तुहिन….☁💨🌬

“तुहिन” वाचून काही कळत नसेल न मित्रांनो. हा बर्फाला पर्यायी शब्द आहे. हिम सारखा.

काल टिव्हीवर बातमी बघितली कि या वर्षी ठंडीने दिल्लीत ११८ वर्षाचे आपलेच रिकॉर्ड तोडले. खर म्हणजे ठंडी जास्त असली तर काहीच तोडता येत नाही माणसाला, थिजलेले असते न! पण हा माणूस नाही ठंडी आहे. काय तोडेल याचा नेम नाही. बादल्या तोडते, बाटल्या ही तोडते, नळ पण तोडते हो. मायनस तापमान असते न तेथे पाणी बाटलीत भरलेले असेल तर त्याचा बर्फ होतो व आकारमान वाढल्याने बाटली फुटते. कांचाची बाटली असेल तर हमखास फुटते. प्लास्टिक ची असेल शक्यता कमी असते. कारण त्या बाटलीचा आकार वाढू शकतो. असो.

पण ११८ वर्षाने दिल्लीत या महिन्यातील तापमानात चे रिकॉर्ड तोडले गेले आहे. अद्याप जानेवारी व फेब्रुवारी शेष आहेत. त्या महिन्यात काय होईल?

बातम्यांमधे हिमालयातील वातावरणाची माहिती ही सांगितली बर का! काही ठिकाणी तापमान उत्तर ध्रुवापेक्षा किती तरी जास्त आहे. मायनस ४०डिग्री. बाप रे. लोकांना जगणे कसे शक्य आहे. आपल्याकडे तर ७-८ डिग्री मधेच आपण गारठून जातो. बातम्या ही येतात अति ठंडीने मरण पावल्याच्या. मग तिकडची माणसे कशी जगत असावी!

चोहीकडे बर्फच बर्फ. वरील चित्रं हिमालयातील नाही पण बर्फाळ प्रदेशातील आहेत. गुगलवरून घेतली. गुगल बाबा ग्रेट आहेत. काही ही विचारा अचूक मिळतेच.

(19665)

☁☁☁🌬🌬💨💨💨🌬💨💨

☁🌬🌬💨💨

“नाती” आणि बर्फाचे गोळेे एक सारखेच असतात. ज्यांना बनवणं सोप पण टिकवणं खूप अवघड असतं. दोघांना वाचवण्यासाठी फक्त एकच उपाय.

“कायम शीतलता ठेवा ” !

🍃🍁🌷शुभ सकाळ🌷🍁🍃

🌬☁☁☁🌬🌬💨💨💨🌬💨☁🌬🌬💨💨
http://www.rnk1.wordpress.com

🌬☁☁☁🌬🌬💨💨💨🌬💨☁🌬🌬💨💨

फास्ट टैग आणि वेग ही….

फास्टैग(Fastag) ही एक ईलेक्र्टॉनिक टोल कलेक्शन यंत्रणा आहे. यात RFID म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन चा वापर होतो. राष्ट्रीय महामार्गावर टोल वसुली साठी प्लाझा असतात. तेथे आतापर्यंत मेन्युअल सिस्टीम होती. त्याने गर्दी खूप व्हायची. वाहनांची लाईन लागलेली असायची. काही वेळा तर तर अर्धा अर्धा तास वाट बघत बसावे लागते. याने वेग मर्यादा येते, पेट्रोल/ डिझेल जास्त खर्ची होते आणि वेळ खूप वाया जातो. आता हा टेग लावला कि टोलसाठी थांबायची गरज नाही. आपल्या वेगाने पुढे निघून जायचे पैसे तुमच्या अकाऊंट मधून आपोआप वळते होतील.

प्रश्न हा आहे जर त्याक्षणी काही कारणास्तव बँकेशी यंत्रणा संपर्क साधू शकली नाही तर काय होईल? म्हणजे पैसे लगेच वळते होतील. का नंतर ही होऊ शकतील. पैसे मिळाल्या शिवाय वाहन पुढे जाणार नसेल. मग अशा वेळी पुन्हा ट्राफिक….. असो याचा विचार झाला असेलच. मी सहज मनात आले म्हणून विचार मांडले.

मी १९९८ मधे जापानला गेलो होतो. तेव्हा तेथे ही अजून असे टेग आले नव्हते. गाडी उभी करूनच टोल भरावा लागत असे. त्याकाळी आपल्याकडे टोल सिस्टीम सुरू झाली नव्हती.

असो, पण या यंत्रणेने वाहनांचा वेग वाढेल व गंतव्य स्थानी जाण्यासाठी जास्त वेळ खर्ची पडणार नाही हे मात्र नक्की.

(19655A)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आयुष्याने शिकवलेलं एक वाक्य…
“जिंकलो तर आवरायचं आणि हरलो तर सावरायचं…”

💐💐सुप्रभात🌼🌼

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

साक्षात यमराजच…

काही दिवसांपूर्वी दिल्लीत एक भयंकर अग्नीकांड घडले. आगीत जवळजवळ ४३ लोकं जळून मेली. माणसाच्या एका छोट्या चुकीचे इतक्या मोठ्या रुपात रुपांतर होणे ही एक शोकांतिका आहे.

थोड्या पैशासाठी किंवा काय झालं दुरुस्ती नाही केली तर, काही होत नाही त्याने, असे गैरसमज करुन घेऊन जीव धोक्यात घालने कितपत योग्य आहे. जस जसी इमारत जुनी होत जाते त्यातील वायरिंग ही जुनी होत जाते. मानुस जुना झाल्यावर त्याची ताकद कमी होते हे आपणा सर्वांना कळते पण वास्तू अगर वस्तू जूनी झाल्यावर तिची ताकद कमी होईल हे आपण मान्य करत नाही. आपल्याला फक्त आपण प्रिय असतो असे आपल्याला वाटते. पण आपण आपलेच वैरी ही असतो हे आपल्याला कधी समजलेच नाही. कारण हे वैर छुपे असते. जेव्हा आपण ‘काय होते त्याने’ हे वाक्य उच्चारले कि आपण आपलेच वैरी आहोत हे सिद्ध होते.

जसे जुन्या वायरिंग वर घरातील अगर कारखान्यातील लोड वाढवत गेले तर ती वायरिंग तग धरेल का? तिला तो भार सोसवेल का? याचा आपण विचारच करत नाही. आपल्याला हे कळते कि आपण आता म्हातारे झालोय वजन उचलू शकत नाही. आपल्या मुलाबाळांना कळतं कि बाबा तुमच वय झालय झालय आता तुम्ही वजन उचलून आजारपण ओढवून आम्हाला त्रास देऊ नका. तेव्हा हे का हो कळत नाही कि इमारत जूनी, त्यातील वियरिंग ही जूनी तिला वाढीव भार कसा सोसवेल? आणि काही झाले तर?!! येथे गोंधळ होतो. आणि मन म्हणते काही होत नाही थोड्याफार बदलाने.

(फोटो:गुगल)

आणि म्हणून अशा घटना घडतात व नाहक लोकांचा जीव जातो.

या दिल्लीत झालेल्या घटनेतील आणखी एक गोष्ट मनाला चटका लावून गेली. हल्ली गरीबात गरीब माणसाकडे मोबाईल हा असतोच. जी लोकं हे अग्नी तांडव सुरू होते तेव्हा त्यात अडकले होते त्यांनी आपल्या नातेवाईक किंवा मित्रांना मोबाईल वरुन संपर्क साधला. त्यांना आपण कशा परिस्थितीत अडकलो आहोत हे सांगितले. आपल्याला वाचवा किंवा या मरणयातनेतून बाहेर काढा अशी विनंती ही केली. हे त्यांचे संभाषण टीव्हीवर ऐकवले तेव्हा मन विषण्ण झाले हो. मन रडू लागले. काल एका गरीबाचं संभाषण पेपरात छापून आलं होतं. त्याने अशा वेळी म्हणजे जीवनाच्या अंतिम क्षणी आपल्या बायका पोरांना किंवा आई वडिलांना फोन न लावता मित्राला फोन लावला. त्याला हकिकत सांगितली. आणि मित्राला विनवणी केली कि “माझ्या घरच्यांकडे लक्ष दे, त्यांची काळजी घे.” किती मरणयातना होत असतील त्यावेळी माणसाला. काय म्हणत असेल त्याचा जीव. साक्षात यमराज समोर येऊन ठाकलाय. काही क्षणातच तो आपले जीवहरण करून घेऊन जाणार आहे. अशा ही क्षणी पहिल्यांदा आपल्या घरच्यांची काळजी करणे !केवढं हे प्रेम हो. पण घरचे असं प्रेम करत असतात त्याच्यावर? नाही, मुळीच नाही. जर खरच प्रेम असतं तर ती बायको सतत छळत नसली असती त्याला. असो. पण पुरुषाचे प्रेम कधीच कोणाला दिसत नाही व दिसणार ही नाही कारण ते मनापासून मनातून व मनाला भिडलेले असते.

(19650)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

👍आपल्या निःस्वार्थी कर्माने दुसऱ्यांच्या मनात घर करून जगणे हीच जीवनातील सर्वात मोठी कमाई आहे!

💐💐सुप्रभात💐💐

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.manachyakavita.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

नाबाद ९७

फिल्म जगताचा एके काळचा बादशहा, अप्रतिम अभिनय क्षमता असलेला अशा एका अभिनेत्याने परवा ९७ वा वाढदिवस साजरा करून ९८ व्या वर्षांत पदार्पण केले आहे. ह्या अभिनेत्याचे नाव आहे “दिलीप कुमार”. इतके आयुष्य लाभलेला हा एकमेव अभिनेता असावा असे मला वाटते.

मधुबन मे राधिका नाची रे, कोई सागर दिल को बहलाता नही, अशा सुमधुर व सुश्राव्य गीतांची आठवण होते जेव्हा या कलाकाराची आठवण येते.

तुम जिओ हजारो साल……

(19649B)

प्रदूषण एक गंभीर समस्या…..

पूर्वी जर एखाद्या कडून कोणते काम करणे शक्य नसे व हळूहळू सुरुवात होत असे तर दिल्ली अभी बहुत दूर है. असे म्हटले जात असे. उपरोधिक असा अर्थ होत असे या म्हणीचा.

ही म्हण आज ही प्रचलित आहे.

आता हिच म्हण आणखी एका वेगळ्या संदर्भाने प्रचलित होत चालली आहे. ती म्हणजे प्रदूषण.

एखाद्या शहरात प्रदूषण वाढायला लागले कि आता असे म्हटले जाते ……. शहराचे आता दिल्ली होण्यापासून कोणी रोकू शकणार नाही. किंवा …….. चे आता लवकरच दिल्ली होणार.

सद्ध्या दिल्ली शहर हे प्रदूषणाच्या चरम सीमेवर पोहोचले आहे. टिव्हीवर रोजच या विषयी बातम्या असतात. या शहराची परिस्थिती अशी आहे कि लहान मुलं सुद्धा मास्क लावल्याशिवाय बाहेर पडू शकत नाहीत. याला काय म्हणायचे. इतकी वाईट परिस्थिती का झाली या शहराची? कशामुळे झाली? याचा विचार प्रत्येक माणसाने करायला हवा. नियम किती ही केले तरी तितकासा फरक पडत नाही. शेवटी स्वयंशिस्त हा एकच पर्याय उरतो.

आजच बातमी वाचली. नियमांची कडकपणे अंमलबजावणी झाल्याने रस्त्यावरील अपघात कमी झाले, प्राणहानी कमी झाली.

पण थोडी स्वयंशिस्त लावली तरी हे शक्य होते. मी विरुद्ध दिशेने गाडी चालवणार नाही, सिग्नल तोडणार नाही हे मनाने ठरवले तर अपघात होणारच नाहीत.

तसेच प्रदूषणाचे ही आहे. बातम्यांमध्ये सांगितले जाते कि पंजाब, हरियाणा व राजस्थान येथील शेतकरी शेतातील कडबा किंवा कचरा पेटवतात म्हणून प्रदूषण होत आहे. यावर उपाय असायलाच हवा. जसे तो कचरा क्रश करून जनावरांना खाऊ घालतात, किंवा त्याला सडवून शेतात खत म्हणून वापर करायला हवा, किंवा कागद बनविण्यासाठी वापरायला हवा, इ.इ.

(19639)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

🌹🌿शुभ सकाळ🌹🌿

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.manachyakavita.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

मात्रुदुग्ध पेढी….

मध्यंतरी वर्तमान पत्रात एक आगळी वेगळी बातमी वाचण्यात आली होती. एक अमेरिकन तरुणी पुण्यात ऑफिस कामानिमित्त दहा दिवसांसाठी आली. ती सॉफ्टवेअर इंजिनिअर होती. तिने नुकताच एका बाळाला जन्म दिला होता. म्हणजे ती तरूणी नसून एक माता आफल्या लहानग्या ताण्हुल्याला सोडून परदेशात आली होती.

ही माता किती संवेदनशील असावी याची कल्पना पुढील बातमी वरून येईल. तिने भारतात येण्यापूर्वी बाळापासून लांब गेल्यावर जो पान्हा फुटेल त्याचे काय करावे याचा आधी च विचार केला. गुगल वर सर्च करून माहिती मिळविली. पुण्यातील ससुन या सरकारी दवाखान्यात आईच्या दुधाची पेढी आहे हे तिला समजले. त्या माऊली ने ईमेलवर संपर्क केला. आधीच सर्व व्यवस्था केली मग आली. तिच्या वास्तव्यकाळात तिने सात लिटर दुध दान केले. अशा प्रकारे तिने पुण्याशी कायमचा संबंध प्रस्थापित केला.

सॉफ्टवेअर इंजिनिअर असून सुद्धा ही माता किती संवेदनशील आहे हे यावरून सिद्ध होते.

इतकेच नव्हे आईच्या दुधाची पेढी असते ही नवीन माहिती समजली.

(19624)

http://www.manachyakavita.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

💐💐💐शुभ सकाळ💐💐💐

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

अफाट अंतराळ…(19612)

मित्रांनो, आताच वर्तमानपत्रात बातमी वाचली कि नासाचे व्हॉएजर-२ या यानाने चार दशकानंतर अंतराळ प्रवासाचा मोठा टप्पा गाठला आहे. त्याने आपल्या अफाट अशा सौरमालेची सीमा ओलांडून वेगळ्या आंतरतारकीय( हा एक नवीन शब्द ऐकण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय तसा हा आंतरतारकीय) अवकाशात प्रवेश केला आहे.

म्हणजे आपल्या सौरमालेच्या बाहेर या यानाने पाऊल टाकले आहे. याबद्दल ची बातमी खालील लिंक वर आहे. https://www.indiatoday.in/science/story/nasa-voyager-2-become-second-spacecraft-reach-interstellar-space-1615948-2019-11-05

हे या २० ऑगस्ट १९७७ रोजी नासाने अंरराळात पाठविले होते. त्याचे मॉडेल गुगलवरून शोधून येथे सादर केले आहे.

याबद्दल ची आणखी माहिती हवी असल्यास विकिपीडियाच्या

https://en.m.wikipedia.org/wiki/Voyager_2 या लिंकवर उपलब्ध आहे.