाऊन मागचा काय करतोय मागे येत आहे का हे पाहणे

चित्र क्र. ८:- समोर चालत असताना समोरच्या वस्तू कडे पाहणे

चित्र क्र. ९:- समोरच्या माणसाकडे डोळे वटारून रागारागाने पाहणे.

मी या सर्व बदलत जाणाऱ्या हावभावांचा व्हिडीओ सुद्धा काढला आहे. बरेच प्रयत्न करूनही तो अपलोड करता आला नाही.

(19646)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

ज्या दिवशी जबाबदारीच ओझ खांघांवर येत ना त्या दिवसापासून थकायचा आणि रुसायचा अधिकार संपतो….

💐शुभ सकाळ💐

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 http://www.manachyakavita.wordpress.com💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

तानसेन(19605)

अकबराच्या दरबारातील नऊ रत्नांपैकी एक रत्न तानसेन. असे म्हणतात कि तो मोठा संगितज्ञ होता. इतका मोठा होता कि तो जेव्हा मेघ मल्हार गायचा तेव्हा पाऊस पडायचा किंवा दिपक राग गायचा तर अग्नी प्रज्वलित ह्वायची.

संगीतात अफाट शक्ति आहे. असे प्रयोग केल्याचे वाचनात आले आहे कि शेतात जर रोज संगीत वाजवले तर चांगले पिक येते.

असाच एक प्रयोग एका वेड्याने केला. त्याचा व्हिडीओ सोबत देत आहे. प्रत्यक्ष दिसत असल्याने संगिताच्या शक्तीची कल्पना येईल.

एका मोठ्या प्लेट वर बाजरीचे दाने विखरून टाकले आहेत. आणि साध रिदम दिल्याने ते दाने कसे लयबद्ध रित्या रचले जातात ते बघा.

गांधी जयंती..( 21019573)

आज महात्मा गांधी यांची १५० वी जयंती आहे. संगणकावर सहज बसलो असता अचानक एम. एस. पेंट उघडले. काय करावे तर एक चित्र गांधी जयंतीनिमित्ताने व्हाट्सएपच्या ग्रुप वर आले होते. ते पाहिले आणि संगणक ावर करायचे ठरविले. बस २-३ मिनिटात रेखाटन झाले.

सुगरण….

एक लहान सा पक्षी. पण अत्यंत बुद्धिमान. आपण दुर्लक्ष करतो यांच्याकडे. पण महान कवयित्री बहिणाबाई यांनी त्यांच्यावर एक छान गाणे रचले आहे. गाणे ऐका आणि सुगरणी चे कर्तृत्व ही बघा.

लाक्षागृह!

कधी कधी आपणाला जे दिसत तस प्रत्यक्ष नसत, पण जे नसत तेच दिसत. ही जुनी म्हण आहे हे आपल्या सर्वांना माहीतच असेल. कधी कधी तर काही ही नसत पण आपल्याला सर्व काही दिसत असत. अस कधी होत जेव्हा आपल मन आपल्याला तस बघण्यासाठी भाग पाडत तेव्हा. अहो थोड कोठे पोटात दुखायला लागल की आपल्याला कधी तरी कोणी तरी एखाद्याबद्दल सांगितलेली गोष्ट लगेच ध्यानात येते. जसे त्या अमक्याला पोटात दुखत होत आणि दवाखान्यात नेल्यावर फोटो वगैरे काढून झाल्यावर डॉ. ने सांगितले होते की त्याला केंसर झाला आहे. आणि ते आठवल की मन सुरु होतात मनाचे खेळ. अहो आपल मन फारच भाबड असत. लगेच त्याच्या मागे धावत आणि मग  गुदमरायला होत. अस वाटत तो यमराज त्याच्या त्या अगडबंब रेड्यावर बसून भला मोठा दोरखंड घेऊन आपल्या दरीच येऊन उभा आहे आणि कोणत्या ही क्षणी आपल्याला उचलून नेईल. झोपेत नव्हे तर जागे पाणीसुद्धा आपल्याला तो यमराज दिसतो खरोखर. असा अनुभव कदाचित प्रत्येकाला येत असेल. मी घेतलेला आहे. म्हणून सांगतो. पण मग मी मन घट्ट केले. काय होईल ते बघू . यम जरी येऊन ठाकला तरी त्याला परतवून लाऊ असा विचार मनात आला आणि मग काय विचारूच नका.

असो मुख्य मुद्दा हा नव्हे. खूप दिवसांनी माझ्या मनावर लिहीत आहे. लेखाचे नाव लाक्षागृह असे ठेवले आहे. त्याचा अर्थ सर्वांना ठाऊक असणारच. कौरवांनी पाण्डवांसाठी तयार केलेली लाक्षागृह ही एक अशी   वास्तू होती की ज्यात जाण्यासाठी पांडव आतुर झाले पण ती जशी होती तशी ती नव्हती. ती सुंदर होती पण भ्रम होती. ते त्यांना थोड्याच वेळात कळल.

महाभारत काळातील ही गोष्ठ वाचून असे वाटते की आपले पूर्वज किती प्रगत होते. असो असेच लाक्षागृह एका कलाकाराने रेखाटले आहे. तेही रस्त्यावर. 3 D Painting द्वारे. काळ परवा अचानक फेस बुक वर मला ते दिसले. त्या कलाकाराच्या साईट वर जाऊन भेट दिली आणि काही चित्र येथे टाकत आहे. कल्पना करवत नाही की त्या रस्त्यावर चालत असतांना कसे वाटत असावे. समोर खड्डा दिसत असेल. तोल चुकला आपण त्या खड्ड्यात पडू अशी सारखी भीती ह्या हळव्या मनाला वाटत असेल. जास्त हलवा मनुष्य असेल त्याला अशा खड्ड्यात आपण पडलो असे जाणवून त्याला हृदय विकाराचा झटका आल्याशिवाय राहणार नाही. बघा तर मग. पण जरा जपून. आप आपले हृदय सांभाळा. चुकून खड्ड्यात पडू नका कारण खड्डा इतका खोल आहे की कोणी बाहे कडू शकणार नाही.

त्या ब्लॉग ची लिंक : http://www.hongkiat.com/blog/

अग बाई जरा जपून!