फसवणूक….

एका मित्राने फेक फोन बद्दल सांगितलेला एक अनुभव.

एके दिवशी मोबाईल ची घंटी वाजली. नंबर अनोळखी होता. थोडा वेळ वाजत राहिला. मला दया आली व मोबाईल घेतला.

एका बाईचा आवाज, “मैं प्राव्हिडंट फंड एँड इंस्युरंश आँफिस से बात कर रही हुँ। आपकी फाईल मेरे टेबल पर आई है। ”

बस येथेच गडबड झाली.माझीच नव्हे. पैसा, त्याची खनखनाट कानावर पडली किंवा चाहूल जरी लागली तरी मनुष्य सर्व भान हरपून जातो. तेच ही लोक हेरतात आणि पुढे आपल्याला गुंतवत जातात.असो.

मी सावध झालो. “कौन सी फाईल ” मी जरा आवाज चढवून विचारले.

तिने पुन्हा तेच सांगितले.

मीः “ऐसा कोई आँफिस ही नही है।”

ती डगमगली नाही.

तीः” आप कब रिटायर हुए ये बताईये.” बहुधा ती कागद पेन घेऊन नोंदवायला तयारच असावी.

मीः पहले ये बताईये आप कहाँ से मतलब मुंबई से बात कर रही है?

तीः नही, मै दिल्ली से बात कर रही हुँ।

माझा माथा ठणकला. हा फोन फेक आहे हे लक्षात आले. आता मात्र मी सावध झालो.आणि तीच्यावर प्रश्नांचा भडिमार केला.

तीने माझी माहिती विचारण्यापेक्षा मीच तिची माहिती खोलात विचारल्याने तीने वैतागून फोन डिस्कनेक्ट केला.

अशा काँलना बळी पडू नये. हल्ली वर्तमान पत्रात आपण अशा प्रकारच्या फसवणूकीच्या बातम्या वाचत असतो.

त्याचा उपयोग झाला म्हणून तो मित्र वाचला.

Advertisements

जीव वाचला…………..

https://ravindra1659.wordpress.com/2012/12/29/%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b5-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%b2%e0%a4%be/

कोयना भूकंप

आज या घटनेला 50 वर्ष झाले. मी तेव्हा म्हणजे 1967 मध्ये 8 वर्षांचा होतो. फैजपूर जि. जळगांव हे आमचे गांव. कोयनेपासून जवळ जवळ 1000 कि. मी. अंतरावर. परंतु सकाळी तिसर्या प्रहरी साखर झोपेत असतांना अचानक दाराची कडी जोरात वाजली. बाहेरून हितचिंतकांनी ही आवाज दिला व आम्ही लगेच बाहेर पडलो. त्यामुळे अनर्थ टळला. 

अत्यंत दुखःद 

आज आमच्या जल विद्युत संघटनेतील अत्यंत बुद्धिमान, 10 वर्ष मुख्य अभियंता म्हणून कार्यरत राहिलेल्या व 1996 मध्ये सेवानिवृत्त झालेल्या मा. तावरे साहेब यांचे अपघाती निधन झाले. फार वाईट वाटले. 80 व्या वर्षी सुद्धा स्वतः कार चालवत मुंबई ते पुणे प्रवास करण्याची हिम्मत असलेला मनुष्य किती धाडसी असु शकतो याचा विचार करून मन थक्क होते. या वयात सुद्धा तंदरूस्त होते. 

मी त्यांचे सोबत 1991 ते 1996 असा दिर्घ काळ काम केले होते. सतत मी त्यांच्या सोबत असे.  त्यामुळे जास्त जवळीक होती. 

पण शेवटच्या क्षणी त्याचे अंत्यदर्शन घेणे शक्य झाले नाही. त्यामुळे वाईट वाटले. 

त्यांना श्रद्धांजली वाहतो व  आत्म्यास शांती लाभो हिच प्रार्थना करतो. 

खालील फोटोत उभे राहून बोलत असलेले श्री तावरे साहेब आहेत. 

संयोग …………….

सध्या आमच्या घरातील वातावरण खूप वेगळ आहे. परवा खूप आनंद होता. अगदी गदगदायला होत होत आणि दोनच दिवसांनी वातावरण तंग झालं. माफ करा पण मी काही खाजगी गोष्टी शेअर करत असतो. जे कदाचित सर्वांना आवडत नसेल. पण मला नेहमी प्रसंग जोडायची आवड आहे. असाच एक प्रसंग.

झाल अस की कन्येने पी.एच.डी. साठी पुणे विद्यापीठाची प्रवेश परीक्षा दिली होती. दोन स्तरावरील परीक्षा तीने पार केल्या. आणि आम्ही अगदी अत्यानंदाने  भारावून गेलो. पण पी.एच.डी. करता करता ३-४ वर्ष निघून जातील. फार मोठा काळ आहे हा. हे मनात आले आणि मनावरील ताण वाढला. असो आजच सायंकाळी ती विद्यापीठातून घरी आली आणि त्याच गोष्ठी सुरु होत्या. तेव्हा माझ्या मनातील पी.एच.डी. करायची सुप्त इच्छा जागृत झाली. मनात येऊन गेले की आपण एक वेगळ्या विषयावर पी.एच.डी. का करू नये? तो विषय असा की पौराणिक काळात म्हणजे रामायण महाभारताच्या काळात जी विविध प्रकारची आयुध वापरली जायची; ज्यात विमान एक होते, यांचा अभ्यास करावा. थोड्या वेळाने सौ.ने वाचनालयातून पुस्तक बदलून आणा असा आदेश फर्मावला. सौ. च्या आदेशापुढे श्रींचे कधी चालले आहे का? ( आणि मी नाही कसा म्हणणार कारण मला बाहेर पडायला कारण हवेच असते. सिगारेट ओढायला.) मी ग्रंथालयात गेलो आणि पुस्तक चाळता-चाळता माझ्या हाती एक छानस पुअस्तक लागल. शीर्षक वेगळाच होता. “देवांच्या राज्यात” लेखक “राजेंद्र खरे” मुख पृष्ठावरच लिहील आहे,” देवांच्या राज्यातून प्रवास करत आनंद मार्गी जीवनाचा वेध घेणारं अनोख पुस्तक” खरोखर अनोख पुस्तक हाती पडल होत. घरी आल्यावर थोड चाळल तर पुस्तक आणण्यापूर्वी जे विचार मनात घोळत होते अगदी त्याच विषयाच पुस्तक होत हे जाणवलं. याला संयोग म्हणायचं की आणखी काही. अस माझ्या बाबतीत नेहमीच घडत. कदाचित इतरांच्या बाबतीत ही घडत असेल.

हा माझा खूप आवडता विषय. मग मी सौ. ला बसवलं आणि आपल प्रवचन सुरु केल. काही परिच्छेद वाचून दाखविले. त्यातील एक येथे देत आहे.

“अनेक उपासक भ्रामरी,ओंकाराच अथवा मंत्रांच विशिष्ट लयीन,आघातान उच्चार करून त्या प्रांतात जाण्याचा प्रयत्न करतात.त्यामुळे मेंदू अक्षरश: charged होतो,प्रभारित होतो. संपूर्ण शरीर प्रभारित होत.वैत विचार, नकारात्मक विचार त्यामुळे दूर होतात. सातत्यान भ्रमारीचा अभ्यास केला तर एक वेळ अशी येते की उपासकाला दिव्यानुभूती मिळून जाते.” “मंत्रांच प्रतिदिन धीरगंभीर खर्ज स्वरात उच्चारण  केल तर अतिशय प्रभावी, आल्हाददायक, उत्साहवर्धक सकारात्मक कंपनं सभोबाती निर्माण होतात. घरातील वातावरण प्रसन्न बनून जात. वाईट विचार, दुष्ट लहरी नाहीशा होतात.”

याबद्दल मला माझ्या मित्राने सांगितलेला एक प्रसंग आठवला. मित्राने सांगितले की तो कोकणात नौकरीला होता. कुटुंब सोबत नव्हते. सर्व एकटेच होते. एकदा ते सर्व मित्र कोठे जंगलात गेले. फिटर असतांना त्यांच्या पैकी एक मित्र अचानक गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पण तो केव्हा गायब झाला हे समजले नाही. सर्व घाबरले आणि त्याला शोधायला लागले. लांबून त्यांना एक नाद ऐकायला येऊ लागला. हळूहळू ते त्या नादाकडे जाऊ लागले. जवळ गेल्यावर त्यांना ओंकार सुरु असल्याचे ऐकू आले. तेथे एक देऊळ होते. देऊलासामोरचे दृश्य बघून ते चकित झाले. देऊलासमोर त्यांचा मित्र बसलेला होता पण जमिनीवर नव्हे तो जमिनीपासून साधारण पाने २ फुट वर होता. म्हणजे अधांतरी. हे जवळ गेले आणि त्याची तंद्री मोडली. तसा तो जमिनीवर येऊ लागला. ह्या मंत्रात इतकी शक्ती आहे. माझे म्हणणे असे आहे की मंत्रात नव्हे तर तल्लीनतेत इतकी शक्ती आहे. तुम्ही कोणतेही काम पूर्ण आत्मीयतेने व तल्लीनतेने केले तर फळ निश्चितच चांगले मिळते.

असो विषय खूप भरकटला आहे. आणखी ही काही सांगायचे होते पण पुनः कधी तरी.

१३ मे

मित्रांनॊ,

काल १३ मे ही तारिख होती. हा दिवस माझ्यासाठी फार महत्वाचा आहे. कारण ह्याच दिवशी मी शासकिय सेवेस सुरुवात केली होती. २६ वर्ष झाली शासनाची सेवा करुन. मी कायम प्रथम प्राधान्य नौकरीला दिलय. स्वतःचा कधीच विचार केलेला नाही. झोकुन दिलय स्वतःला.

काल एक अशी दुखद घटना  घडली की हा दिवस मला आयुष्यभर लक्षात राहिल.

माझे परम मित्र, माझे स्नेही, माझ्या कॊलेजचे माझे सिनिअर, माझ्या गावाजवळ ज्यांचे गाव होते व जे आज माझे बॊस होते त्यांचे दिर्घ आजाराने, केंसर ने दुखद निधन झाले. त्यांचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. कारण असे की पुण्याचे वास्तव्यास तेच कारणीभुत आहे. आजारपणाने त्रस्त असल्याने व कामात मदद होण्याच्या द्रुष्टीने त्यांनी माझी बदली पुण्याला होण्यासाठी खुप आग्रह धरला होता. त्यांच्यामुळेच मी ह्या पुण्यनगरीत अवतरलो नव्हे वास्तव्याला आलो. मी एकटा  नव्हे सर्व कुटुंब घेऊन अवतरलो आणि बघता बघता आम्ही ह्या नगरीच्या प्रेमात पडलो.

श्रद्धांजली म्हणुन मी पोस्ट त्यांना अर्पण करतॊ व त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो .

देवा!  हा भयावह आजार कोणाला दुश्मनाला ही होऊ देऊ नको रे बाबा!

भुत आणि भविष्य!

जापानला नुकताच भुकंप आणि सुनामि ने जबर्दस्त हादरा दिला आहे. हा हादरा एव्हढा जबरदस्त होता की याने प्रुथ्वी आपल्या जागेवरुन सरकली आणि सर्व जग आ वाचुन जापान कडे पाहात राहिले.
नेशनल जिओग्राफिक सोसायटी ने जापान बद्दल नुकतीच काही चित्र प्रसारित केली आहेत. यांचे वैशिष्ट असे आहे की हे ज्या ठिकाणांना सुनामि लाटांनी हादरा दिला त्यांचे पुर्वीचे सुवास्तु चित्र आणि आताचे विदारक चित्र यांची तुलना आपाण करु शकतो.
पहा आणि निसर्गाच्या ताकदिला ओळखा.

खालील हेडिंग वर क्लिक करा

 

भुत आणि भविष्य


BEFORE TSUNAMI

AFTER TSUNAMI