संथ वाहते कृष्णामाई….

संथ वाहते कृष्णामाई

तीरावरल्या सुखदुःखांची

जाणीव तिजला नाही

नदी नव्हे ही निसर्ग-नीती,आत्मगतीने सदा वाहती

लाभहानिची लवही कल्पना नाही

तिज ठायीकुणी नदीला म्हणती माता,

कुणी मानिती पूज्य देवता

पाषाणाची घडवुन मूर्ती

पूजित कुणी राही

सतत वाहते उदंड पाणी,

कुणी न वळवुन नेई रानी

आळशास ही व्हावी कैसी गंगाफलदायी?

🟣चित्रपट : संथ वाहते कृष्णामाई (1967)🔴स्वर : सुधीर फडके🟠संगीत : दत्ता डावजेकर🟡गीत : ग.दि.माडगूळकर

(02121837)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
“आपण जगासाठी
एक व्यक्ती आहात,परंतू कुटुंबासाठी आपणसंपूर्ण जग आहात”म्हणून स्वतःची काळजी घ्या!! घरी राहा – आनंदीत राहा !!!!…शुभ प्रभात…!!💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐www.manachyakavita.wordpress.com💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

कल्लोळ भावनांचा

जेव्हा जेव्हा तुझी न माझी गांठ पडते

माझ्या मनात

असंख्य भावनांचा कल्लोळ उठतो

मनातील भावना

शब्द रूपात बाहेर येण्यास आतुर होतात

पण तू

माझ्या मनातील भावनांना

कोणत्या मापदंडाने मोजाशील

तुला माझ्या भावना पटतील का नाही

ह्या भावनेने

मी प्रत्येक वेळी निशब्द होऊन जातो

मग मला वाटते

तू माझ्या चेहर्यावरील

हाव भाव ओळखशील

वाचशील

आणि ह्या भावनेने

मी पुनः शांत होऊन जातो

तुझ्या चेहऱ्यावरील

हाव भाव वाचायचा

प्रयत्न करतो

पण तो निर्विकार चेहरा पाहून

मन विषण्ण होऊन जाते.

सेक्रीफाईस

हा विषय घेऊन मी मध्यंतरी माझ्या इंग्रजी ब्लोग वर काही कविता लिहिल्या होत्या.  सेक्रीफाईस म्हणजे बलिदान. एक दिवस, तो  सुटीचा दिवस होता, आमच्या कडे दैनिंग टेबल आहे पण मला त्यावर बसून जेवण जात नाही. आपली भारतीय बैठक बरी असते. पण त्या दिवशी आम्ही तिघे दैनिंग टेबल वर जेवण करत बसलो होतो. त्यावेळी माझे लक्ष कवितेकडे होते. कोणता विषय घ्यावा अशी खलबत मनात सुरु होती.  जेवण सुरु होते म्हणून माझ्या डोक्यात तोच विषय घेवून लिहावे असे वाटले. आणि अचानक कल्पना सुचली. कि दोघे पती पत्नी दैनिंग टेबलवर जेवण करीत बसले आहेत. वेळ रात्रीची आहे. केंडल लाईट डीनर सुरु आहे. आणि कवी व दयाळू मनाचा पती आपल्या पत्नीशी संवाद साधतो कि आपण रोज ह्या केंडल च्या लाईटमध्ये जेवण करीत असतो पण तू कधी तिने आपल्या साठी काय बलिदान दिले हे तुला कधी समजले आहे का? आणि पुढे ते महाशय म्हणतात की ज्या प्रमाणे हि केंडल आपल्यासाठी बलिदान करीत आहे आपण आज उपवास ठेऊन ह्या देशाच्या गोर गरीब लोकांसाठी एक वेळ बलिदान करू. हा माझ्या कवितेचा सार. कविता येथे लिंक केली आहे.

जगात असे कितीतरी जीवजंतू , झाडे झुडपे आहेत जे इतरांसाठी बलिदान देत असतात. आंब्याचे झाड आपल्याला आंबे देते, सावली देते,इ. त्यामुळे  हाच विषय घेऊन मी आणखी एक कविता तयार केली. यावेळी मी  झाडांचे बलिदान असा विषय निवडला व मला वडाचे झाड योग्य वाटले. कारण आमच्या शहरात रस्ता रुंदिकरणाने बऱ्याच वडा च्या झाडांची कत्तल केली आहे. हे झाड अनेक वर्ष जगते. त्या कवितेचा सार मी येथे देत नाही. फक्त लिंक देत आहे. ह्या कवितेने माझ्या त्या इंग्रजी ब्लोगला चांगली प्रसिध्दी मिळवून दिली. आज पर्यंत ३०० पेक्षा जास्त लोकांनी माझी हि कविता वाचली आहे. एप्रिल च्या सुरुवातीला माझ्या ब्लॉगचे वाचक फक्त २८३ होते. आज ती संख्या फक्त ह्या एकाच कविते मुळे १२५७ वर पोहोचली आहे. माझ्या मनाचे जगभरात पसरलेले वाचक व माझ्या इंग्रजी ब्लॉग “My Blog” चे जगभरातील वाचक किती आहेत हे दाखविण्यासाठी मी दोघांचे नकाशे येथे टाकले आहेत.

( आज १३ जून २०१० पर्यंत ही कविता १५६८ वेळा विजिट केली गेली आहे.)

My Blog चे जगातील visitors

माझ्या मनाचे जगातील visitors

आशा आहे आपणाला सुध्दा ही कविता आवडेल.  आवडली तर कॉमेंट द्यावी. कॉमेंट दिल्याने प्रोत्साहन मिळते. हल्ली कोमेत मिळत नसल्याने व वेळ ही मिळत नसल्याने लिहिणे कमी झाले आहे.

My English Poems.

मित्रांनॊ माझ्या इंग्रजी कविता  Indianblogworld.com या वेब साईट वर प्रकाशित झालेल्या आहेत. त्यांची लिन्क खाली देत आहेत. ईच्छा झाल्यास वाचाव्या. आणि आवडल्यातर कॊमेंटाव्या. येथे नाही त्याच तेथेच कॊमेंट्स दिल्या तर बरे होईल.

आई साठी एक कविता मी लिहिली आहे. सर्वांना आई म्हणजे विश्व असेच वाटते. मला वाटते आपण सर्व ही कविता आवर्जुन वाचणारच.

The-Mother

मानसाने सुखी जिवन जगावे हिच त्याची ईच्छा असते. पण ह्या धकाधकीच्या जीवनात त्याला वेळ्च मिळत नाही सुख उपभोगायला. पैसा असतो पण उपभोग घेऊ शकत नाही. म्हणुनच जिकडे तिक्डे हास्य क्लब सुरु झाले आहेत. माझी दुसरी कविता Laughter is the best medicine याच विषयावर आहे.

Laughter-is-the……..

म्हातार पण आल की मनुष्य कसा हतबल होऊन जातॊ. डोक्याचे केस पांढरयाचे काळे करतो. पण काही केल्या म्हातारपण  लपविता येत नाही.  आता आमची पन्नासी उलटली म्हणजे म्हातार्पणाची चाहुल लागली. नाही चाहुल लागली हे म्हणणे चुकीचे ठरेल त्यापेक्षा म्हातारपण खिडकीतुन डोकावु लागलय अस म्हणणे उचित होईल. याच विषयावर ही माझी पुढील कविता आहे.

My Age

१ फ़ेब्रुवारी ला मुंबईला मिटिंगसाठी अम्बेसेडर ने ( ओफ़िसिअली) जात होतो. इगतपुरी मागे सुटले आणि कसारा घाट सुरु झाला. तेव्हा दाट धुके होते. त्यावरुन मी ्जिवनावर आधारित एक कविता तयार केली. ती सुध्दा वरिल वेब साईट्वर पब्लिश झाली आहे. नाव आहे Moments of my Life. जरुर वाचावी.

The Moments of My Mife

तर मित्रांनो माझ्या ह्या कविता आवडल्या तर जरुर वाचा.

मनाच्या कविता

मित्रांनो मध्यंतरी मी समर्थ राम्दास स्वामी यांच्या मनाचे श्लोक च्या स्फुरणाने काही पद्द निर्माण केले होते. ते माझ्या “मनाच्या कविता” या ब्लोग वर टाकलेले आहेत. त्यातील काही येथे सादर करित आहे. यात मी मानसाने सदा आनंदी रहावे असा संदेश दिला आहे.

माझ्या मना  दुख करू नको हे/
मना नेहमी शोक धरू नको हे//
झाले गेले सर्व सोडून द्यावे/
सदा सुखी जीवन व्यतीत करावे//१//

माझ्या मना सदा हसत जगावे/
मनी चिंता कधी नाही बाळगावी//
जीवन असे तोवर निश्चिंत राहावे/
सदा सर्वदा प्रेमाने बोलावे//२//

माझ्या मना देव पूजित जावे/
देवाने दिला देह त्याचाच मानावे//
पाषाणात हि देव हे  ध्यानी धरावे/
देवा कधी नाही विसरावे//३//

माझ्या मना सदा शांत राहावे/
कधी आपला तोल जाऊ न द्यावे//
देहाला सदा ताब्यात ठेवावे/
रागाला सदा आवर घालावे//४//

माझ्या मना नेहमी मौन पाळावे/
नसे शक्य कमी तरी बोलावे//
माझ्या मना काही तरी करावे/
नसे शक्य नकार देत जावे//५//

याला जीवन ऎसे नाव

जीवन आहे नदी समान,
उगम पावते माते पासून
जीला मानतो देवी समान,
जीवन आहे नदी समान.१.

नदीचे पात्र मोठे होते जसे,
जीवन मोठे होत जाते तसे,
नदी नाले  येऊन  मिळतात
तसेच याला मित्र भेटतात
यालाच जीवन असे म्हणतात.

दगड धोंडे अडथळा करतात जसे,
अडी अडचणी जीवनात येतात तसे,
त्यावर मात करुनी ते  पुढे सरकते कसे
कधी कधी मात्र ते चुकुन भटकत असे.

ज्याचे जितके पात्र मोठे तो तितका महान असे
इतरांना मात्र मिळ्तो मान किमान असे
यालाच जीवन असे पडले नाव असे.

प्रतिक्षा

काल  अचानक वातावरणात बदल दिसायला लागला. बघता बघता आकाशात काळे ढग जमा व्हायला लागले. आणि सूर्य त्या काळ्या ढगांमागे लपून डोकावू लागला. ढगांचे ते रूप माझ्या मनाला खूप विलोभनीय वाटले आणि मी आपल्या मोबाईलच्या केमेऱ्यात आपल्या घराच्या टेरेस वरूनच ते दृश्य कैद करून घेतले. आज चे वातावरण पाहून तर हा महिना जुलाई चालू आहे कि काय असे दिवस भर वाटत आहे. घरी असल्याने काही बाहेरची खाजगी कामं  करावी असे वाटत होते. पण वातावरणामुळे कोठे हि जायची इच्छा झाली नाही. पण ती काळ काढलेली फोटो मला पोस्त वर टाकायची होती. मग कशी टाकावी हा विचार करीत असतांना एक विरह रसाची कविता सुचली. आणि झाले कविता हि झाली आणि फोटो हि टाकले. बघा आणि, कसे वाटले ते अवश्य कळवा.badal3

प्रतिक्षा

“आज अचानक या वातावरणात बदल कसा झाला

काल पर्यंत रखरखत्या उन्हाने चकाकणाऱ्या

त्या पांढरया  शुभ्र ढगांमध्ये

अचानक हा बदलाव कसा आला.

मी हैराण आहे वातावरणातील हा बदल बघून

आणि मला प्रतीक्षा आहे तुझ्यात

असा अचानक बदल होण्याची

येशील का रे तू परत

असाच अचानक या ढगांसारखा

पळत माझ्या कडे येशील का?

सरड्यासारखा रंग बदलणाऱ्या या ढगांसारखा

तू हि रंग बदलशील का रे एक वेळा

फक्त एक वेळा येशील का रे?

आणि मला समजून घेशील का रे?

येशील का रे तू?IMG1923A

badal2